Maharashtra Live News Update Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update: आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: आज शनिवार, दिनांक २७ डिसेंबर २०२५, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची युती अन् जागावाटप, महापालिका निवडणुका अपडेट्स, राज्यात थंडी ओसरली, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

Wardha: भारतीय जनता युवा मोर्चाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

- भारतीय जनता युवा मोर्चाची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

- कार्यकारिणीत तुरुंगात असलेल्याला स्थान

- कार्यकारिणी सदस्य म्हणून मयंक खंडागळे याला स्थान

- मयंक खंडागळे हा मागील काही दिवसांपासून आहे तुरुंगात

- पुलगाव पोलीस स्टेशन अंतर्गत कलम 307च्या गुन्ह्यात आहे आरोपी

- भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पृथ्वी शिंदे यांनी जाहीर केलीय जिल्हा कार्यकारिणी

- कार्यकारिणीत तुरुंगात असलेल्याला स्थान दिल्याने चर्चाना उधाण

- कार्यकारिणीत आणखी गुन्हे दाखल असलेल्यांचा समावेश असल्याची चर्चा

Dharashiv: धाराशिवमध्ये नगरपरिषद निवडणुकीतील पराभवानंतर शिवसेना ठाकरे गट ॲक्शन मोडवर

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर आमदार कैलास पाटलांकडून बैठकांचा सपाटा सुरू

धाराशिव जिल्ह्यातील शिरढोण,ईटकुर, येरमाळा गटात आमदार कैलास पाटलांनी घेतल्या बैठका

बैठका घेऊन पक्ष संघटनेचा आढावा घेत निवडणुकीच्या अनुषंगाने काम करण्याच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना दिल्या सूचना

ठाकरे गटाच्या बैठकांना कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा मोठा प्रतिसाद

नगरपरिषद निवडणुकीत जिल्ह्यातील आठ नगरपरिषदांपैकी एकाही ठिकाणी नगराध्यक्ष निवडून आणण्यात ठाकरे गटाला आले अपयश

परभणी महापालिकेसाठी शिवसेनेची भाजपकडे 32 जागांची मागणी

परभणी महानगरपालिकेची निवडणूक लागली आहे.सर्वच पक्षाकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे मात्र जागा वाटप झाल्या नसल्यामुळे अजून उमेदवारी देण्यात आली नाही परभणी महापालिकेतील 16 प्रभागातील 65 जगासाठी निवडणुका होत आहेत . भाजप आणि शिसेना युती होणार असून या पैकी 32 जागा शिवसेनेने मागितल्या असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंद भरोसे यांनी दिली आहे तर येणारी निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लावडणार आहेत त्यांनी सांगितले आहेत त्यामुळे आज शिवसेना आणि भाजप याच्यामध्ये जागा वाटपाचे घोडे अडलेले सुटणार असल्याचे चित्र आहे

31 डिसेंबर रोजी श्री संत गजानन महाराजांचे समाधी मंदिर भक्तांना दर्शनासाठी रात्रभर खुले राहणार

31 डिसेंबर रोजी श्री संत गजानन महाराजांचे समाधी मंदिर भक्तांना दर्शनासाठी रात्रभर खुले राहणार.

नववर्षाच्या स्वागतासाठी आतापासूनच शेगाव येथे भाविकांची मोठी गर्दी.

नववर्षाच्या स्वागतासाठी दर्शनाला येणाऱ्या भाविकांच्या गर्दीचा ओघ बघता मंदिर प्रशासनाचा निर्णय.

Washim: वाशीममध्ये रंगले वत्सगुल्म जिल्हा मराठी साहित्य संमेलन....

वाशिममध्ये वत्सगुल्म जिल्हा मराठी साहित्य संमेलन पार पडत असून कथाकथन, कविसंमेलन, प्रकट मुलाखत, चर्चासत्र, विनोदी कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम आणि तीन परिसंवाद, अशा विविध उपक्रमांमधून यानिमित्ताने माय मराठीचा जागर होत आहे. दोन दिवस वाशीमकरांना साहित्यिक मेजवानी मिळत आहे यानिमित्ताने पुस्तक प्रदर्शनाने विक्रीचाही आयोजन करण्यात आलं असून त्यालाही वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय.

Nashik: आदित्य ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर

- भाजपने ठाकरे यांच्या शिवसेनेला दिलेल्या धक्क्यानंतर डॅमेज कंट्रोलसाठी आदित्य ठाकरे नाशकात

- नाशिकच्या तपोवन परिसरात झाडांची करणार पाहणी

- तर दुपारी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये घेणार पहिला कार्यकर्ता मेळावा

- आदित्य ठाकरे आज नाशिकमध्ये फोडणार प्रचाराचा नारळ

- आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये आज महाविकास आघाडीची घोषणा होण्याची शक्यता

Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अमरावतीच्या दौऱ्यावर..

श्री शिवाजी शिक्षण संस्थेतर्फे दिल्या जाणारा या वर्षीचा ‘डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार २०२५’ मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना देण्यात येणार असून या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस,मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,मंत्री पंकज भोयर उपस्थित राहतील.

तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अमरावती शहरातील सुजान कॅन्सर हॉस्पिटलचे होणार लोकार्पण आहे...

तर मुख्यमंत्र्यांचे हस्ते सावित्रीबाई फुले व ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याच्या अनावरण देखील आज होईल

Dharashiv: कळंब तालुक्यात थंडी व ढगाळ वातावरणाचा फटका,हरभऱ्यावर घाटेअळीचा प्रादुर्भाव

धाराशिव - थंडी वाढत चालल्याने रब्बी हंगामातील पिकांना फटका बसु लागला आहे.कळंब तालुक्यात प्रामुख्याने हरभरा पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढत आहे.त्यामुळे हरभऱ्याच्या उत्पादनावर परीणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.कळंब तालुक्यात हंगामी शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे.खरीप व रब्बी हे दोन्ही प्रमुख पीक हंगाम असुन विविध पिकांची लागवड केली जाते.यंदा अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांचा पेरणी खर्च ही निघालेला नाही त्यामुळे शेतकऱ्याची संपुर्ण मदार ही रब्बी हंगामातील हरभरा पिकावर आहे.माञ हरभऱ्यावर घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांतुन व्यक्त केली जात आहे.

नागपूर महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची यादी तयार

- नागपूर  महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची तयारी पूर्ण, १५१ जागांसाठी उमेदवारांची यादी ठरली.

- महाविकास आघाडीतील मित्रपक्षांसोबत जागा वाटपाची अंतिम चर्चा स्थानिक नेत्यांकडे.

- काँग्रेसने १५१ जागांसाठी नावे ठरवली असली, तरी महाआघाडी टिकवण्यावर भर.

- चर्चेनंतर काही जागा मित्रपक्षांना सोडण्याची तयारी.

- शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्याशी शनिवारी निर्णायक बैठक.

- काँग्रेसकडून ‘शक्तीनुसार जागा’ हा फॉर्म्युला निश्चित.

- जागा वाटप करताना मित्रपक्षांची संघटनात्मक ताकद आणि स्थानिक प्रभाव महत्त्वाचा निकष.

- मुंबईत प्रदेश निवड समितीची दोन दिवसांची बैठक, बहुतेक उमेदवारांवर सहमती.

- प्रत्येक प्रभागाचा सविस्तर आढावा घेऊन उमेदवारांची निवड.

- संबंधित विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस उमेदवारांना विश्वासात घेऊन निर्णय.

* महाविकास आघाडीच्या बळावरच निवडणूक लढवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न

Yavtmal: यवतमाळ जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण वाढले,वर्षभरात 392 जणांचा मृत्यू

रस्ता सुरक्षा ही सर्वात मोठी समस्या बनली असून यवतमाळ जिल्ह्यात मागील बारा महिन्यात सर्वाधिक अपघात झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. राष्ट्रीय महामार्ग तसेच जिल्हा महामार्गावर तब्बल 840 अपघातांमध्ये 392 जणांचा मृत्यू झाला तर 537 जण यामध्ये जखमी झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

Pune: राज्यात थंडी कायम राहण्याचा अंदाज

राज्यात थंडी कमी अधिक होत असली तरी गारठा कायम आहे सकाळच्या वेळी थंडीमुळे हुडहुडी अनुवायला मिळत आहे बऱ्याच ठिकाणी पारा सातत्याने 10 अंशाच्या खाली आहे

राज्याच्या किमान तापमानात सर्वात थंडी कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे

आंदेकर कुटुंबियांना मिरवणूक, भाषण,घोषणाबाजी करण्यास मनाई

पोलीस बंदोबस्तात उमेदवारी अर्ज दाखल करण्याला परवानगी दिलेली आहे

आयुष कुमकर खून प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या आंदेकर टोळीचा मोरक्या बंडू आंदेकर त्याची भावजय लक्ष्मी उदयकांत आंदेकर तसेच सोनाली वनराज आंदेकर यांना आगामी महापालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यास विशेष न्यायालयाने सशर्त परवानगी दिलीय

उमेदवारी अर्ज दाखल करताना मिरवणूक प्रचार यात्रा भाषण घोषणाबाजी करू नये असे आदेश विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी दिले आहेत

Nagpur: नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक लागले तयारीला...

- *गेल्या तीन दिवसात तब्बल 5 हजार 507 उमेदवारी अर्ज उचलले गेले... मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी फक्त चार उमेदवारांनी अर्ज केले दाखल.

- आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तीन दिवस शिल्लक असल्याने अखेरच्या 29 आणि 30 डिसेंबरला मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता आहे....

- महायुती असो किंवा महा विकास आघाडी यांचे युती आणि आघाडी संदर्भात बैठकांचे दौर सुरू असल्याने आणि पक्षातील इच्छुक असलेल्यांना तिकीट न भेटल्यास त्यांच्याकडून बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

- विशेष म्हणजे सर्वच पक्षांनी सावध भूमिका घेतली.. उमेदवारांची यादी जाहीर झाली नाही. त्यामुळे शेवटच्या दोन दिवसात उमेदवारांना चांगलीच पळापळ करावी लागणार आहे.

Jalna: जालन्यात महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीसाठी संयुक्त बैठक संपन्न...

जालना महानगरपालिका निवडणूकच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी, शिवसेना (एकनाथ शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) या महायुतीतील घटक पक्षांची महत्त्वाची बैठक रात्री उशिरा जालना शहरात पार पडलीये..या बैठकीत महानगरपालिका निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढविणे, जागावाटप, समन्वय यंत्रणा तसेच निवडणूक रणनिती यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.. महायुती एकसंघपणे निवडणुकीला सामोरे जाण्याबाबत सकारात्मक वातावरण बैठकीत दिसून आले असून, आज पुन्हा एकदा दुपारी चार वाजता बैठक होणार असून त्यानंतर युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे...

भाजपच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे भाजपचे मनपा निवडणूक प्रमुख जबाबदारी

- भाजपच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे भाजपचे मनपा निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

- प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केली घोषणा.

- संजय भेंडे यांना शहराच्या निवडणूक नियोजनाच्या जबाबदारीसोबतच उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी म्हणूनही नियुक्त करण्यात आले आहे.

- भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी शहरातील विविध विधानसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या मंडळांसाठी 'प्रभाग संयोजकां'च्या नावांची घोषणा केली आहे.

Hingoli: हिंगोलीत दोन आयपीएस पोलीस अधिकाऱ्यात खुर्चीवरून खडाजंगी

हिंगोली मध्ये पोलीस अधीक्षक पदावरून दोन अधिकाऱ्यांमध्ये खुर्चीवरून खडाजंगी पाहायला मिळत आहे, हिंगोलीचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांची गृह विभागाने बदली करत त्यांच्या जागी संभाजीनगर येथील

दहशतवादी विरोधी पथकाचे प्रमुख असलेल्या नीलम रोहन यांच्या नियुक्तीचे आदेश काढले होते मात्र बदलीचा कार्यकाळ पूर्ण न होता बदलीचे आदेश निघाल्याने पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी केंद्रीय प्रशासकीय न्याय प्राधिकरणाकडे दाद मागितल्याने कोकाटे यांच्या बदलीवर स्थगिती आदेश देण्यात आले आहेत दरम्यान यावर आता सहा जानेवारी रोजी अंतिम सुनावणी होणार आहे मात्र या सगळ्या प्रकारामुळे हिंगोली जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था सांभाळताना नेमका कोणत्या साहेबांचा आदेश पाळायचा या संभ्रमात सापडले आहेत.

संभाजीनगरमध्ये राडा

छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएमच्या उमेदवारी दिल्यावरून दोन गटांमध्ये राडा झाला. प्रभाग क्रमांक १२ मध्ये किराडपुरा मध्ये माजी नगरसेवक हाजी इसाक यांना उमेदवारी डावलून मोहमद असरार यांना MIM ने उमेदवारी दिली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर किराडपुरा परिसरात मोहम्मद आसरार यांनी आपल्या समर्थकासह रॅली काढली होती.

कोल्हापूर महानगरपालिकेसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षांने आपले इच्छुक उमेदवारांची पहिली यादी केली जाहीर

काँग्रेसने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत 48 इच्छुक उमेदवारांचा सहभाग

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षला देण्यात आलेल्या बारा जागा वगळून काँग्रेसने जाहीर केल्या आपल्या 48 जागांवरील उमेदवारांची नावे

Shirur- कोरेगाव भिमा विजयस्तंभ शौर्यदिन सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात

कोरेगाव भिमा येथील विजयस्तंभ शौर्यदिन सोहळ्याची प्रशासनाची तयारी अंतिम टप्पात आली असुन देशभरातून येणाऱ्या अनुयायांना कोणताही त्रास होणार नाही, याची विशेष दक्षता सर्व संबंधित विभागांनी घ्यावी, अशा स्पष्ट सूचना सामाजिक न्याय विभागाचे प्रधानसचिव हर्षदीप कांबळे यांनी दिल्या.

या बैठकीत वाहतूक व्यवस्थापन, सुरक्षा व्यवस्था, आरोग्य सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा तसेच आपत्कालीन सेवा याबाबत विभागनिहाय चर्चा करण्यात आली. शौर्यदिन सोहळा शांततेत, शिस्तबद्ध आणि आनंददायी वातावरणात पार पडावा, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश कांबळे यांनी दिले.

नववर्षासाठी मावळकडे पर्यटकांचा ओघ, लोणावळा ,खंडाळ्यात ६०% हॉटेल बुकिंग  

मावळ तालुका पर्यटन नगरी म्हणून ओळखला जातो. लोणावळा आणि खंडाळा परिसरात असलेले पवना धरण, भुशी डॅम, लायन्स पॉईंट आणि टायगर पॉईंट यांसह ऐतिहासिक लेण्यांमुळे सुट्टीच्या दिवसांत पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. 100% ऑक्सिजन घेण्यासाठी राज्यसह परदेशी पाहुणेही लोणावळा शहराच्या प्रेमात दरवर्षी पडत असतात. लोणावळा खंडाळ्याला निसर्गाने भरभरून निसर्ग सौंदर्य आणि आल्हददायक वातावरण दिलं आहे. त्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक दरवर्षी लोणावळ्यात दाखल होत असतात.

आई एकवीरा देवी देवस्थान ट्रस्ट मध्ये गैरव्यवहार सुरू, कोट्यवधी रुपयांची केली अफरातफर

महाराष्ट्राची कुलदैवत म्हणून जाणाऱ्या कार्ला आई एकवीरादेवी देवस्थान ट्रस्टमध्ये गंभीर गैरव्यवहार सुरू असल्याचा आरोप येथील पुजारी गणेश देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळे यांच्यावर कोट्यवधी रुपयांची अफरातफर, देवस्थानची गाडी खासगी व राजकीय वापरासाठी वापरणे, तसेच देवीला दान स्वरूपात मिळालेल्या सोन्या चांदीच्या वस्तूंवर डल्ला मारल्याचे आरोप करण्यात आले आहेत. इतकेच नव्हे तर व्हीआयपी दर्शनासाठी बनावट पावत्या छापून रोखीने पैसे उकळले जात असल्याचा गंभीर दावा पुजाऱ्यांनी केला असून, याबाबत पुणे धर्मदाय आयुक्त यांच्याकडे तक्रार दाखल केली असून यामुळे कार्ला परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. कार्ला देवस्थानकडे असलेली इनोव्हा व फॉर्च्युनर गाडी वैयक्तिक व राजकीय वापरासाठी वापरली जात असल्याचेही आरोप करण्यात आले आहेत. मात्र या प्रकरणामुळे कार्ला एकवीरादेवी देवस्थानच्या कारभारावर प्रशासन आणि सरकार काय भूमिका घेणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sambhajinagar : संभाजीनगरमध्ये कार्यकर्त्यांचा तुफान राडा, उमेदवारीवरून जोरदार हाणामारी, पाहा व्हिडिओ

Morning Exercises: रोज सकाळी करा हे 5 व्यायाम, सर्वात बारीक तुम्हीच दिसाल

Google Trends: गुगलवर 67 टाइप करा, स्क्रीन होईल इंटरेस्टिंग; एकदा मज्जा पाहाच

Kitchen Hacks : घरातील देवघर स्वच्छ कसे ठेवावे? जाणून घ्या टिप्स

HBD Salman Khan : करोडपतींचा बादशाह बॉलिवूडचा भाईजान; चित्रपटांव्यतिरिक्त कुठून करतो 'इतकी' बक्कळ कमाई

SCROLL FOR NEXT