Minister Narhari Zirwal Saam tv
महाराष्ट्र

Nashik News: नरहरी झिरवाळांच्या मतदारसंघात ACB ची मोठी कारवाई, महिला सरपंचाला लाच घेताना रंगेहाथ पकडलं

ACB Catches Sarpanch Red Handed Taking Bribe: मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मतदारसंघामध्ये एसीबीने मोठी कारवाई केली. याठिकाणी एका महिला सरपंच आणि तिच्या पतीला लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडलं.

Priya More

Summary -

  • मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मतदारसंघात एसीबीची मोठी कारवाई

  • दिंडोरी तालुक्यात सरपंच आणि त्यांच्या पतीला लाच घेताना एसीबीने अटक केली

  • अविश्वास ठराव नामंजूर करण्यासाठी लाच मागितल्याचा आरोप

  • नरहरी झिरवाळ यांच्या मतदारसंघात झालेल्या कारवाईमुळे चर्चांना उधाण

अभिजीत सोनवणे, नाशिक

मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालातील कार्यालयात एसीबीने काही दिवसांपूर्वी छापा टाकत क्लर्कला लाच घेताना रंगेहाथ पकडलं होतं. या घटनेमुळे मंत्री नगरहरी झिरवाळ यांच्यावर सध्या टीकेची झोड सुरू आहे तसंच त्यांच्यावर अनेक आरोप केले जात आहेत. अशातच आता नरहरी झिरवाळ यांच्या मतदारसंघात नाशिकच्या एसीबी पथकाने मोठी कारवाई केली आहे. सरपंच आणि तिच्या पतीला लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडलं. या घटनेमुळे दिंडोरीमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंत्री नरहरी झिरवळांच्या नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरी मतदारसंघात एसीबीने मोठी कारवाई केली. रासेगावच्या सरपंच मंदा बेडकुळे आणि पती विठ्ठल बेडकुळे यांना लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडलं. उपसरपंचावर आणलेला अविश्वास ठराव नामंजूर करण्यासाठी त्यांनी ५० हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीत २५ हजार मान्य करण्यात आले. यापैकी १५ हजार रुपये स्वीकारताना सरपंच पत्नीसह पती अटक करण्यात आली. नाशिकच्या एसीबीच्या पथकाने दिंडोरी तालुक्यात केलेल्या या कारवाईने खळबळ उडाली आहे.

दरम्यान, १२ फेब्रुवारीला मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयावर एसीबीने छापा टाकला होता. यावेळी एसीबीच्या पथकाने सापळा रचत झिरवाळ यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या क्लर्कला ५० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं होते. क्लर्क राजेंद्र ढेरंगेला एसीबीच्या पथकाने गुन्हा दाखल करत अटक केली होती. मेडीकलचा परवाना निलंबन रद्द करण्यासाठी मदत करण्यासाठी राजेंद्र ढेरंगेने पैशांची मागणी केली होती.

एसीबीच्या या कारवाईनंतर मंत्रालयात खळबळ उडाली होती. त्यानंतर नरहरी झिरवाळ यांनी देखील या प्रकरणातील दोषींविरोधात कारवाई केली जाईल. तसंच जर चौकशीमध्ये माझे नाव आले तर मी राजीनामा देईन, असे नरहरी झिरवाळ यांनी सांगितले होते. तसंच, ही घटना घडली तेव्हा ते दिल्लीत होते. हा प्रकार अतिशय चुकीचा होता. या प्रकाराला मी कुठेही पाठीशी घालणार नाही, असे देखील त्यांनी सांगितले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashok Kharat Case: बाळू तुपे कोण? ज्याच्या हत्येचा अशोक खरातवर आहे आरोप

पुण्यात जमीन घोटाळा उघड! ४२४ प्रकरणांत गंभीर अनियमितता, चंद्रशेखर बावनकुळेंचे कारवाईचे आदेश; महसूल विभागात खळबळ

Maharashtra Live News Update: साताऱ्यात पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन

Egg consumption: जगभरात कोणत्या देशात अंड्याचं जास्त सेवन केलं जातं?

अनैतिक संबंधांवरून वाद, गणपती मंडळाच्या माजी अध्यक्षाची हत्या; दोघांना जन्मठेप, वडिलांसह मुलांना मिळणार भरपाई

SCROLL FOR NEXT