Nanded News  Saam Tv
महाराष्ट्र

गर्भवती महिलेसोबत गैरवर्तणूक; नांदेड जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

हे प्रकरण अल्पसंख्याक आयोगाकडे गेले असले तरी आरोग्य मंत्री राजेश टोपे या प्रकरणात लक्ष घलतिल का आणि पिडीत गर्भवती महिलेला न्याय देतील का असा सवाल या निमित्ताने विचारला जातोय.

संतोष जोशी

नांदेड- डाॅक्टरला आपण देव मानतो मात्र काही वेळा डॉक्टर एवढी असंवेदनशीलता दाखवतात की, एखाद्याचा जिव जात असेल तरी त्या डॉक्टरला त्याची कीव येत नाही. त्यामुळे सर्वसामान्य माणसांला डॉक्टर बद्दल प्रचंड चिड निर्माण होते. असाच एक धक्कादायक प्रकार नांदेडच्या एका गर्भवती महिलेच्या बाबतीत घडला आहे. नांदेडमध्ये (Nanded) सुसज्ज असं डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा शासकीय रुग्णालय (Hospital) आहे. पैश्या अभावी गोरगरीब रुग्ण या ठिकाणी उपचार घेतात काही दिवसांपूर्वी याच रुग्णालयात डॉक्टरांची (Doctor) असंवेदनशीलता पहायला मिळाली. (Nanded Latest News)

हे देखील पहा -

एका गर्भवती महिलेची प्रसुती न करता तिच्या सोबत गैरवर्तणूक करण्यात आली. पिडीत महिलेने संबधीत डॉक्टरची तक्रार थेट राज्य अल्पसंख्याक आयोगाकडे केल्याने खळबळ उडाली आहे. शंकरराव चव्हाण जिल्हा शासकीय रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. हिना बेगम शेख वली या १८ आॅक्टोंबर २०२१ रोजी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झाल्या होत्या त्यावेळी तेथील डॉक्टरांनी महिलेस तुमची सिझरिंग करावी लागणार आहे. तुम्हाला एका वर्षात दोन मुलं कोण जन्माला घाला म्हणले असे म्हणत संबधीत डॉक्टरने प्रसुती करण्यास नकार दिला होता. त्यावेळी या घटनेचे चित्रिकरण करून संबधित महिलेच्या नातेवाईकांनी थेट अल्पसंख्याक आयोगाकडे तक्रार केली. या प्रकरणात एक समिती गठीत करण्यात आली असून, अल्पसंख्याक आयोगाच्या निर्देशानुसार सुनावणी होणार आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या प्रभारी अधिष्ठाता पी. टी.यांनी या प्रकरणात तीन सदस्यीय समिति गठित करण्यात आली आहे.. चौकशीत दोषी आढळल्यास कारवाई करु असं आश्वासन दिल आहे. पिडीत गर्भवती महिलेने जिल्हा रुग्णालयाच्या कारभाराची वास्तविकता समोर आणली आहे. मात्र, शासकीय रुग्णालयातील अनास्थेमुळे दररोज किती रुग्णांना संकटांचा सामना करावा लागतो याची कल्पना या नांदेडच्या एका उदाहरणावरून समोर येते त्यामुळे हे प्रकरण अल्पसंख्याक आयोगाकडे गेले असले तरी आरोग्य मंत्री राजेश टोपे या प्रकरणात लक्ष घलतिल का आणि पिडीत गर्भवती महिलेला न्याय देतील का असा सवाल या निमित्ताने विचारला जात आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Dasara Melava Live Update: संगमनेरमधील मुस्लिम मावळा दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थावर दाखल

Bhaskar Jadhav: टीका करणारे डल्लेखोर, तकलादू आणि भाडेकरू, भास्कर जाधवांचा जोरदार हल्लाबोल|VIDEO

Swollen Face: सकाळी उठल्यानंतर चेहरा सुजलेला का दिसतो?

Instagram Ads : तुम्ही काय बोलता हे सर्व इंस्टाग्राम गुपचूप ऐकतं का? अ‍ॅडम मोसेरीने सगळं खरं खरं सांगितलं

Shocking: दसरा सणाला गालबोट! दुर्गा देवीच्या विसर्जनादरम्यान अनर्थ घडला, ६ जण नदीत बुडाले

SCROLL FOR NEXT