Abu Salem Saam Digital
महाराष्ट्र

Abu Salem : अबु सालेमच्या भेटीसाठी विदेशी व्यक्ती; ATS ने घेतलं दोघांना ताब्यात

Sandeep Gawade

गँगस्टर अबु सालेमच्या भेटीसाठी आलेल्या दोघांना आज एटीएसने ताब्यात घेतलं आहे. त्या दोघांमध्ये अबू सालेमची मैत्रिण आणि एका विदेशी व्यक्तीचा समावेश असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. गँगस्टर अबु सालेम मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी असून सध्या नाशिकच्या कारागृहात त्याचा मुक्काम आहे. त्याच्या भेटीसाठी आलेल्यांच्या चौकशीत काय समोर येतं याकडे लक्ष आहे.

कुख्यात गँगस्टर आणि मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी अबू सालेमला तळोजा कारागृहाच्या अंडा सेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. मात्र या कारागृहात त्याला धोका असल्याचं बोललं जात होतं. तसंच तळोजा कारागृहाच्या अंडा सेलच्या भिंती कमकुवत झाल्याचा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सादर करण्यात आला होता. त्यामुळे अबू सालेमला अलिकडेच नाशिकच्या कारागृहात हलवण्यात आलं होतं. 

अबू सालेम कुख्यात दहशतवादी असून त्याच्यावर अनेक खटले सुरू आहेत. मुंबई बॉम्बस्फोटप्रपकरणी सध्या तो शिक्षा भोगत आहे आहे. १९ वर्षांपूर्वी पोर्तुगालमध्ये सालेमला अटक करण्यात आली होती. वादग्रस्त अभिनेत्री मोनिका बेदी हिच्यासह त्याला भारतात आणण्यात आले होते. त्याला प्रारंभी अर्थर रोड कारागृहात ठेवण्यात आले होते.

अबू सालेमवर ऑर्थर रोड कारागृहात हल्ला झाला होता. त्यामुळे त्याला तळोजा कारागृहात हलवण्यात आलं होतं. त्यानंतर तळोजा कारागृहातील अंडा असेल सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नसल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर त्याला नाशिकच्या कारागृहात हलवण्यात आलं. दरम्यान आज या कारागृहात त्याची एक मैत्रिण आणि विदेशी नागरिक त्याला भेटण्यासाठी आले असता एटीएसने ताब्यात घेतलं आहे. ते कशासाठी आणि कुठून आले होते याची चौकशी सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Tips: रोज प्या कढीपत्त्याचा चहा, सर्व आजार जातील पळून

Mumbai Rain : नवरात्रीत परतीच्या पावसाचा दांडिया; अचानक बरसलेल्या सरींनी नागरिकांची उडाली तारांबळ, VIDEO

Ajit Pawar: स्वपक्षीय साथ देणार की पाठ दाखवणार? विधानसभेला अजित पवार यांची अग्निपरीक्षा; वाचा स्पेशल रिपोर्ट

Nashik Politics : भुजबळ-कांदे, महायुतीचे वांदे; नाशकात महायुतीत कुरघोडीचं राजकारण, VIDEO

Health Tips: बुलेटप्रूफ कॉफी तुम्ही प्यायलात का? वाचा आश्चर्यकारक फायदे

SCROLL FOR NEXT