Maharashtra Live News Update Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update : पुण्याच्या भाजप प्रवेशाचा तिसरा अंक आज मुंबईत

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: आज गुरूवार, दिनांक २५ डिसेंबर २०२५, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युती, महापालिका निवडणुका अपडेट्स, राज्यात थंडी ओसरली, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

निवडणूक प्रमुख पदावरून आमदार किशोर जोरगेवार यांना हटवले

चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या जागी आता भाजपने माजी राज्यसभा खासदार अजय संचेती यांच्याकडे चंद्रपूर मनपाचे निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी दिली. ही जबाबदारी आधी किशोर जोरगेवार यांना देण्यात आली होती. मात्र किशोर जोरगेवार आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यात सुरू असलेल्या पक्षांतर्गत संघर्षाच्या पार्श्वभूमीवर प्रदेश भाजपने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यातील संघर्ष आता चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना उमेदवारी देताना पक्षपात होऊ नये, नेत्यांच्या गटबाजीचा फटका बसू नये, यासाठी पक्षाने बाहेरचा निवडणूक प्रमुख बनवला, असे सांगितले जाते. या निर्णयामुळे जोरगेवार यांना चांगला धक्का बसला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वास्थ्य स्थापन केलेल्या देहूरोड येथील बुद्ध मूर्तीचा आज 71 वा वर्धापन दिन

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1954 साली देहूरोड येथे भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती स्वहस्ते देहूरोड येथे स्थापना केली होती. त्याचा आज 71 वा वर्धापन दिन. बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा ऑक्टोबर 1956 साली नागपूर येथे लाखो अनुयायांना धम्मदीक्षा दिली होती. मात्र त्या अगोदर देऊळ येथे 25 डिसेंबर 1954 साली बुद्ध मूर्तीची स्थापन केली होती त्यामुळे याला वेगळच महत्व आहे. देहूरोड येथील बुद्ध विहारात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थि स्तूपाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेले आहेत. त्याला अभिवादन करण्यासाठी आज राज्याच्या कानाकोपऱ्यातून भीम अनुयायी येऊन येथे बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान बुद्ध यांना अभिवादन करतात. सकाळपासून परित्राण पाठ बुद्ध वंदना धम्म बंधनात संघ वंदना यासह समता सैनिक दल च्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले जाते. दिवसभर गायक मंडळी आपली कला येथे सादर करतात. येत्या काळात याच ठिकाणी मोठे विहार बांधून चैत्यभूमी दीक्षाभूमी सारखे मोठे महाविहार बांधण्याचा संकल्प समितीच्या वतीने करण्यात आलेला आहे.

भुसावळ नगर परिषदेचा निकाल लागताच प्रभाग क्रमांक 20 मधील अपक्ष उमेदवार ॲक्शन मोडवर

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ नगरपरिषदेचा निकाल जाहीर होताच प्रभाग क्रमांक 20 मधील अपक्ष उमेदवार ॲक्शन मोडवर आले असून अपक्ष उमेदवार राज चौधरी यांनी प्रभागातील पाणी प्रश्नसह स्वच्छतेबाबत नगरपरिषद प्रशासनाला निवेदन देऊन तात्काळ उपायोजना करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates:  भाजप शिवसेना दोघेही एकत्र लढणार असल्याचं जवळपास निश्चित, आज भाजप आणि शिवसेना दोघांची बैठक होणार

जळगाव महापालिका निवडणुकीत भाजप व शिंदे सेनेच्या युतीवर शिक्कामोर्तब

बैठकीत शिवसेना आणि भाजपचा महापालिका निवडणुकीत जागांचा फॉर्म्युला ठरला नसल्याची माहिती. राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत चर्चा करून त्यांना देखील सोबत घेणार असल्याचे माहिती

राष्ट्रवादी सोबत चर्चानंतर महायुती तसेच अंतिम उमेदवारांची यादी निश्चित केली जाणार असल्याची नेत्यांची माहिती..

श्रीपत पिंपरीतील महिलेचा गर्भपात केल्याने मृत्यू

सोलापुरातल्या बार्शीत अवैध गर्भलिंग निदान चाचणीनंतर केलेल्या असुरक्षित गर्भपातामुळे २८ वर्षीय विवाहितेला आपला जीव गमावा लागल्याची धक्कादायक घटना घडलीय.बार्शी तालुक्यातील श्रीपत पिंपरी येथे ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.हा प्रकार 6 ते 14 डिसेंबर या कालावधीत घडला.वृषाली वैभव मोरे असे मयत झालेल्या 28 वर्षीय विवाहितेचे नाव आहे.6 डिसेंबर रोजी पंढरपूर येथे राहणारा आरोपी विकास पवार याने सोबतच्या एका महिलेच्या आणि पुरुषाच्या मदतीने वृषाली हिच्या पोटातील गर्भ मुलगा आहे की मुलगी हे तपासण्यासाठी सोनोग्राफी केली.

सोलापुरात महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांनी दिलीय

सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी शरद पवार गट, मनसे, माकप या महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरलाय

यामध्ये काँग्रेस 50-55, उद्धव ठाकरे गट 27-29, शरद पवार गट 17-18, माकप 8-10 असा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली

सोलापुरात महाविकास आघाडीच्या जागा वाटप संदर्भात काल संध्याकाळी सर्वपक्षीय नेत्यांची एक बैठक पार पडली

यामध्ये 7-8 जागावर अद्याप कोणताही तोडगा निघालेला नसला तरी उर्वरित जागाचे मात्र जागावाटप निश्चित झाल्याचे सांगण्यात येतंय

आज या फॉर्म्यूला संदर्भात सर्व पक्ष आपल्या प्रदेश कार्यालयाला माहिती कळवणार आहेत, त्यानंतर हा फॉर्म्युला अधिकृतरित्या जाहीर होईल अशी माहिती आहे

नांदेडच्या जवळा येथील एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू 

दोन मुलांची रेल्वेखाली आत्महत्या तर आई-वडील आढळले गळफास घेतलेल्या अवस्थेत

आई-वडिलांचा घातपात की आत्महत्या पोलीस तपासून होणार उघड

नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील जवळा लखे कुटुंबातील दुर्दैवी घटना.

कारंजा नगरपरिषदेवर पदग्रहण सोहळा संपन्न

वाशिमच्या कारंजा नगरपरिषदेच्या अध्यक्ष पदासह 16 नगरसेवक या निवडणुकीत विजयी झाले आहेत,त्यामुळे पहिल्यांदाच एमआयएम पक्षाने कारंजा नगरपरिषदेवर एक हाती सत्ता स्थापन केली आहे, त्या पार्श्वभूमीवर कारंजा नगर परिषद नगराध्यक्ष पदग्रहण सोहळा पार पडला. यावेळी नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा फरीदाबानू मोहम्मद शफी पुंजाणी यांचा पदग्रहण सोहळा तसेच नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार समारंभ कारंजा नगर परिषदेच्या कार्यालयात उत्साहात पार पडला. यावेळी शहरातील प्रतिष्ठित नागरिक या सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

उपाध्यक्ष आणि विविध सभापती नियुक्त केले जाणार असून,कारंजा नगरपालिका वर प्रथमच एम आय एम ने आपला झेंडा रोवल्याने राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे.

अहिल्यानगर - लोणी गावात ट्रक आणि कारचा अपघात

पालकमंत्र्यांनी ताफा थांबवून घेतला आढावा...

मंत्री विखे पाटलांनी अपघाताची पाहणी करत प्रशासनाला केल्या मदतीच्या सूचना...

काल रात्री 10 वाजेच्या सुमारास लोणी गावात ट्रक आणि कारचा अपघात...

अपघातात कारचे मोठे नुकसान.. सुदैवाने जीवितहानी नाही...

नेवासा दौऱ्यावरून परतणाऱ्या विखे पाटलांनी अपघातस्थळी ताफा थांबवत घेतला आढावा..

अमरावती महानगरपालिकेच्या निवडणूकीत शरद पवार गटाची डाव्या पक्षांसोबत आघाडी

अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने अमरावतीत पत्रकार परिषदेत भूमिका मांडली. आमचा शरद पवार गट,कम्युनिस्ट, फॉरवर्ड ब्लॉक आणि रिपब्लिकन पक्षासोबत एकत्रितपणे 80 जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्धार जाहीर करण्यात आला.तसेच मनसे, ठाकरे गट, शरद पवार गट,वंचित अशी देखील युतीची होऊ शकते तशा बैठका आमच्या चालू आहे, जागावाटप आणि विविध मुद्द्यावर आमच्या चर्चा चालू आहे अशी माहिती शरद पवार गटाचे शहराध्यक्ष डॉ. हेमंत देशमुख यांनी दिली

ना-हरकत दाखला मिळवण्यासाठी २४ लाखांवर कर जमा

- कोल्हापूर महापालिका निवडणूक लढवण्यासाठी विविध करांचा भरणा करण्याची आवश्यकता असल्याने आजपर्यंत इच्छुकांनी २४ लाख ३७ हजारांचा भरणा केला आहे. ५९९ इच्छुकांनी 'ना हरकत" दाखल्यासाठी अर्ज केले आहेत. अर्ज दाखल करताना महापालिकेचे कोणतेही देणे थकीत नसल्याची अट आहे. त्यामुळे अर्ज छाननीतून अवैध होऊ शकतो. त्यासाठी महापालिकेने ना हरकत दाखला देण्यासाठी एक खिडकी केंद्र सुरू केले आहे. त्यामध्ये पहिल्या दिवसापासून इच्छुकांनी अर्ज करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत ५९९ इच्छुकांनी ना हरकत दाखल्यासाठी अर्ज केले आहेत. त्यातील ४७७ दाखले तयार करण्यात आले आहेत, तर ३१० दाखल्यांचे वितरण केले आहे. इतर ६६ अर्जाची कराची रक्कम भरायची आहे, तर ५६ दाखल्यांसाठी विभागांचे अभिप्राय तयार करून ठेवले आहेत. या सर्व प्रक्रियेतून आतापर्यंत २४ लाख ३७ हजार १८१ रुपये इच्छुकांनी महापालिकेकडे जमा केले आहेत.

नगरपरिषद निवडणुकीतील दणदणीत यशानंतर भाजपचे मिशन झेडपी

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटलांनी सुरू केला तयारी आढावा दौरा

धाराशिव मधील काक्रंबा आणि उपळा जिल्हा परिषद गटातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या घेतल्या गाठीभेटी

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव

जिल्हा परिषद अध्यक्ष पद अर्चना पाटलांनाच मिळेल अशा आरक्षण जाहीर झाल्यानंतर समर्थकांकडून समाज माध्यमांवर करण्यात आल्या होत्या पोस्ट

यापूर्वीही जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा राहिलेल्या आहेत अर्चना पाटील

nashik-malegaon-मालेगाव महापालिकेत दोन दिवसात ४०४ अर्जाची विक्री मात्र एक उमेदवारी अर्ज दाखल नाही

-नाशिकच्या मालेगाव महापालिकेच्या निवडणूकीसाठी गेल्या दोन दिवसात सात विभागातून एकूण १९७ इच्छूकांनी ४०४ अर्ज खरेदी केले असून सर्वात जास्त ७८ अर्ज इच्छूक उमेदवारी घेतले आहे.दोन दिवसात मात्र एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही,तर अद्याप मालेगाव मध्ये शिवसेना-भाजपाची जागा वाटपा ची बैठक झालेली नसल्याने सर्व इच्छूकांच्या नजरा त्याकडे लागल्या आहेत.

परभणी महापालिकेसाठी ऊबाठा शिवसेनेची जोरदार तयारी

परभणी महानगर पालिकेसाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने जोरदार तयारी सुरू केली आहे.पक्ष फुटी राज्यात परभणीचे खासदार संजय जाधव आणि आमदार डॉ राहुल पाटील या दोन्ही नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्या बरोबर राहण्याचा निर्णय घेतला मात्र या दोघात काही मतभेद मनभेद होते आता महापालिका निवडणुकीसाठी हे दोन्ही नेते एकत्र आले आहेत दोघांमध्ये ही मनोमिलन झाले आहे.आमच्या दोघात काही असले तरी आम्ही ते बाजूला ठेवून कार्यकर्त्यांच्या या निवडणुकीत एकदिलाने काम करू तसेच आमदारांच्या नेतृत्वाखाली परभणी महानगर पालिका निवडणूक लढवू आणि परभणीत महापौर हा शिवसेनेंचाच बसवू असा विश्वास खासदार संजय जाधव यांनी व्यक्त केलाय.हे दोन्ही नेते एकत्र येणे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी ही या निवडणुकीतील अत्यंत जमेची बाजू असणार आहे.

वाशिममध्ये फूटपाथ वरील दोन दुकानाला आग

वाशिम शहरातील मुख्य रस्त्यावरील श्री शिवाजी विद्यालयाच्या समोरील फूटपाथवर असलेल्या लघु व्यावसायिकांच्या दोन दुकानाला आग लागल्याची घटना घडलीये, यामध्ये एक कापडाचे व चप्पलचे दुकान जळून खाक झाले आहे, वाशिम नगर पालिकेच्या अग्निशमन दलाच्या वतीने आग विजविण्यात आली असली तरी, लागलेल्या आगीमुळे लघु व्यवसायिकांचे मोठ आर्थिक नुकसान झाले आहे,नेमकी आग कशामुळे लागली हे अद्याप अस्पष्ट आहे...

पुण्याच्या भाजप प्रवेशाचा तिसरा अंक आज मुंबईत

मुंबईत होणार भाजप पक्ष प्रवेश

पुण्यातील काही आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी यांचे भाजप प्रवेश

पुणे महापालिका निवडणुकीसाठी अनेकांची भाजप मध्ये एन्ट्री

पुणे महापालिका निवडणुकीत थेट पॅनल जिंकून आणण्याचा भाजपचा निर्धार

ठाकरेसेना आणि मनसे युतीचा भंडाऱ्यात जल्लोष, फटाक्यांची आतषबाजी

उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येत महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युतीची घोषणा केली. तब्बल 20 वर्षानंतर हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानं राज्यभरात ठाकरे आणि मनसेचे पदाधिकारी जल्लोष साजरा करत असताना भंडाऱ्यातही या दोन्ही भावांच्या पक्षांच्या युतीचा जल्लोष करण्यात आला. भंडाऱ्याचे ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख संजय रेपाळे आणि मनसेचे जिल्हाप्रमुख नितीन वानखेडे यांच्या असंख्य कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांनी भंडारा शहरातील गांधी चौकात या युतीचा जल्लोष साजरा केला. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करून जय भवानी जय शिवाजीसह उद्धव आणि राज ठाकरेंच्या युतीचा जयघोष करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढा भरवून हा जल्लोष केला.

सुट्यांमुळे होणारी गर्दी लक्षात घेत तुळजाभवानी मातेचे महाद्वार 31 डिसेंबर पर्यंत भाविकांसाठी बंद

नाताळ सुट्यांच्या पाश्र्वभूमीवर 25 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत सामान्य भाविकांसाठी तुळजाभवानी मातेचे महाद्वार बंद करण्याचा निर्णय मंदीर संस्थानच्या वतीने घेण्यात आला आहे.या कालावधीत भाविकांना कुंभार गल्लीतील झुलत्या पायऱ्यांवरून मंदीरात सोडण्यात येणार आहे.तर 200 रुपयांचे सशुल्क दर्शन पास तसेच रेफरल दर्शन पास बंद असणार आहे.माञ व्हीआयपींसह 500 रुपयांचे स्पेशल दर्शन पास,अभिषेक पूजा व सिंहासन पुजेच्या भाविकांना महाद्वारातुन सोडण्यात येणार आहे.28 डिसेंबर पासून तुळजाभवानी मातेचा शांकभरी नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे.भाविकांना सुलभ दर्शन व भाविकांचा गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मंदीर संस्थानच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे.

नाशिक महापालिका निवडणुकीसाठी २ दिवसांत विक्रमी अर्जांची विक्री, दोनच दिवसांत ३,७०५ अर्जांची विक्री

महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज विक्रीच्या पहिल्याच दिवशी १७६३ उमेदवारी अर्ज विक्री झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तब्बल १९४२ अर्जांची विक्री झाली. दोन दिवसात ३७०५ अर्जांची विक्रमी विक्री झाली आहे. यावेळी इच्छुकांच्या संख्या अधिक असल्याने अर्जांची विक्रीही जास्त होईल. या विक्रीतून पालिकेला ९८,८६३ रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. सातपूरला प्रभाग क्रमांक ११ ‘क’ मधून गीता संजय जाधव यांनी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यात एक अपक्ष व दुसरा मनसेच्या नावाने भरला आहे. विविध पक्षांसह अपक्ष इच्छुकांनी मोठ्या संख्येने अर्ज खरेदी करत निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी दर्शवली आहे. प्रभाग ११ मधून सर्वाधिक १४९ अर्जांची विक्री झाली असून, त्या खालोखाल प्रभाग २१ मधून १४६ अर्जांची विक्री झाली आहे. सर्वात कमी अर्जविक्री प्रभाग २३ मध्ये झाली. या प्रभागात केवळ १९ अर्जांची विक्री झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dwi Dwadash Yog 2025: १७ वर्षांनी या राशींची होणार चांदीच चांदी; 'या' राशींच्या व्यक्ती जगणार राजासारखं आयुष्य

Mumbai Metro: मुंबईकरांसाठी गुड न्यूज! कुठून पण कसाही करा प्रवास, नव्या वर्षांत सुरू होणार २ नवीन मेट्रो मार्ग

Kitchen Hacks : कपड्यांवर पडलेले तेलाचे हट्टी डाग निघत नाही, मग हे उपाय करुन बघा कपडे नव्या सारखे चमकतील

Bollywood Actress : पन्नाशी गाठली तरी अभिनेत्रीनं लग्न केलं नाही, म्हणाली- "मी खुप आनंदी आहे..."

Income Tax Return: ITR मध्ये चूक झाली? शेवटचे ४ दिवस उरले; डेडलाइननंतर भरावा लागेल दंड

SCROLL FOR NEXT