मिरजमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई; लाखोंची गोवा बनावट दारू जप्त!
मिरजमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई; लाखोंची गोवा बनावट दारू जप्त! विजय पाटील
महाराष्ट्र

मिरजमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई; लाखोंची गोवा बनावट दारू जप्त!

विजय पाटील

सांगली :  31 डिसेंबरच्या तोंडावर सांगलीत (Sangli) उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली आहे. मिरजेतुन (Miraj) तब्बल 57 लाखाची गोवा (Goa) बनावटीची बेकायदेशीर दारू जप्त करण्यात आली आहे. एका कंनटेनरमधून मैदा पोत्याच्या आड लपवून दारू (Alcohol) आणली जात होती. गोवा राज्यातून (state) बेकायदेशीररित्या महाराष्ट्रात (Maharashtra) आणली जाणारी दारू उत्पादन शुल्क विभागाने सापळा रचून पकडली आहे.

हे देखील पहा-

ही कारवाई मिरज- पंढरपूर (Pandharpur) मार्गावर मध्यरात्रीच्या सुमारास हि कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये एका कंटेनरसह 57 लाखाची दारू जप्त करण्यात आली. उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक संध्याराणी देशमुख यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. गेल्या महिनाभरात राज्य उत्पादनशुल्क विभागाने 44 लाख 17 हजार रुपयांची गोवा बनावटीची दारू जप्त केली. एप्रिल ते डिसेंबर या 9 महिन्यांत तीन कोटी 19 लाख रुपयांची दारू जप्त केली आहे.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Court Raps Ed: खटल्याला उशीर झाला, आरोपींनी अधिकची शिक्षा भोगली, ईडीला कोर्टाने फटकारलं

Madha Constituency: झुकणार नाही लढणार! निवडणुकीनंतर अनेक गोष्टींना तोंड देण्याची माझी तयारी; धैर्यशील मोहिते पाटलांचे फडणवीसांना प्रतिआव्हान

Bhabha Hospital News : पेशंटकडून नर्सला मारहाण, कर्मचाऱ्यांकडून कामबंद आंदोलन

Panchayat 3 Released Date : अखेर ठरलं..., 'पंचायत ३' याच महिन्यात रिलीज होणार; कहाणीत कोणता नवा ट्वीस्ट येणार ?

Today's Marathi News Live : राणे-तटकरेंचा पराभव करण्यासाठी ठाकरे पितापुत्र कोकणात

SCROLL FOR NEXT