Shivsena Eknath Shinde Latest News Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra politics : शिवसेनेत धुसफूस; माजी मंत्री आक्रमक; एकनाथ शिंदेंकडे करणार पालकमंत्र्यांची तक्रार

Shivsena Eknath Shinde Latest News : छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेच्या दोन नेत्यांमधील वादाने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. माजी मंत्री अब्दुल सत्तार आणि विद्यमान मंत्री संजय शिरसाट यांच्यातील मतभेद आता उघडपणे समोर आले आहेत.

Namdeo Kumbhar

sanjay shirsat vs abdul sattar : माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सुरू असतानाच, त्यांच्याच नेतृत्वातील शिवसेनेत मोठी धुसफूस सुरू असल्याचं समोर आलेय. छत्रपती संभाजीनगरमध्ये आजी-माजी मंत्र्यांमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. माजी मंत्री आणि सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार आणि विद्यमान मंत्री संजय शिरसाट यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फेरी सुरू आहेत. जाहीर सभेत संजय शिरसाट यांनी सत्तार यांचा समाचार घेतला. आता अब्दुल सत्तार शिरसाट यांची तक्रार एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार आहेत.

छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट (Sanjay shirsat) आणि माजी पालकमंत्री सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांच्यातील वाद आता वाढत चालला आहे. सोमवारी संध्याकाळी छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये झालेल्या नागरी सत्काराच्या वेळेस संजय शिरसाट यांनी अब्दुल सत्तार यांच्यावर नाव न घेता टीका केली होती. त्याबद्दल आता अब्दुल सत्तार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करणार आहेत.

अब्दुल सत्तार साम टीव्हीशी बोलताना म्हणाले, 'ही बाब एकनाथ शिंदे यांच्या कानावर टाकणार आहेत. सध्या मी माध्यमांशी बोलणार नाही. एकनाथ शिंदे साहेबांना याबद्दल सांगणार आहे. त्यानंतर मग ते जे म्हणतील त्यानुसार मी पाऊल टाकणार आहे.'

दरम्यान, अब्दुल सत्तार यांच्या तक्रारीनंतर एकनाथ शिंदे काय निर्णय घेतील, याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

संजय शिरसाट काय म्हणाले होते ?

कपटकारस्थान करणाऱ्या माणसाने व्हॉइस चॅट शिंदेंना दाखवत मला मंत्री कसे करू नये असे प्रयत्न झाले. मंत्रीपदाची शपथ घेताना हात लटपट कापत होते. मी मंत्री झालो हे काही जणांच्या पोटात दुखत होते. निवडणुकीच्या काळात मी टेन्शन घेत नाही पण करेक्ट कार्यक्रम करतो .या निवडणुकीत पैसे जास्त लागले पण मीही मोकळा हात केला, असे शिरसाट म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विठ्ठल मंदिर जतन संवर्धन कामाचे ऑडिट होणार

Pune Crime : पुण्यात भयंकर घडलं! जेवणासाठी घरी बोलवलं, दारू पाजली; किरकोळ वादातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या

Youth Drowned: तलाव पाहून पोहण्याचा मोह झाला अन् अनर्थ घडला; २० वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू

Politics : पंतप्रधान नरेंद्र मोदी विष्णूचे ११वे अवतार; कुणी केलं विधान? वाचा

'Saiyara' तू तो बदला नहीं है... या ट्रेंडींग गाण्याचा अर्थ काय?

SCROLL FOR NEXT