Kiran Lohar , ACB, Bribe saam tv
महाराष्ट्र

Maharashtra : महाबळेश्वरात मंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार घेतलेल्या शिक्षणाधिका-याला पाेलिसांनी केली अटक

किरण लाेहारच्या विराेधात सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

विश्वभूषण लिमये

Kiran Lohar उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी येथील एका स्वयंअर्थसहाय खासगी शाळेचे आठवी ते दहावीचे वर्ग ‘यु-डायस प्लस’मध्ये समाविष्ट करण्यासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार (Kiran Lohar) यांनी ५० हजारांची लाच (Bribe) मागितली. त्यातील २५ हजार रुपये सोमवारी (ता. ३१ ऑक्टोबर) कार्यालयातच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) लाेहारला रंगेहाथ पकडले. (Solapur Latest Marathi News)

लाेहार यास महाबळेश्वरातील (mahableshwar) एका संस्थेने नुकताच राज्यस्तरीय पुरस्कार दिला होता. हा पुरस्कार उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शिक्षणमंत्री दीपक केसरकर, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत रविवारी (ता. ३० ऑक्टोबर) त्य़ाने स्विकारला हाेता. अन् दुस-याच दिवशी त्याला २५ हजार रुपयांची लाच स्विकारताना एसीबीने पकडलं. (Maharashtra News)

तत्पूर्वी, झेडपीच्या प्राथमिक शाळांची स्थिती सुधारण्याच्या बाता मारत शिक्षकांना (teachers) उपदेशाचे धडे देण्यामुळे लोहार चर्चेत होते. ग्लोबल टिचर डिसले गुरुजींच्या प्रकरणात बेधडक वक्तव्यांमुळे पण ते चर्चेत राहिले हाेते. (Breaking Marathi News)

दरम्यान लाेहारने २५ हजार रुपये सोमवारी (ता. ३१ ऑक्टोबर) कार्यालयातच स्विकारल्याने त्याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. त्याला अटक (arrest) करण्यात आल्याची माहिती पाेलिसांनी दिली. (Kiran Lohar Latest Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

SCROLL FOR NEXT