ओंकार हत्तीवर फटाके-सुतळी बॉम्ब फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल होताच वनविभागाकडून खुलासा
हत्तीला इजा करण्याचा हेतू नसल्याचा दावा वनविभागाकडून करण्यात आलाय.
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना गेले काही दिवस आजाराला सामोरे जावे लागत आहे दोन दिवसापूर्वी संजय राऊत यांना भांडुपच्या फोर्टीज रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर शिवसेना UBT गटातील आणि विरोधकांनी देखील संजय राऊत लवकर बरे व्हावे यासाठी शुभेच्छा दिल्या. आज भांडुपमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून भांडुप मधील प्रसिद्ध असलेल्या गणपती मंदिरामध्ये संजय राऊत हे लवकर बरे व्हावे यासाठी महाआरतीचे आयोजन करण्यात आले
-मनमाडला नांदगावंचे शिवसेना आमदार सुहास कांदे, चांदवडचे भाजप आमदार डॉ. राहुल आहेर, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांची झाली बैठक.. बैठकीत नगर परिषद, जिल्हा परिषद निवडणूक महायुती एकत्रितपणे लढण्याचा झाला निर्णय..
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी आणि ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर हे दोघेही एकमेकांचे राजकीय विरोधक. मात्र, आज या दोघांमधील मैत्रीचा एक हलकाफुलका क्षण पहायला मिळालाय. सचिन अहिर यांनी अमोल मिटकरींना नवा चष्मा गिफ्ट केलाय. या चष्म्यातून अमोल मिटकरी सर्वच गोष्टींकडे समतेच्या नजरेतून पाहती, अशी अपेक्षा आमदार सचिन अहिर यांनी व्यक्त केलीये. अमोल मिटकरींनाही सचिन अहिर यांच्याा गिफ्टचा आनंदाने स्विकार करीत त्यांच्या अपेक्षेवर अंमलबजावणीचे आश्वासन दिलेय. आज दोघांची मुंबईत भेट झालीय.
उद्धव ठाकरे घेणार जिल्ह्यातील शिवसैनिकांची बैठक.
चार दिवसांपासून उद्धव ठाकरे यांचा मराठवाडा दौरा सुरू
दौऱ्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी, शेतकऱ्यांशी संवाद साधला
आज दौऱ्याचा समारोप करणार, शिवसैनिकांची बैठक घेऊन मुंबईकडे परतणार
ऊस दरासाठी सुरू असलेल्या आंदोलनात पोलिसांकडून आंदोलकांना धक्काबुक्की
शिरोळ मध्ये सुरू आहे आंदोलन अंकुश या संघटनेचं ऊस दरासाठी आंदोलन
आंदोलन करणाऱ्या धनाजी चिडमुंगे यांच्यासह अन्य आंदोलकांना पोलिसांची धक्काबुक्की
ऊस दरासाठी सुरू असलेल आंदोलन कारखानदारांकडून पोलिसांमार्फत दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आंदोलकांकडून आरोप
नंदुरबार शहरातील नेहरू पुतळा परिसरात भरधाव वेगातील टॅक्सी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या दुचाकींना धडक देत टॅक्सीने रस्त्यावर चालणाऱ्या देखील काही वाहनांना धडक दिली. या अपघातात 5 दुचाकी चालक गंभीरित्या जखमी झाल्या असून जखमींना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. टॅक्सी शहर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली असून चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
मागील चार पाच दिवसापासून ज्या पद्धतीने आरोप केले जात आहे
त्या सगळ्या आरोपांना उत्तर मी पत्रकार परिषद घेऊन उत्तर देणार
तुम्हाला कल्पना आहे पुराव्या शिवाय मी कुठलेही वक्तव्य करत नाही मी पुराव्यासहित तुमच्यासमोर बसेन
सर्व कागदपत्रे माझ्याकडे आहेत
जे सगळे आरोप प्रत्यारोप गेले काही दिवसापासून सुरू आहे त्या सर्वांना उत्तर देणार- रूपाली चाकणकर
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत कोणासोबत युती किंवा आघाडी करायची यासंदर्भात काँग्रेस बुधवारी निर्णय घेणार
१२ तारखेला बुधवारी महाराष्ट्र काँग्रेस ची पार्लमेंट्री बोर्डची बैठक होणार
सर्व जिल्हाध्यक्षांसोबत चर्चा केल्यानंतर राज्यातील प्रमुख नेत्यांसोबत चर्चा करून निर्णय होणार
मनसेला विरोध होत असताना शिवसेना ठाकरे गट किंवा शरद पवार पवार यांच्या राष्ट्रवादी बरोबर आघाडी करायची की नाही याचा ही निर्णय घेतला जाणार
काँग्रेसच्या पार्लामेंट्री बोर्डाच्या बैठकीत सर्व काँग्रेसचे महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार
धुळ्यात मंकीपॉक्सच्या रुग्णाचा सहावा रिपोर्ट पॉझीटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणांच्या चिंतेत वाढ
गेल्या महिना भरापूर्वी सौदी अरेबिया येथून परतलेल्या 44 वर्षीय ईसमाचा मंकीपॉक्स आजाराचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता
तेव्हापासून हा रुग्ण धुळ्याच्या शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला होता
शासकीय रुग्णालयात या रुग्णावर महिन्याभरा पासून उपचार सुरू आहेत
परंतु महिनाभर उपचार घेतल्या नंतर देखील मंकीपॉक्स आजाराचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत आणखीन वाढ झाली आहे...
पुणे येथील एनआयव्ही संस्थेकडे पुन्हा दोन दिवसांनी हे नमुने तपासणी पाठवण्यात येणार आहे
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी नगरसेवक चंद्रकांत टिंगरे अजित पवारांच्या भेटीला
धानोरी लोहगाव परिसरातील गेले तीन टर्म आहेत नगरसेवक
रेखा टिंगरे आणि चंद्रकात टिंगरे भेटीसाठी दाखल
विधानसभा निवडणुकीत केला होता राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश
लवकरच प्रवेश करण्याची शक्यता
शिक्षक म्हणून 25 ते 30 वर्ष ज्यांनी काम केलं आहे त्यांना परत टीईटी परीक्षा लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय शिक्षकांवर अन्याय करण्यासारखा आहे. तसंच टीईटी परीक्षा अनिवार्य करण्याचा निर्णय हा शिक्षण क्षेत्रावर गंभीर परिणाम करणार आहे. त्यामुळेच आज कोल्हापूर जिल्ह्यातील तीसहून अधिक शिक्षक संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय. सरसकट टीईटी परीक्षा अनिवार्य करण्याचा निर्णय रद्द व्हावा या मागणीसाठी राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात लवकरात लवकर पुनर्विचार याचिका दाखल करावी ही मागणी या मोर्चेदरम्यान करण्यात आली आहे. या मोर्चात प्राथमिक आणि माध्यमिक शाळांचे शिक्षक सहभागी झाले होते. दसरा चौकातून सुरू झालेला हा मोर्चा थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चामध्ये शिक्षकांच्या हातातील फलक हे राज्य सरकारचे आणि प्रशासनाचे लक्ष वेधणारे होते
जिल्हा निवडणूक प्रभारी केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसेंची यांच्या अध्यक्षतेखाली इच्छुकांच्या घेण्यात आल्या मुलाखती...
नवापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी तसेच नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांची प्रभारीने घेतल्या मुलाखती...
पक्ष ज्याला उमेदवारी दिली त्याचा पाठीमाग ताकदीने उभे राहण्याचा भाजप नेत्या हिना गावित यांनी इच्छुकांना दिला सल्ला....
मागच्या निवडणुकीत आपल्याला उमेदवारांना फार थोड्या थोड्या मतांनी पराभव स्वीकारावा लागला मात्र गेल्या पाच वर्षात आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ग्राउंडवर काम केल्याने भाजपला अच्छे दिन....
लोकांचा भाजपला सपोर्ट असून नवापूर नगरपालिकेवर भाजपचा झेंडा फडकणार असल्याचा भाजपने त्या हिना गावित यांनी व्यक्त केला विजयाचा विश्वास....
नवापूर शहरात घेण्यात आलेल्या या बैठकीला केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री तथा नंदुरबार जिल्हा प्रभारी रक्षा खडसे माजी मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित, भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी माजी खासदार डॉ हिना गावित भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी भाजपा पदाधिकारी उपस्थित होते...
श्रीवर्धन मतदार संघात ठाकरेंच्या शिवसेनेला शिंदेंच्या शिवसेनेने मोठा धक्का दिला असून श्रीवर्धनमधील माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश कोळंबेकर तसेच माजी सभापती अक्षदा कोळंबेकर यांनी आपल्या शेकडो सहकाऱ्यांसह शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत सर्वजण शिवसेनेत दाखल झाले. यामुळे मंत्री आदिती तटकरे यांच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेची ताकद वाढली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदिती तटकरे यांच्या मतदार संघात मंत्री भरत गोगावले यांच्या फेऱ्या वाढल्याने राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढली आहे.
भाजपचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष चे सुपुत्र थेट भाजपाचा विरोधात करणार उमेदवारी....
शहादा नगरपालिकेच्या निवडणुकीत होणार तिसरी आघाडी...
शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील तिसऱ्या आघाडीच्या तयारीत....
नगरपालिका निवडणुकीत अभिजीत पाटील जनता विकास आघाडी म्हणून लढवणार....
शहादा नगरपालिकेत भाजप ,शिवसेना ,काँग्रेस यासह राष्ट्रवादीला जनता विकास आघाडीचा नव आव्हान....
29 जागांवर नगरसेवक पदाचे आणि एक नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार देऊन जनता विकास आघाडी चा माध्यमातून निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचं अभिजीत पाटील यांनी केलं स्पष्ट....
प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे जिल्हाध्यक्ष पदाचा दिला राजीनामा..
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत उद्या रहिमतपूर येथे होणार कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश....
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने घेतला निर्णय
राज्यात नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीच्या आचारसंहिता घोषित करण्यात आलीय...सर्वपक्षीय पदाधिकारी आणि नेत्यांकडून देखील निवडणुकीसाठी मोठ्या हालचाली होताना दिसत आहे याच पार्श्वभूमीवर बारामती मधील ओबीसी मत व्यक्त केले आहेत पदाधिकाऱ्यांनी ओबीसी चेहराला प्राधान्य द्यावे असे मत व्यक्त केलंय... बारामती शहरात सर्वात ज्यास्त ओबीसी बांधव असल्याने ही मागणी केल्याच्या भावना ओबीसी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत..
शितल तेजवानी या मूळच्या पिंपरी चिंचवडच्या असल्या तरी त्या मागील काही वर्षापासून अतिशय उच्चभृस एरिया समजल्या जाणाऱ्या कोरेगाव पार्क येथील ऑक्सफर्ड हॉलमार्क या सोसायटीमध्ये वास्तव्यास आहेत. मात्र त्यांच्या विरोधात फसवणुकीचे दोन गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यामागील तीन दिवसापासून फरार आहेत. अशी माहिती ऑक्सफर्ड हॉलमार्क सोसायटीच्या सूत्रांनी दिली आहे. शितल तेजवानी आपल्या सोबत काही महत्त्वाची कागदपत्र आणि मोठी रोख रक्कम घेऊन विदेशात परार झाल्याची शक्यता देखिल व्यक्त करण्यात येत आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन माझ्या हत्तेचा कट रचल्याचा गंभीर आरोप धनंजय मुंडे यांच्यावर केला होता, त्यानंतर धनंजय मुंडे यांनीही परळी पत्रकार परिषद घेऊन याला चांगलेच उत्तर दिले होते. ओबीसी नेते धनंजय मुंडे यांना बदनाम करण्याचे षडयंत्र सुरू आहे असा आरोप करत परळीतील मुंडे समर्थक रस्त्यावर उतरले आहेत. मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत मुंडे समर्थकांनी घोषणाबाजी केली.
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना धमकी दिल्याच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने आज पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात धमकी देणाऱ्या संबंधित व्यक्तींवर तातडीने आणि कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. जरांग पाटील हे मराठा समाजाच्या हक्कांसाठी शांततेने लढा देत आहेत, आणि अशा समाजहिताच्या नेत्याला धमक्या मिळणे ही लोकशाहीविरोधी आणि गंभीर बाब आहे.काही लोक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यावर कारवाई करावी अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी दिला
धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा सामना सत्ताधारी भाजप सोबत असलेल्या महायुती विरोधात महाविकास आघाडी असा सामना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दरम्यान असणार असल्याचे धुळे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रवीण चौरे यांनी स्पष्ट केले आहे,
एकीकडे महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिंदे सेना व राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे एकला चलो रे ची भूमिका घेतली जाणार असल्याचे दिसून येत असून, दुसरीकडे मात्र काँग्रेसतर्फे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दरम्यान सावध भूमिका घेत महाविकास आघाडीत एकत्रच या निवडणुका लढविण्यासंदर्भात पावलं उचलली जात असल्याचे दिसून येत आहे, वरिष्ठांच्या आदेशानंतरच पुढील भूमिका घेतली जाईल असे देखील यावेळी काँग्रेसच्या वतीने सांगण्यात येत आहे,
सोलापुरात धनंजय मुंडे यांच्या समर्थनात आंदोलन...
सकल मराठा समाजाने धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेला केलेल्या जोडेमार आंदोलनाला प्रतिउत्तर म्हणून सोलापुरात मुंडे समर्थकांचे आंदोलन...
आमदार धनंजय मुंडे युवा प्रतिष्ठान यांच्या वतीने आमदार मुंडे यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून समर्थन दर्शवले...
कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत मुंडे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी...
आंदोलनादरम्यान मुंडे समर्थकांनी मनोज जरांगे-पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले...
मनोज जरांगे यांच्या हत्येचा कट रचणारे आरोपी त्यांचेच कार्यकर्ते आहेत...
आमदार धनंजय मुंडे यांना बदनाम करण्याचे काम जरांगे-पाटील करत आहेत...
जरांगे-पाटील यांनी नार्को चाचणीसाठी पुढे यावे, मग सत्य समोर येईल मुंडे समर्थकांची मागणी...
विक्रोळी येथील बहुप्रतीक्षित महात्मा फुले रुग्णालय च्या पुनर्निर्माण वरून श्रेयवाद रंगला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सुनील राऊत यांनी या रुग्णालयाचे श्रेय घेणारी पोस्ट समाज माध्यमात केली. यामुळे आज शिवसेना आक्रमक झाली. शिवसेनेच्या वतीने आज या रुग्णालयाच्या समोर आंदोलन करण्यात आले. राऊत यांचा पुतळा जाळण्यात आला. त्यांनतर आता युवा सेना ही सुनील यांच्या घराकडे निघालेली असताना पोलिसांनी त्यांना मध्येच अडवले आहे. यावेळी पोलिसांशी धक्काबुक्की सुरू आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने गणेश नाईक यांनी मॅरेथॉन बैठका घेतल्या
भाजपचे माजी नगरसेवक आणि नवी मुंबई महानगरपालिकेचे प्रशासनातले अधिकारी यांच्या संयुक्त बैठक झाली
नगरसेवकांच्या प्रश्नांवर नाईक आक्रमक होते
प्रत्येक प्रभागातील काही समस्या गणेश नाईक यांनी समजून घेतल्या अधिकाऱ्यांना तातडीने प्रश्न मार्गी काढा या दृष्टीने बैठक झाली
वडापाव मध्ये प्लास्टिकचे तुकडे आढळून आले आहेत. पिंपरी चिंचवड शहरातील ताथवडे परिसरातील डी वाय पाटील बायो इन्फॉर्मेटिक्स कॉलेजच्या मेस कॅन्टीनमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विद्यार्थी मेस मध्ये वडापाव खात असताना त्यांना अचानक वडापाव मध्ये प्लास्टिकचे तुकडे जाणवू लागले. त्यानंतर संतापलेल्या विद्यार्थ्यांनी मेस च्या बाहेर मेस प्रमुख आणि कॉलेज प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केला आहे. ताथवडे येथील डी वाय पाटील कॉलेज प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची आणि त्यांना सुरक्षित तसेच स्वच्छ अन्न पुरवण्याची काळजी घ्यावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे
रुपाली ठोंबरे यांच्या बहिणीवर मारहाणीचा आरोप करणारी माधवी खंडाळकर अजित पवारांच्या भेटीला.
कालच पक्षाने रुपाली पाटील यांना शिस्तभंगाची कारणे दाखवा नोटीस रुपाली ठोंबरे पाटील यांना जाहीर केली आहे
तर माधवी खंडाळकर यांच्या तक्रारीवरून रुपाली पाटील यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे
दहिसर टोल नाका शिफ्ट करण्याचा सरकारचा निर्णय
१३ तारखेपर्यंत टोल नाका शिफ्ट न झाल्यास पूर्णपणे टोलनाका उखडणार असल्याचं सरनाईक यांनी सांगितले
ठाकरे गट व भाजपच्या कार्यकर्त्यात धाराशिव पंचायत समिती कार्यालयात तुफान राडा
पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या केबिनमध्ये दोघेजण एकमेकांशी भिडले
ठाकरे सेनेचे संजय खडके आणि भाजपचे वाघोली गावचे माजी उपसरपंच सतीश खडके यांची एकमेकांना शिवीगाळ
धाराशिव तालुक्यातील वाघोली ग्रामपंचायत मधील विकास कामातील भ्रष्टाचार तक्रारी वरून परस्परांमध्ये झटापट
पंचायत समिती मधील राड्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
उद्धव ठाकरे परभणी दौऱ्यावर गेले आहेत
परभणीतील शेतकऱ्यांशी आज चर्चा करणार आहेत.
या दरम्यान त्यांनी सरकारवर टीकास्त्र केले आहे
सरकार सडलेला गहू आणि किडलेले तांदूळ शेतकऱ्यांना देतंय असे म्हणाले
उद्धव ठाकरे परभणी दौऱ्यावर गेले आहेत
परभणीतील शेतकऱ्यांशी आज चर्चा करणार आहेत.
या दरम्यान त्यांनी सरकारवर टीकास्त्र केले आहे
सरकार कर्ज मुक्ती कधी करणार? असा सवाल उपिस्थत केला आहे
उद्धव ठाकरे परभणी दौऱ्यावर गेले आहेत
परभणीतील शेतकऱ्यांशी आज चर्चा करणार आहेत.
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या प्रवक्त्या रूपाली पाटील ठोंबरे 11 वाजता घेणार अजित पवारांची भेट.
पक्षाने कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर रूपाली पाटील ठोंबरे अजित पवारांच्या भेटीसाठी येणार.
आज जुन्नर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ८ जागांसाठी उमेदवार निवड प्रक्रियेची अजित पवारांनी घेतली बैठक
बैठकीत स्थानिक नेते, पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांसोबत अजित पवारांनी केली सविस्तर चर्चा
जुन्नर तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहून आपापल्या सूचना मांडल्या.
आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक सक्षमपणे जनतेच्या विश्वासावर खरा उतरेल, असा विश्वास अजित पवारांनी यावेळी व्यक्त केला.
मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने
भायखळा जवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने मुंबईकडे येणारी जलद वाहतूक उशिराने
धीम्या मार्गावरील लोकलसेवेवरहि परिणाम
एक्सप्रेस गाड्या उशिराने येत असल्याने लोकल सेवेवर परिणाम.मुंबईत जलद लोकल सेवेवर परिणाम
अजित पवार पुण्याच्या पार्टी कार्यालयात
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्याच्या पक्ष कार्यालयात अजित पवारांच्या कार्यकर्त्यांसोबत भेटीगाठी
पार्थ पवार यांच्या पुण्यातील जमीन घोटाळ्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच पुण्यात
पक्ष कार्यालयाच्या वरच पार्थ पवारांचं खाजगी कार्यालय देखील आहे
पिंपरी चिंचवड -
मुंडवा जमीन घोटाळ्यातील मुख्य आरोपी शीतल तेजवानी विदेशात पळून जाण्याची शक्यता
शितल तेजवानी दिविजन पाटील आणि रवींद्र तारू या तिघांविरोधात बावधन पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा झाला होता दाखल
तिने आरोपींचा बावधन पोलिसांकडून शोध सुरू
बुलडाणा -
हिवरखेड ते सोनाळा रोडवर भीषण अपघात
चालकाचे नियंत्रण सुटल्याने चारचाकी थेट पुलाखाली
सुदैवाने जीवित हानी टळली
मात्र गाडीतील प्रवाशी जखमी झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात केले भरती
सोलापूर -
- सोलापूर विमानतळ आता बिझी एअरपोर्ट होणार, विमानसेवेची व्याप्ती वाढली
- मुंबई - बेळगाव रोज तर बंगळूरुला दर रविवारी सोलापुरातून विमान घेणार उड्डाण..
- 10 नोव्हेंबर पासून सोलापूर - मुंबई - बेळगाव हवाई मार्गावर दररोज विमानसेवा असणार
रत्नागिरी - महाराष्ट्रमध्ये महायुती व्हावी असे आमचे प्रयत्न आहेत योगेश कदम
रत्नागिरी मध्ये देखील महायुती व्हावी यासाठी देखील आम्ही संपर्कात आहोत
स्थानिक स्वराज्य संस्थेत महायुती म्हणून लढलो तर महाविकास आघाडी कुठेच पुढे येणार नाही
काँग्रेस मुक्त भारत आमचा नारा होता काँग्रेस मुक्त महाराष्ट्र यासाठी आमची एकी आवश्यक
वैभव खेडेकर यांच्या विधानाला आपण जास्त महत्व देत नाही आणि ना वैभव खेडेकरांना आपण महत्त्व देत
विकास निधी हा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडून घेत असतो त्यामुळे येथे श्रेय वादाचा विषयच नाही
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल तशा सूचना देण्यात आले आहेत
उद्धव ठाकरे यांनी कुठल्या बांधावर जावं हा त्यांचा प्रश्न आहे यावर मी काहीही बोलू इच्छित नाही
यवतमाळमध्ये ठेवीदारांना 20% रक्कम देण्यात सुरुवात
डबघाईस आलेल्या यवतमाळ येथील बाबाजी दाते महिला बँकेतील ठेवीदारांना 20 टक्के रक्कम समप्रमाणात वाटप करण्यास सुरुवात झाली
उर्वरित 80 टक्के रक्कम मिळून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक तथा अवसायक नानासाहेब चव्हाण यांनी सांगितले
यासंदर्भात माजी मंत्री मदन येरावार यांनी पाठपुरावा केला होता.
पुणे -
पुण्याचे माजी विधान परिषद आमदार अनिल भोसले यांच्यावर बँक घोटाळा प्रकरणी अखेर पीएमएलए कोर्टात आरोप निश्चिती झाली
त्यांच्यावर शिवाजीराव भोसले सहकारी बँकेत 71 कोटींचा गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय...
याच घोटाळ्यात ते गेली अनेक महिने तुरूंगात आहेत
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अतिशय प्रतिष्ठेच्या नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या बिगुल अखेर चार नोव्हेंबरला वाजला
गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली,आरमोरी, देसाईगंज वडसा या तीन नगरपालिकांसाठी रणसंग्राम रंगणार आहे
या निवडणुका शहरी मतदारांचा कॉल ठरविणार असून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीची ही लिटमस टेस्ट मानली जात आहे
नाशिक -
- राजकीय गुंडांनंतर नाशिक पोलिसांचा मोर्चा आता खंडणी वसूल करणाऱ्या गुंड आणि अवैध सावकारांकडे
- द्वारका ते कसारा टॅक्सी व्यवसाय सुरू करण्यासाठी ५० हजारांची खंडणी मागणाऱ्या श्रमिक सेनेच्या पदाधिकाऱ्यांना अटक
- खंडणी मागितल्याप्रकरणी ३ जणांना पोलिसांकडून अटक
- तर अवैध सावकारी करणाऱ्या आणि अवैध सावकारीच्या नावाखाली खंडणी मागणाऱ्या सावकाराला देखील पोलिसांनी ठोकल्या बेड्या
- नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला, नाशिक पोलिसांच्या ऑपरेशन गुन्हेगारी क्लीन अप मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात
तुळजापुरात माजी आमदार सिद्धराम म्हेत्रे यांच्या साखर कारखान्याविरोधात शेतकरी आक्रमक
तुळजापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शेतकऱ्यांनी सुरू केलं आमरण उपोषण
म्हेत्रे यांच्या मातोश्री साखर कारखान्याकडे 2023 - 24 हंगामातील बिले प्रलंबित असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप
चालू हंगामात 3000 रुपये प्रति टन पहिला हप्ता उचल म्हणून देण्याची मागणी
शेतकऱ्यांना पिक विमा 15 डिसेंबर पर्यंत काढता येणार
सततच्या पावसाने यावर्षी रब्बी हंगाम लांबला असून यासोबत पीक विमा काढण्यासाठी वाढीव मुदत मिळाली आहे.
रब्बी हंगामातील सहा पिकांसाठी शेतकऱ्यांना पिकांसाठी विमा उतरविता येणार आहे.
15 डिसेंबरपर्यंत शेतकऱ्यांना पिकाचा विमा काढता येणार आहे.
यवतमाळ जिल्ह्याची जबाबदारी भारतीय कृषी विमा कंपनीकडे सोपवण्यात आली आहे.
नागपूर -
- नगरपरिषद, नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी जिल्हा काँग्रेसने घेतलेल्या मुलाखतीवरून गटबाजी पाहायला मिळालीय
- बैठकीला जिल्हा निवड मंडळातील सर्व पदाधिकाऱ्यांना बोलाविण्यात आले नसल्याची तक्रार प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे करण्यात आलीय...
- तातडीने जिल्हा प्रभारी माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी फोनवरून मुलाखती थांबविण्याचा निरोप दिला. मात्र गर्दी झाल्यानं इच्छुकांना परत न पाठवता मुलाखती पार पडल्यात....
- नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या गणेशपेठ येथील कार्यालयात मुलाखती झाल्यात...
- नगर परिषद, नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांमध्ये मोठा उत्साह होता. इच्छुक ५३० इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या. प्रत्येकाने आपण कसे सक्षम आहोत, हे नेत्यासमोर मांडले.
नागपूर -
- यंदाचे हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबर ते होऊन १९ डिसेंबरपर्यंत असणार आहे...विधानभवन सचिवालयाचे कामकाज २८ नोव्हेंबरपासून नागपुरात सुरू होणार असल्याचं संगीतले जात आहेय..
- विधानभवन सचिवालयाने हे सत्र ८ डिसेंबरलाच सुरू होणार असल्याच पत्र नागपूर विधानभवनातील कक्ष अधिकारी यांनापाठवण्यात आले आहे..
- पत्रात विधानभवनातील पीठासीन अधिकारी आणि इतर अधिकारी यांच्या कक्ष आणि निवास व्यवस्थेची तयारी करण्याचे निर्देश दिले
- दोन आठवड्यांच्या या सत्रात एकूण १० दिवसांचे कामकाज असणार आहे....
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.