Abdul Sattar News  Saam Tv
महाराष्ट्र

Abdul Sattar : कथित गायरान घोटाळ्याच्या आरोपानंतर अब्दुल सत्तारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रसार माध्यमांना पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

मंगेश मोहिते

Abdul Sattar News : राज्याच्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर कथित गायरान घोटाळ्यावरून विरोधकांकडून गंभीर आरोप केले आहे. कथित गायरान घोटाळ्यावरून विरोधकांकडून अब्दुल सत्तार मागणी केली जात आहे. या आरोपानंतर अब्दुल सत्तार नॉट रिचेबल होते. त्यानंतर आता कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रसार माध्यमांना पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर कथित गायरान घोटाळ्याचे आरोप करत राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली. मंत्री अब्दुल सत्तार यांनी वाशीम जिल्ह्यात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करुन तब्बल 150 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी केला. या आरोपांनंतर कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) नॉटरिचेबल झाले होते.

त्यानंतर कृषीमंत्री अब्दुल सत्तार प्रसारमाध्यमांसमोर आले आहे. कथित गायरान घोटाळ्यावरून पहिली प्रतिक्रिया देताना कृषिमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, 'उद्या सभागृह सविस्तर उत्तर देईल'. त्यामुळे उद्या सभागृहात अब्दुल सत्तार काय उत्तर देतील, यावरून तर्कवितर्क लढविले जात आहे.

अजित पवार अब्दुल सत्तारांवर काय म्हणाले होते?

अजित पवार म्हणाले, 'दहा पेक्षा जास्त असलेल्या तालुक्यांना वेगळं पॅकेज आणि दहा पेक्षा कमी असलेल्यांना वेगळं पॅकेज. कृषीबाबत जो कार्यक्रम सत्तारांनी घेतला ती लुबाडणूक सुरू आहे. कृषी मंत्री सत्तेत आल्यापासून बेताल वक्तव्य करत आहेत. को्ट्यवधींचा घोटाळा सत्तारांनी केला आहे. आम्ही अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली आहे अशी माहिती अजित पवारांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! मासिक पेन्शनबाबत घेतला महत्वाचा निर्णय

Ladki Bahin Yojana : सप्टेंबर महिना संपत आला, ऑगस्टचा हफ्ता कधी जमा होणार? लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट

Maharashtra News Live Update: शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही”; पुरंदरच्या पाहणी दौऱ्यात कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

Palak Besan Chilla Recipe: रोज सकाळी नाश्त्यासाठी बनवा हेल्दी पालक बेसन चीला, वाचा सोपी रेसिपी

Health Tips: बर्फ खाण्याची इच्छा ते हात-पायांना सतत मुंग्या येतात? मग, शरीराचे 'हे' ७ संकेत जाणून घ्या

SCROLL FOR NEXT