Sanjay Gaikwad Saam TV Marathi
महाराष्ट्र

भाजपचा 'हा' नेता म्हणजे दुसरा अशोक खरात, त्यानं पोरींची इज्जत लुटली; शिंदेसेनेच्या आमदाराचा गंभीर आरोप

Buldhana politics BJP vs Shiv Sena : बुलढाण्यात भाजप आणि शिंदेसेनेत वाद चिघळला आहे. आमदार संजय गायकवाड यांनी भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले असून या प्रकरणामुळे राजकीय वातावरण तापले आहे.

Namdeo Kumbhar

Sanjay Gaikwad allegations against Vijayraj Shinde details : भाजप आणि शिंदेंसेनेतील वाद बुलढाण्यात पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गाडकवाड यांनी भाजप जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार विजयराज शिंदेंवर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. विजयराज शिंदे हा दुसरा अशोक खरात आहे. त्याने त्याच्या शाळेत शिकत असणाऱ्या कितीतरी पोरी बरबाद केल्या आहेत, त्याने कितीतरी पोरींची इज्जत लुटली आहे, असा गंभीर आरोप आमदार संजय गायकवाड यांनी विजयराज शिंदेंवर केला आहे. संजय गायकवाड यांच्या आरोप भाजप जिल्हाध्यक्ष शिंदेंनी खोडून काढले आहेत. या आरोप प्रत्यारोपाच्या फैरीने बुलढाण्याचे राजकारण तापलेय.

आमदार संजय गाडकवाड यांचा नेमका आरोप काय?

विजयराज शिंदे हा दुसरा अशोक खरात आहे. त्याच्या शाळेत शिकत असलेल्या कितीतरी पोरी त्याने बरबाद केल्या. कितीतरी पोरींच्या इज्जती त्याने लुटल्या आहेत, असा गंभीर आरोप भाजप जिल्हाध्यक्ष विजय शिंदे यांच्यावर शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे. या वादात आता वंचितनेही उडी घेतली असून गाडकवाड यांनी माफी मागावी, अशी मागणी केली. शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी शाळेत शिकणाऱ्या आजी व माजी विध्यार्थिनींची आणि त्यांच्या पालकांची माफी मागावी, अन्यथा त्यांच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वंचितकडून करण्यात आली आहे.

बुलढाण्यात शिवसेना आमदार विरुद्ध भाजप जिल्हाध्यक्ष व माजी आमदार यांच्यातील वाद आता विकोपाला गेला आहे. त्यातच आता वंचितनेही उडी घेतली आहे. बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाण्याचेच माजी आमदार व सध्या भाजपा जिल्हाध्यक्ष असलेले विजयराज शिंदे यांच्यावर आरोप केले. शिंदे यांनी त्यांच्याच निवासी शाळेतील अनेक विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केले. शिंदे यांनी अनेक विद्यार्थीनीचे आयुष्य बरबाद केलं, असा आरोप केला.

त्याशिवाय संजय गायकवाड यांनी विजयराज शिंदे यांच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करावा किंवा त्यांच्या शाळेत शिकणाऱ्या आजी-माजी विद्यार्थिनींची व त्यांच्या पालकांची माफी मागावी, असेही म्हटले आहे. विजयराज शिंदे यांच्या शाळेत शिकलेल्या अनेक माजी विद्यार्थिनींच्या जीवनात आता वाद होत आहेत, अनेक विद्यार्थिनी व पालकांना मानसिक तणावाचा सामना करावा लागत आहे. संजय गायकवाड यांनी माफी न मागितल्यास वंचित जिल्हाभर रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशाराही वंचितचे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MPSC Exam : MPSC विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! गट-क टंकलेखक पदभरतीत मोठा बदल; नवीन नियम लगेच लागू

मोठी बातमी! 'ज्याची भीती होती, तेच झालं,' कॉकरोच जनता पार्टीचे X अकाऊंट अचानक बंद, नेमकं कारण काय?

Petrol Diesel Price: पेट्रोल डिझेलमध्ये बदल होणार; केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Maharashtra News Live Update: NEET पेपर फुटीचे धागेदोरे आता अंबाजोगाईत; CBI कडून २ विद्यार्थ्यांची २ तास कसून चौकशी, लातूर कनेक्शन उघड

दोन दिवसांचा दुखवटा जाहीर, भाजप नेत्याचे निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

SCROLL FOR NEXT