ACB, Bribe, Pandharpur
ACB, Bribe, Pandharpur Saam Tv
महाराष्ट्र

Pandharpur News : एक लाख रुपयांची लाच घेताना मंडल अधिकारी सापडला, दाेघांवर गुन्हा दाखल

भारत नागणे

Pandharpur Crime News : अवैधरित्या मुरूम उत्खनन आणि वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा न दाखल करण्यासाठी एक लाख रुपये घेताना पंढरपूर तालुक्यातील तुंगत गावचे मंडल अधिकारी रणजीत मोरे यांच्यासह शरद मोरे या नागरिकास शुक्रवारी लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले. या दाेघांवर एसीबीने पाेलिसांत (police) गुन्हा (crime) दाखल केला आहे.

तक्रारदाराने भाड्याच्या जेसीबीच्या सहाय्याने मुरुमाचे बेकायदेशीर उत्खनन केले होते. तसेच स्वतःच्या टिप्पर मधून वाहतूक देखील केली होती. यावर मंडल अधिकारी रणजीत मोरे यांनी‌ याप्रकरणी गुन्हा नोंद न करण्यासाठी रणजीत मोरे यांनी खाजगी व्यक्ती शरद मोरे ( रा. मुंडेवाडी तालुका पंढरपूर ) यांच्यामार्फत तब्बल एक लाख रुपयाची लाच (bribe) मागितली होती.

जेसीबी आणि टिप्परवर कारवाई न करणे, गुन्हा दाखल न करणे यासाठी एक लाख रुपये द्यायचे ठरले. दरम्यान संबंधित व्यक्तीने (pandharpur) लाच लुचपत विभागाकडे तक्रार दिली. दरम्यान एक लाख रुपयाची लाच स्वीकारताना शरद मोरे (नागरिक) आणि मंडल अधिकारी रणजीत मोरे यांना लाच लुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे. (Maharashtra News)

Edited By : Siddharh Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Esha Gupta च्या बोल्ड फोटोंची एकचं चर्चा, फोटो पाहून चाहते थक्क

Custard Apple Benefits : डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी सीताफळ उपयुक्त; जाणून घ्या आरोग्यदायी फायदे

Special Report : बारामतीत मडकं फोडणारा "तो" कार्यकर्ता कोण?

Special Report : तुम्हारे पास क्या है? कोल्हेंच्या डायलॉगबाजीने अहमदनगरात वातावरण तापलं

Mithila Palkar : ‘वेब क्वीन’ मिथिलाचा अनोखा साज, लूकने वेधले लक्ष

SCROLL FOR NEXT