नगर-पुणे महामार्गावर भीषण अपघात; चार जण जागीच ठार!  Saam Tv
महाराष्ट्र

नगर-पुणे महामार्गावर भीषण अपघात; चार जण जागीच ठार!

नगर-पुणे महामार्गावर दोन मालवाहू ट्रक व दुचाकीच्या भिषण अपघातात चार जण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहीती आहे.

सचिन आगरवाल

सचिन आगरवाल

अहमदनगर: नगर-पुणे महामार्गावर Pune- Nagar Highway Accident दोन मालवाहू ट्रक व दुचाकीच्या भिषण अपघातात चार जण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहीती आहे. दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास पारनेर तालुक्यातील जातेगाव शिवारात हा अपघात झाला असून सुपे पोलिसांनी क्रेनच्या मदतीने वाहनांमध्ये, वाहनाखाली अडकलेले मृतदेह काढण्यात आले आहेत.

हे देखील पहा-

अशी झाली धडक;

पुण्यावरून नगरकडे चाललेल्या कंटेनरने अचानक ब्रेक दाबला आणि त्यामुळं पाठीमागून वेगाने येणाऱ्या ट्रकची कंटेनरला जोरात धडक बसली. धडकेदरम्यान काळात दोन्ही वाहनांच्या मधोमध चाललेल्या दुचाकीलाही ट्रकने ठोकर दिली आणि दुचाकी ट्रकखाली जाऊन त्यावरील दोघांचा जागीच मृत्यू झाला.

अचानक ब्रेक लावल्यामुळे ट्रकमधील पाईप बॉडी तोडून केबीनमध्ये शिरले. त्यात ट्रक चालकासह क्लिनरचा देखील मृत्यू झाली अशी माहीती आहे. तर संबंधित ट्रकमध्ये आणखी किती व्यक्ती आहेत याची अद्याप पोलिसांकडे माहीती नाही. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

शहारे आणणारे दृष्य;

अपघात झाल्यानंतर प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहीनुसार, ट्रकखाली तसेच ट्रकमधील रक्ताच्या थारोळया पडलेल्या अवस्थेत मृतदेह होते.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नांदेड जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाची जोरदार हजेरी

Shocking: भुकेनं व्याकुळ मुलानं दूध मागितलं, संतापलेल्या बापानं ४ वर्षाच्या पोराला दरवाजावर आपटलं

राज्यातील 80 लाख महिला अपात्र! ₹1500 सरकारच्या डोळ्यात खुपताय का?

पोटावरची चरबी झटक्यात उतरेल! सकाळी दुधासोबत प्या 'या' हिरव्या पानांची पावडर

Satbara Utara : कामाची बातमी! ५ मिनिटात घरबसल्या काढा सातबारा, फक्त ₹१५ होणार खर्च; पाहा 7/12 ऑनलाइन काढण्याची सोपी प्रोसेस

SCROLL FOR NEXT