Maharashtra Live News Update Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update : दगडूशेठ गणपती मंदिरावर फुलांची आकर्षक सजावट

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज शनिवार, दिनांक १८ ऑक्टोबर २०२५, आज धनत्रयोदशी, महाराष्ट्रातील दिपोउत्सोव, राज्यातील राजकीय घडामोडी, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

दगडूशेठ गणपती मंदिरावर फुलांची आकर्षक सजावट

आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिर परिसर सजला

फुलांमध्ये दिव्यांची आरास

तेरा वर्षांच्या मुलीची हत्या करणाऱ्याचा एन्काऊंटर करा; तृप्ती देसाईंची संतप्त मागणी

आज सातारा जिल्ह्यातील सासपडे गावात तृप्ती देसाई यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. त्यावेळी अनेक महिला त्यांना भेटायला आल्या होत्या. पीडित मुलीच्या आईने तर तात्काळ त्याला आमच्यासमोर शिक्षा द्यावी अन्यथा आमच्या ताब्यात त्याला द्यावे, अशी मागणी केली. फास्टट्रॅक कोर्ट नेमले गेले आहे. परंतु या प्रकरणात सुद्धा फार उशीरा निकाल येतात. लवकर फाशीची शिक्षा पण होत नाही. त्यामुळे तात्काळ या आरोपीचा एन्काऊंटर करावा आणि पिढीतील न्याय द्यावा, अशी मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे.

Satara : उदयनराजे-जयकुमार गोरे यांच्यात मिश्कील दिलजमाई

भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आणि राज्याचे ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्यातील यारी पुन्हा एकदा जिल्हा शासकीय विश्रामगृहावर दिसली. जयकुमार गोरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने उदयनराजेंनी त्यांना 'पार्टी कुठे?' असा मिश्कील सवाल करताच चला जलमंदिरलाच जाऊन पार्टी करू, असे मिश्कील उत्तर जयकुमार गोरे यांनी दिले. यानिमित्ताने पुन्हा एकदा उदयनराजे आणि जयकुमार गोरे यांच्यातील सुसंवाद सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Pune : पुण्यात दिवाळी खरेदीसाठी मंडई आणि लक्ष्मी रोडवर गर्दी 

दिवाळी खरेदीसाठी पुण्यातील मंडई आणि लक्ष्मी रोडवर गर्दी झाली आहे.

Solapur : मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर पहिल्यांदाच माजी आमदार राजन पाटील माध्यमासमोर

- मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर पहिल्यांदाच माजी आमदार राजन पाटील माध्यमासमोर

- राजन पाटील यांनी भाजपत जाण्याचे स्पष्ट संकेत दिले

- अजित पवार गटात सुरु असलेल्या कारभाराविरोधात राजन पाटलांनी व्यक्त केली खंत

- जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्यावर खोचक शब्दात केली टीका

Nashik : शहापूर तालुक्यातील काही भागात वादळीवारा, विजेच्या कडकडाटासह परतीच्या पावसाची दमदार हजेरी

दुपार नंतर शहापूर तालुक्यातील चरिव ,अष्टे सह काही भागात वादळीवाऱ्यासह विजेच्या कडकडाटा परतीच्या पावसाने धूमाकूळ अनेक भागातील रस्त्यावर झाडे पडली असून धूवाधार पाऊस पडला अचानक आलेल्या पावसामुळे भात शेती भिजली असून शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे.

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील यांची घोडे स्वारी, काळा चष्मा घालत धनंजय मुंडे यांना डिवचल

काल बीड येथील ओबीसी मेळाव्यामध्ये धनंजय मुंडे यांनी माझा चष्मा आवडत असेल तर घेऊन जा,ओपन की नाही माहित नाही असं म्हणत नाव न घेता जरांगे पाटलांवरती टीका केली होती...

आज जरांगे पाटलांनी अंतरवाली सराटी मध्ये काळा चष्मा घालत घोडेस्वारी केली...

आज मनोज जरांगे पाटील यांनी घोडस्वारीचा आनंद घेत काळा चष्मा घालत फेरफटका मारला,

ऐन सणासुदीचा काळात सातपुड्यातील चांदसैली बनला मृत्यूचा घाट

ऐन सणासुदीचा काळात सातपुड्यातील चांदसैली बनला मृत्यूचा घाट....

चांदसैली घाटातील तीव्र वळणावरून चार चाकी गाडी थेट 100 फुटावरनं कोसळली खाली...

अवैद्य प्रवासी वाहतूक आणि खराब झालेला घाट मार्गाने घेतला 8 जणांचा बळी...

Pune : पुणे तिथे काय उणे..पुण्याच्या करवंदे काकांनी सिंहगड किल्ला केला १ हजार ७०६ वेळा सर

उत्तुंग इच्छाशक्तीपुढे आकाशही ठेंगणे या म्हणीचा प्रत्यय सिंहगडावर आला, जेव्हा ८४ वर्षीय विकास करवंदे यांनी आपली १ हजार ७०६ वी सिंहगड वारी पूर्ण केली.चढाई एव्हरेस्ट शिखरावर करण्यासाठी पूर्वतयारी करायची असेल,तर आधी सिंहगडाच्या चढाईचा सराव केला जातो, एवढे महत्त्व या गडावरील चढाईला आहे.करवंदे काका यांनी वयाच्या ५३ व्या वर्षी पहिली सिंहगड वारी केली. तेव्हापासून ते आठवड्यातून दोन वेळा गुरुवारी आणि रविवारी गड चढत आहेत.गेल्या तीन दशकांमध्ये त्यांनी तब्बल १ हजार ७०६ वेळा सिंहगड सर केला आहे.

Raigad : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर वाहतूक कोंडी

- पुणे लेन वर सात ते आठ किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा

- दिवाळी आणि सलग सुट्टी असल्याने मुंबईबाहेर पडणाऱ्या वाहनांची एक्सप्रेसवर संख्या वाढली

- खोपोली ते बोरघाटातील अमृतांजन पुल दरम्यान वाहनांच्या रांगा

Nandurbar : आमदार डॉ. विजयकुमार गावित नंदुरबारमधील तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल

आमदार डॉक्टर विजयकुमार गावित तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल...

चांदसैली घाटात झालेल्या अपघातात जखमी झालेल्या तरुणांची घेतली भेट..

अपघातात मृत झालेल्या नातेवाईकांना आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी दिला धीर...

कोंढव्यात पोलिसांसोबत झालेल्या झटापटीनंतर ड्रग्स पेडलरचा मृत्यू

कोंढव्यात पोलिसांसोबत झालेल्या झटापटीनंतर ड्रग्स पेडलरचा मृत्यू झाल्याची माहिती..

मीरा - भाईंदरमध्ये या आरोपीवर गुन्हे दाखल होते...

मीरा भाईंदर पोलीस या आरोपीचा शोध घेत होते..

शोध घेण्यासाठी पुण्यातील मीरा-भाईंदर पोलीस रात्री कोंढव्यात आले असता, पोलीस आणि आरोपीमध्ये झटापट झाल्याने आरोपीचा मृत्यू झाल्याची माहिती...

चांदसैली घाटात झालेल्या भीषण अपघातात जखमींना आमदार राजेश पाडवींचा मदतीचा हात

चांदसैली घाटात झालेल्या भीषण अपघातात जखमींना आमदार राजेश पाडवींचा मदतीचा हात...

तळोदा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू....

अपघातात गंभीरित्या जखमी झालेल्यांना सर्वपरी मदत करणार...

अपघातात मृत पावलेल्या तरुणांच्या मृत्यू देह घरापर्यंत पोहोचवणार...

धनत्रयोदशीच्या निमित्ताने सोन खरेदी करण्यासाठी पुणेकरांची लगबग

धनत्रयोदशी निमित्त आज पुण्यातील सराफा बाजार सजले आहेत. सोन्याच्या भावांमध्ये सातत्याने वाढ होत असली तरी सुद्धा ग्राहकांचा कल सोना खरेदी करण्यासाठी कुठेही कमी झाला नसल्याचे आज अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. सोनू हे धनाचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे आज दिवाळीच्या निमित्ताने धनत्रयोदशीला सोन्याची पूजा केली जात असल्याने सोने खरेदी करण्यासाठी ग्राहक विविध पाहायला मिळतात. सोन्याचे भाव १ लाख ३१ हजार ८४० आहेत तर चांदीच्या भावात सुद्धा वाढ झाली असून चांदी १ लाख ७६ हजार १३० रुपये इतका आहे असं असलं तरी सुद्धा ग्राहकांकडून आजच्या दिवशी एक ग्रॅम का होईना पण सोनं खरेदी करण्याची लगबग पाहायला मिळते आहे.

Latur: पूरग्रस्त कुटुंबियांना आमदार संजय बनसोडे यांच्याकडून 53 लाखाची मदत

लातूर जिल्ह्यातल्या उदगीर आणि जळकोट परिसरात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या कुटुंबीयांना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संजय बनसोडे यांनी मदतीचा हात दिला आहे . पूरग्रस्त कुटुंबांना अन्नधान्य सह, आर्थिक मदत केली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या घरात ही दिवाळी व्हावी, शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागावा या उद्देशाने त्यांनी ही मदत केली आहे.

अमरावतीत नऊ महिन्यात 18 हजार नागरिकांना मोकाट कुत्र्यांचा चावा

अमरावती जिल्ह्यात मोकाट कुत्र्यांचा त्रास दिवसेंदिवस वाढत चालला आहे, जानेवारी ते सप्टेंबर या 9 महिन्याच्या कालावधीत तब्बल 18 हजार 366 नागरिकांना कुत्र्याने चावा घेतल्याची नोंद शासकीय रुग्णालयात झाली आहे, यामध्ये एका नागरिकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आहे.

Dhule: धनत्रयोदशीनिमित्त सोन्या चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी धुळेकरांची लगबग

धनत्रयोदशी सणाच्या निमित्ताने सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी धुळेकरांनी सोन्याच्या दुकानात मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे, सोन्या चांदीचे दर मोठ्या प्रमाणात वाढलेले असताना देखील धुळेकर नागरिकांनी सोनं चांदी खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केली आहे, सोन्या चांदीचे दर वाढल्यामुळे सोने चांदी खरेदीवर याचा परिणाम देखील झाला आहे, सोने चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांतर्फे कमी प्रमाणात खरेदी होत असल्याने याचा थेट परिणाम प्रॉफिट वर होत असल्याची खंत सोने चांदी व्यापाऱ्यांतर्फे व्यक्त केली जात आहे

धनगर समाज बांधवाने गळफास घेऊन आत्महत्या केली

बीडच्या गेवराई तालुक्यातील मादळमोही गावात धनगर समाज बांधवाने गळफास घेऊन आत्महत्या केली. योगेश बबन चौरे असं 33 वर्षीय तरुणाचे नाव असून तो आरक्षणाच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनात सक्रिय होता. मात्र आरक्षणाचा तिढा सुटत नसल्याने योगेश चौरे याने आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे. दरम्यान याच ठिकाणी एक सुसाईड नोट आढळून आली असून पोलीस या अनुषंगाने माहिती आणि तपास करत आहेत. दरम्यान आत्महत्याग्रस्त कुटुंबाला न्याय मिळावा या मागणीसाठी धनगर समाजाचे नेते भारत सोन्नर यांच्यासह धनगर समाजाने मादळमोही पोलीस चौकीत ठिय्या मांडला.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर धुळे पोलीस ॲक्शन मोडमध्ये

पोलीस प्रशासनातर्फे रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आल्यानंतर दिवसा बाजारामध्ये देखील पोलिसांची गस्त वाढली

बाजारात दिवाळीनिमित्त खरीदारीसाठी धुळेकरांची गर्दी वाढल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनातर्फे वाढविण्यात आली ग्रस्त

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानंतर टवळाखोरांना व चोरट्यांना लगाम लावण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज

बदलापूरच्या रेशन अधिकाऱ्याला दिला 'शारदाचा शिधा'

राज्य शासनाच्या वतीने दिवाळी सणा निमित्तानं देण्यात येणारा आनंदाचा शिधा यावर्षी बंद झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने निषेध व्यक्त करत बदलापूरच्या शिधा वाटप अधिकाऱ्याला शिधा भेट देऊन उपहासात्मक आंदोलन करण्यात आलं.यावेळी शिधावाटप कार्यालयाला दिवाळीचं तोरणही बांधण्यात आलं. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी

बदलापूर गावातील आदिवासी बांधवांना "शारदाचा शिधा" वाटप केलं. राज्य सरकारने फक्त निवडणुकीपुरता आनंदाचा शिधा वाटप करून नागरिकांची थट्टा केल्याचा आरोप यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला.

ज्या गाडीची चर्चा होत आहे ती गाडी निलेश ढवळे या कंत्राटदाराची आहे तो माझा नातेवाईकही आहे आणि पक्षाचा कार्यकर्ता ही आहे त्याने शंभर टक्के कर्ज काढून ती गाडी घेतलेली आहे आणि मी काही दिवस वापरण्यासाठी ती गाडी माझ्याकडे बोलावली आहे माझ्या अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीवर आमदाराचा सिम्बॉल लावला आहे त्यात काही गैर नाही आणि ज्यांनी कमिशन म्हणून आरोप केले त्या कुत्र्यांना मला उत्तर द्यायची गरज नाही.
आ. संजय गायकवाड

मालाडमध्ये अग्नितांडव, १५ ते २० गाळ्यांना लागली आग

मालाड (पूर्व) – पठाणवाडी, संजय नगर, पिंप्रीपाडा परिसरात दुपारी १२.५४ वाजता आग लागल्याची घटना घडली. या आगीची माहिती मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला मिळताच तत्काळ दलाच्या 6 गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या.

आग सुमारे १५ ते २० गाळ्यांपुरती मर्यादित असल्याचे प्राथमिक माहितीवरून समजते. घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस, बीएमसीचे विभागीय अधिकारी, १०८ रुग्णवाहिका तसेच अदाणी इलेक्ट्रिसिटीचे पथक दाखल झाले आहे.

अग्निशमन दलाने या आगीला स्तर-२ (Level-II) घोषित करून नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू केले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाल्याची नोंद नाही, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

108 अत्यावश्यक रुग्णवाहिकांचा भोंगळ कारभार

- सांगली जिल्ह्यातल्या 108 अत्यावश्यक रुग्णवाहिकांची अवस्था दयनीय झाली आहे. रुग्णवाहिकांमध्ये प्राथमिक उपचार सुविधा देखील उपलब्ध नसल्याने रुग्णांना घेऊन जाताना रुग्णांची प्रकृती आणखी गंभीर बनत असल्याचा आरोप करण्यात येत आहे कुपवाड शहरातल्या बामणोली येथील रुग्णाच्या बाबतीत हा प्रकार घडला आहे. एक तरुण कामावर जात असताना चक्कर येऊन पडला त्यानंतर संबंधितांनी 108 रुग्णवाहिकाला याची माहिती दिल्यानंतर डबल अर्ध्या तासाने रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली,त्यानंतर संबंधित रुग्णाला सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल्या.मात्र या दरम्यान रुग्णाची प्रकृती ही आणखी गंभीर बनले.

Jalna: एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी; झाडावर चढून बंजारा बांधवाच आमरण उपोषण....

हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जालन्यात विजय चव्हाण यांनी थेट झाडावर चढून आमरण उपोषणाला सुरुवात केलीय. उपोषणकर्त्याला आमरण उपोषणासाठी पोलिसांनी परवानगी नाकारल्याने थेट झाडावर चढून आंदोलन सुरू केल आहे.एसटी आरक्षणासाठी बंजारा समाज पुन्हा आक्रमक होताना पाहायला मिळतोय. दरम्यान बंजारा समाजाच्या मागण्याची दखल न घेतल्यास येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीला धडा शिकवणार असा थेट इशारा बंजारा बांधवांनी दिला आहे

Pune: निलेश घायवळचा जामीन रद्द करावा, पुणे पोलिसांची न्यायालयाला विनंती

जामीन रद्द करण्यासाठी, पुणे पोलिसांची न्यायालयात याचिका

पुणे पोलिसांची मुंबई उच्च न्यायालयात याचिका

गायवळ याने जामिनात असलेल्या अटी शर्तीचे पालन न केल्यामुळे जामीन रद्द करावा अशी पोलिसांची मागणी

गायवळ याने पोलिस ठाण्यात हजेरी चुकवल्यामुळे तसेच पासपोर्ट जमा न केल्यामुळे त्याचा जामीन रद्द करावा असे पोलिसांनी याचिकेत म्हटलं आहे

Maharashtra Politics: शरदचंद्र पवार पक्षा समोर अंध:कार; पालकमंत्री जयकुमार गोरे यांची टीका

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षा समोर अंध:कार आहे. त्यांना कुठ जायचं आणि कसं जायचं हे त्यांना समजत नाही अशी टिका पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने काल सरकार विरोधात काळी दिवाळी साजरी करून आंदोलन केले होते. त्यानंतर आज पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षावर जोरदार टिका केली.

सरकारने पूरग्रस्तांसाठी सुमारे 31 हजार कोटीची मदत जाहीर केली आहे. सोलापूर जिल्ह्यातील 15 हजार पूरग्रस्त शेतकर्यांच्या घरात चांगली दिवाळी साजरी व्हावी म्हणून दिवाळी कीट भेट देण्यात आले आहे. विरोधकांची आता गरजच उरली नसल्याचेही गोरे यांनी स्पष्ट केलं.

Dhananjay Munde: धनंजय मुंडे यांच्या भाषणानंतर करुणा मुंडे यांची प्रतिक्रिया

धनंजय मुंडे यांच्यामुळे माझ्या आईने आत्महत्या केली होती त्याचा पुरावा माझ्याकडे आहे सुसाईड नोट मी न्यायालयामध्ये सादर केली आहे तरुणा मुंडेंचा खळबळजनक आरोप आज हे लोक ओबीसी समाजासाठी लढत आहेत मात्र माझ्यासारखे अनेक ओबीसी बांधवांवरती धनंजय मुंडे यांनी केला आहे त्यांना न्याय कधी मिळणार आम्ही देखील वंजारी आहोत आमच्यावर अन्याय करताना तुम्हाला काही वाटत नाही का रे त्याचबरोबर माझा परिवार उध्वस्त करण्याचे काम धनंजय मुंडे निखिल आहे त्याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत असं करुणा मुंडे म्हणाल्या

Yewala: येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे मंत्री भुजबळ यांच्या हस्ते लोकार्पण

येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री ना. छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. सुमारे रु. ८९ लाख ४५ हजार खर्च करून ही आधुनिक इमारत उभारण्यात आली आहे. या प्रसंगी माजी आमदार मारुतराव पवार, बाजार समितीचे सभापती, संचालक मंडळाचे सदस्य, तसेच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या इमारतीच्या माध्यमातून बाजार समितीचे प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ आणि शेतकरी-केंद्रित होणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. मंत्री भुजबळ यांनी यावेळी बाजार समितीच्या विकासकामांचे कौतुक करत शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्य करण्याचे आवाहन केले.

Washim: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; दोन विदेशी नागरिकांचा मृत्यू...

वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे, या भीषण अपघातात म्यानमार येथील 2 विदेशी नागरिकांचा अपघातात मृत्यू झालाय... वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील चॅनल 232 वर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी डिव्हायडरला धडकून हा भीषण अपघात झाला आहे, इनोव्हा गाडीतून सहा विदेशी नागरिक होते. यात दोन महिला,तीन पुरुष आणि एक दहा वर्षीय मुलांचा समावेश आहे. हे सहा विदेशी नागरिक मुंबईवरून नागपूरला जात होते.

Pune: पुण्यात डिजिटल अरेस्टचा भयंकर प्रकार; 1 कोटी 45 लाख रुपयांची फसवणूक

पुण्यात बनावट NIA चीफ असल्याचं सांगत 1 कोटी 45 लाख रुपयांची फसवणूक

राष्ट्रीय तपास यंत्रणेचा चीफ आहे अस सांगत करण्यात आली फसवणूक

70 वर्षीय फिर्यादीची फसवणूक करत उकळले पैसे

पहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्यातील अतिरेक्यांशी तुमचा संबंध असून पहलगाम हल्ल्यात अतिरेक्यांना पैसे पुरवल्याची धमकी देत करण्यात आली फिर्यादीची फसवणूक

वेगवेगळ्या बँक खात्यातून पैसे अतिरेक्यांना पुरवले अशी खोटी माहिती देत बनाव करून उकळले कोट्यवधी रुपये

पुण्यातील सायबर पोलिसांकडे गुन्हा दाखल

Pune-Nashik: पुणे नाशिक रस्त्यावर वाहतूक कोंडी

पुणे नाशिक रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

दिवाळीच्या सुट्टी निमित्त पुणे नाशिक मार्गावर वाहतूक जॅम

नारायणगाव जवळ वाहनांच्या लांब रांगा

Gold Rate: धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने चांदीचे दर घसरले

- धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर सोने चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

- सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण

- सोनं १ लाख ३३ हजार रुपयांवरून १ लाख ३१ हजार रुपयांपर्यंत घसरलं

- तर चांदीच्या दरात देखील तब्बल १६ हजारांची घसरण

- चांदीचा भाव प्रतिकिलो १ लाख ६९ हजार रुपयांवर, कालपर्यंत चांदीचा भाव प्रतिकिलो पोहोचला होता १ लाख ८५ हजार रुपयांवर

Dharashiv: धाराशिवमध्ये लोकनाट्य कला केंद्रांवर जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई

उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणानंतर जिल्ह्यातील लोकनाट्य कला केंद्रांवर प्रशासनाचा कारवाईचा धडाका

जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी कालिका आणि गौरी लोकनाट्य कला केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी केले आहेत रद्द

आतापर्यंत धाराशिव जिल्ह्यातील चार लोकनाट्य कला केंद्रांवर कारवाई करण्यात आली असून तुळजाई, पिंजरा, साई, आणि कालिका या केंद्रांचे परवाने रद्द झाले आहेत

सोलापूर-धुळे महामार्गालगत असलेल्या या केंद्रांनी प्रशासनाने घालून दिलेल्या अटींचा भंग केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

वाढती गुन्हेगारी आणि नियम भंगाविरोधात प्रशासनाचा कडक संदेश — धाराशिव जिल्ह्यात सुरू आहे कारवाईचा सिलसिला

Amravati: अमरावतीमध्ये चक्क 21 हजार रुपये किलो सोन्याची मिठाई..

दिवाळीचा सण आणि गोडधोड पदार्थ यांचं अतूट नातं आहे. मात्र यंदा अमरावतीत एका मिठाईच्या दुकानाने गोडीत सोनेरी भर घातली आहे.देशभर चर्चेत असलेली सोनेरी भोग मिठाई जी खऱ्या २४ कॅरेट सोन्याच्या वर्खाने सजलेली आहे.दिवाळीच्या मुहूर्तावर ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तयार करण्यात आलेली ही मिठाई म्हणजे केवळ खाण्याचा पदार्थ नाही, तर एक कलाकृती आहे. निवडक आणि उच्च दर्जाच्या सुकामेव्यासह पिस्ता, मामरा बदाम, केशर आणि हेजलनटसारख्या घटकांनी बनवलेली ही मिठाई खास वर्गासाठी आकर्षण ठरली आहे.या मिठाईची किंमत ऐकून कुणाच्याही डोळ्यांत आश्चर्य वाटेल.. प्रतिकिलो तब्बल २१ हजार तरीही खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी दिसून येते आहे.

Maharashtra Politics: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटलांचे राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटलांना खुलं आव्हान

- जिल्हा परिषदेला मी माझा नरखेड गट सोडून लढतो तुम्ही अनगर सोडून माझ्या विरोधात लढा

- जर माझा पराभव झाला तर मी माझं राजकारण सोडून देतो

- मी अनगर गावात गेल्यावर माझ्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला पण 'अपने गली मे कुत्ता भी शेर होता है'

- मोहोळचे माजी आमदार राजन पाटील भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चानंतर जिल्हाध्यक्ष उमेश पाटलांचे ओपन चॅलेंज

- राजन पाटील हे अजित पवार गटाचे माजी आमदार तसेच राज्यमंत्री दर्जा असलेले सहकार परिषदेचे विद्यमान अध्यक्ष आहेत.

- माझं राजन पाटलांना आव्हान आहे की माझ्याविरोधात लढा.

- माझा बाप कुठला आमदार, खासदार, मंत्री नाही किंवा माझ्याकडे कारखाना, भरपूर पैसा नाही पण आमच्यात हिंमत आहे

Nashik: नाशिक जिल्ह्यात आठवडाभर कांदा खरेदी-विक्री व्यवहार राहणार बंद

- जिल्ह्यातील लासलगाव, पिंपळगाव या मुख्य बाजार समितीमध्ये दीपावली निमित्त व्यापारी घेणार सुट्टी

- बाजार समितीच्या या सूचनेमुळे कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने कांद्याच्या दरात मोठी घसरण

- परिणामी कांद्याचे दर कोसळले, ऐन दिवाळीत शेतकऱ्याला विकावा लागतोय किमान ४ रुपये किलोने कांदा

- तर लासलगाव बाजार समितीत सरासरी भाव १०७५ रुपये प्रति क्विंटलवर, शेतकऱ्यांमध्ये नाराजी

Vasai-Virar: पर्यावरण पूरक दिवाली साजरी करा, वसई विरार पालिकेच्या आयुक्तांचे आवाहन

वसई विरार शहर महानगर पालिकेचे आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांनी पर्यावरण पूरक दिवाली उत्सव साजरा करण्याचा निर्धार केला आहे. फोडणाऱ्या फटाक्यांमुळे शहरातील प्रदूषणात वाढ होत असते, त्यामुळे अपघातही होत असतात आपण सर्वजण सजक नागरिक म्हणून आपण आपली जबाबदारी पार पाडू असे आवाहन आयुक्तांनी शहरातील नागरिकांना केले आहे.

पालिकेच्या माध्यमातून 17 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर पर्यंत दिवाळी सखी कार्यक्रम राबविण्यात येत आहे, यामध्ये बचत गटाच्या महिलांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री केली जाणार आहे. शहरातील सर्व नागरिकांनी बचत गटाच्या महिलांनी बनवलेल्या वस्तूंची खरेदी करावी जेणेकरून त्यांना एक मदतीचा हात मिळेल.

Akkalkot: अक्कलकोट स्वामी समर्थांचे मंदिर राहणार 20 तास तर गाणगापूर श्री दत्तात्रयाचे मंदिर राहणार 18 तास खुले

अक्कलकोट स्वामी समर्थाचे मूळस्थान असलेले वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान हे दिवाळी सुट्ट्यांमधील भाविकांच्या गर्दीमुळे २० तास खुले ठेवण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे.

तर अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त" श्रीक्षेत्र गाणगापूर येथे दिवाळीनिमित्त विविध अभिषेक,पालखी,मंगलस्नान असे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले आहेत.दिवाळी उत्सवानिमित्त पहाटे ३ ते रात्री ९ असे १८ तास गाणगापूर दत्तात्रय मंदिर भाविकांसाठी मंदिर खुला राहणार आहे.पहाटे पासून दुपारी १२ पर्यंत विधिवत पूजा, अभिषेक असणार आहे. दु.१ वाजता निर्गुण पादुका मूळस्थान दर्शन बंद करण्यात येणार आहे.

Badlapur: बदलापूर नगरपालिकेनं साजरी केली 'स्वच्छतेची दिवाळी'

बदलापूर पालिकेनं स्वच्छतेची दिवाळी साजरी करत शहरात आगळा वेगळा उपक्रम राबविलाय. या उपक्रमाअंतर्गत दिवाळीच्या पहिल्या दिवशी शहरातील दहा चौकात रांगोळ्या काढत पालिकेकडून 25 हजार दिवे लावण्यात आले त्यामुळे शरीरातील सर्व चौक हे दिव्यांच्या प्रकाशानं उजळून निघाले होते. नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि प्रशासक मारुती गायकवाड यांच्या संकल्पनेतून हा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात आला, गेल्या 15 दिवसांपासून नगरपालिकेचे स्वच्छता आणि बांधकाम विभागाकडून शहरातील साफसफाईची मोहीम राबविण्यात आलीय. या उपक्रमात पालिकेचे सर्व कर्मचारी सहभागी झाले होते.

पुणेकरांच्या उपस्थितीत पर्वतीवर उत्साहात दीपोत्सव साजरा

पुण्यातील पर्वती परिसरात दररोज फिरायला येणाऱ्या व्यायाम प्रेमी पुणेकरांकडून आज पर्वती दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर असंख्य पुणेकर नागरीक पर्वतीवरील दीपोत्सवात सहभागी झाले होते. असंख्य दिव्यांनी पर्वती अक्षरशः उजळून निघाली.

यावर्षी दीपोत्सवाचा सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात येत आहे. पहाटेच्या चार वाजता च ब्राह्म मुहूर्त पासून असंख्य तरुण मुले मुली, महिला पुरुष पारंपरिक वेशभूषा परिधान करून पर्वतीवर आवर्जून उपस्थित होते. पहाटेच्या शितल वातावरणात पर्वतीवर मंगलमय वातावरणात पणत्या लावण्यात आल्या.

पिसाळलेल्या कुत्र्याची दहशत..20 जणांना घेतला चावा

भंडारा शहरातील चांदणी चौक परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने चक्क 9 बालकांसह एकूण 20 नागरिकांना चावा घेतला. यामध्ये काही तरुण व एका वृद्ध इसमाचाही समावेश आहे. या प्रकाराने भंडारा शहरात दहशत पसरली. सर्व जखमींना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. भंडाऱ्यात भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यांचा बंदोबस्त करण्यात पालिका प्रशासन कमी पडत असल्याचे या घटनांवरून दिसून येते. काही भागात आठ ते दहा तर कुठे 15 ते 20 च्या समूहाने कुत्रे आढळतात. यामुळे लहान बालकांना घराबाहेर पाठविण्यासाठी पालकगण विचारात पडले आहेत. शहरातील मोठा बाजार परिसराला लागून असलेल्या राम मंदिर वॉर्ड, चांदणी चौक परिसरात भटक्या कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे.

सर्व निराधारांना अडीच हजार रुपये मासिक अर्थसहाय्य द्या,   डाव्या पक्षांचे जिल्हाभरात एक दिवसीय ठिय्या आंदोलन

संजय गांधी, श्रावण बाळ निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मासिक पाच हजार रुपयांचे अर्थसाह्य करावे यासाठी शेतकरी कामगार पक्षासह डाव्या मित्रपक्षांनी वेळोवेळी आंदोलने केल्यानंतर राज्य शासनाने या योजनेतील अपंग लाभार्थ्यांना अडीच हजार रुपये मासिक अर्थसहाय्य सुरू केले आहे. मात्र इतर लाभार्थ्यांना ही वाढ लागू करण्यात आली नसल्याने सध्याच्या महागाईच्या काळात विधवा परित्यक्ता व वयोवृध्द निराधारांनी अल्प अर्थसहाय्यात आपली गुजराण कशी करावी असा प्रश्न निर्माण झाला असून शासनाने या योजनेतील सर्व लाभार्थ्यांना सरसकटपणे किमान अडीच हजार रुपये मासिक अर्थसहाय्य तातडीने लागू करावे या प्रमुख मागणीसाठी जिल्हाभरातील विविध तहसील कार्यालयांसमोर शेतकरी कामगार पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या डाव्या मित्रपक्षांनी गडचिरोली जिल्हाभरातील विविध तहसील कार्यालयांसमोर एक दिवसीय ठिय्या आंदोलन व धरणे प्रदर्शने केले.

दिवाळीच्या सुटीमुळे बसस्थानक प्रवाशांनी गजबजले ..

सध्या दिवाळीच्या सणामुळे सर्वत्र सुटी आहे .. त्यामुळे नोकरदार वर्ग, आणि शालेय विद्यार्थी यांना सुद्धा सुटी आहे .. त्यामुळे घरी जाण्यासाठी प्रवाशांनी बस स्थानक वर मोठी गर्दी केली असल्याचे पाहायला मिळत आहे.. तर खाजगी बसचे भाडे सुद्धा जास्त असल्याने आणि बसचे भाडे सुद्धा कमी असल्याने प्रवाशांनी बसचा पर्याय निवडला असल्याचे दिसते आहे .. त्यामुळे बस स्थानक वर मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे .

पन्हाळगडावर दीपोत्सव

कोल्हापूर हायकर्स फाउंडेशनने वसुबारसच्या पावन संध्याकाळी पन्हाळगडावर दीपोत्सवाच्या तेजोमय प्रकाशात ‘एक सांज पन्हाळगडावर’ उपक्रम अत्यंत उत्साहात आणि ऐतिहासिक वातावरणात संपन्न झाला. या दीपोत्सवाचा शुभारंभ युवराज्ञी संयोगिताराजे संभाजीराजे छत्रपती यांच्या शुभहस्ते शिव मंदिराचे पूजन करून आणि पहिला दिवा शिवरायांच्या चरणी अर्पण करून करण्यात आला. शिवमंदिर, महाराणी ताराराणी साहेबांचा राजवाडा परिसरात हजारो दिव्यांच्या साक्षीने ऐतिहासिक वातावरण अनुभवायला मिळाले. कार्यक्रमादरम्यान वीरभद्र मर्दानी आखाडा यांनी शिवकालीन युद्धकलेची थरारक प्रात्यक्षिके सादर केली. तलवारींचा झंकार, ढोल-ताशांच्या गजरात शिवभक्त मंत्रमुग्ध झाले. यानंतर सज्जा कोटी परिसरात सर्व शिवभक्तांनी एकत्र येऊन हजारो दिव्यांनी गड प्रकाशमय केला. अत्युच्च उत्साहात आणि शिवमय वातावरणात “दिवाळीचा पहिला दिवा माझ्या राजाच्या चरणी” लावून हा दीपोत्सव संपन्न झाला. हा उपक्रम यंदा १३व्या वर्षी कोल्हापूर हायकर्स फाउंडेशनच्या वतीने यशस्वीरित्या पार पडला.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०२६ मधील परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर

२०२६ मध्ये घेतल्या जाणाऱ्या विविध परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक प्रसिद्ध

राज्यसेवा, वनसेवा, अभियांत्रिकी सेवा अशा विविध परीक्षांच्या अंदाजित तारखा, निकालाचा महिना याचे वेळापत्रक जाहीर

एमपीएससीने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, ५ ते ९ मे रोजी महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा २०२६ त्याचा निकाल ऑगस्टमध्ये जाहीर केला जाण्याची शक्यता

१६ मे रोजी स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा, महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा होणार आहे

या दोन्ही परीक्षांचा निकाल ऑगस्टमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे

१७ मे रोजी महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२५ होणार आहे

परीक्षेचा निकाल सप्टेंबर २०२६ मध्ये जाहीर करण्याचे नियोजन

DHULE उघड्यावर पार्ट्या करणाऱ्या तळीरामांच्या विरोधात धुळ्यात पोलीस ॲक्शन मोडमध्ये

धुळे पोलीस तळीरामांच्या विरोधामध्ये चांगलेच ॲक्शन मोडमध्ये आल्याचे बघायला मिळाले असून रस्त्याच्या किनारी त्याचबरोबर चौपाटीवर नदीकिनारी तसेच सार्वजनिक ठिकाणी अड्डा बनवून सर्रासपणे दारू पिणाऱ्या तळीरामांना धुळे पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे,

महाड बाजार पेठेत कापड दुकानाला लागली आग

महाड शहरातील बाजार पेठेत कापड दुकानाला आग लागून मोठ नुकसान झाल आहे. मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास हि आग लागली. महाड शहरातील जुना पोस्ट परिसरातील भदेसर साडी सेंटर या दुकानाला आग लागली. महाड नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने हि आग आटोक्यात आणली मात्र या आगीत दुकानातील फर्निचर, साड्या आणि ड्रेस मटेरिअल सह इतर साहित्य जळून मोठ नुकसान झाल आहे. आगीचे निश्चित कारण समजू शकले नसल तरी दिवाळीमध्ये करण्यात आलेल्या विद्युत रोषणाई मुळे अगर शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.

वेळेवर उपचार न घेतल्याने तरुणाचा रेबीजने हृदयद्रावक मृत्यू

फक्त एका चुकीने आयुष्य उद्ध्वस्त झाल्याची हृदयस्पर्शी घटना अंबरनाथमध्ये उघडकीस आली आहे. अमन कोरी (वय २४) या तरुणाला दोन महिन्यांपूर्वी कुत्र्याने चावले होते, परंतु त्याने याबाबत कुटुंबीयांना सांगितले नाही आणि फक्त एकच इंजेक्शन घेतल्याने उपचार अपूर्ण राहिले. काही दिवसांनी त्याच्या पायात बदल जाणवू लागले, परंतु कुटुंबाला रेबीजची कल्पना नसल्याने त्यांनी त्याला आयुर्वेदिक उपचारासाठी हैदराबादला नेले. नंतर अमनचे वर्तन कुत्र्याप्रमाणे बदलू लागले आणि त्याला तातडीने कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणीत रेबीज झाल्याचे स्पष्ट झाले. उपचारासाठी वेळ हातातून गेल्याने अमनचा मृत्यू झाला. ही घटना ऐकून कुटुंब व परिसर हादरला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. श्वानदंशानंतर वेळेवर आणि पूर्ण उपचार घेणे किती अत्यावश्यक आहे, याची जाणीव अमनच्या मृत्यूने पुन्हा एकदा सर्वांना झाली आहे.

सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तानतर्फे पुरग्रस्त भूम तालुक्यातील ५ शेतकऱ्यांना सात गाईंचे वाटप

धाराशिवच्या भूम तालुक्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पुणे येथील सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तान या सामाजिक संस्थेतर्फे पाच शेतकऱ्यांना सात गाईंचे वाटप करण्यात आलय.पूरपरिस्थितीमुळे चिंचपूर ढगे आणि पिंपळगाव परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. विशेषतः, काहींचे पशुधन वाहून गेल्याने किंवा मृत्यूमुखी पडल्याने त्यांना प्रचंड आर्थिक फटका बसला होता.अशा शेतकऱ्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्तान या सामाजिक संस्थेने हा उपक्रम हाती घेतला.

पुणे शहरातील समाविष्ट नऊ गावांचा प्रारूप विकास आराखडा जाहीर

पुणे शहराच्या हद्दीलगतच्या गावांचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी म्हणून २०१७ मध्ये ९ गावे महापालिकेत समाविष्ट केली होती

त्यांचा प्रारूप विकास आराखडा राज्य सरकारने मंजूर करून त प्रसिद्ध

त्यावर आता नागरिकांना हरकती सूचना नोंदविण्यासाठी साठ दिवसांचा कालावधी

या प्रारूप विकास आराखड्यात एकूण १७५ आरक्षणाचा समावेश

पुणे शहरातील ही आहेत ९ गावे

लोहगाव (उर्वरित), मुंढवा (उर्वरित केशवनगर), साडेसतरा नळी (हडपसर), शिवणे (उत्तमनगर), मौजे शिवणे (संपूर्ण उत्तमनगर), मौजे आंबेगाव खुर्द (उर्वरित), मौजे उंड्री (उर्वरित), मौजे धायरी (उर्वरित) आणि मौजे आंबेगाव बुद्रूक (उर्वरित).

NANDED l नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील चेनापुर तांडा येथे 70 ते 75 जणांतून पाण्यातून विषबाधा

नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील चेनापुर तांडा येथे 70 ते 75 जणांतून पाण्यातून विषबाधा

गावकऱ्यांनी विहिरीतील पाणी पिल्याने विषबाधा झाल्याची माहिती

काल सकाळपासूनच गावातील काही लोकांना जाणवत होता जुलाब आणि उलट्यांचा त्रास

गावातील विषबाधा झालेल्या सर्व सगळ्या लोकांची प्रकृती स्थिर

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संगीता देशमुख यांची माहिती

NAVI MUMBAI : नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक निमित्ताने अजित पवार गटाची मोर्चे बांधणी करायला सुरुवात

नवी मुंबई महानगरपालिका शिवसेना-भाजपने मोर्चे बांधणी करत असताना आता अजित पवार गटाने सुद्धा नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक दृष्टीने पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाचा सपाटा लावल्या दिसून येत आहे 

नवी मुंबईतील परिसरातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी अजित पवार गटात पक्ष प्रवेश केला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला असंख्य  कार्यकर्त्यांनी अजित पवार गटात पक्षप्रवेश केला आहे

MAVAL : लोणावळ्यामध्ये मतदार यादीत घोळ, मतदार याद्यांची होळी करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे केले आंदोलन. पात्र मतदारांची नावे वगळल्याचा केला आरोप....

 लोणावळा शहरात मतदार यादीत  प्रचंड घोळ असल्याने मतदारांना  मनस्ताप सहन करावा लागणार असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.  कार्यकर्त्यांनी लोणावळ्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध करत मतदार याद्यांची होळी करून संताप व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे शहराध्यक्ष नासीर शेख यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनाचे आयोजन करण्यात आलं होतं. या आंदोलनात कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग दिसून आलाय. आगामी स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत“मतदार याद्यांतील त्रुटींमुळे सामान्य नागरिकांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहावे लागणार आहे. नवीन आणि जुन्या मतदारांची नावे एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात गेली आहेत. दुबार आणि बोगस मतदार यादीत घुसविण्यात आले आहे. मयत नावे कमी झालेली नाही, नावांमध्ये त्रुटी आहेत अशा अनेक तक्रारी करत हे लोकशाहीला धक्का देणारे आहे,” अशी प्रतिक्रिया पक्षाच्या नेत्यांनी दिली....

Khed महात्मा गांधी विद्यालयात विद्यार्थ्यांचा भव्य दीपोत्सव; शेकडो दिव्यांनी उजळलेलं खेडचं मैदान

दिवाळीचा सण म्हणजे प्रकाशाचा उत्सव... आनंद, एकोपा आणि संस्कृतीचा संगम! पुण्याच्या राजगुरुनगर मधील महात्मा गांधी विद्यालयातही विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने भव्य दीपोत्सव साजरा करत संपूर्ण परिसरच उजळून टाकला.

Thane | ठाणे एनसीपी स्वबळावर निवडणूक लढणार, सेनेवर भ्रष्टाचाराचे आरोप

ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेसोबत युतीचा विचार सोडून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (एनसीपी) ठाणे शाखेने स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेच्या गेल्या दोन दशकांच्या कारभारात विकास प्रकल्प रखडल्याचा आणि भ्रष्टाचाराचे आरोप करत एनसीपीने हा निर्णय घेतला. एनसीपीचे राज्य कार्यकारिणी सदस्य आणि माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांनी पत्रकार परिषदेत याबाबत घोषणा केली. “गेल्या 20 वर्षांतील भ्रष्टाचार आणि घोटाळ्यांचा बोजा आम्हाला नको. थीम पार्कसारख्या प्रकल्पांमधील अनियमिततेवर कारवाईची मागणी आम्ही वारंवार केली,” असे मुल्ला म्हणाले. तसेच, जागावाटपातील अडचणींमुळे एनसीपीच्या उमेदवारांना संधी मर्यादित झाल्याचेही त्यांनी नमूद केले.

Raigad | किल्ले रायगडावर दिपवाली साजरी

किल्ले रायगडावर दिपवाली साजरी करण्यात आली आहे.  दिवाळीच्या निमित्ताने शिवप्रेमींनी स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर जल्लोश साजरा केला.  रायगडावरील नगारखाना, राजदरबार, शिरकाई देवीच मंदिर येथे आकाश कंदिल आणि पणत्या लावल्या.  मशालींच्या प्रकाशात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष करीत पालखी मिरवणुक काढण्यात आली.  यावेळी मर्दानी खेळ खेळत, फटाके देखील फोडण्यात आले.  शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती, दुर्गराज रायगड या संस्थेने शिवचैतन्य सोहळा नावाने या सोहळ्याचे आयोजन केले होते.

मोठी बातमी! ३३ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार अतिवृष्टी, महापुराची नुकसान भरपाई; सर्व जिल्ह्यांचे पंचनामे अहवाल सादर

सर्व जिल्ह्यांचे पंचनामे अहवाल शासनाला सादर झाले असून कृषी विभागाकडूनही एकूण अहवाल रात्री उशिरा राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे. त्यामुळे आजपासून (ता. १८) शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाईची रक्कम वितरीत होईल, असे कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

राज्यातील ३३ जिल्ह्यांना सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीचा तडाखा बसला. अतिवृष्टी व महापुरामुळे एकाच महिन्यात तब्बल ५२ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. सर्व जिल्ह्यांचे पंचनामे अहवाल शासनाला सादर झाले असून कृषी विभागाकडूनही एकूण अहवाल रात्री उशिरा राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे. त्यामुळे आजपासून (ता. १८) शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाईची रक्कम वितरीत होईल, असे कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. 

निलेश घायवळवर आणखी एक गुन्हा दाखल

निलेश घायवळ त्याचा भाऊ सचिन घायवळ आणि त्यांच्या टोळीविरुद्ध अॅडजंक्ट कंपनीकडून ४५ लाख रुपये उकळल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने ही रक्कम त्याच्या चुलत भावाच्या नावावर बनावट नोंदणी केलेल्या अस्तित्वात नसलेल्या डेअरी फर्मद्वारे मिळवली. वारजे पोलिस स्टेशनमध्ये केला गुन्हा दाखल

MUMBAI - पुढील शैक्षणिक वर्षापासून चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा स्तर इयत्ता पाचवी ऐवजी इयत्ता चौथी आणि इयत्ता आठवी ऐवजी इयत्ता सातवी मध्ये करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

 शिष्यवृत्ती परीक्षेतील बदलाची अंमलबजावणी 2025-26 या शैक्षणिक सत्रापासून करण्यात येणार आहे. यामुळे 2025-26 या शैक्षणिक क्षेत्रात इयत्ता पाचवी आणि इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन (अंतिमतः) साधारणतः फेब्रुवारी 2026 च्या दुसऱ्या अथवा तिसऱ्या रविवारी करण्यात येईल. 

तर इयत्ता चौथी आणि इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन साधारणतः एप्रिल किंवा मे 2026 च्या कोणत्याही रविवारी करण्यात येईल. 

ठाकरेंची नवी युवा पिढी एका फ्रेम मध्ये

मनसेच्या दिपोत्सव कार्यक्रमाला आज उद्धव ठाकरे यांनी उपस्थित दर्शवडे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दीपोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन झालं. यावेळी उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थाने भेट घेतले यावेळी ठाकरेंच्या नव्या युवा पिढीचा एकत्रित फोटो

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ओबीसींचं नुकसान झालेलं नाही, राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अध्यक्षांचं विधान; VIDEO

Bihar Election : ऐन निवडणुकीत इंडिया आघाडीला जोरदार झटका, एका राज्यातील सत्ताधारी मित्रपक्ष फुटला

Maharashtra Politics: अजित पवारांच्या गटात बेशिस्तपणा वाढलाय; राष्ट्रवादीचा माजी आमदार भाजपात जाणार

Sunday Horoscope : तुम्ही यशाच्या अगदी जवळ जाणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात येणार टर्निंग पॉईंट

टेस्ट, वनडे आणि टी-२० नंतर क्रिकेटमध्ये नव्या फॉरमॅटची एन्ट्री! कुठे आणि कधी होणार सुरूवात? नियम कोणते?

SCROLL FOR NEXT