पुणे- आहिल्यानगर महामार्गावर कोरेगाव भीमा येथे कामगारांची वाहतूक करणाऱ्या बसला आग
महामार्गावर अचानक बसने पेट घेतल्याने सर्वत्र धावपळ
पुण्याच्या दिशेने कामगारांना घेऊन जाताना आग लागली, मात्र आगीचे कारण अस्पष्ट
बसमधील कामगारांनी प्रसंगावधान राखत बाहेर पडले सुदैवाने दुदैवी घटना टळली
मात्र संपूर्ण बस जळून खाक
पुणे-आहिल्यानगर महामार्गावर बसला आग लागल्याने दोन्ही बाजूने वाहतुककोंडी
पिंपरी चिंचवड महापालिकेचा भोसरी येथील रुग्णालयात दारू पार्टी करतानाचा एक व्हिडिओ सध्या झपाट्याने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रुग्णालयातील एक्स-रे विभागात रुग्णालयातील काही कर्मचारी दारू पार्टी करताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यामुळे रुग्णालयातील रुग्णांच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करून दारू पार्टी करणाऱ्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर आता महापालिकेचा आरोग्य विभाग काय कारवाई करते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.
रोहित आर्य एन्काऊंटर प्रकरणाचा तपास आता मुंबई क्राईम ब्रांचकडे वळवल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
पुण्यात एटीएसने अटक केलेल्या जुबेर हंगरेकर याच्या संपर्कात असलेल्या एका तरुणाला सोलापूरातून ताब्यात घेण्यात आलंय. जूबेर हा देखील 18-20 ऑक्टोबर दरम्यान सोलापुरातील एका शाळेतील कार्यक्रमत हजर होता, असा संशय पोलिसांना आहे. त्या दृष्टीने शाळेचे प्राचार्य, शिक्षक कार्यक्रम आयोजक यांची देखील चौकशी होणार आहे.
चार तारखेपर्यंत आहे हंगारगेकरला पोलीस कोठडी
अजूनही काही धागेदोरी एटीएसला हाती लागण्याची शक्यता
देशात अनेक ठिकाणी घातपात करण्याचा होता डाव
राज ठाकरे यांचा कार्यकर्ता मेळावा पार पडतोय. या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्यासोबत उठणं बसणं सुरुच राहणार, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने परभणीच्या पूर्णा तालुक्यातील देऊळगाव दुधाटे येथे परभणी जिल्ह्यात रोजगार हमी योजनेतून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी विहीर, गायगोठा, यांचे कामे पूर्ण करून जवळपास चार वर्षे पूर्ण झाली तरी देखील कुशल बिल अद्यापही बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावर पडले नव्हते 2021 पासून प्रलंबित असलेल्या कुशल बिल असलेल्या शेतकऱ्यांनी आक्रमक होत आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मागण्या घेत आज जलसमाधी आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन चार तास नंतर रोजगार हमी,योजनेचा डेप्युटी सीईओ व त्यांच्या सोबत पुर्णा पंचायत समितीचे बीडीओ यांनी घटना स्थळी येऊन आंदोलकांशी संवाद साधला 2021 पासून प्रलंबित असलेल्या विहिरीच्या कुशल बिलाच्या संदर्भात ताबडतोब कार्यवाही करून एक महिन्याच्या आत प्रलंबित असलेले कुशल बिल शेतकऱ्याच्या खात्यात जमा करू दोषी अधिकाऱ्यांची तत्काळ बदली करू आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी आंदोलना स्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त होता व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते
रोहित आर्य यानं पवईत मुलांना ओलीस का ठेवलं, यामागचं कारण समोर आलं आहे. सरकारच्या वेगवेगळ्या प्रकल्पांमध्ये त्यानं पैसे लावले होते. कोट्यवधींची गुंतवणूक केली होती. त्यात नुकसान झालं. सरकार आणि संबंधित विभाग जबाबदार आहे, असं त्याला वाटत होतं. सरकारसोबत संवाद साधून आपली बाजू मांडण्यासाठी हे धोकादायक पाऊल उचलल्याची माहिती समजते.
पवईत एका स्टुडिओत ओलीस ठेवलेल्या मुलांची अखेर सुटका
आरोपी रोहित आर्य पोलिसांच्या ताब्यात
रोहित आर्य याने मुलांना ओलीस का ठेवले याचा पोलिसांकडून शोध सुरू
जालन्यातील पाथरूड गावात अतिवृष्टीमुळे कांद्याच नुकसान होऊनही पंचनामा न झाल्याने शेतकरी अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पाथरूड येथील शेतकरी अनिल खोत यांच्या कांदा पिकाचे नुकसान झालं मात्र तलाठी ,ग्रामसेवक आणि कृषी सहायकाने जाणीवपूर्वक पंचनामा केला नसल्याचा या शेतकऱ्यांनी म्हटलं.पाथरूड शिवारातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तलाठी ग्रामसेवकांनी गावात बसून बोगस पंचनामे केल्याचा आरोप या शेतकऱ्याने केला आहे.या संदर्भात या शेतकऱ्यांने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केलीय.
पवईत एका माथेफिरुने लहान मुलांना ठेवलं डांबून
व्यक्ती मानसिक रुग्ण असल्याची माहिती
साकीनाका पोलिस आणि क्राईम ब्रांच 10 चे पथक घटनास्थळी रवाना
अमरावती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्याला दाखवले काळे झेंडे.. अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर येथे शेतकऱ्यांनी दाखवले काळे झेंडे..
यवतमाळची सभा संपवून उपमुख्यमंत्री अजित पवार अमरावती येत असताना दाखवले काळे झेंडे..
सकाळपासून अमरावतीच्या विविध भागात पाऊस सुरू असताना देखील शेतकऱ्यांनी पावसात उभे राहून दाखवले काळे झेंडे..
सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली..
जोपर्यंत सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार नाही तोपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करणार असल्याचा शेतकऱ्यांचा इशारा.
- इमामपुर येथील साईनाथ कदम नामक व्यक्तीला रात्री 11 वाजता बीड शहरातील व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले होते.
- त्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे मारहाणीत मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे तर व्यसनमुक्ती केंद्राकडून त्याला फिट आल्यानंतर मृत्यू झाला असं सांगितलं जात आहे.
- मृतदेह शवविच्छदनासाठी बीडच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आला आहे.
- मृत व्यक्तीच्या शरीरावर अनेक जखमा दिसत आहेत.
लातूर जिल्ह्यात काल झालेल्या मुसळधार पावसामुळे रेणा नदीला पूर आला होता, दरम्यान पुराचे पाणी ओसरल्यानंतर नदीत वाहून गेलेल्या सोयाबीनचा ढीग वाचवण्यासाठी शेतकऱ्याने धडपड केली आहे.नदीवरील लोखंडी पुलाला सोयाबीनचा ढीग अडकला होता ,, प्रवाह कमी झाल्याने वाहून गेलेल सोयाबीन वाचवण्यासाठी, रेनापुर तालुक्यातल्या गोविंद पाटील या शेतकऱ्याने पदरात काही ना काही तरी पडेल या आशेने, जेसीबीच्या साह्याने सोयाबीनचा ठीक बाजूला काढण्याचा प्रयत्न केला आहे.
मंत्रालयासमोर फलटण येथील डॉक्टर महिला आत्महत्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं मोर्चा पुकारला आहे. फलटण महिला डॉक्टर आत्महत्याप्रकरणी शरद पवार गटानं आंदोलन छेडलंय.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अमरावती जिल्हा दौऱ्यावर आहेत... देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कॅम्प रोड येथील अभिनंदन अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक लिमिटेडच्या मुख्य कार्यालयाच्या नूतन इमारतीच्या लोकार्पण पार पडलं..
पुणे शहरात टोळक्यांकडून दहशत माजवण्याचे प्रकार त्यासोबतच गुंडागर्दी करण्याचे प्रकार काही थांबत नाहीय. पुण्यातील मंगळवार पेठेत असलेल्या जुना बाजार चौकात एका टोळक्याने एका चार चाकी मध्ये असलेल्या व्यक्तीला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. ही घटना काल मंगळवारी रात्री उशिरा घडली असून, या व्हिडिओ मध्ये काही तरुण या चौकाजवळ असलेल्या एका चार चाकी वाहनात बसलेल्या तरुणाला बेली ने बेदम मारहाण करत असल्याचा दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मारहाणीचे करण समजू शकले नाही..
ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील वागळे प्रभाग समिती व लोकमान्य सावरकर नगर प्रभाग समिती अंतर्गत इंदिरानगर संप येथे पाणी पुरवठा करण्यासाठी नव्याने अंथरण्यात आलेले 1168 मि.मी व्यासाची जलवाहिनी कार्यान्वित करण्यात येणार आहे. यासाठी नितिन कंपनी जंक्शन येथे 750मि.मी व्यासाच्या जलवाहिनीवर व्हॉल्व्ह बसविण्याचे काम करणे आवश्यक असल्याने शनिवार दिनांक 1/11/2025 रोजी सकाळी 9.00 ते रविवार दिनांक 02/11/2025 रोजी सकाळी 9.00 वाजेपर्यत एकूण 24 तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
प्रवाशांचा वाढता ताण लक्षात घेता लोकल आता बारा डब्यांच्या ऐवजी पंधरा डब्याची केली जाणार..
भविष्यातील वाढणारी लोकसंख्या अंदाजात पाहता मध्य रेल्वे कडून.फलाट क्रमांक दोन ची रुंदी १६.१५ मीटर वाढण्यात येणार आहे. तर फलाट क्रमांक तीन आणि चारची रुंदी हे ४० मिटर वाढण्यात येणार आहे.
प्रहार पक्षाचे नेते बच्चू कडू यांचे शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती साठी नागपूर येथे आंदोलन सुरू आहे . या आंदोलनाला पाठिंबा म्हणून मोताळा येथे शेतकऱ्यांनी भजन आंदोलन करत रस्ता रोको केलाय .शेतकऱ्यांनी मोताळा ते बुलढाणा रस्त्यावर बसून हे आंदोलन केले आहे . तर यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आलीय ..
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माळशिरस तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी राजेवाडी येथील सद्गुरु साखर कारखान्याच्या मोळी पूजन प्रसंगी गोंधळ घालून हा कार्यक्रम उधळून लावण्याचा प्रयत्न केला.
सद्गुरु साखर कारखान्याने मागील हंगामातील शंभर रुपये वाढीव थकीत ऊस बिल दिले नसल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तालुकाध्यक्ष अजित बोरकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केलं यामुळे बराच वेळ त्या ठिकाणी गोंधळ निर्माण झालेला होता.
पुण्यातील जैन बोर्डिंग सुनावणी संदर्भात मोठी अपडेट
व्यवहार रद्द करण्यासाठी बिल्डर विशाल गोखले आणि ट्रस्टी यांनी दिले प्रतिज्ञापत्र
बिल्डर आणि ट्रस्टी यांनी धर्मदाय आयुक्तांना सादर केले प्रतिज्ञापत्र
या व्यवहाराचे सेल डीड येत्या २ आठवड्यात कागदोपत्री रद्द व्हावे, याचिकाकर्ते यांची मागणी
धर्मदाय आयुक्त यांचा जैन बोर्डिंग व्यव्यवराबाबत आजच निर्णय येणार
नंदुरबार तालुक्यातील धामडोद परिसरात कापसाचे प्रचंड नुकसान....
काढणीला आलेला कापूस भिजला पावसात...
पहिलेच कापसाला भाव नाही तर दुसरीकडे शेतीतील कापूस भिजल्याने शेतकरी आर्थिक संकटात...
गेल्या 5 दिवसापासून जिल्ह्यात पावसाचा कहर....
पडत्या पावसात शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन कापूस नुकसानीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर निकवाडे यांनी...
शनिवारी मुंबईत होणाऱ्या मोर्चाची तयारी म्हणून आज पुणे शहरात महाविकास आघाडी यासह मनसे ची एक महत्त्वाची नियोजन बैठक पार पडली. यावेळी सगळ्या पक्षाचे शहराध्यक्ष उपस्थित होते त्यांनी मुंबईत होणाऱ्या मोर्चेपाठोपाठ पुण्यात देखील असा मोर्चा होणार असल्याची माहिती दिली. मुंबईतील मोर्चा हा भूतो न भविष्याती होईल असा विश्वास सुद्धा त्यांनी व्यक्त केला. पुण्यातून हजारो कार्यकर्ते १ तारखेला सकाळी मुंबईच्या दिशेने निघतील अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या घरात फुट ....
चुलत बंधू हिंदूराव माने पाटील भाजपच्या वाटेवर...
ऐन निवडणुकांच्या तोंडावर मोहिते पाटील यांना धक्का...
हिंदूराव माने पाटील व त्यांच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतली भेट....
लवकरच अकलूज येथे पक्ष प्रवेश सोहळ्याचे आयोजन ...
राम सातपुते - मोहिते पाटील संघर्ष पेटण्याची शक्यता...
बीड जिल्ह्यात गुन्हेगारी काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. बीड शहरातील एका हॉटेलवर पाच जणांच्या टोळक्याने किरकोळ कारणावरून धुडगूस घालत हॉटेल कामगाराला लोखंडी रॉड आणि दांडक्याने अमानुष मारहाण केली. या घटनेत हॉटेल कामगाराचा पाय फ्रॅक्चर झाला. जखमी कामगारावर बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात करण पवार, दिलीप पवार आणि अभिषेक खाडे या तिघा जणांविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. यातील सर्वच आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. याआधी देखील आरोपींनी अनेक ठिकाणी असाच हैदोस घातला होता. या घटनेमुळे हॉटेल व्यावसायिकांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
साताऱ्यातील फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर महिलेने हातावरती सुसाईड नोट लिहीत आत्महत्या केली. या प्रकरणात एसटीची स्थापना करण्यात यावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे मात्र सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे असा आरोप करत ग्रामस्थांनी कवडगाव येथील टाक्याच्या पानावरती जाऊन आंदोलन केले आहे आणि तात्काळ एस आय टी स्थापन करण्यात यावी त्याशिवाय आम्ही आंदोलन मागे घेणार नसल्याचा पाव उतरतेने घेतला आहे यावेळी शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेते सुषमा अंधारे आंदोलन स्थळी पोहोचल्या आहेत
बीड तालुक्यातील पाली येथे गुरुवारी पहाटे चोरट्यांनी कॅनरा बँकेत धाडसी चोरी केली. या घटनेत जवळपास आठरा लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास बँकेच्या मागील बाजूची भिंत फोडून आत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने लॉकर तोडून रोकड काढून नेली. बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी चोरट्यांनी वापरलेली साधने व पावलांचे ठसे, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू केले आहे.
पनवेल येथील सिडको कार्यालयावर नागरी सेवा केंद्रावर महाविकास आघाडी कडून मोर्चाच्या आयोजन करण्यात आले
तसेच महिलांनी गेटवर सिडको कार्यालयामध्ये पनवेलच्या महिला घुसले आहेत
तसेच गेटवरून महिला यांनी हंडा आणि मडकी फोडून गेटवर टाकले आहेत
महाविकास आघाडीचा आंदोलन सुरू आहे
सिडकोचे अधिकाऱ्यांना महिलांनी आघाडीच्या नेत्यांनी महिलांनी घेराव घातला आहे
धनगर आंदोलन दीपक बोऱ्हाडे बच्चू कडू यांच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी थोड्याच वेळात जालन्यावरून नागपूरच्या दिशेने रवाना होणार आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडू यांचे नागपूर येथे आंदोलन सुरू आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या पाठोपाठ आता धनगर आंदोलक दिपक बोऱ्हाडे देखील बच्चू कडू यांना पाठिंबा देण्यासाठी जालन्याहून रवाना होणार आहे..
हवामान खात्याचा नंदुरबार जिल्ह्याला येलो अलर्ट..
नंदुरबार जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशी पावसाचा जोर कायम..
अवकाळी पावसामुळे शेतात पाणी साचायला सुरुवात....
सततच्या पावसामुळे शेतकरी हैराण....
पुणे -
जैन बोर्डिंग व्यवहार प्रकरणी माजी आमदार रवींद्र धंगेकर पोलिस ठाण्यात
रवींद्र धंगेकर चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात पोहचले
जैन बोर्डिंग संदर्भात रवींद्र धंगेकर देणार तक्रार
जैन बोर्डिंग प्रकरणातून बिल्डर गोखले याने माघार घेतली असली तरी या गैरव्यवहाराची चौकशी व्हावी अशी धंगेकर यांची मागणी
एवढ्या मोठ्या जागेचा व्यवहार कोणी केला आणि त्यामध्ये कुणी मदत केली याचा तपास व्हावा म्हणून तक्रार करणार
नांदेड -
हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात
नांदेड शहरासह जिल्हाभरात पावसाची जोरदार बॅटिंग.
अनेक नदी नाल्यांना पावसामुळे पूर
रायगड -
लाभाच्या वस्तु वाटपावरून रायगडमध्ये शिवसेना राष्ट्रवादीमध्ये पुन्हा जुंपली
राष्ट्रवादीने शिवसेनेच्या कार्यक्रमात खोडा घातला
शिवसेना नेत्यांचा आरोप
लाभार्थी यांनी नाव न घेता व्यक्त केला संताप
नागपूर-
पावसामुळे सध्या आंदोलनाचा स्थळ परसोडी भागातील पुनर्वसन येथील एका मंगल कार्यालयामध्ये करण्यात आलेला आहे
थोड्याच वेळात या ठिकाणी बच्चू कडू यांच्यासह स्थानिक पदाधिकाऱ्यासोबत बैठक होईल..
त्यानंतर मुंबईला कोण जाणार आहे या सगळ्या संदर्भात चर्चा केली जाणार आहे,
नांदेड -
लाचखोरी प्रकरणी नायगाव पंचायत समितीचे 9 गृहनिर्माण अभियंता कार्यमुक्त
घरकुल योजनेत लाच घेतल्याची आमदार राजेश पवार यांच्यासमोर दिली होती कबुली.
नांदेड जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी काढले कार्यमुक्तीचे आदेश
आता आमदार राजेश पवार यांच्याकडून उमरी व धर्माबाद येथील कर्मचाऱ्यांना सावधानतेचा इशारा
जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाटात दरड कोसळली
सुदैवाने मोठा अनर्थ टळला, या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.
गेल्या चार ते पाच दिवसांपासून तालुक्यात अवकाळी पाऊस सुरू आहे.
सुरू असलेल्या पावसामुळे कन्नड घाटात मोठी दरड कोसळली.
यावेळी कुठलीही जीवित हानी झाली नसून मात्र काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
महामार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन दरड बाजूला सरकवून वाहतूक सुरळीत केली
पुणे -
पुण्यातील राजाराम पुल ते नांदेडसिटीपर्यंत नदी काठ होणार सुशोभित
पुण्यातील एकतानगर परिसरातील नाल्याभोवती सीमाभिंत उभारली जाणार
प्रकल्पाचा खर्च ३०० कोटीवरून ४५० पर्यंत वाढणार
खडकवासला धरणातून मुठा नदीत पाणी सोडल्यानंतर वारंवार उद्भवणाऱ्या पूरस्थितीपासून एकतानगर परिसराला दिलासा मिळावा, यासाठी पुणे महापालिकेने नदीकाठ सुधार प्रकल्प
या प्रकल्पाची निविदा पुढील आठवड्यात निघणार
नदीच्या प्रवाहासाठी भिंती ९० मीटरपर्यंत रूंद केल्या जाणार
पावसाचे पाणी वाहून नेण्यासाठी स्वतंत्र ८०० मीटर लांबीची वाहिनी बसविण्यात येणार तसेच पाण्याची पातळी वाढल्यास जॅकवेलद्वारे पाणी बाहेर काढले जाणार
पुणे -
पुणे महापालिका ऍक्शन मोडमध्ये, अतिक्रमण विरोधात जोरदार कारवाई
पुण्यातील चंदननगर परिसरात महापालिकेची अतिक्रमणविरोधी कारवाई
अतिक्रमण केलेल्या आस्थापनांवर महापालिकेचा बुलडोझर
१७ हजार ५०० चौरस फूट क्षेत्रफळाचा भाग केला मोकळा
नागपूरमधील शेतकरी आंदोलनावर आजच तोडगा निघणार
मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत आज होणार बैठक
बैठकीत शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी तोडगा निघणार
बच्चू कडू यांच्या अनेक मागण्या रास्त आहेत
बच्चू कडू यांच्यासोबत आज चर्चा होईल आणि आजच बैठकीतून सगळा तोडगा निघेल
मनोज जरांगे यांच्या देखील शेतकऱ्यांना पाठिंबा आहे
आज मुंबईत होणाऱ्या बैठकीतून मार्ग निघेल
जालना जिल्ह्यात जोरदार पाऊस
सात मंडळात अतिवृष्टी
खरीपातील पिकांचं अतोनात नुकसान
पावसाने मक्का, कपाशीसह पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान
बळीराजा चिंतेत आला आहे
नाशिक -
- नाशिकच्या द्वारका परिसरात गुंडांची दहशत
- कराड बंधू चिवडा दुकानावर अज्ञात टवाळखोरांचा कोयता आणि दगडाने हल्ला
- कुणीही जखमी नाही दुकानाचे नुकसान
- हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद
- नाशिक पोलिसांकडून तपास सुरू
रत्नागिरी - रत्नागिरी जिल्ह्यात रात्रभर पावसाची धुवाधार बॅटिंग
परतीच्या पावसामुळे कोकणातील शेतक-याचं मोठं नुकसान
कापलेली भातशेती पुर्णपणे पाण्याखाली ,भातशेती कुजण्याच्या स्थितीत
भातशेतीवर अवलंबुन असणारा कोकणातील शेतकरी चिंताग्रस्त
रत्नागिरी जिल्ह्यासाठी आज आणि उद्या यलो अलर्ट
आज आणि उद्या कोकणात मुसळधार पावसाचा इशारा
कोकणातील शेतक-याची प्रशासनाकडे मदतीची अपेक्षा
पुणे -
निलेश घायवळ प्रकरणात आता ईडीची एन्ट्री होण्याची शक्यता
पुणे पोलिसांसह आता ईडी निलेश घायवळ प्रकरणी तपास करण्याची शक्यता
पुणे पोलिस लवकरच अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) तपासासाठी पत्र पाठवणार
नवी मुंबई -
नवी मुंबईत होणार माथाडी कामगारांचा मेळावा
नवी मुंबई शहरामध्ये माथाडी कामगारांचा मेळावा व पश्चिम महाराष्ट्रातील नवी मुंबईकरांच्या रहिवाशांचा संवादाचा आयोजन महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट यांच्या वतीने करण्यात आला आहे
आगामी काळामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने हा मेळाव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नरेश म्हस्के, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, नरेंद्र पाटील इत्यादी नेते उपस्थित राहणार आहेत
नागपूर -
पावसामुळे शेतकरी आंदोलनामध्ये अडचण
रात्रभरापासून पाऊस सुरू असल्याने आज ढगाळ वातावरण असल्यामुळे पुन्हा पावसाची शक्यता
पावसामुळे आंदोलकांनी सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला आहे
तसेच आंदोलन स्थळावरील मैदानावर मोठ्या प्रमाणात चिखल झाल्यानं अडचण निर्माण झाली आहे..
पुणे -
पुण्यातील एच एन डी जैन बोर्डिंग चा व्यवहार रद्द होण्याचा आदेश आज होणार?
धर्मदाय आयुक्त यांच्या समोर आज सुनावणी
जैन बोर्डिंग व्यवहार रद्द होण्याबाबत बिल्डर आणि ट्रस्टी यांची सहमती
आजच्या सुनावणीकडे जैन समाजातील सर्व बांधवांचे लक्ष
व्यवहार पूर्णपणे रद्द व्हावा ही जैन समाजातील लोकांची मागणी
पुणे -
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात बिबट्याचा हल्ला
तीन शेळ्या ठार, नागरिकांत दहशत
भोर तालुक्यातील चिखलावडे खोऱ्यात बिबट्याच्या हल्ल्यांचा सिलसिला सुरूच आहे. शेतकरी संदीप पवार यांच्या तीन शेळ्यांचा बिबट्याने फडशा पाडला
शेळ्या शेतात चरत असताना बिबट्याने अचानक हल्ला केला
गेल्या दोन-तीन महिन्यांत अशाच प्रकारे अनेक पाळीव प्राण्यांवर हल्ले झाले आहेत. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे
वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे
पंढरपूर -
विठ्ठल रूक्मिणी मंदिरावर दिव्यांची विद्युत रोषणाई
कार्तिक यात्रेच्या निमित्ताने पंढरपूर येथील विठ्ठल रूक्मिणी मंदिरावर विद्युत दिव्यांची आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.
दिव्यांच्या विद्युत प्रकाशाने मंदिर व परिसर उजळून निघाला आहे.
धाराशिव -
धाराशिवमधील रस्त्यांची काम तातडीने सुरू करण्याची शहरातील महिलांची मागणी
भाजपा पदाधिकाऱ्यांसह महिलांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
रस्ते विकास कामाला देण्यात आलेली स्थगिती उठवावी अन्यथा आंदोलनाचा इशारा
स्थगिती उठवलेल्या कामांना पुन्हा स्थगिती दिल्याने महीला आक्रमक
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.