दिवाळीच्या पूर्व संध्येला नाशिकच्या मनमाड बाजार समितीमध्ये झेंडूच्या फुलांच्या भावात मोठ्या प्रमाणावर घसरण झाली. झेंडूच्या फुलाला अवघा 5 ते 10 रुपये दर मिळाल्याने संतप्त झेंडू उत्पादक शेतकऱ्यांनी काही काळ झेंडूच्या फुलांचे लिलाव बंद पाडले होते.
दिवाळीच्या मुहूर्तावर देवगड हापूसची पहीली पेटी वाशी मार्केटला रवाना करण्यात आली आहे. देवगड तालुक्यातील पडवणे गावातील आंबा बागायदार प्रकाश शिरसेकर यांनी दिवाळी सणाच्या मुहूर्तावर सहा डझन हापूस आंब्याची पेटी वाशी मार्केटला पाठवली आहे. जुलै महिन्यामध्ये एका हापूस कलमाला मोहोर आला होता.
सध्या दिवाळीत सर्वत्र विद्युत रोषणाईने बाजारपेठा सजून गेल्या आहेत. मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा विद्युत रोषणाईने झळाळून निघालाय. मालवण राजकोट किल्ल्यावरील महाराजांचा पुतळा व येथील परीसर रात्रीच्या वेळी विलोभनीय वाटत असून पर्यटकही येथे आवर्जून भेट देत आहेत.
वाशिम ते पुसद मार्गावर एका दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक देत अपघात केल्याची घटना घडली आहे. या अपघातात दुचाकी वरील एक जन जागीच ठार झाला तर एक गंभीर जखमी झाला असून, जखमीला तात्काळ वाशीमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आज नरकचतुर्दशी निमित्ताने पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मातेला पारंपारिक मौल्यवान अलंकार परिधान करण्यात आले आहेत.अलंकारांनी देवाचे रूप अधिकच खुलून दिसत आहे.श्री विठ्ठलास सोन्याचा मुकुट, नाम निळाचा, कौस्तुभ मणी, दंड पेट्या जोड मोठा, हिऱ्याचा कंगण जोड, मोत्याचा तुरा, मोत्याची कंठी १ पदरी, मोत्याची कंठी २ पदरी, नेकलेस,शिरपेच मोठा १० लोलक असलेला, मस्त्य जोड, तोडे जोडे, सूर्य कळ्यांचा हार, सोन्याचे पैंजण जोड, तुळशीची माळ १ पदरी, नक्ष्मी टोप अलंकार परिधान करण्यात आलेले आहेत.
नांदेड ते देगलूर महामार्गावरील बागनटाकळी जवळ घडली अपघाताची घटना.
अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी.
जखमींना देगलूर येथील शासकीय रुग्णालयात हलवलं. या अपघातात ८ जण जखमी झालेत.
छत्रपती संभाजी महाराजांविषयी वादग्रस्त वक्तव्य करणारे आमदार बच्चू कडू यांच्यावर संतापाची लाट उसळली आहे. "बच्चू कडूंनी तमाम शंभू भक्तांची माफी मागावी, अन्यथा त्यांना धडा शिकवला जाईल," असा इशारा अधिवक्ता योगेश केदार यांनी दिला आहे.
केदार यांनी आरोप केला की, "बच्चू कडूंनी संभाजी महाराजांच्या मृत्यूला त्यांच्या सासरच्या लोकांना जबाबदार धरले, पण औरंगजेबाला मात्र क्लिनचिट दिली. हे वक्तव्य अत्यंत आक्षेपार्ह असून इतिहासाचा अपमान आहे," असा तीव्र निषेध त्यांनी नोंदवला.
काल शनिवार वाडा येथे मुस्लिम महिलांकडून नमाज पठणच्या व्हिडीओ व्हायरल नंतर खासदार मेधा कुलकर्णी आणि पतित पावन संघटनेच्या वतीने शनिवार वाडा येथे आक्रमक आंदोलन करत शनिवार वाडा पटांगणात असलेली मजार काढण्यात यावी अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आली त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने याच शनिवार वाड्यात आंदोलन करत पक्षाच्या प्रवक्त्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी खासदार मेधा कुलकर्णी यांच्यावर जोरदार टिका केली.
दिवाळी सणाची धामधुम सुरू असताना चोरट्यांचा देखील धुळ्यात सुळसुळाट वाढल्याचे बघावयास मिळत आहे, धुळे शहरातील वाडी भोकर रोड परिसरात एका दुकानासमोर लावलेले दुचाकी वाहन चोरट्याने लंपास केल्याचे सीसीटीव्ही कॅमेरात चित्र कैद झाले आहे,
या चोरट्याने अत्यंत शातिर पद्धतीने ही दुचाकी लंपास केल्याचे सीसीटीव्ही कॅमेराच्या फुटेजच्या आधारे दिसून येत आहे, हा दुचाकी चोरटा बराच वेळ या दुचाकीच्या अवतीभोवती फिरून त्याकडे कुणाचेही लक्ष नसल्याचे निश्चित झाल्यानंतर या चोरट्याने अत्यंत शातिर पद्धतीने ही दुचाकी लंपास केली आहे, शेजारीच असलेल्या एका दुकानामध्ये लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चोरट्याच्या या संपूर्ण हालचाली कैद झाल्या आहेत, या दुचाकी चोरीचा संबंधित पोलीस सीसीटीव्ही कॅमेराच्या आधारे पुढील तपास करीत आहेत.
बंजारा समाजाचे एसटी प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीसाठी जालन्यात बेमुदत उपोषण
आमरण उपोषणाचा आजचा चौथा दिवस, बंजारा समाज पुन्हा आक्रमक
बंजारा समाजातर्फे उद्या जालन्यात उपोषणस्थळी दिवाळी साजरी करण्याचा निर्णय
शनिवारवाड्यात नमाज पठण केल्याचा आरोप करतानाच परिसरातील कबर काढा या मागणीसाठी भाजप खासदार मेधा कुलकर्णींनी काल हिंदुत्ववादी संघटनांसह शनिवारवाडा परिसरात आंदोलन केलं होतं. त्यावर टीका करताना रुपाली ठोंबरे पाटील यांनी शनिवारवाड्यात आज आंदोलन केलं. त्यांनी मेधा कुलकर्णी यांच्यावर टीका केली. आंदोलनावेळी रुपाली पाटील यांना चक्कर आल्याची माहिती आहे.
संपूर्ण देशभर दिवाळीचा उत्साह आहे. तर दुसरीकडे कोकणातल्या शेतकऱ्याची दिवाळी मात्र शेतावरच होत असलेली पाहायला मिळतेय.. यावर्षी पाऊस लांबला, त्यामुळे भातपिक कापण्यास उशीर झाला, गेले काही दिवस पावसाने उसंत घेतल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी भात कापण्यात व झोडण्यात व्यस्त आहे. आज अभ्यंगस्नान करून शेतकरी पहाटेपासूनच शेतात राबवताना पाहायला मिळतोय, त्यामुळे जगाच्या पोशिंद्याची बळीराजाची दिवाळी ही शेतातच होत आहे आहे..
परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील कासापुरी मंडळात सप्टेंबर मध्ये अतिवृष्टी झाली मात्र sky मेट या संस्थेने पावसाची आकडेवारी कमी दाखवली आणि ज्यामुळे हे मंडळ अतिवृष्टीच्या अनुदानातून वगळला असल्याचा आरोप करत पाथरी तालुक्यातील कासापुरी मंडळातील शेतकऱ्यांनी गोदावरीत जलसमाधी आंदोलन केले..
"मेधा कुलकर्णींवर गुन्हा दाखल करा, त्यांना अटक करा!" राष्ट्रवादी अजित पवार गटाचा शनिवार वाड्यात घोषणाबाजी
हिंगोलीत क्रेशर मशीन चालवणाऱ्या एका व्यापाऱ्याला शुल्लक कारणावरून दोघाजणांनी पेट्रोल पंपावर बेदम मारहाण केली आहे, लाकडी दांडा खुर्च्या आणि दगडांच्या सहाय्याने ही मारहाण करण्यात आली आहे, काळुराम जाधव असे या मारहाण झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे तर शंकर देवकर व दिगंबर देवकर अशी मारहाण करणाऱ्या दोघांची नावे आहे. दरम्यान या घटनेत व्यापारी जाधव हे गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कोरोना काळात घसा दुखत असल्याचा इलाज करण्यासाठी गेलेल्या रुग्णाचा कोरोना पाॅझिटिव्ह असल्याचा खोटा रिपोर्ट बनवून, त्यातही पुढे चुकीचे उपचार दिले. यात रुग्णाचा मृत्यू झाला. हा प्रकार मृत्यूपर्यंत न थांबता, मृताच्या अवयवांची तस्करीसाठी आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावली अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल झालेले डॉक्टर अद्यापही अटक झालेले नाही. या डॉक्टरांना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणावर झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचे अतोनात नुकसान झाले होते. या अतिवृष्टीत शेतीसह अनेक ठिकाणी घरादारातील सामान व वस्तु वाहून गेल्या होत्या. शेतकरी बांधवांवर आलेल्या या गंभीर घटनेची दखल घेत अतिवृष्टीने नुकसान झालेल्या कुटुंबियांची दिवाळी गोड व्हावी यासाठी राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या कुटुंबीयांसमवेत दिवाळी साजरी केली. अतिवृष्टीने बाधित झालेल्या कुटुंबीयांना किराणा किट, सतरंजी व चादर भेट म्हणून दिल्या.
कंत्राटदाराने दिवाळीची आगाऊ १०,००० रक्कम न दिल्याने वाघोलीत सफाई कंत्राटी कामगारानी सकाळ पासून अचानक काम बंद आंदोलन सुरू केले. जो पर्यंत रक्कम मिळत नाही तो पर्यंत काम सुरू करणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. या आंदोलनामुळे कचऱ्याची समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे. वाघोलीत एकूण १३७ कामगार आहेत. कंत्राटदाराने कामगारांना दिवाळीसाठी आगाऊ १०,००० रक्कम द्यावी व पगारातून प्रत्येक महिन्यातून २००० ने ती परत घ्यावी असे आदेश महापालिका आयुक्तांनी काढले आहेत. मात्र या कामगारांना सोमवार पर्यंत ही रक्कम न मिळाल्याने कामगारांनी अचानक काम बंद आंदोलन सुरू केले.
दिवाळी सणानिमित्त वाशिम शहरातील बाजारपेठ विविध वस्तूंनी सजली असताना, दिवाळीतील लक्ष्मीपूजनासाठी उसाला धार्मिक आणि पारंपरिक महत्त्व असल्याने बाजारात त्याला विशेष मागणी आहे. या साठी काळ्या रंगाच्या मॉरिशियन उसाची खास चर्चा असते. हा उस जिल्ह्यातील काटा गावातील शेतकऱ्यांनी पिकवलेला असून, त्याला ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळतो.
नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा येथील तापी नदी काठावरील संगमेश्वर महादेव मंदिर परिसरात दिवाळी निमित्ताने सुमारे 11 हजार दिव्यांची रोषणाई करत भव्य संगमेश्वर महाआरती पार पडली. माजी आदिवासी विकास मंत्री आणि विद्यमान आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत ही महाआरती झाली. तापी आरती सेवा समितीच्या वतीने आयोजित या दीप सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी हजारो भाविक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भजन संध्या आणि फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. डॉ. गावित यांनी उपस्थित भक्तगणांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सोलापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा सक्रिय होताना दिसत आहे. कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या उपस्थितीमध्ये उद्या माढा तालुक्यातील निमगाव येथे माजी आमदार संजय शिंदे यांच्या निवासस्थानी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीची आयोजन केले आहे. अजित पवार गटाचे मोहोळ आणि माढ्याचे माजी आमदार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार गट आता सोलापूर जिल्ह्यात सक्रिय होताना दिसत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीमध्ये संजय मामा शिंदे यांच्या निवासस्थानी बैठकीचे आयोजन केले आहे.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. आणि दिवाळी सणात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चटणी भाकर आंदोलन केल आहे. नांदेड सह राज्यभरात पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं आहे.नांदेड जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्टरहुन अधिक शेती पिकांच नुकसान झाला आहे.परंतु राज्य सरकारने अत्यंत तोकडी मदत सरकारने देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसले आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून 50 हजार रुपये हेक्टरी अनुदान देण्यात यावे, संपूर्ण कर्जमाफी करावी, पिक विमा द्यावा व शेतीमालाला हमीभाव देण्यात यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चटणी भाकर आंदोलन केल आहे.
सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणावर झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचे अतोनात नुकसान झाले होते. या अतिवृष्टीत शेतीसह अनेक ठिकाणी घरादारातील सामान व वस्तु वाहून गेल्या होत्या. शेतकरी बांधवांवर आलेल्या या गंभीर घटनेची दखल घेत अतिवृष्टीने नुकसान झालेल्या कुटुंबियांची दिवाळी गोड व्हावी यासाठी राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या कुटुंबीयांसमवेत दिवाळी साजरी केली. अतिवृष्टीने बाधित झालेल्या कुटुंबीयांना किराणा किट, सतरंजी व चादर भेट म्हणून दिल्या.
नाशिकमध्ये भाजपला धक्का बसला आहे.संगीता गायकवाड यांनी शिवसेना ठाकरे सेनेत प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षप्रवेश केला आहे.
जालनातून एक हृदयद्रावक बातमी समोर येत आहे. दिवाळी आली पोरं कपडे फाटक्याला पैसे मागायले ,त्यांना काय सांगू.अनुदान आलं असतं तर दिवाळी झाली असती. अशी चिठ्ठी लिहून जालन्यात एका शेतकऱ्याने शेतात झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. जालन्यातील शेवगा गावात घटना घडली आहे.रामेश्वर खंडागळे असं मयत शेतकऱ्याचं नाव आहे. या आत्महत्या मुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.दरम्यान घटनास्थळी जाऊन जालन्यातील मौजपुरी पोलिसांनी पंचनामा केला असून त्यांच्याकडे सापडलेली चिठ्ठी देखील जप्त केली आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत...
राहुल नार्वेकर यांनी अपात्रतेच्या बाबतीत दिलेल्या निर्णयाला असविधानिक निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाला आव्हान देण्यात आलेला आहे. राहुल नार्वेकर यांनी अपात्रेच्या बाबतीत चुकीचा निर्णय घेतलेला आहे. या संदर्भाची याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि पक्ष चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिला तो निर्णय पूर्णपणे चुकलेला आहे निवडणूक आयोगाने आपल्या अधिकार कक्षावर हा ओलांडला आहे का यावर या संदर्भातली शहानिशा करणारा निर्णय खंडपीठाकडे प्रलंबित आहे. यासंदर्भात 12 ते 13 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.
० मुंबई गोवा महामार्गावर सलग तिसऱ्या दिवशी होत आहे वाहतूक कोंडी
० माणगाव आणि इंदापूर शहरांमध्ये वाहनांच्या रांगा
० दिपावलीसाठी मुंबई आणि पुण्यातील कोकणवासी मोठ्या संख्येने गावाकडे रवाना
० माणगाव शहरात वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांची दमछाक
० वाहतूक कोंडीचा कोकणवासीयांच्या प्रवासात अडथळा
शाही तख्त स्नानाने नांदेडच्या सचखंड गुरुद्वारा मध्ये दिवाळी सणाला सुरुवात झालीय. 20 ते 27 ऑक्टोबर पर्यंत गुरुद्वारामध्ये विविध कार्यक्रमांचा आयोजन करण्यात आल आहे. आज शाही तख्त नानाने दिवाळी सणाची सुरुवात झाली. गोदावरी नदीतून पवित्र जल आणून गुरुद्वारा तसेच परिसर स्वच्छ केला जातो.त्याच बरोबर गुरुद्वारा मधील शस्त्रांची साफसफाई केली जाते. या पवित्र पारंपारिक उत्सवात देश विदेशातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
पुण्यात बजरंग दलाकडून देवीचे चित्र असलेल्या लक्ष्मी बॉम्ब फटाक्याला जोरदार विरोध करण्यात आला तसेच फटाकाकडून स्टॉल धारकांकडून या फटाक्याचा मोठा साठा बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी जप्त करून पोलिसांना दिला.
काल रात्री पुण्यातील कॅम्प परिसरात असलेल्या गोळीबार मैदान येथे लक्ष्मी मातेचे चित्र असलेल्या फटाक्यांची विक्री चालू असलेले बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना माहिती मिळाली. त्यांनी तिथे जाऊन पोलीसांच्या मदतीने या फटाक्याचा साठा जप्त केला व धार्मिक भावना दुखावल्या अंतर्गत BNS 299 अंतर्गत वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला. कोणीही लक्ष्मी बॅाम्ब ची खरेदी विक्री करून आपल्या देवी देवतांचा अपमान करू नये यासाठी समाजप्रबोधन देखील बजरंग दलाकडून करण्यात आले...
खासदार मेधा कुलकर्णी यांनी जी घटना केलीय ती अशोभनीय आहे
आम्ही सुद्धा हिंदू आहोत पण दोन समाजात तेढ निर्माण करणारे हिंदू नाहीत
मेधा कुलकर्णी पर्सनल अजेंडा राबवतात
१९३६ मध्ये चित्र शाळा मध्ये पुरातन विभागात या मजार ची नोंद आहे
१९३६ मध्ये मेधा कुलकर्णी यांचा जन्म झाला होता का
पेशवे यांनी शाहू महाराज यांनी परवानगी घेऊन तो दिला होता
ऐतिहासिक स्थळ म्हणून या वाड्याची नोंद आहे
बुरखा घातलेल्या महिलेने नमाज केला, शेजारी हनुमान चालीसा केली. तर ती जागा त्यांच्या बापाची होते का
लाजा वाटल्या पाहिजे पुण्यातील वातावरण तुम्ही (मेधा कुलकर्णी) खराब करत आहात
मेधा ताई यांना कळलं नाही का तिथे शेजारी असलेला कचरा साफ करण्याची अक्कल त्यांना आली नाही
मेधा कुलकर्णी यांना नौटंकी करायची सवय आहे
मेधा कुलकर्णी यांच्या मेंदूला लखवा मारला आहे
शनिवार वाड्यात सगळ्या धर्माची लोकं येणार. पोलिसांनी मेधा कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे
मी हिंदू आहे, आम्हाला हिंदुत्व मेधा ताई यांनी शिकवू नये
मेधा ताई हिंदू धर्मातील लोकं महिलांवर अत्याचार करतात तेव्हा आपण पुढे येता का- रुपाली ठोंबरे
साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्यपीठ असलेल्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी
- २२ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबर पर्यंत सप्तशृंगी देवीचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी रात्री १२ वाजेपर्यंत खुलं राहणार
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जवानांसोबत दिवाळी साजरी केली आहे. त्यांनी आयएनएस विक्रांतचंदेखील लाँचिंग केलं आहे.
- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महानगर पालिका
- शहरातील अस्वच्छता, रस्त्यांची दुरावस्था यामुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले असून त्याकडे प्रशासनचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसचा महापालिकेवर मोर्चा
ऐन दिवाळीतच सांगली शहरामध्ये पाण्याचा ठणठणाट निर्माण झालाय. महापालिका प्रशासनाकडून शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला,त्यामुळे नागरिकांचे दिवाळीच्या पहिल्या दिवशीच मोठा खोळंबा झाला.पाणीपुरवठा होत नसल्याने संतप्त झालेल्या काँग्रेस आणि भाजपच्या नगरसेवकांनी नागरीकांसह थेट महापालिकेच्या पाणीपुरवठा कार्यालयावर धडक देत,पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना घेराव घालत धारेवर धरलं,यावेळी संतप्त झालेल्या नगरसेवकांनी पाणीपुरवठा कार्यालयाच्या दारातच हंडे आणि घागर घेऊन धरणे आंदोलन देखील केलं.यावेळी महापालिका आयुक्तांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवण्यात आला.दिवाळीच्या पहिल्या दिवशीच महापालिकेकडून शहरात पाणीपुरवठा करण्यात आला नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाल्याचा आरोप करत तातडीने पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली.
रस्त्यावरून महिलांना तीन महिलांना बेदम मारहाण
हवेली तालुक्यातील वाडेबोल्हाई मधील घटना
तहसील कार्यालयामध्ये रस्त्याची केस प्रलंबित असताना. त्याच्या राग मनात धरून एका गटाकडून महिलेला बेदम मारहाण
पुरुषाकडून उसाने मारहाण पोलिसात तक्रार दाखल नाही.
निकाल प्रलंबित असताना मारहाण
शेतात काम करत असताना येऊन केली मारहाण
साताऱ्यातील जिल्हा कारागृहात असलेल्या बंदिवानांसाठी दीपावलीनिमित्त सप्तसूर फाउंडेशन यांच्या माध्यमातून दीपावली पहाट हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये हिंदी मराठी चित्रपटातील गाणी गायकांनी सादर केली यावेळी सातारा कारागृह अधीक्षक श्यामकांत शेडगे यांच्यासह अधिकारी यांनी देखील या कार्यक्रमात आपले गाणे सादर केले. या दीपावली पहाट कार्यक्रमाला बंदिवानांनी देखील चांगला प्रतिसाद दिला.
शनिवारवाड्यात असणाऱ्या कबरी बाहेर पोलिसांनी वाढवला बंदोबस्त
काल हिंदू संघटनांनी आणि भाजपा खासदार मेधा कुलकर्णी यांनी या कबरी विरोधात केलं होतं आंदोलन
शनिवार वाड्यात काही मुस्लिम महिलांनी नमाज पठण केल्यानंतर आंदोलन करण्यात आलं होतं
कुठलाही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी वाढवला बंदोबस्त
हिंदू संघटनांकडून ही कबर हटवण्यासाठी ८ दिवसाचा अल्टीमेटम देण्यात आला आहे
या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
"ज्या घटनेशी माझा काही संबंध नव्हता, त्या घटनेवरून सलग २५० दिवस इलेक्ट्रॉनिक मीडियावर माझी ट्रायल चालली. त्या दिवसांत मी दोनदा मरता मरता वाचलो. आज मी तुमच्या आशीर्वादामुळेच तुमच्यासमोर उभा आहे," अशा शब्दांत माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी आपली भावनिक खंत व्यक्त केली.
कल्याणकारी राज्याची संकल्पना, पूरग्रस्त शेतकऱ्यांची नुकसान भरपाई, कायदा सुव्यवस्थेचे उडालेले धिंदवडे, दरडोई वाढणारा कर्जाचा भार हे सगळे मुद्दे चर्चेतून हद्दपार करण्यासाठी भाजपातले उतावीळ झालेले नेते "धर्मकेंद्री" राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मालेगाव बॉम्बस्फोटामध्ये शिक्षा भोगलेल्या प्रज्ञा साध्वी यांचं मुलीं संदर्भातलं वक्तव्य हे ऑनर किलिंग सारख्या भयंकर घटनांना प्रोत्साहन देणारे आहे. याकडे दुर्लक्ष करणारी भाजप आणि "बेटी बचाव बेटी पढाव" किंवा एकूणच महिला सबलीकरण सारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलण्याचा नैतिक अधिकार गमावून बसली आहे.सुषमा अंधारे
रायगडच्या म्हसळ्यामध्ये शिवसृष्टी उभी राहत आहे. म्हसळा तहसिल कार्यालयाच्या जागी हि शिवसृष्टी उभारली जात असून याच भूमीपुजन खा. सुनील तटकरे व मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळेस संपूर्ण म्हसळा शहरातून ढोलताशा व खालुबाजाच्या तालावर मिरवणूक काढण्यात आली तसेच मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.
दिवाळी पहाट कार्यक्रमा ऐवजी मराठवाड्यातील पूरग्रस्तांना विचारे करणार मदत..
दरवर्षी गडकरी रंगायतन येथील चौकात विचारेंच्या माध्यमातून दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यायचे..
यंदा दिवाळी पहाट कार्यक्रम रद्द करत चौकात ठिकठिकाणी मदत नवे कर्तव्य दिवाळी पहाट कार्यक्रम रद्द करून पूरग्रस्तांना मदत करणार अशा आशयाचे लावण्यात आले बॅनर..
तर दुसरीकडे शिंदेंच्या सेनेचे मान्सूनचा तलाव भागात दोन ठिकाणी दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे..
जळगाव जिल्ह्यात गेल्या सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीने एकूण तीन लाख ३८ हजार शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१४ कोटी रुपयांच्या अनुदानाची मागणी जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलेली होती. तेवढी मदत जिल्हा प्रशासनाला शासनाकडून प्राप्त झालेली आहे. आता तालुकानिहाय नुकसानबाधित शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू झालेले आहे. रविवारी सुटीचा दिवस असूनही तहसील कार्यालयात बाधित शेतकऱ्यांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू होते. काही ठिकाणी याद्या तयार होऊन 'डीबीटी'द्वारे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत पाठविण्याचे काम सुरू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.महिन्यात जिल्ह्यात सप्टेंबर अतिवृष्टी व ढगफूटीसदृश पावसासह पुरामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते
राज ठाकरे यांनी 96 लाख खोटे मतदार यादीत असल्याबाबत टीका केली होती याला मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिउत्तर दिल आहे... राज ठाकरे यांनी जर 96 लाख खोटे मतदार असतील तर त्यासाठी त्यांनी पुरावा द्यायला हवा.. आता हरकती घेण्याची मुदत संपून गेली आहे... अशी काही माहिती मनसेकडे आली असेल तर त्यांनी निवडणूक आयोगाकडे सादर करावी. निवडणूक आयोगाने देखील प्रत्येक जिल्हा प्रशासनाला अशा काही बाबींनी आढळून आल्या तर अहवाल मागितला होता. चुकीचा असेल तर निवडणूक आयोग कारवाई करेल. असे मत मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले
भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी आमदार जयंत पाटीलवर पुन्हा एकदा निशाणा साधलाय,जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या जतच्या राजारामबापू पाटील साखर कारखान्याचा धुराडा यंदा पेटू देणार नाही,असा गर्भित इशारा गोपीचंद पडळकर यांनी दिलाय. जतचा साखर कारखाना हा सभासदांचा असून तो त्यांना परत मिळवून देण्यासाठी मोठा संघर्ष करू,प्रसंगी कायदेशीर आणि रस्त्यावरची लढाई करणार असल्याचेही आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्पष्ट केले आहे.जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील असणाऱ्या राजारामबापू साखर कारखान्याकडे जतचा साखर कारखाना आहे.कारखाना ढापण्यात आला असून तो सभासदांच्या मालकीचा झाला पाहिजे, अशी भूमिका आता गोपीचंद पडळकर यांनी यंदा राजरामबापू साखर कारखाना सुरू होऊ देणार नाही,असा इशारा देत जयंत पाटील यांची कोंडी करण्याची भूमिका घेतली आहे.
पुणे शहरासह जिल्ह्यात कमाल तापमानात घट झाली असली,तरी दिवसभर उकाडा आणि रात्री गारवा जाणवत आहे.
जिल्ह्यातील घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी पडत असलेल्या पावसामुळे मागील दोन दिवसात ३६ अंशांवर पोहचलेले कमाल तापमान ३२ अंशांपर्यंत खाली आले आहे.
दिवसभरात शिवाजीनगर आणि चिंचवड येथे ३२.३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
वडगावशेरी आणि बारामती येथे ३१.८, पाषाण परिसरात ३१.२, एनडीए येथे ३०.९, हवेली परिसरात ३०.५ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली.
शहरात पुढील दोन दिवस आकाश निरभ्र, तर दुपारनंतर ढगाळ वातावरण राहील. जिल्ह्यातील घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडतील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.
सर्व नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. प्रकाशाचा हा पवित्र सण प्रत्येक व्यक्तीचे जीवन आनंद, समृद्धी आणि सौहार्दाने उजळून टाको - हीच आमची प्रामाणिक इच्छा आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी
- दिवाळीत पावसाच्या हजेरीची शक्यता
- नागपूरमधून मान्सून ने माघार घेतली असली तरी ऐन दिवाळीत पावसाची शक्यता
- वातावरण कोरडे असले तरी हलक्याफुलक्या पावसाची शक्यता
- 21 ते 23 दरम्यान विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात हलक्याफुलक्या पावसाची शक्यता
- शेतकरी आणि शहरी भागातील नागरिकांना हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा.
यवतमाळच्या बाभुळगांव येथील बस स्थानक मार्गावरील इलाबाद बँकेच्या मागे असलेल्या कॉलनीत दोन घरफोड्या झाल्याची घटना उघडकीस आली असून या चोरट्यांनी दोन्ही ठिकाणाहून सोन्या चांदीचे दागिने रोख असा तीस लाखांचा मुद्देमाल लंपास केला या घटनेनंतर नागरिकांमध्ये दहशतीत पसरली आहेत.पोलिसांनी चोरट्याच्या शोधार्थ विविध पथके तपासकामी रवाना केले आहेत.
दिपावलीनिमित्त सोलापुरात यंदा प्रथमच ब्रम्हदेवदादा सहकारी बँकेकडून दिवाळी पहाट कार्यक्रमाच आयोजन करण्यात आले.सोलापुरातील केएलई प्राशलेच्या प्रणांगणात या कार्यक्रमाच आयोजन करण्यात आल होत.महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका कार्तिकी गायकवाडच्या गाण्याने यावेळी सोलापूरकर मंत्रमुग्ध झाल्याचं चित्र दिसून आलं.कार्तिकीसोबतच पंडित कल्याण गायकवाड आणि कौस्तुभ गायकवाड यांनी सोलापूरकरांना अभंग,भजन,भक्तीगीत आणि सुगम गीतांची मेजवानी दिली.दरम्यान यनिमित्ताने सोलापुरात दिवाळी पहाट कार्यक्रमांना पोषक वातावरण तयार झाल्याचं चित्र निर्माण झाल आहे.
दिवाळीनिमित्त एपीएमसी बाजारात मोठ्या प्रमाणात झेंडूच्या फुलांची आवक झाली आहे. पिवळ्या आणि भगव्या रंगांच्या झेंडूच्या फुलांनी एपीएमसी बाजार परिसर बहरून निघाला आहे. दिवाळीत झेंडूच्या फुलांना विशेष महत्त्व असल्याने नागरिक झेंडू खरेदी करण्यासाठी बाजार परिसरात मोठी गर्दी करत आहेत. सध्या वाशीतील एपीएमसीत कमी प्रतीचा झेंडू 80 ते 100रुपये; तर आकाराने मोठा आणि उत्तम प्रतीचा झेंडू 100 रुपये किलोने विकला जात आहे.
दिवाळीत दारावर झेंडूच्या फुलांचे तोरण, दुकानांची सजावट, वाहनांना झेंडूच्या माळा बांधण्याची परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे. दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या वेळी मोठ्या प्रमाणात झेंडूच्या फुलांचा वापर केला जातो. त्यामुळे या वेळी झेंडूच्या फुलांना विशेष मागणी असते.
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांच्यावर धार्मिक तेढ निर्माण केल्या प्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करा अशी मागणी केली.पुण्यात भाजपने खासदार मेधा ताई यांना आवरा बाबा.शनिवारवाडा ही वास्तू कोणाच्या बापाचा नाही.शनिवारवाडा मराठा साम्राज्य, पेशव्यांचा आहे. पुणेकर सर्व जाती धर्मांचे आहेत. मेधा कुलकर्णी पुण्यातील हिंदू-मुस्लिम बांधवांचं वातावरण खराब करत आहेत. जाणीवपूर्वक तेढ निर्माण करत आहे.त्या विसरल्या आहेत की त्या खासदार आहे,अशी टीका रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली.
कोथरुडमध्ये नाटकं झाली, आता कसब्यातून येऊन जाणीवपूर्वक हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण करत आहेत. त्यांच्यावरच तातडीने गुन्हा दाखल करा. खासदार ताईला प्रार्थना असो की दुवा करणे असो एकच आहे हे समजत नाही किंवा त्या जाणीवपूर्वक करत आहे. मेधा कुलकर्णी यांनी शनिवारवाड्यामध्ये येऊन जी नाटकं केली त्यासाठी त्यांच्यावर गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे",
यवतमाळ जिल्ह्यात यावर्षी पावसामुळे कापूस आणि सोयाबीन पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अतीपावसाने कापूस फुटायलाही प्रदीर्घ कालावधी लागला मागील वर्षाच्या तुलनेत यंदा शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असून दरवर्षी दिवाळीच्या काळात शेतकऱ्यांचा माल बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध व्हायचा मात्र यंदा उत्पादन उशिरा आले,यामुळे सीतादईला विलंब होत आहे. विशेष म्हणजे कापूस वेचणीसाठी मजूर मिळणे अवघड झाले आहे.
धाराशिवच्या परंडा नगरपरिषदेत एकाच घराच्या पत्त्यावर 37 मतदारांची नोंद करण्यात आली आहे.विशेष म्हणजे हे मतदार वेगवेगळ्या जाती-धर्माचे समूहाचे आहेत.हिंदू ,मुस्लिम,दलीत,माळी,ब्राह्मण जातीच्या लोकांचा समावेश आहे.यामध्ये उत्तर प्रदेशातून आलेल्या पाच मजुरांचा समावेश असल्याचाही आरोप करण्यात आला.शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाच हे घर असल्याचा आरोप आहे.याप्रकरणी नगरपरिषद प्रशासनाकडे लेखी तक्रार करण्यात आली असून याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.