abu azmi, amravati saam tv
महाराष्ट्र

Love Jihad : हिंदू मुलींना पळवून नेण्यासाठी पैसे दिले जातात ? अबू आजमी म्हणाले...

आज अबू आजमी अमरावतीत आले हाेते.

साम न्यूज नेटवर्क

- अमर घटारे

Abu Azmi News : देशात अनेक मोठे हिंदू मुस्लिम लग्न झाले आहेत. अठरा वर्षानंतर आपल्या मर्जीने कोणत्याही व्यक्तीला काेणत्याही धर्मातील व्यक्ती बराेबर लग्न करण्याचा अधिकार आहे. मुस्लिम मुले हिंदू मुलींना लग्नासाठी पळवून नेतात हा केला जाणार आरोप चुकीचा आहे. मुस्लिम लोक हिंदू मुलींना पळवुन नेण्यासाठी पैसे देतात हे देखील म्हणणे चुकीचे आहे आणि असे असेल तर मी आयुष्यभर गुलामी करेल व राजकारण सोडुन देईन असा ठाम विश्वास आमदार अबू आजमी (abu azmi) यांनी व्यक्त केला.

अमरावती जिल्ह्यात सध्या लव जिहादचे अनेक प्रकरण होत असल्याचा आरोप भाजपने (bjp) केला आहे. यावर समाजवादी पार्टीचे नेते व आमदार अबू आजमी यांनी अमरावतीत (amravati) प्रसार माध्यमांची संवाद साधताना मुस्लिम समाजावर हाेत असलेल्या आराेपांचे खंडन केले.

आमदार अबू आजमी म्हणाले मुस्लिम मुले हिंदू मुलींना लग्नासाठी पळवून नेतात हा मुस्लिम समाजावर केला जाणार आरोप चुकीचा आहे. मुस्लिम लोक हिंदू मुलींना पळवुन नेण्यासाठी पैसे देतात हे खाेटे आहे. असे घडत असेल तर मी आयुष्यभर गुलामी करेल व राजकारण सोडुन देईन असेही आमदार आजमी यांनी व्यक्त केले. (Maharashtra News)

राहुल व सोनिया गांधींच्या नेतृत्वात काँग्रेस कमकुवत

आमदार अबू आजमी म्हणाले काँग्रेस पक्ष आता संपल्यात जमा आहे. काही ठिकाणी काँग्रेस महाराष्ट्रात शिल्लक आहे. काँग्रेस वाढायला पाहिजे ही आमची इच्छा आहे, कारण भाजप सोबत लढण्यासाठी फक्त काँग्रेसच पक्ष एक समोर दिसत आहे.

राहुल गांधी व सोनिया गांधी यांचे नेतृत्वात काँग्रेस कमकुवत होत आहे अशी टीका समाजवादी पार्टीचे आमदार अबू आजमी यांनी केली. उत्तर प्रदेशसह हिंदी भाषिक राज्यात काँग्रेस राहिली नाही. पूर्वीची काँग्रेस (congress) आता राहिली नाही आता काँग्रेस कमी झाली आहे असेही आजमी यांनी नमूद केले. (Tajya Batmya)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart health new year resolutions: नव्या वर्षात हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवायचंय? हे ५ संकल्प नक्की करा

पार्टी ऑल नाईट! पुणेकरांचा 31st रात्रभर गाजणार; पब, रेस्टॉरंट पहाटेपर्यंत सुरू राहणार, वाचा

Virat Kohli : विराट कोहलीचा नवा विक्रम; सचिन तेंडुलकरच्या स्पेशल क्लबमध्ये एन्ट्री

Namo Bharat Express: नमो भारत ट्रेनमध्ये ठेवले शरीरसंबंध, तरुणीचा आत्महत्येचा प्रयत्न; व्हिडीओ व्हायरल करणाऱ्याची गेली नोकरी

Maharashtra Live News Update: काँग्रेससोबत आघाडी होणार नाही, वंचितकडून मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT