लेखाधिकारी कार्यालयात दोन लाचखोरांना रंगेहाथ पकडले विजय पाटील
महाराष्ट्र

लेखाधिकारी कार्यालयात दोन लाचखोरांना रंगेहाथ पकडले

विजयनगर येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील लेखाधिकारी, लेखापरीक्षण पथक शिक्षण विभागात ही कारवाई करण्यात आली आहे.

विजय पाटील

सांगली: निवडश्रेणी आणि वेतनश्रेणीचे काम पूर्ण करून देण्यासाठी पाच हजार रूपयाची लाच घेताना लेखाधिकारी बाबासो महादेव जाधव आणि कनिष्ठ लेखापरीक्षक बबन रामचंद्र कोळी या दोघांना अटक करण्यात आली आहे. विजयनगर येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधील लेखाधिकारी, लेखापरीक्षण पथक शिक्षण विभागात ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे परिसरात लाच खोरीची चर्चा रंगली होती.

तक्रारदार यांची निवडश्रेणी पडताळणी स्टॅम्पिंगसाठी व मित्र यांची वरिष्ठ वेतनश्रेणी पडताळणी व स्टॅम्पिंग मिळण्यासाठी लेखाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल केला होता. या कार्यालयातील लेखाधिकारी जाधव व कनिष्ठ लेखापरीक्षक कोळी यांनी निवडश्रेणी व वेतनश्रेणीचे काम पूर्ण करण्यासाठी पाच हजार रूपये लाचेची मागणी केली होती. लाच मागितल्यानंतर तक्रारदारांनी ५ ऑगस्ट रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचेची तक्रार आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी केली. तेव्हा जाधव व कोळी या दोघांनी पाच हजार रूपये लाचेची मागणी करून रक्कम घेऊन येण्यास सांगितल्याचे स्पष्ट झाले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज विजयनगर येथील प्रशासणाच्या इमारतीमध्ये सापळा रचला होता. तेव्हा तक्रारदाराकडे पाच हजार रूपये लाच मागून ती रक्कम स्विकारताना महादेव जाधव व कोळी या दोघांना रंगेहाथ पकडले. या कारवाईनंतर प्रशासकीय इमारतीमध्ये चर्चेला उधान आले होते उडाली होती. लाचप्रकरणी जाधव व कोळी या दोघांविरूद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : यापुढे बोलताना काळजी घेईल, कोकाटेंचे स्पष्टीकरण

Maharashtra Politics : माणिकराव, तुमच्यामुळे सरकारची बदनामी होतेय, अजित पवारांकडून राजीनाम्याचे संकेत

Sanjay Dutta Education: शिक्षण अर्धवट सोडले अन् अभिनयाचे गिरवले धडे; संजय दत्त किती शिकलाय?

Nashik To Akkalkot: गुड न्यूज! ६ राज्यांमधून जाणार महामार्ग, नाशिक ते अक्कलकोट ४ तासांत पोहचता येणार; ही शहरं येणार जवळ

Akkalkuwa News : प्रसूतीसाठी झोळीत टाकून पायपीट; रस्त्याअभावी रुग्णालयात पोहचणे अशक्य, माघारी फिरत घरीच प्रसूती

SCROLL FOR NEXT