bribe news, sangli news, sangli Latest Marathi News, Ravishnakar chavan Saam Tv
महाराष्ट्र

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने रिक्षा चालकाकडून घेतले एक हजार रुपये; गुन्हा दाखल

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकवर झालेल्या कारवाईमुळे सांगली पोलीस दलात खळबळ माजली आहे.

विजय पाटील

सांगली : एक हजार रुपयांची लाच घेताना एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (acb) अटक केली आहे. रिक्षाचालकावर कारवाई न करण्यासाठी मिरजेच्या (miraj) महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्यात कार्यरत असणा-या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रवीशंकर चव्हाण (ravishankar chavan) यास लाच (bribe) स्विकारताना अटक (arrest) करण्यात आली आहे. (sangli latest marathi news)

मिरजेच्या महात्मा गांधी चौक पोलिस ठाणे याठिकाणी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असणा-या रवीशंकर रामचंद्र चव्‍हाण (वय 53) याने एका वडाप रिक्षा चालकास कारवाई न करण्यासाठी एक हजार रुपये लाचेची मागणी केली. ही मागणी चव्हाण याने 10 जूनला केली होती. त्यानंतर संबंधित रिक्षाचालकाने लाचलुचपत विभागाकडे याबाबतची तक्रार नोंदवली होती. त्याची पडताळणी केल्यानंतर 15 जूनला महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याच्या बाहेर सापळा रचून रिक्षाचालकाकडून एका हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रवीशंकर चव्‍हाण यास रंगेहात पकडले.

याप्रकरणी महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्यामध्येच रवीशंकर चव्हाण याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सांगलीचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सुजय घाटगे (sujay ghatge) यांनी दिली आहे. दरम्यान सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकवर झालेल्या कारवाईमुळे सांगली पोलीस दलात खळबळ माजली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bangle Designs: नववधूच्या सौंदर्यात पडेल भर! 'या' ५ आहेत बांगड्यांच्या लेटेस्ट आणि युनिक डिझाइन्स

Mobile Battery Saving Tips: ...म्हणून तुमच्या मोबाइलची बॅटरी खटाखट उतरतेय, आताच ही सेटिंग बदला

Buldhana : डॉक्टर होण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं! कॉलेजला जातानाच १९ वर्षाच्या ॠतूजाचा मृत्यू

Maharashtra Live News Update: महायुतीची ठाण्यात होणार आज बैठक; जागा वाटपांवर होणार चर्चा

Breakup Tips: पार्टनरला न दुखावता कसं कराल ब्रेकअप? या सोप्या टीप्स करतील तुमची मदत

SCROLL FOR NEXT