गुटखा तस्करी
गुटखा तस्करी संजय राठोड
महाराष्ट्र

गुटखा तस्करीसाठी अनोखी शक्कल; पोलिसांच्या सतर्कतेमुळे आरोपींचा फर्दाफाश

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय राठोड -

यवतमाळ : यवतमाळमधील Yavatmal दिग्रस येथे गुटखा तस्करांनी अनोखी शक्कल लढवत टान्स्पोर्टच्या ट्रकमधून (Transport Truck) गुटख्याची तस्करी करण्याचा प्रयत्न केला होता. यासाठी त्यांनी किराणा, कटलरी, कापडाची वाहतूक करणाऱ्या टान्स्पोर्टच्या ट्रकचा वापर केला होता मात्र हा त्यांचा डाव उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी उधळून लावला आहे.

हे देखील पहा -

उपविभागीय पोलीस अधिकारी दारव्हा यांनी 14 लाख 72 हजारांचा गुटखा, सुंगधी तंबाखू व ट्रक जप्त केला आहे. एकूण 7 जणा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या कारवाई मुळे टान्स्पोर्ट व वाहन चालकात मोठी खळबळ उडाली आहे. अमरावती व दिग्रस येथील एकूण 7 जणांविरोधात अन्न सुरक्षा प्रतिबंधात्मक कायदा व कलम 328 नुसार दिग्रस पोलीस स्टेशनमध्ये (Digras Police Station) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अमरावती वरून पुसदला माल घेऊन जाणाऱ्या विजय टान्सपोर्ट ट्रक क्रमांक MH 05 K 8996 या टान्सपोर्ट ट्रकमधून गुटखा व सुंगधित तंबाखू जात असल्याची गोपनीय माहिती दारव्हा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी तथा सहायक पोलीस अधीक्षक आदित्य मिलखेलकर यांना प्राप्त होताच त्यांनी आपल्या वाहतूक शाखेच्या चमूच्या साहाय्याने सापळा रचून दिग्रस येथील नवीन बसस्थानका जवळ ट्रक ताब्यात घेऊन दिग्रस पोलीस स्टेशनला आणून झडती घेतली असता त्यातून लाखो रुपयाचा गुटखा व सुगंधित तंबाकू मिळून आला.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kitchen Tips: साबण आठवड्यातच संपतो ?; फॉलो करा 'या' टीप्स

MI Playoffs Scenario: मुंबई इंडियन्सला अजूनही प्लेऑफमध्ये जाण्याची संधी! कसं असेल समीकरण?

Madha Lok Sabha: माढ्यात शरद पवार गटाला मोठा धक्का बसणार? बडा नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत

Ranbir - Sai Photos Viral Ramayana Movie : ‘रामायण’ चित्रपटाच्या सेटवरील रणबीर कपूर आणि साई पल्लवीचा फोटो व्हायरल, लूक पाहून नेटकरी म्हणाले...

Shirur Lok Sabha: शिरूरमध्ये प्रचारावरून वातावरण तापलं; अमोल कोल्हेंचा हल्ला, तर आढळरावांचा प्रतिहल्ला

SCROLL FOR NEXT