मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर खंडाळा बोगद्याजवळ सकाळी एका ट्रकला अचानक आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे पुण्याकडे येणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या ट्रकच्या केबिनमध्ये अचानक आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगावधान राखत तत्काळ ट्रक रस्त्याच्या कडेला लावला. काही क्षणांतच आग भडकली आणि ट्रकचे केबिन जळून खाक झाला. घटनेची माहिती मिळताच बोरघाट व खंडाळा वाहतूक पोलिस कर्मचारी व अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग आटोक्यात आणली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही...
अमरावती जिल्ह्यातील 10 नगरपालिका आणि 2 नगरपंचायत निवडणुकांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल होणार....
अमरावती जिल्ह्यातील तिवसा आणि भातकुली नगरपंचायत ची निवडणूक नाही....
भाजप ,शिवसेना,ठाकरे गट, काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण...
दोन तारखेला मतदान तर तीन डिसेंबरला लागणार निवडणुकांचा निकाल....
सोशल मीडिया वरून इच्छुकांचा प्रचार सुरू..
जगप्रसिद्ध ऐतिहासिक खासबाग कुस्ती मैदानाची प्रशासनाकडून बांधकामात होत असलेली दिरंगाई विरोधात कोल्हापुरातील पैलवान आक्रमक
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी 1912 साली बांधले जगप्रसिद्ध ऐतिहासिक खासबाग कुस्ती मैदान
कोल्हापुरातील पैलवान, वस्ताद, कुस्ती शौकिनांकडून कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासनाचा ठेकेदाराचा जाहीर निषेध
केशवराव भोसले जळीत कांडात खासबाग कुस्ती मैदानाचाही बराच भाग जळाला
खासबाग कुस्ती मैदानाची त्वरित दुरुस्ती करावी कुस्ती शौकिनांची मागणी
परभणी शहरा सह जिल्ह्यात मागील काही दिवसापासून थंडीला सुरुवात झाली आहे तर आज परभणी जिल्ह्यात दहा अंश सेल्सिअस एवढे तापमान नोंदवले गेले आहे यंदाच्या मोसमातील सर्वात निचांकी तापमान नोंदवल्या केल्यामुळे आता परभणीकर उबदार कपड्यांचा वापर करताना दिसत आहेत घराच्या बाहेर निघताना विद्यार्थी नागरिक उपचार कपडे घालून बाहेर निघत आहेत तर हवामान विभागाने पुढील ही थंडी कायम राहण्यातले सांगितले आहे त्यामुळे नागरिक उबदार कपडे घालून या बाहेर निघत थंडीचा आनंद घेताना दिसत आहे
सोलापूर जिल्ह्यातील 289 जागांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याला होणार प्रारंभ, जिल्हा प्रशासनाकडून यंत्रणा सज्ज
- जिल्ह्यातील पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, करमाळा, बार्शी, कुर्डूवाडी, अक्कलकोट, मोहोळ, दुधनी, मैंदर्गी, अकलूज नगरपरिषद तर एक अनगर नगरपंचायत निवडणुका होणार
- जिल्ह्यात भाजप कडून स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी तर विरोधकांकडून सर्वपक्षीय आघाडी करून निवडणुकीला सामोरे जाण्याची लगबग
- जिल्ह्यातील अनेक नगर परिषदेमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार
सांगोला तालुक्यातील कोळा येथे बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली कारवाईदरम्यान पाच लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे तर 11 फोर व्हीलर व 14 टू व्हीलर गाड्या ताब्यात घेण्यात आले आहेत याप्रकरणी 33 जणांवर सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पंढरपूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत डगळे यांनी केली आहे.
नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच लोणावळा शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नगराध्यक्ष पद अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने या गटातील इच्छुक उमेदवारांनी गावभेटी, कार्यकर्त्यांच्या बैठकांद्वारे आणि मतदार संपर्क मोहिमांद्वारे तयारीचा धडाका सुरू केला आहे. आरक्षण जाहीर होताच समीकरणांमध्ये मोठा बदल झाल्याने पक्षनिहाय चर्चा आणि रणनीती ठरविण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी प्रहार देखील आपली तयारी करत आहेत.. अनेकांच्या मुलाखती घेणे प्रहार कडून सुरू असताना आपण मत कुणाला दिलं हे माहीत होत नसल्याने बच्चू कडूंनी संताप व्यक्त केला.. ईव्हीएम मशीनचा घोळ या निवडणुकीत नसला पाहिजे.. सगळे नामर्दाची अवलाद आहेत.. मशीन समोर करतात मशीन मधून चोरी करतात.. प्रामाणिकतेचे मत कुठे राहतं.. संविधानात अधिकार दिला आहे आपण कुणाला मत दिलं हे जाणून घेण्याचा.. मात्र आज मत कुणाला दिलं हे आपल्याला कळत नाही.. याचे उत्तर निवडणूक आयोग देऊ शकता का असा प्रश्न देखील उपस्थित केला.. निवडणूक आयुक्तांना नोटांची गड्डी मिळाली असेल त्यामुळे सर्व गोंधळ सुरू आहे अशी शंका बच्चू कडूनी ही व्यक्त केली...
लातूर जिल्ह्यातील चार नगरपालिका व एक नगरपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी आज पासून सुरू झाली आहे. आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे,तर 17 नोव्हेंबर पर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत, 18 नोव्हेंबरला अर्जाची छाननी होणार असून 25 नोव्हेंबर पर्यंत अर्ज मागे घेता येतील., तर 26 नोव्हेंबर रोजी अंतिम यादी प्रसिद्ध करून चिन्ह वाटप करण्यात येणार आहे त्यामुळे जिल्ह्यातील अहमदपूर, औसा, निलंगा, उदगीर या सह रेनापुर नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठीची खरी रणधुमाळी आज पासून सुरू झाली आहे.
मागील काही दिवसात हवामान बदल झालेला आहे. गोंदिया जिल्ह्यातही आता बोचरी थंडी जाणवू लागल्यानं नागरिकांनी उबदार कपडे आणि शेकोटीचा आधार घेतल्याचं सर्वत्र बघायला मिळतं आहेत. पुढील काही दिवस बोचरी थंडी अशीचं जाणवतं राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागांनं वर्तविला आहे. काल विदर्भात सर्वांत कमी 11.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद गोंदिया येथे झाली आहे. तर थंडीपासून बचाव करण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
धुळ्यात कालच्या तुलनेमध्ये आज देखील तापमानाचा पारा आणखीन घसरल्याचे दिसून येत आहे, आज धुळ्यामध्ये 8.2° सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे, गेल्या काही दिवसांपासून उत्तरेकडील येणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात गारठा वाढला आहे, त्यातच धुळ्याचे तापमान मोठ्या प्रमाणात कमी झाल्यामुळे धुळ्याकरांना वाढत्या थंडीचा सामना करावा लागत आहे,
गेल्या काही दिवसांपासून धुळ्यात वाढत असलेल्या थंडीमुळे आता धुळेकर नागरिकांना कपाटात ठेवलेले स्वेटर व गरम कपडे पुन्हा बाहेर काढावे लागत आहेत, पुढील काही दिवसात आणखी थंडीचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागतर्फे वर्तविण्यात आली आहे.
हिमालयात झालेल्या बर्फवृष्टीचा परिणाम थेट यवतमाळ जिल्ह्यात झाला असून कडाक्याच्या थंडीमुळे जिल्हा गारठला आहे. जिल्ह्याचे किमान तापमान 13 अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले तर कमाल तापमान हे 32 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले आहे चालू मोसमातील आतापर्यंतचा हा किमान तापमानाचा पहिला नीचांक असून उत्तर भारतातून दक्षिण भारताकडे वाहणाऱ्या शेत वाऱ्यामुळे येत्या शुक्रवार पर्यंत किमान तापमानाचा पारा खाली राहण्याची शक्यता आहे त्यामुळे आठवडाभर थंडीचा फील घेता येणार आहे.
नाशिक जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. कधी दाट धुके, कधी कडक ऊन तर कधी पाऊस यामुळे द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्तीला तोंड देताना शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आले आहे.नाशिकच्या मालेगाव,बागलाण मधिल अनेक शेतकरी अर्ली द्राक्षाचे ऑक्टोंबर,नोव्हेंबर महिन्यात मिळणारे उत्पादन घेत असतात,बदलत्या नैसर्गिक वातावरणाचा परिणाम होऊ नये,रोगापासून बचाव करण्यासाठी मालेगावच्या नरेंद्र शेवाळे यांनी आपल्या द्राक्ष बागेला वाविण्यासाठी द्राक्ष बागेवर संपुर्ण बागेला प्लास्टिक ताडपत्रीचे आच्छादन केले असून त्याचा चांगला परिणाम दिसून येत आहे.
पुण्यात अखेर थंडीने जोरदार आगमन केले आहे. शहराचा पारा थेट साडेतेरा अंशांवर घसरल्याने पुणेकर चांगलेच कुडकुडले आहेत. विशेष म्हणजे, थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरपेक्षाही पुण्यात सध्या जास्त थंडी असून, महाबळेश्वरचा पारा १९ अंशांवर आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, हवेली परिसरात सर्वात कमी १३.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. गेल्या आठवड्यापर्यंत पावसाळी वातावरण अनुभवल्यानंतर पुणेकरांना आता खऱ्या अर्थाने हिवाळ्याची चाहूल लागली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवसांत किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाढत्या थंडीचा आनंद घेण्यासाठी पुणेकर सज्ज झाले आहेत.
नाशिक जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला आला आहे. कधी दाट धुके, कधी कडक ऊन तर कधी पाऊस यामुळे द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. नैसर्गिक आपत्तीला तोंड देताना शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आले आहे.नाशिकच्या मालेगाव,बागलाण मधिल अनेक शेतकरी अर्ली द्राक्षाचे ऑक्टोंबर,नोव्हेंबर महिन्यात मिळणारे उत्पादन घेत असतात,बदलत्या नैसर्गिक वातावरणाचा परिणाम होऊ नये,रोगापासून बचाव करण्यासाठी मालेगावच्या नरेंद्र शेवाळे यांनी आपल्या द्राक्ष बागेला वाविण्यासाठी द्राक्ष बागेवर संपुर्ण बागेला प्लास्टिक ताडपत्रीचे आच्छादन केले असून त्याचा चांगला परिणाम दिसून येत आहे.
यंदाच्या निवडणुकीत उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरून त्याची प्रिंट काढून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज सादर करावा लागणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने नगरपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर केल्या असून,पुणे जिल्ह्यातील १४ नगरपरिषदा आणि ३ नगरपंचायतींसाठी आचारसंहिता लागू झाली आहे.
उत्तरेकडील थंड वाऱ्यांनी महाराष्ट्राकडे कूच केल्याने राज्यात थंडीचा कडाका वाढू लागला आहे. किमान तापमान १० अंशांच्या खाली आल्याने धुळे आणि जेऊर येथे थंडीची लाट आली आहे. तर अनेक ठिकाणी पारा १२ अंशांच्या खाली घसरल्याने गारठा वाढला आहे. आज (ता. १०) राज्यात मुख्यतः कोरड्या हवामानासह गारठा कायम राहण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करण्यापूर्वी रोहित पवारांनी आपण केलेल्या जमीन घोटाळ्याची प्रकरणे बाहेर आली तर त्यांना शांत झोप लागणार नाही.आरोप करण्यापूर्वी झोपताना शांतपणे विचार करावा असा पलटवार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी रोहित पवारांवर केला आहे.
नगरपरिषद व नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी उद्यापासून (सोमवार, ता. १०) उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होणार आहे. जिल्ह्यातील ११ नगरपरिषदा व अनगर नगरपंचायतीत भाजपच्या विरोधात कसे लढायचे ? याची सोलापूर जिल्ह्यातील रणनीती येत्या दोन दिवसांत ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यासोबत आज झालेल्या बैठकीत भाजप सोडून कोणासोबतही युती/आघाडी करण्याचा निर्णय झाल्यानंतर जिल्ह्यातील घडामोडींनाही वेग आला आहे.
अज्ञात वाहनाच्या धडकेने जखमी होऊन झुडपात आडोशाला बसून राहिलेल्या बिबट्याला वनविभागाने पिंजऱ्यामध्ये जेरबंद केलं. या बिबट्याला पुणे येथे अधिक उपचारांसाठी पाठविण्यात आलेय. ही घटना लांजा तालुक्यातील केळंबे येथे घडली.
केळंबे येथील सुधा-विष्णूनगर येथे जखमी अवस्थेत बिबट्या मुख्य रस्त्यापासून १०० मीटर अंतरावर एका झुडपात लपून बसलेला होता. हा बिबट्या मादी जातीचा असून, दोन वर्षांचा आहे. त्याच्या मागील दोन पायांना गंभीर दुखापत झालेली होती. त्यामुळे त्याला चालता येत नव्हतं. जखमी अवस्थेतील या बिबट्यावर सुरुवातीला जाळी फेकण्यात आली. त्यानंतर बिबट्याला पकडून पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आलं.
सातारा जिल्ह्यातील फलटण उपरुग्णालयातील महिला डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी संपदा मुंडे प्रकरणी पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांच्या कुटुंबाला दिले आहे. मुंबई प्रदेश युवक काँग्रेस आणि महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने सोमवार, दि. 10 नोव्हेंबर, 2025 रोजी दुपारी 12 वाजता गिरगांव चौपाटी येथे आंदोलन करण्यात येणार असून मुख्यमंत्री निवास असलेल्या वर्षा बंगल्याला घेराव घालण्यात येणार आहे अशी माहिती मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस यांनी दिली आहे.
आज पासून नगर परिषदेचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरवात होत असताना,वाशिम नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी इच्छुकांची गर्दी वाढली असून,भाजपकडून वाशिम नगरपरिषदेच्या दोन प्रभागात चार जागांसाठी तब्बल 47 इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे भाजपची या चार जागांसाठी डोकेदुखी वाढली आहे. भाजपकडून प्रामुख्याने प्रभाग क्रमांक 7 आणि प्रभाग क्रमांक 11 हे सर्वाधिक उमेदवारी मागणारा प्रभाग ठरला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.