Police controversy saam tv
महाराष्ट्र

Abhijit Dipke: भेटीसाठी आलेल्यांशी उद्धट वर्तनाचा आरोप; अभिजित दिपके यांनी पोलीस अधिकाऱ्याला काढलं घराबाहेर

Police controversy: छत्रपती संभाजीनगरमध्ये अभिजित दिपके यांनी नागरिकांशी उद्धट वागणूक दिल्याचा आरोप करत पोलीस अधिकाऱ्यांना सुनावलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर विविध स्तरांत चर्चा सुरू आहे.

Surabhi Jayashree Jagdish

छत्रपती संभाजीनगरमध्ये एका घटनेमुळे चांगलीच चर्चा रंगलीये. अभिजीत दिपके यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या वर्तनावर उघडपणे नाराजी व्यक्त केलीये. आपल्या भेटीसाठी येणाऱ्या नागरिकांना काही पोलीस कर्मचारी उद्धटपणे वागवत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. नागरिकांशी अशा प्रकारची वागणूक देणं योग्य नसल्याचं सांगत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सुनावलं.

काय म्हणाले अभिजित दिपके?

यावेळी अभिजीत दिपके म्हणाले, "मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी ठरवायचं नाही. मी कुणाला भेटणार, हा निर्णय माझा आहे." भेटीसाठी येणाऱ्या लोकांना अडवणं किंवा त्यांच्याशी अयोग्य भाषेत बोलणं सहन केलं जाणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

या वादादरम्यान वातावरण काही काळ तणावपूर्ण झालं. उपस्थित असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याला अभिजीत दिपके यांनी "तुम्ही बाहेर जा," असं सांगत आपल्या घराबाहेर जाण्यास सांगितलं. त्यानंतर त्यांनी पोलीस उपायुक्तांना फोन करून संबंधित अधिकाऱ्याची तक्रार केली. "हा अधिकारी मला इथे नको आहे," अशी विनंती त्यांनी पोलीस उपायुक्तांकडे केल्याचं सांगितलं.

यावेळी दिपके यांनी काही गंभीर आरोपही केलेत. त्यांच्या घरासमोर काही जण उभे असून त्यांनी स्वतःला सीआयडी अधिकारी असल्याचं सांगितल्याचा दावा त्यांनी केला. पोलिसांनी त्या व्यक्तींना बाजूला करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी "आम्ही सीआयडी अधिकारी आहोत," असं सांगितल्याचा आरोप दिपके यांनी केला.

याशिवाय, संबंधित अधिकारी 'हिट स्प्रे' नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये असल्याचाही गंभीर आरोप त्यांनी केला. "आम्हाला म्हणजेच 'कॉक्रोज'ला संपवण्यासाठी 'हिट स्प्रे'चा वापर करू, अशी भाषा त्या ग्रुपमध्ये केली जाते. जर अधिकारी त्या ग्रुपमध्ये असेल, तर त्याचा अर्थ काय?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. एका मीडिया प्रतिनिधीने संबंधित अधिकाऱ्याच्या मोबाईलमध्ये 'हिट स्प्रे' नावाचा ग्रुप पाहिल्याचा दावा केलाय.

"जर 'हिट स्प्रे' नावाचा ग्रुप अधिकाऱ्याच्या मोबाईलमध्ये असेल, तर ते माझ्या सुरक्षेसाठी इथे नाहीत. सीआयडीचे हे लोक माझ्या घरासमोर उभे राहून व्हॉट्सअॅपवर रिपोर्ट करत आहेत," असा आरोपही अभिजीत दिपके यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कर्जत-मुरबाड राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा खड्ड्यांचे साम्राज्य

Rain Alert : राज्यात ऊन-सावल्यांचा खेळ; मराठवाड्यासह 'या' जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

Nepal Floods: नेपाळमध्ये महाप्रलय! महापुरानंतर भूकंपाचे धक्के, मृतांचा आकडा ४०० वर; २९० भारतीय बेपत्ता

Rakshabandhan Horoscope: रक्षाबंधनाचा दिवस कोणत्या राशीसाठी ठरणार खास? भावंडांकडून मिळेल प्रेम, आनंद आणि मोठी खुशखबर!

चीनमुळे नेपाळमध्ये महाप्रलय? 300 जणांचा मृत्यू, शेकडो भारतीय बेपत्ता

SCROLL FOR NEXT