मोहम्मद पैगंबरांविषयी बेताल वक्तव्य; दुकाने बंद ठेवत मुस्लिम बांधवानी घटनेचा केला निषेध अरुण जोशी
महाराष्ट्र

मोहम्मद पैगंबरांविषयी बेताल वक्तव्य; दुकाने बंद ठेवत मुस्लिम बांधवानी घटनेचा केला निषेध

मुस्लिम धर्म संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी बेताल वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ अमरावतीमध्ये मुस्लिम बांधवानी आपली दुकाने बंद ठेवत घटनेचा जाहीर निषेध केला.

अरुण जोशी

अमरावती: त्रिपुरा राज्यात मुस्लिम बांधवावर सातत्याने अत्याचार केले जात आहे. मस्जिदमध्ये तोडफोड केल्या जात आहेत. याबराेबरच मुस्लिम धर्म संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी बेताल वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ आज (शुक्रवार) अमरावतीमध्ये मुस्लिम बांधवानी आपली दुकाने बंद ठेवली व घटनेचा जाहीर निषेध केला. (Absurd statements about the Prophet Muhammad; The Muslim Brotherhood protested the incident by keeping the shops closed)

हे देखील पहा -

अमरावती शहरातील पठाण चौक, इतवारा चौक, चांदणी चौक, जमील कॉलनी, आसोरीया चौक, ताजनगर, हेदरपूरा, अलीम नगर, ट्रान्सपोर्ट नगर, टांगा पडाव चौक येथील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फुर्तीने आपले व्यवसाय बंद ठेवले होते. याशिवाय अमरावती जिल्ह्यातही अनेक ठिकाणी मुस्लिम बांधवानी या घटनेच्या निषेधार्थ जिल्ह्यात बंद पाळण्यात आला. नागरिकांची देखील या बंद काळात प्रमुख रस्त्यांवर वर्दळ कमी असल्याचे चित्र आज शहरात पाहावयास मिळाले.

त्रिपुरा प्रकरणातील दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी मुस्लिम संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. जोपर्यंत दोषींवर कारवाई केली जात नाही तोपर्यंत टप्या-टप्याने आंदोलन करण्यात येणार असल्याचेही कळविण्यात आले आहे. दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हाेऊ नये यासाठी महत्वाच्या ठिकाणी पाेलिस बंदाेबस्त ठेवण्यात आला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajaz Khan : सोशल मीडियावर हवा; मात्र राजकारणात डब्बागुल,'बिग बॉस' फेम अभिनेत्याचा दारूण पराभव

Tourist Spots: भारतातील सर्वाधिक भेट दिलेले 'ही' ५ पर्यटन स्थळ

Devendra Fadanvis : महाराष्ट्राने पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर विश्वास दाखवलाय; अभूतपूर्व विजयानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया

Priyanka Gandhi : वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा दणदणीत विजय; मोकेरी यांना 4 लाखांच्या फरकाने हरवलं

Uddhav Thackeray : लाटेपेक्षा त्सुनामी आली; महायुतीच्या विजयावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT