vishnu talav near shelgaon saam tv
महाराष्ट्र

महाविष्णु तलावातील गाळ काढण्याच्या कामास प्रारंभ; 'सकाळ रिलीफ फंड'चे पाठबळ

जिल्हाधिकारी आंचल गाेयल यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.

राजेश काटकर

परभणी : सकाळ रिलीफ फंड व स्थानिक गावकऱ्यांच्या एकीतून शेळगाव येथील महाविष्णु तलावातील गाळ काढण्याचे हाती घेतलेल्या कामाचा फायदा ग्रामस्थांना हाेईल असे मत जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी व्यक्त केले. गाेयल यांनी राज्यभरात सकाळ परिवार विविध समाजपयाेगी काम करीत असते. यामुळे समाजातील विविध घटकांना त्याचा लाभ हाेताे असे नमूद केले. (parbhani latest marathi news)

सकाळ रिलीफ फंडातुन (sakal relief fund) सोनपेठ तालुक्यातील कोठाळा, बोदरगाव ,डिघोळ, सायखेडा या गावात जलसंधारणाची कामे यापुर्वी करण्यात आली आहेत. या कामांचा फायदा या गावांसह आजुबाजुच्या गावांना झाला आहे. यंदा लोकसहभागातुन शेळगाव महाविष्णु येथील तलावातील गाळ काढण्याच्या कामाचा प्रारंभ जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या हस्ते झाला. त्यावेळी जिल्हाधिकारी गाेयल बाेलत हाेत्या.

सकाळ माध्यम समुहाच्या सकाळ रिलीफ फंडातुन अनेक लोकोपयोगी कामे करण्यात येतात. मराठवाड्यातील (marathwada) दुष्काळावर (drought) मात करण्यासाठी गेली अनेक वर्षे सकाळ रिलीफ फंड आणि तनिष्का व्यासपीठाच्या माध्यमातून विविध समाजपयाेगी उपक्रम राबविले जात आहेत. या कामांमुळे मराठवाड्यातील शेकडो गावांना याचा मोठा लाभ हाेत आहे.

शेळगाव महाविष्णु येथील तलावातील गाळ काढण्याच्या कामाचे काैतुक करत पाण्यासाठी (water) काम करणे गरजेचे असल्याचे मत जिल्हाधिकारी गाेयल यांनी ग्रामस्थांशी चर्चा करताना व्यक्त केले. त्या म्हणाल्या एकीतून गावाचा विकास साध्य हाेताेय हे पाहून खूप आनंद हाेत आहे. सकाळ परिवाराने ग्रामस्थांसाठी केलेली मदत शब्दांत व्यक्त करणे खूप अवघड आहे. सकाळ नेहमी समाजाच्या पाठीशी खंबीर उभे राहते असेही जिल्हाधिकारी गाेयल यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coconut Truffles: न्यू इयर करा स्पेशल! लहान मुलांसाठी बनवा झटपट टेस्टी आणि हेल्दी नारळाचे ट्रफल; वाचा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update : नाशिकमध्ये प्रथमच मनसे-महाविकास आघाडीचे पदाधिकारी एकत्र

क्षणात अनर्थ! चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं अन्...; महाडमध्ये थरारक अपघात|VIDEO

Papad Chivda Recipe : शाळेतून आल्यावर मुलांसाठी ५ मिनिटांत बनवा पापड चिवडा, एकदा खाल तर खातच राहाल

Viral Video: झोपेत लोळत लोळत १० व्या मजल्यावरील खिडकीतून खाली पडला, ८ व्या मजल्यावर ग्रीलमध्ये उलटा लटकला, दैव बलवत्तर म्हणून...

SCROLL FOR NEXT