Maharashtra Live News Update Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update: जालना शहरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस सुरूच, पाच जणांना घेतला चावा

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज बुधवार, दिनांक ५ नोव्हेंबर २०२५, महाराष्ट्रातील ताज्या बातम्या, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा, राज्यातील राजकीय घडामोडी, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

Jalna News: जालना शहरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस सुरूच, पाच जणांना घेतला चावा

जालना शहरात मोकाट कुत्र्यांचा हैदोस सुरूच

जालन्यात पाच जणांना घेतला मोकाट कुत्र्यांनी चावा

दोन चिमुकले गंभीर जखमी

मोकाट कुत्र्यांच्या वाढलेल्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Ratnagiri: भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच खेडमध्ये जंगी स्वागत

रत्नागिरी - भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच खेडमध्ये जंगी स्वागत

पदाधिकारी कार्यकर्ते बैठक आटपून रवींद्र चव्हाण स्व.मिनाताई ठाकरे नाट्यगृहात मेळाव्यासाठी दाखल

प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर पहील्यांदाच रवींद्र चव्हाण यांचा कोकण दौरा

खेड , चिपळूण आणि रत्नागिरीत चव्हाण यांच्या महत्वाच्या पक्ष बैठका आणि मेळावे

रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत अनेकांचे होणार पक्ष प्रवेश

नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणूकीसाठी रवींद्र चव्हाण यांचा हा दौरा महत्वाचा

Beed: उद्धव ठाकरे बीडच्या पाली गावामध्ये दाखल, शेतकऱ्यांसोबत साधणार संवाद 

बीड -

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बीडच्या पाली गावामध्ये दाखल

शेतकऱ्यांसोबत संवाद साधताना उद्धव ठाकरे.

शेतकऱ्यांनी मांडल्या उद्धव ठाकरे यांच्यासमोर व्यथा.

Mumbai: दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या कमेंटप्रकरणी वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा

मुंबई -

दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या कमेंट प्रकरणी वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

वाकोला पोलिसांकडे कलम 196 BNS अंतर्गत गुन्हा नोंद

इंस्टाग्रामवरील भडकावू कमेंट प्रकरणी मोहम्मद सिद्दीक मोहम्मद सलाउद्दीन (28 वर्षीय) युवक अटकेत

फिर्यादी अजित यादव यांनी छत्रपती संभाजी महाराज समर्थनार्थ व्हिडिओ पोस्ट केला होता

आरोपीने sayyadi_hussain आयडीवरून समाजात तेढ निर्माण करणारी कमेंट केल्याचा आरोप

Shindhudurg: सिंधुदुर्गात युती नकोच भाजप कार्यकर्त्यांचा स्वबळाचा नारा

सिंधुदुर्गात युती नकोच भाजप कार्यकर्त्यांचा स्वबळाचा नारा

युती तुटल्यास सिंधुदुर्गात नितेश राणे निलेश राणे येणार आमने सामने

सिंधुदुर्गात शिवसेनेसोबत युती नको स्वबळावरच लढूया असा आग्रह भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी धरला आहे.

आज रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपची महत्त्वाची बैठक सावंतवाडी येथे होणार आहे.

या बैठकीत नितेश राणे आणि रवींद्र चव्हाण एकाच व्यासपीठावर येतायत. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हा स्वबळाचा आग्रह धरला आहे.

Pandharpur: वारकरी साहित्य परिषदेकडून सात लाख रूपयांचा रथ भेट

पंढरपूर -

भक्त पुंडलिक पालखी सोहळ्यासाठी सागवानी रथ

वारकरी साहित्य परिषदेकडून सात लाख रूपयांचा रथ भेट

Pune: पुण्यातील वाढती गुन्हेगारीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आंदोलन

पुणे -

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन

पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या विरोधात आंदोलन

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, शरद पवारांच्या राष्ट्रवादी ची मागणी

पुण्यातील अभिनव चौकात आंदोलन

Pune: निलेश घायवळवर आणखी एक मोक्का, तरुणावर केला होता कोयत्याने हल्ला

पुणे -

निलेश घायवळवर आणखी एक मोक्का

१८ सप्टेंबर रोजी घायवळ टोळीच्या सदस्यांनी केला होता एका तरुणावर कोयत्याने हल्ला

कोथरूड पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता

गायवळ टोळीच्या सदस्यांनी कोथरूडमध्ये गोळीबार केल्यानंतर एका तरुणावर त्याच रात्री कोयत्याने हल्ला केला होता

Pune: आमदार रवींद्र धंगेकर यांचे ट्वीट, मुरलीधर मोहोळांवर गंभीर आरोप

पुणे -

आमदार रवींद्र धंगेकर यांनी केलं ट्वीट

धंगेकरांचा मुरलीधर मोहोळं वार पुन्हा एकदा मोठा आरोप

हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर केला मोहोळांच्या गुंड यांनी हल्ला

बिद्री साखर कारखाना ऊसाला प्रतिटन ३६१४ रूपये दर देणार , अध्यक्ष, माजी आमदार के. पी. पाटील यांची घोषणा

कोल्हापूर जिल्ह्यातील श्री. दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याने सन २०२५-२६ च्या गळीत हंगामात येणाऱ्या ऊसास प्रतिटन रु.३६१४/- ऊसदर देणार असल्याची सुधारीत घोषणा अध्यक्ष के. पी. पाटील यांनी केली.

शेतकऱ्यांची माहिती सरकार दरबारी आहे. मी काही आज प्रचार करायला आलेलो नाही. मराठवाड्यावर मोठं संकट आलेले आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले

बीड तालुक्यातील लिंबा रुई गावातून केंद्रीय पथकाच्या पाहणी दौऱ्याला सुरुवात

मागील महिन्यात अतिवृष्टीने बाधित झालेल्या क्षेत्राची पाहणी करण्यासाठी केंद्राचं पथक बीडमध्ये दाखल झालंय. बीड, शिरूर आणि आष्टी तालुक्यातील बाधित क्षेत्राची पथकाकडून पाहणी केली जातेय. बीड तालुक्यातील लिंबारुई गावातून पथकाच्या दौऱ्याला सुरुवात झाली आहे. मागील महिन्यात लिंबारुई गावातून वाहणाऱ्या डोंमरी नदीला पूर आला होता. याच पुराने नदीकाठची शेती बाधित झाली. शेतीसह अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी देखील बुझल्या आहेत. आणि याचीच पाहणी या केंद्रीय पथकाकडून करण्यात येतेय. दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक आणि बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत याचा आढावा घेतला जातो आहे.

केंद्राचे पथक बीडमध्ये दाखल

मराठवाड्यामध्ये झालेली अतिवृष्टी त्याचबरोबर शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालं याचा प्राथमिक अहवाल घेण्यासाठी केंद्राचे पथक बीडमध्ये दाखल झाले असून शेतकऱ्यांच्या बांधावरून थेट पाहणी करून अहवाल सादर करण्यात येणार आहे पथक बीडमध्ये दाखल झाले आहे.

मेहकरात भूखंड घोटाळा उघड, दिग्गजांसह इतरांचे 58 भूखंड रद्द

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर चे उपविभागीय अधिकारी यांनी उपविभागातील अनेक ले आउट रद्द केल्याने अनेकांचे धाबे दणाणले असून यात काही दिग्गजांचे ले आउट रद्द च्या यादीत असल्याने एकच खळबळ उडाली आहे.. मेहकर शहरात तत्कालीन एसडिओ गणेश राठोड यांनी जमिनी अकृषक करण्याचा सपाटा लावला होता, परिणामी नगररचना विभागाच्या नियमाकडे दुर्लक्ष करत नगररचना विभागाने नकाशा मंजूर केलेला नसतांना देखील जमीनी एन ए अर्थात अकृषक केल्याने भूखंड माफियांनी सर्रासपणे जमिनी एन ए करून प्लॉट विकल्याने ज्या ज्या नागरिकांनी आपले घर होणार हे स्वप्न बघून आपल्या आयुष्याची पुंजी गमावली, त्या नागरिकांचे धाबे दणाणले आहे .. आम्ही तर एन ए ३४ बघून प्लॉट घेतले आता आमचे काय होणार ? अशी अवस्था झाली आहे.. पैकी 58 ले-आउट रद्द करण्यात आले असून काहींना दिवाणी न्यायालयाने तूर्त स्थग्नादेश दिला आहे, तर काही ले आउट धारकांनी आपले एन ए प्रकरण पुनर्विलोकणासाठी दाखल केले आहेत.. सगळी प्रक्रिया झाल्यावर योग्य ती कारवाई करण्यात येइल असे आश्वासन एसडीओ यांनी दिले आहे

सातपुड्यातील सुहासची गगनभरारी

नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातून आलेल्या एका जिगरबाज तरुणाने आपल्या अथक परिश्रमाच्या बळावर महाराष्ट्राच्या स्पर्धा परीक्षांच्या जगात एक नवा आणि प्रेरणादायी अध्याय लिहिला आहे. मोलगी परिसरातील सोराचापडा या छोट्या आदिवासी पाड्यावर राहणाऱ्या सुहास धरमसिंग वसावे या तरुणाने, अत्यंत बिकट आर्थिक परिस्थितीतून मार्ग काढत, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2024 मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षेत एसटी प्रवर्गातून राज्यात नववा 9 वा क्रमांक मिळवत दैदिप्यमान यश संपादन केले असून त्यांची सहाय्यक राज्यकर आयुक्त पदावर त्याची नियुक्ती होणार आहे सुहास वसावेच्या या यशाने सातपुड्याच्या कुशीत आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे

nashik-chandvad-गुरुनानक जयंती निमित्त फलकावर चित्र रेखाटनातून केले अभिवादन

शीख धर्मियांचे संस्थापक गुरुनानक देवजी यांच्या जयंती निमित्ताने चांदवडचे कला शिक्षक देव हिरे यांनी फलकावर रंगीत खडूंच्या माध्यमातून चित्र रेखाटले असून,सर्व लोकांना दया,समानता,प्रेम,मानवता व विश्वबंधूतेची शिकवण देणा-या गुरुनानक देवजी यांचा संदेश चित्र रेखाटनातून त्यांना अभिवादन केले आहे.

शरद पवारांची राष्ट्रवादी विदर्भात तिसऱ्या आघाडीत

नगरपरिषद आणि नगर पंचायतच्या निवडणुका जाहीर झाल्या मात्र नागपुर जिल्ह्यात महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याच चित्र पाहायल मिळत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाने काँग्रेस सोडून समविचारी पक्षा सोबत तिसऱ्या आघाडीची तयारी सुरू केली. शरद पवार गटाचे नागपूर जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे पाटील यांनी यांची समविचारी पक्षासोबत बोलणी करत आहे.महाविकास आघाडीत निवडणूक लढण्याला प्राधान्य मात्र काँग्रेसकडून कुठलाही प्रस्ताव आला नसल्यानं नाराजीचा सूर व्यक्त केला आहेय. काँग्रेस सोबतचा विधान सभेचा अनुभव चांगला नसल्यानं समविचारी पक्षाना सोबत घेऊन निवडणुकीला समोर जात असल्याचं बोललं जात आहे, असे प्रवीण कुंटे पाटील म्हणाले.

Junnar उत्तर पुण्यात बिबट्याची दहशत वाढली; शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी लाखांचा खर्च!

शेतशिवारात घरं बांधून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आता माणसासोबतच बिबट्यांशीही दोन हात करावे लागतायत. कुटुंबाच्या सुरक्षेसाठी शेतकऱ्यांना शेतशिवारात लोखंडी कुंपण, लाइट्स आणि सुरक्षा यंत्रणा बसवण्यासाठी हजारो रुपयांचा खर्च करावा लागत आहे. उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव खेड शिरूर परिसरात बिबट्यांची संख्या 2 हजारांवर गेलीय तर 60 जणांचे बळी गेलेत तर 14 हजारांहुन आधिक पशुधन ठार झाले असुन अनेक ठिकाणी शेतातील जनावरे, चिमुकल्यांवर बिबट्यांनी हल्ले केल्याने भीतीचं सावट पसरलंय. शेतकरी आता स्वतःच्या कुटुंबासह शेतात राहण्यासही घाबरतोय. रात्रीच्या वेळी शेतशिवारात बिबट्यांचा वावर टिपण्यासाठी शेतकऱ्यांनी सीसीटीव्ही आणि सौरदिवे बसवलेत, मात्र त्यासाठी होणारा खर्च शेतकऱ्यांच्या खिशाला चटका लावणारा ठरतोय. प्रशासनाकडून ठोस उपाययोजना न झाल्याने ही दहशत दिवसेंदिवस वाढताना दिसतेय.

वर्षातून एकदाच उघडते कार्तिक स्वामींचे मंदिर

नंदुरबार जिल्ह्यातील दक्षिण काशी तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या प्रकाशा ता.शहादा येथील कार्तिक स्वामींचे मंदिर वर्षातून एकाच दिवशी उघडते. यंदा हे मंदिर कार्तिक पौर्णिमेला अर्थात आज भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. मंदिरावर दर्शना साठी महाराष्ट्र, मध्यप्रदेश यासह जवळच्या गुजरात राज्यातील भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. या मंदिराचे वाशिष्ट्ये म्हणजे या मंदिरात गणपती आणि कार्तिक स्वामी यांची स्वयंभू अशी मूर्ती आहे एकाच पाषाणात या दोन हि मुर्त्या कोरण्यात आल्या आहेत अहिलाबाई होळकरांनी हे मंदिराचे बाधकाम केल्याचे सांगितले जाते. तापी नदी काठावरील हे एकमेव प्राचीन मंदिर आहे...

सांगली मध्ये पसरली गर्द धुक्याची झालर..

सांगली शहरावर धुक्याची झालर पसरली आहे.. गेल्या काही दिवसात वातावरण निर्माण झालेला बदल आणि हवेतील गारवा आणि पाऊस यामुळे वातावरणात मोठे बदल होत आहे.. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झाल्यामुळे शहरावर धुक्याची झालर पसरली आहे.. पहाटेपासून गर्द धुके पडायला सुरुवात झाली आहे.. अत्यंत दाट आणि पुढचे काही न दिसणारा असं दाट धुके शहरवासीय अनुभवत आहेत... यामुळे गुलाबी थंडीत सांगलीकरांना धुक्याचा मनमुराद आनंद लुटण्याची संधी मिळाली आहे...या धुक्यातुन सांगलीकर वाट काढत होते.

Bhandara : मोहगाव करडी येथील शिवम कृषी केंद्राला मध्य रात्री लागली आग

भंडारा जिल्ह्यातील मोहगाव (करडी) येथील शिवम कृषी केंद्र या दुकानाला रात्रीच्या सुमारास आग लागण्याची घटना घडली आहे. या आग लागल्याच्या घटनेमुळे कृषी केंद्रातील खते, बियाणे, कीटकनाशके आणि इतर शेती उपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले असून,ही आग कोणीतरी अज्ञात व्यक्ती कडून लावण्यात आली असल्याचा बोलले जात आहे.या कृत्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.घडलेल्या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून, कृषी केंद्राला आग लावणाऱ्या अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त कोल्हापुरातील पंचगंगा घाट उजळला ५१ हजार दीपांनी! ‘देवदिवाळी’चा दैवी सोहळा तेजोमय!

कोल्हापुरात आज त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त पंचगंगा नदी घाटावर दीपोत्सवाचा सोहळा साजरा करण्यात आला. कोल्हापूरकरांनी तब्बल ५१ हजार दीप पणत्या लावून घाट उजळून टाकला. फटाक्यांची आतषबाजी, आकर्षक रांगोळ्या, फुलांच्या पायघड्या आणि पारंपरिक सजावट यामुळे संपूर्ण घाट दैवी प्रकाशाने न्हाऊन निघाला. त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुर राक्षसाचा वध करून धर्म आणि सत्याचा विजय मिळवला, या आनंदात दिवे लावून ‘देवदिवाळी’ साजरी करण्याची परंपरा आहे. कोल्हापुरात या दिवशी अंबाबाई मंदिर, पंचगंगा घाट आणि शहरातील विविध मंदिरांमध्ये दीपोत्सव साजरा केला जातो. आज पहाटे हजारो दीपांच्या प्रकाशाने संपूर्ण परिसर दैवी तेजाने झळाळून गेला. हा सोहळा पाहण्यासाठी पहाटेपासूनच पंचगंगा नदी घाटावर कोल्हापूरकरांनी गर्दी केली होती.

Maharashtra Live News Update: राज्यात थंडीला सुरुवात होण्याची शक्यता

सतत ढगाळ वातावरण अधून मधून सरी आणि अस्थिरवामामुळे पुणेकर ह्याला झाले होते परंतु आता पावसाने हकीर विश्रांती घेतली असून हवेतील गारवा वाढू लागला आहे पुढील तीन ते चार दिवसात कमाल आणि किमान तापमानात लक्षणीय घट होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे परिणामी शहरातील थंडीला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

PUNE : वेल्ह्यात आढळलेल्या बारा फुटी अजगरास सोडले पुन्हा निसर्गाच्या सानिध्यात

वेल्हे (ता.राजगड) येथील गुंजवणी धरण परिसरात असलेल्या एका खाजगी रिसॉर्ट परिसरात आढळलेल्या बारा फुटी अजगरास सर्प रक्षक व वन विभागाच्या पथकाने यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन करत निसर्गाच्या सानिध्यात सोडण्यात आले.गुंजवणी धरण परिसरामध्ये एका खाजगी रिसॉर्ट च्या परिसरात  मोठा अजगर रिसॉर्टच्या व्यवस्थापक संतोष भोंडेकर यांना आढळला. यानंतर  भोंडेकर यांनी तात्काळ दूरध्वनीद्वारे याची माहिती पुणे जिल्हा वन्यप्राणी व सर्परक्षक असोसिएशनचे सदस्य विशाल नगीने व विकास भिकूले व वन कर्मचाऱ्यांना दिली. काही वेळातच घटनास्थळी वन कर्मचारी व सर्पमित्र यांनी रेस्क्यू मोहीम सुरू केली.या मोहिमेत वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल लांडगे, वनपाल वैशाली हाडवळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक सारिका भैमुले,भाग्यश्री जगताप,स्वप्नील उंबरकर व निखिल रासकर यांनी व विकास भिकुले, विशाल नगिने यांनी संयुक्तपणे सहभाग घेतला. सर्वांच्या समन्वयातून अजगराला जखमी न करता अत्यंत शिताफीने पकडण्यात आले.यानंतर या अजगराला वनविभागाच्या देखरेखीत त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आले.या कारवाईदरम्यान वनविभागाने सर्पमित्रांचे विशेष आभार मानले. तसेच, सर्प व इतर वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी नागरिकांनी अशा प्रसंगी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले.

रोहित आर्य एन्काऊंटर प्रकरणात मानवाधिकार आयोगाकडून चौकशीचे आदेश

पोलिस कारवाईत मृत्युमुखी पडलेल्या रोहित आर्या (Rohit Arya) प्रकरणात महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने चौकशीचे निर्देश दिले आहेत.

YAVATMAL :यवतमाळमध्ये पोलीस भरतीच्या तयारीसाठी तरुणांची मोठी गर्दी

यवतमाळ जिल्ह्यात पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात होताच शहरातील मैदानांवर मोठी गर्दी उसळली आहे. शहरातील व जिल्ह्याच्या विविध भागांतून इच्छुक तरुण मैदानात मेहनत घेताना दिसत आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील १६१ जागांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे, ज्यात १५० जागा पोलीस शिपाई पदाच्या आहेत, तर ११ जागा बॅन्ड्रसमनच्या आहेत. भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, मैदानावर तयारी करणाऱ्या उमेदवारांची संख्या लक्षणीय आहे. तरुणांमध्ये पोलीस दलात दाखल होण्याची मोठी उत्सुकता दिसून येत आहे.

PUNE : लष्कर भागातील पाणीपुरवठा समस्येबाबत मनसेकडून आंदोलन

गेले अनेक महिन्यांपासून लष्कर भागामध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने, अनियोजित व अनियमित पद्धतीने होत असल्याबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने नागरिकांची सह्यांची मोहिम राबविण्यात आली होती. या मोहिमेदरम्यान गोळा करण्यात आलेल्या सह्यांचा बॅनर लष्कर पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना भेट देण्यात आला. तसेच तो बॅनर विभागाच्या कार्यालयाच्या गेटवर लावण्यात आला आणि संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.यावेळी अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर आवश्यक दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात येतील, असे आश्वासन दिले.या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तसेच अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hruta Durgule: ‘आली मोठी शहाणी’च्या गोव्यातील चित्रीकरणाचा श्रीगणेशा ! हृता दुर्गुळे - सारंग साठ्ये पहिल्यांदाच एकत्र

Mumbra Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघातात मोठी कारवाई, २ इंजिनिअर आणि अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा

Garlic Chutney: वरण भातासोबत पापड नको, फक्त ५ मिनिटांत तयार करा झणझणीत लसूण आणि पुदिना चटणी

Janjira Fort : आनंदाची बातमी! जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी खुला, 'या' कारणामुळे होता बंद

देव दिवाळीला काळाचा घाला, हावडा एक्सप्रेसने रेल्वे रूळ पार करणाऱ्यांना उडवले, ८ महिला भाविकांच्या चिंधड्या

SCROLL FOR NEXT