पुण्यामधील जैन बोर्डिंग वाचविण्यासाठी आज राज्यभरात ठिकठिकाणी सकल जैन समाज बांधवांकडून मोर्चे आंदोलन आणि दुचाकी रॅली काढण्यात येत आहे.जैन बोर्डिंग वाचावी यासाठी जैन समाज बांधव आता आक्रमक झाले आहेत.जालना शहरातल्या जैन मंदिरापासून तर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सकल जैन समाज बांधवांनी दुचाकी रॅली काढली यावेळी मोठ्या संख्येने समाजबांधवांची उपस्थिती होती.पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणाचा खरेदी व्यवहार तात्काळ रद्द करण्यात यावा अन्यथा आमचा लढा हा चालूच राहील असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. शिवाय या सगळ्या प्रकरणाला चॅरिटी कमिशनर ट्रस्टमंडळी आणि राजकीय मंडळींची हात मिळवणी असून ते जबाबदार असल्याचाही जैन समाज बांधवांनी म्हटलं.
"स्टे" कायम ठेवून धर्मदाय आयुक्त हा व्यवहार रद्द करण्याचा आदेश देणार का?
पुणे विभागाच्या सह - धर्मदाय आयुक्त यांनी सदर केला आयुक्तांना अहवाल
धर्मदाय आयुक्त यांनी दिले होते सह धर्मदाय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली एक निरीक्षक नेमून दिले होते सर्वेक्षणाचे आदेश
जैन मंदिरात भगवान महावीर यांचे मंदिर असल्याचे अहवालात नमूद, विश्वसनीय सूत्रांची माहिती
उद्या मुंबईत धर्मदाय आयुक्तालयात होणार सुनावणी
धर्मदाय आयुक्त अमोघ कलोटी यांच्यासमोर होणार सुनावणी
छत्रपती संभाजीनगरमध्ये सकल जैन समाजाकडून पुणे येथील जमिन विक्रीच्या बेकायदेशीर व्यवहाराविरुद्ध भव्य मूक मोर्चा काढण्यात आलाय. छत्रपती संभाजी नगर शहरातील राजा बाजार जैन मंदिरापासून या मोर्चाला सुरुवात होऊन हा मूक मोर्चा विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकला . सकल जैन समाजाने आपल्या मागण्याचा निवेदन विभागीय आयुक्तांना सादर केल आहे. या मोर्चामध्ये जैन समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जमिनीचा व्यवहार रद्द न केल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा मोर्चेकऱ्यांनी दिला...
सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत दिवे घाट वाहतुकीसाठी राहणार बंद
आळंदी ते पंढरपूर पालखी महामार्गाअंतर्गत हडपसर ते दिवेघाट दरम्यान दिवेघाटातील रस्ता रुंदीकरण सुरू
रस्ता रुंदीकरणासाठी ब्लास्टिंग करण्यात येणार असल्याने वाहतूक बंद ठेवण्यात येणार
वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने केलं आहे
शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर पुण्यातील जैन बोर्डिंग मध्ये दाखल
रवींद्र धंगेकर घेणार जैन मुनी यांचे आशीर्वाद
आज पासून रवींद्र धंगेकर हे जैन बोर्डिंग येथे करणार होते आंदोलन
दोन दिवस याविषयी काही बोलणार नसल्याची रवींद्र धंगेकर यांची माहिती
- आता सोलापूर ते मुंबई विमानसेवा दररोज सुरू होणार
- सध्या आठवड्यातून चार दिवस सुरु आहे सोलापूर ते मुंबई विमानसेवा
- मात्र आता सोलापूरकरांची मागणी लक्षात घेता आणि मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्लॉट मिळाल्याने दररोज सुरू राहणार विमानसेवा
- त्यामुळे आता सोलापूरकरांना आणि मुंबईकरांना एक नोव्हेंबर पासून दररोज करता येणार सोलापूर ते मुंबई विमानसेवेचा प्रवास
- स्टार एअरलाइन्सच्या या निर्णयाचे सोलापूरकरांकडून मोठ्या उत्साहात स्वागत
बच्चू कडूंच्या आंदोलनाला काँग्रेस मुळे बळ मिळणार.. बच्चू कडू यांनी फोनवरून संवाद साधत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे मानले आभार.
बच्चू कडू यांच्या ट्रॅक्टर मोर्चाला काँग्रेस च्या पाठिंब्यामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला.
आत्ता पाठींबा दिला काँग्रेस पक्षाने देखील मोर्चात थेट सहभागी व्हायला पाहिजे -बच्चू कडू यांच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना आवाहन
- नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर सकल जैन समाजाचा मोर्चा
- पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत असलेल्या जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द व्हावा, या मागणीसाठी मोर्चा
- जैन बोर्डिंगची जागा काही विश्वस्तांनी बेकायदेशीरपणे विकल्याने जैन समाजामध्ये रोष
- निषेध करण्यासाठी काढण्यात आला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
- नाशिकच्या अशोक स्तंभावरून मोर्चाला सुरुवात
परतीच्या पावसानं नवापूर तालुक्याला झोडपल...
दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचा घास हिरावला....
नवापूर तालुक्यातील खेकडा झामणझर परिसरात भात शेतीच प्रचंड नुकसान....
सोमवेल कुवर या शेतकऱ्यांचे तोडणीवर आलेली भात शेती पाण्यात गेली वाहून....
खेकडा झामणझर गावातील शेतकऱ्याने लावलेल्या चार ते पाच एकर भात शेतीचे प्रचंड नुकसान....
- शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेना ठाकरे गटाचे अक्कलकोट तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे यांचे सुरूय आमरण उपोषण
- अक्कलकोट तालुक्यातील कलहिप्परगा गावात गेल्या चार दिवसांपासून सुरुय अन्नत्याग उपोषण
- शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा, प्रतीहेक्टरी 50 हजार रुपये अतिवृष्टी नुकसान भरपाई द्या यासह विविध मागण्यांसाठी सुरू आहे उपोषण
- जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवणार
- त्यामुळे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी अक्कलकोट तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक
छत्रपती संभाजीनगरमध्ये सकल जैन समाजाकडून पुणे येथील जमिन विक्रीच्या बेकायदेशीर व्यवहाराविरुद्ध भव्य मूक मोर्चा काढण्यात येतोय . थोड्याच वेळात छत्रपती संभाजी नगर शहरातील राजा बाजार जैन मंदिरापासून या मोर्चाला सुरुवात होणार असून विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा धडकणार आहेत.
17 तारखेपासून जैन बोर्डिंग चा व्यवहार रद्द व्हावा यासाठी आचार्य गुप्तीनंदी महाराजांच्या नेतृत्वाखाली बोर्डिंगमध्ये आंदोलन सुरू
जैन बोर्डिंग च्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी प्रकाश आंबेडकर आंदोलन ठिकाणी येणार
आंदोलकांकडून सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी येऊन पाठिंबा देण्यासाठी विनंती
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील युती वरून भाजप शिवसेनेच्या मंत्र्यांचे मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. शिवसेनेचे नेते व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंत्री नितेश राणे यांना युती वरून चांगलेच फटकारले आहे.युतीचा निर्णय घेणारे नितेश राणे हे काय राज्याचे मुख्यमंत्री नाहीत. ते एका मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात असा टोलाही राणे यांना लगावला.
कोकणात भाजप स्वबळावर निवडणूक लढवणार असे विधान मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी केले होते. त्यावर शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी राणे यांना उद्देशून टोला लगावला.
एक महिन्यापूर्वी कोपरगाव शहरात दोन गटात तुफान राडा आणि दगडफेक झाल्याची घटना घडली होती.. या प्रकरणात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे यांचा स्वीय्य सहाय्यक आरोपी अरुण जोशी अखेर एक महिन्यानंतर पोलिसांना शरण आलाय.. अरुण जोशी आणि इतर काही आरोपींनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर आरोपी अरुण जोशीसह इतर तीनजण स्वतःहून कोपरगाव पोलिसांना शरण आलेत.. एक महिन्यापूर्वी झालेल्या दगडफेकीत दोन पोलिस जखमी तर पोलिस गाडीचेही नुकसान झाले होते..
महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ येथे सध्या दाट धुक्याची चादर पसरली आहे. रिमझिम पावसामुळे येथील निसर्गाची शोभा अधिकच खुलली आहे, ज्यामुळे संपूर्ण परिसर आल्हाददायक आणि नयनरम्य झाला आहे.
जालना जिल्ह्यात काही दिवसांपासून अवकाळी पाऊस पडतोय.या पावसाचा फटका कापूस उत्पादक शेतकऱ्याला बसतोय. बळीराजाचं पांढर सोन अवकाळी पावसामुळे शेतातच काळ पडायला सुरुवात झाली आहे. जालन्यातील पिरकल्याण,सोमनाथ यासह अनेक परिसरामध्ये काल मध्यरात्री अवकाळी पाऊस पडला.या पावसामुळे वेचणीला आलेला कापूस शेतातच भिजला असून कापूस काळा पडायला सुरुवात झाली आहे. कापूस शेतातच भिजल्याने बळीराजाला आता हा कापूस कमी दराने बाजारात विकावा लागणार आहे.त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे.
जालन्यातील भोकरदन येथील तहसील कार्यालयासमोर अवैध दारू विक्रीविरोधात नारायण साबळे या तरुणाने आमरण उपोषण सुरू केलय.आज या तरुणाच्या आमरण उपोषणाचा चौथा दिवस असून भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यातील अवैध दारू विक्रीवर तातडीने प्रशासनाने कारवाई करण्याची मागणी या उपोषणकर्त्याची आहे. भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यात अवैध देशी दारू विक्रीने अक्षरशः कहर केला असून प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप यावेळी उपोषणकर्त्यांनी केला आहे..
रुग्णांची रूग्णवाहिकांकडून लूट होत असल्याचा प्रकार राजरोस पणे घडत असून या गंभीर विषयांकडे यवतमाळ उपप्रादेशिक परिवहन विभागाने दुर्लक्ष केल्याचा आरोप केल्या जात आहे.अनेक रुग्णवाहिकांकडे आरटीओचे फिटनेस नाहीये, त्या कधी बंद पडतील याचाही नेम नाही, अनेकांनी भाऊ- दादांचे नाव वापरून हा धंदा राजरोसपणे सुरू केला आहे या सगळ्या प्रकारावर मात्र उपप्रादेशिक परिवहन विभाग दुर्लक्ष करित असल्याचा आरोप होत आहे.
- बलात्कार प्रकरणात २०२४ पासून हा कैदी होता नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात
- कैद्याच्या आत्महत्येचं कारण मात्र अस्पष्ट, नाशिकरोड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद
- सिन्नरमधील एका अल्पवयीन मुलीच्या अत्याचार प्रकारात या कैद्याला झाली होती अटक
अहिल्यानगर जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेसने स्वबळावर लढवाव्या अशी एकमुखी मागणी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केली आहे.. संगमनेर येथे बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली.. या बैठकीत आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुका काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढवाव्यात अशी मागणी श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी केली आहे.. बाळासाहेब थोरात यांनी मात्र पदाधिकाऱ्यांच्या मागणीवर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.. एकीकडे राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाविकास आघाडीत सहभागी होणार का? याकडे लक्ष लागलेले असताना दुसरीकडे अहिल्यानगर जिल्ह्यात मात्र काँग्रेस पदाधिकारी स्वबळाचा नारा देत आहेत.. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आघाडीत बिघाडी होणार की एकत्रित निवडणुकांना सामोरे जाणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे..
सोलापूर शहरातील हैदराबाद रोड,चंदन काटा येथे भीषण अपघाताची घटना घडली. एसटी बस आणि दुचाकीच्या धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
वैराग येथील एस.टी. बस आणि दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना धाराशिव चौकात घडली. रणजित महादेव पाटील मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे.सोलापूरवरून सव्वा सात वाजता नॉन स्टॉप एस. टी. बस बार्शीकडे निघाली होती. सदर एस.टी. बस वैराग येथील धाराशिव चौकात आली असताना वैरागकडून सोलापूरकडे विनानंबरची दुचाकी यांच्यात समोरासमोर भीषण धडक होऊन दुचाकीस्वार रणजित पाटील याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्याबद्दल एक भाऊ आणि वडील असा परिवार आहे. याप्रकरणी वैराग पोलीस पोलीस पुढील तपास करत आहेत.
निलेश घायवळ खंडणी प्रकरणी फरार असलेल्या तरुणाला केली अटक
अमोल उर्फ गोरख बबन बंडगर असे आरोपीचे नाव
गुन्हे शाखेने भिगवण येथे जाऊन घेतलं बंडगर याला ताब्यात
त्याच्यावर या आधी भिगवण, वालचंद नगर, बारामती पोलिस ठाण्यात विविध प्रकारचे गुन्हे दाखल
पुण्यातील वारजे पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या खंडणीच्या गुन्ह्यात केली अटक
दिवाळीच्या आठवड्यात पुणे मेट्रोचा वापर मोठ्या प्रमाणात घटला आहे.
धनत्रयोदशीपासून प्रवासी संख्या घटू लागली आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फक्त ५२,४८२ प्रवाशांनी मेट्रो वापर केला.
इतर दिवसांची सरासरी फक्त १३–१४ हजार राहिली, तर दैनंदिन प्रवासी संख्या २.३६ लाखांवरून थेट १२ हजारांवर आली.
शाळा, महाविद्यालये आणि कार्यालये बंद असल्यामुळे शहरांतर्गत प्रवास कमी झाला.
यामुळे मेट्रोला मोठा आर्थिक झटका बसला. आजपासून प्रवासी संख्येत थोडी सुधारणा दिसू लागली आहे, मात्र दिवाळीच्या सुट्टीमुळे आर्थिक परिणाम मोठ्या प्रमाणावर जाणवत आहेत
दिवाळीच्या सुट्ट्या संपल्या आणि सोमवारी पुन्हा एकदा कामाला जाण्यासाठी नागरिकांची लगबग यामुळेच पुण्यातून जाणाऱ्या सर्व महामार्गांवर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. रविवारी रात्री पुणे मुंबई एक्सप्रेस वे, बेंगलोर मुंबई महामार्ग, पुणे सोलापूर मार्ग या सारख्या अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा होत्या. दिवाळीच्या सुट्ट्या संपल्याने नागरिक पुन्हा परतू लागले. मुंबई- बंगळूरू महामार्गांवरील कात्रज बोगदा ते बाणेर दरम्यान वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
साखर हंगामाच्या तोंडावर जिल्ह्यात अवकाळी पावसाने दाणादाण उडवून दिली असून या पावसामुळे साखर हंगाम किमान पंधरा दिवस लांबण्याची भीती व्यक्त होत आहे. दसरा, दिवाळी पाडव्याच्या मुहुर्तावर जिल्ह्यातील काही कारखान्यांनी मोळी टाकून प्रारंभ केला, पण आता प्रत्यक्ष गाळपासाठी उसाची प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय नाही.
महाराष्ट्रातील ऊस गळीत हंगाम एक नोव्हेंबरपासून सुरू होत आहे, मात्र तत्पूर्वीच २० तारखेपासून कर्नाटकचा हंगाम सुरू झाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.