Sambhaji Bhide Guruji News SaamTVNews
महाराष्ट्र

संभाजी भिडेंचा अपघात; चक्कर येऊन सायकलवरुन पडले, खुब्याला मार!

नेहमीप्रमाणे मंदिरात जात असताना त्यांना अचानक चक्कर आली आणि ते सायकलवरुन खाली पडले असून गंभीर जखमी झाले आहेत.

विजय पाटील साम टीव्ही सांगली

सांगली : नेहमी वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असणारे शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांचा सांगलीमध्ये (Sangli) अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. सायकल चालवत असताना चक्कर आल्याने संभाजी भिडे अचानक जमिनीवर पडले. या अपघातात (Accident) त्यांना कमरेखाली खुब्याला मार लागला असून ते गंभीररीत्या जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर सांगलीच्या भारती हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले आहे. (Sambhaji Bhide Cycle Accident)

हे देखील पाहा :

सांगली शहरातील गणपती पेठ येथे असणाऱ्या गणपती मंदिरात संभाजी भिडे नित्यनियमाने सायकलवरूनच दर्शनासाठी जात असतात. आजही नेहमीप्रमाणे मंदिरात जात असताना त्यांना अचानक चक्कर आली आणि ते सायकलवरुन (Cycle) खाली पडले. शिवप्रतिष्ठानचे प्रमुख असणारे संभाजी भिडे यांचे सध्या एक विधान वादाचा मुद्दा बनले आहे. ''भारताला तीन बाधा झाल्या आहेत. एक म्लेंच्छ बाधा, दुसरी आंग्ल बाधा आणि तिसरी गांधी बाधा. एकवेळ विषबाधा आणि भूतबादेवर उपाय मिळेल, पण यावर नाही" असे वक्तव्य त्यांनी केले होते. या वक्तव्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका सुरु आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : कोल्हापूर हादरले! मंदिर परिसरात नववीत शिकणाऱ्या मुलीची हत्या; आरोपी CCTV मध्ये कैद, परिसरात खळबळ

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT