Abhijeet Dipke On Mohan Bhagwat Saam Tv
महाराष्ट्र

Abhijeet Dipke: मोहन भागवत यांचा 'Gen Z' सोबत संवाद, अभिजीत दिपकेंची पहिली प्रतिक्रिया

Abhijeet Dipke On Mohan Bhagwat: अभिजीत दिपके यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर निशाणा साधला. मोहन भागवत हे झेन झींसोबत संंवाद साधत आहे त्यावर दिपकेंनी प्रतिक्रिया दिली.

Priya More
  • मोहन भागवत झेन झींसोबत संवाद साधत आहेत

  • अभिजीत दिपकेंनी दिली भागवतांवर प्रतिक्रिया

  • 'कुठे तरी जाऊन त्यांना झेन झींसोबत संवाद साधावा हे सूचले ही चांगली गोष्ट' असे ते म्हणाले

  • संविधानावर शिकवणाऱ्यांना देखील त्यांनी खडेबोल सुनावले

माधव सावरगावे, संभाजीनगर

नीट पेपरफुटी प्रकरण आणि त्यासंदर्भात झालेल्या आंदोलनानंतर आता आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत झेन झींसोबत संवाद साधत आहेत. यावर कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. 'चांगली गोष्ट आहे, उशिरा का होईना पण आता कुठेतरी जाऊन यांना सुचलंय तरी की 'Gen Z' सोबत बोलावं लागेल. ही चांगली गोष्ट आहे.', असे अभिजीत दिपके यांनी सांगितले. त्याचसोबत संविधानावर लेक्चर देणाऱ्यांना त्यांनी सडेतोड उत्तर दिलं.

अभिजीत दिपके यांनी मोहन भागवत हे झेन झीसोबत संवाद साधत आहेत त्यावर बोलताना सांगितले की, 'तरुणांसोबत बोलावं लागेल. चांगली सुरुवात आहे. पण मला असं वाटतं की, तरुण लोकांनी तरुणांसोबत बोललं तर जास्त चांगलं होईल. कारण की, तुम्ही जोपर्यंत यंग चेहरे पुढे आणणार नाही तोपर्यंत काही अर्थ नाही अशा डायलॉगचा असं मला वाटतंय. तुम्ही बोला त्याच्यात काही हरकत नाही चांगली स्टेप आहे. पण नवीन लोकांना पुढे आणा, नवीन चेहरे पुढे आणा, ते जास्त चांगलं होईल. पण शिकलेले चेहरे पुढे आणा.' यावेळी अभिजीत दिपके यांनी संविधानावर शिकवणाऱ्यांवर सडकून टीका केली. तो म्हणाला की, 'मला वाटतंय ज्या लोकांनी गांधींची हत्या केली, ज्या लोकांनी आंबेडकरांचा आयुष्यभर विरोध केला त्या लोकांनी आम्हाला संविधानावर लेक्चर देऊ नये.'

शिंदेसेनेच्या दोन आमदारांनी अभिजीत दिपके यांची भेट घेतली होती. यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, 'आता ३० वर्षांच्या मुलापासून तुम्हाला एवढी भीती वाटते तर मी काय बोलू याच्यावर? म्हणजे ते तर मला फक्त पर्सनली भेटायला आले होते आणि शुभेच्छा द्यायला आले होते. दुसरं तर आमचं काही बोलणं झालं नाहीये. ते फक्त एक म्हणाले की युवकांचा मुद्दा उचलला, देशाच्या शिक्षणाचा मुद्दा उचलला, चांगला मुद्दा होता. ज्या आंदोलनाला यश मिळाले त्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या होत्या. मी भाजपला सांगू इच्छितो एवढी घाबरायची गरज नाहीय. ईडी, सीबीआय सगळं तुमच्याकडे आहे आमच्याकडे काही नाहीये. आम्हाला लोकं पर्सनली भेटायला येतात आणि शुभेच्छा द्यायला येतात. भाजपला एवढी घाबरायची गरज नाहीये.'

अभिजीत दिपके यांनी पक्षाची पुढची भूमिका काय असणार आहे याबद्दल सांगितले की, 'सीजेपीच्या बैठकीमध्ये आमचं जंतर-मंतरचं आंदोलन झालं, त्या आंदोलनामधून काही शिकायला मिळालं आणि पुढे जाऊन काय-काय चांगल्या प्रकारे करता येईल यावर आम्ही चर्चा करू. पुढे जाऊन संघटन आम्हाला कसं देशभर वाढवण्यात येईल त्याच्यावर चर्चा होणार आहे. पुढे एकूणच 'कॉमन जनता पार्टी'चा रोडमॅप काय असणार आहे त्याच्यावर आमचं डिस्कशन असणार आहे. ही बैठक दोन दिवस असेल. आमचे जेवढे स्पोक्सपर्सन आहेत ते येणार आहेत. आमच्या बैठकीमध्ये जे काही ठरेल ते आम्ही ६ तारखेला सविस्तर सांगू.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : भारतीय क्रिकेटपटूच्या भावाविरोधात गुन्हा दाखल, केबिन क्रू महिलेने केले गंभीर आरोप

Maharashtra News Live Update: कल्याणच्या प्रसिद्ध कुंभारवाड्यात बाप्पाला घरी नेण्यासाठी भाविकांची गर्दी; ढोल-ताशांच्या गजरात गणरायाचा जयघोष

Manoj jarange: मनोज जरांगेंची मोठी घोषणा, उद्या एकटेच मुंबईला येणार; पुढच्या आंदोलनाचा संपूर्ण प्लान सांगितला

Skin Care: चेहऱ्याची काळजी घेताना नकळत करता 'या' चुका करू नका; हळू हूळ चेहरा पडेल काळा आणि डल

High Court : विद्यार्थ्यांना दिलासा! शाळा सोडल्यानंतरही दाखल्यातील चूक दुरुस्त होणार, हायकोर्टाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT