satara news, wai panchayat samiti news, deepak nanaware saam tvn
महाराष्ट्र

चर्चाच चर्चा! पंचायत समिती सदस्याने पळवली अधिका-याची खुर्ची

ननावरेंच्या पावित्र्याने कार्यालयात एकच खळबळ उडाली.

ओंकार कदम

सातारा : रस्त्याच्या कामावरून आक्रमक झालेल्या सातारा (satara) जिल्ह्यातील वाई (wai) तालुक्यातील पंचायत समिती सदस्य दीपक ननावरे (deepak nanaware) यांनी बांधकाम विभागातील अधिकार्‍यांची खुर्ची काढून घेत स्वतःच्या वाहनात घालून नेल्याने एकच खळबळ उडाली. (wai latest marathi news)

कनूर गावातील महादेव मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याची निविदा नुकतीच मंजूर करण्यात आली आहे. या रस्त्याचे सुमारे दाेन लाख 30 हजार रुपयांचे काँक्रिटीकरणाचे काम आहे. दीड वर्षांपूर्वी मंजूर झालेले अंतर्गत रस्त्याचे (road) काम पूर्ण न केल्याने वाई पंचायत समिती सदस्य दीपक ननावरे यांनी आज आक्रमक घेतला.

ननावरे यांनी वाई पंचायत समितीच्या कार्यालयातील बांधकाम विभागात आज तेथील अधिकार्‍यांची खुर्ची काढून घेतली. त्यानंतर खूर्ची चार चाकीत ठेवून तेथून निघून गेले. या प्रकाराने वाई पंचायत समितीत काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

साम टीव्हीशी बाेलताना ननावरे म्हणाले कामे न करता अधिकारी फक्त खुर्चीवर बसून राहत असून त्यांना या खुर्चीवर बसण्याचा नैतिक अधिकार नाही. म्हणत त्यांची खुर्ची काढून घेतली आहे. रस्त्याचे काम झाल्याशिवाय खुर्ची परत देणार नाही तसेच काम पूर्ण न झाल्यास बसण्याचे टेबल पण काढून घेईन असा इशारा ननावरेंनी प्रशासनास दिला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तुळजापुरात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

SCROLL FOR NEXT