Abhijeet Dipke challenges PM Modi over degree controversy saam tv
महाराष्ट्र

मोदींनी डिग्री दाखवावी, मी डिग्रीचा खर्च दाखवतो, अभिजीत दिपकेंचं भाजपला खुलं आव्हान

CJP Founder Targets PM Modi Over Degree Row Amid Funding Probe: सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपकेंनी थेट पंतप्रधान मोदींना खुलं आव्हान दिलंय. नेमकं काय आहे हे आव्हान? मोदी हे आव्हान स्वीकारणार का? दिपके नेमकं का संतापले आहेत? पाहूयात या रिपोर्टमधून...

Suprim Maskar

नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिल्यानंतर आता CJPचे संस्थापक अभिजीत दिपकेंच्या मागे चौकशीचा ससेमीरा लागण्याची चिन्ह आहेत. त्यामुळेच त्यांच्या अमेरिकेतील शिक्षणाच्या खर्चावरून वाद निर्माण झालाय. या चौकशीवरून मात्र दिपकेंनी थेट पंतप्रधान मोदींनाच टार्गेट केलंय, नरेंद्री मोदींनी त्यांची डिग्री दाखवावी मी अमेरिकेतील शिक्षणाच्या खर्चाचा तपशील दाखवतो असं खुलं आव्हान दिपकेंनी दिलंय. तर याला उत्तर देताना भाजपनं प्रतिज्ञापत्राचा मुद्दा पुढं केलाय.

मुळात अभिजित दिपकेंच्या वडीलांनी अभिजित यांना शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवण्यासाठी इतके पैसे कुठून आणले, असा सवाल उपस्थित करत सुरतच्या RTI कार्यकर्त्यांनं आर्थिक चौकशीची मागणी केली होती...मात्र साम टिव्हीच्या ब्लँड अँण्ड व्हाईट या कार्यक्रमात दिपकेंनी त्यापूर्वीच परदेशातील शिक्षण शिष्यवृत्तीतून आणि लोन काढून केल्याचं स्पष्ट केलं होतं...

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिग्रीवरून याआधी विरोधकांनी अनेकदा सरकारवर निशाणा साधलाय..मात्र मोदींनी स्वत:हून डिग्रीसंदर्भात कुठलचं स्पष्टीकरण दिलेलं नाही...Entire Political Science अशा विषयात पंतप्रधानांनी डिग्री केल्याची चर्चा आहे....मात्र असा कुठलाच विषय अभ्यासक्रमात नसताना पंतप्रधानांनी ही डिग्री कोणत्या विद्यापीठातून घेतली... यावरून विरोधक नेहमीच पंतप्रधानांवर निशाणा साधतात....त्यात आता CJPच्या संस्थापक असणाऱ्या दिपकेंनीच पंतप्रधानांना डिग्री सार्वजनिक करण्याचं आव्हान दिल्यानं नवा वाद पेटलाय...आता पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: जेन झी स्टाईल रिलद्वारे दिपकेंचं चॅलेज स्विकारून आपली डिग्री सार्वजनिक करतात का? हे पाहणं महत्त्वाचं आहे....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT