beed, accident saam tv
महाराष्ट्र

Beed : कोद्री नदीच्या पुलावरून टॅंकर काेसळला; चालक सुखरुप

क्रेनच्या साह्याने टॅंकर नदी पात्रातून बाहेर काढण्यात आला.

विनोद जिरे

बीड : अंबाजोगाई - केज महामार्गावरील (highway) कोद्री नदीच्या पुलावरून काँक्रीटचा टँकर तीस फूट खाली काेसळला. हा अपघात आज (बुधवार) दुपारी एकच्या सुमारास झाला. या अपघातात (accident) टँकरचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने चालक बचावला आहे. (beed latest marathi news)

अंबाजोगाई - केज महामार्गवरील कोद्री नदीच्या पुलावर सातत्याने अपघात हाेत आहेत. आज दुपारी एकच्या सुमारास रेडी मिक्स सिमेंट काँक्रीट भरलेले टँकर क्रमांक एमएच 15 एफव्ही 5158 हा अंबाजोगाईच्या दिशेने जात हाेता. होळ आणि लोखंडी सावरगाव दरम्यानच्या कोद्री पाटी जवळ टॅंकर आला असता ताे कोद्री नदीच्या पुलावरून नदीपात्रात कोसळला.

या अपघातानंतर तातडीने घटनास्थळी पाेलिस पाेहचले. या अपघातातून चालक बचावला. क्रेनच्या साह्याने टॅंकर नदी पात्रातून बाहेर काढण्यात आला. दरम्यान या महामार्गावर अनेक कामे अर्धवट असल्याने अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळं तात्काळ रखडलेले कामे पूर्ण करा अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhattisgarh Encounter: छत्तीसगडमध्ये मोठी चकमक, ५ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश

Gold Price Today: स्वस्त झाल्यानंतर सोन्याचे भाव आज पुन्हा वाढले; पाहा किती आहे 24 कॅरेटचा भाव?

New Marathi Movie: प्रथमेश परब आणि शशांक शेंडेचा 'श्री गणेशा' लवकरच; चित्रपट या दिवशी होणार रिलीज

Maharashtra News Live Updates: छत्तीसगडमध्ये चकमक, ५ नक्षलवाद्यांचा खात्मा

IND vs SA: भारत - दक्षिण आफ्रिका सामन्यात पडला रेकॉर्ड्सचा पाऊस; संजू- तिलकने मोडून काढले हे मोठे रेकॉर्ड्स

SCROLL FOR NEXT