औरंगाबादमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई; लाखोंची बनावट दारू जप्त!  
महाराष्ट्र

औरंगाबादमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई; लाखोंची बनावट दारू जप्त!

या कारवाईत एका चारचाकी आणि एका दुचाकी वाहनासह बनावट निर्मितीची दारू व दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

-- अविनाश कानडजे

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये नवीन वर्षाच्या उंबरठ्यावर बनावट विदेशी दारु विरुद्ध राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक, भरारी पथक यांनी संयुक्त कारवाई करत एक चारचाकी आणि एक दुचाकी वाहनासह बनावट निर्मितीची दारू व दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

हे देखील पहा :

राज्य उत्पादन शुल्क विभागाला आणि राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाला मिळालेल्या खात्रीलायक गुप्त बातमीनुसार, पडेगाव ते मिटमिटा सरकारी रोडवरील शनीमंदीर समोर पडेगाव येथे निरीक्षक उत्पादन शुल्क भरारी पथकाने छापा मारला असता त्या ठिकाणी एक मारुती सुझुकी कंपनीची इको हि चारचाकी गाडी आढळून आली. या चारचाकीत संपूर्ण बनावट तयार केलेल्या विदेशी मद्य १८० मि.ली क्षमतेच्या एकूण 1200 बनावट बाटल्या आढळल्या.

तसेच चारचाकी आणि दुचाकी वाहनासह एकूण 8 लाख 67 हजार रुपयेचा मुद्देमाल मिळून आला. वैभव परशुराम खरात आणि राहूल पांडूरंग बालझडे या दोन आरोपींना ताब्यात घेतले असून, इतर दोन फरार आरोपी सागर संतोष जैस्वाल आणि दत्ता नानासाहेब वारे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Super Earth discovery: नासाने शोधला Super-Earth! पृथ्वीपेक्षा 36 पट मोठा आहे ग्रह; वाचा शास्त्रज्ञांनी कसा शोधला?

Patolya Recipe: नागपंचमी स्पेशल मऊ लुसलुशीत पातोळ्या कश्या बनवायच्या? रेसिपी वाचा

Ladki Bahin Yojana: पुरूष लाभार्थी घुसलेच कसे? लाडकी बहीण योजनेत ४८०० कोटींचा घोटाळा

Maharashtra Live News Update : कोकांटेंचा राजीनामा नाहीच, फक्त खाते बदल होणार,सूत्रांची माहिती

मुंबई-आग्रा महामार्गावर बसचा भीषण अपघात, ८ वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू, १५ जखमी, ४ जणांची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT