यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचा निवडणूक कार्यक्रम सुरू झाला असून प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. अशातच जिल्हा बँकेत अनेक वर्षांपासून सलग संचालक म्हणून निवडून येणाऱ्यांवर निवडणूक बंदीची टांगती तलवार आली आहे. आरबीआयच्या निर्देशाप्रमाणे सलग १० वर्षे संचालक राहणाऱ्यांना निवडणूक लढविण्याची बंदी घालण्यात आली आहे. या निर्देशाविरोधात काही संचालकांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे.जिल्हा मध्यवर्ती बँकेतील २१ पैकी ११ संचालक सातत्याने निवडून आले आहेत. ठरावीक मतदारसंघात त्यांचा प्रभाव असल्याने तेथून ते बँकेत कायम राहिले आहेत. आता अशा संचालकांच्या बाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काही निकष घालून दिले आहेत. त्यासाठी २०२० मध्ये स्पष्ट तरतूद करण्यात आली आहे. या तरतुदीप्रमाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत सलग दहा वर्षे संचालक म्हणून निवडून येणाऱ्यांना आता निवडणूक लढता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या निर्णयामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेत सलग निवडून येणाऱ्या संचालकांना जबर धक्का बसला आहे. त्यांना स्वतःच्या जागेवर कुटुंबातील सदस्याला किंवा सहकाऱ्याला संधी देण्याची वेळ ओढवली आहे. या निर्णयाच्या विरोधात नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. आरबीआयचे निर्देश पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात येऊ नये, अशी मागणी याचिकाकर्त्या संचालकांनी केलेली आहे. न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी २२ जानेवारी रोजी ठेवली आहे.
भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील डोंगरी बु. येथील मायल मधील कंत्राटी कामगारांनी आज वेतन कपात आणि कंत्राटदाराच्या मनमानी कारभाराविरोधात आक्रमक पवित्रा घेत काम बंद आंदोलन पुकारले.सकाळच्या पहिल्या पाळीपासूनच ऑपरेटर, चालक आणि हेल्पर्सनी कामावर बहिष्कार टाकल्याने खाणीतील कामकाज ठप्प झाले आहे.मायल प्रशासनाने मागील महिन्यात एक नवीन कंत्राटदार नियुक्त केला आहे. मात्र, पदभार स्वीकारताच या कंत्राटदाराने कामगारांच्या वेतनात मोठी कपात केल्याचा आरोप होत आहे.ज्या कामगारांना पूर्वी १५,८०० रुपये वेतन मिळत होते, ते आता थेट १२,५०० रुपयांपर्यंत खाली आणले आहे.एका दिवसाच्या गैरहजेरीवर १.५% दंड आकारून कामगारांचे आर्थिक शोषण केले जात असल्याची तक्रार कामगारांनी केली आहे.या जाचक अटींबाबत कामगारांनी स्थानिक मायल प्रशासनाकडे वारंवार दाद मागितली. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही ठोस दखल घेतली न गेल्याने अखेर कामगारांनी संपाचे हत्यार उपसले. कंत्राटदार दादागिरी करत असून आमचे शोषण थांबवावे, अशी मागणी आंदोलक कामगारांनी केली आहे.पहिल्या पाळीपासून पुकारलेले हे आंदोलन सुरूच आहे. व्यवस्थापन किंवा कंत्राटदाराकडून अद्याप कोणताही समाधानकारक तोडगा काढण्यात आलेला नाही. तोडगा निघेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याच्या भूमिकेवर कामगार ठाम असल्याने पेच निर्माण झाला आहे.
तपोवन परिसरातील प्रस्तावित वृक्षतोडीला २० फेब्रुवारीपर्यंत स्थगिती
राष्ट्रीय हरित लवादाने नाशिक महापालिकेला दिला पुन्हा दणका
कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कोणतेही झाड तोडू नये हरित लवादचे स्पष्ट निर्देश
नुकत्याच झालेल्या सुनावणीत संपूर्ण अहवाल सादर करण्याचे आदेश
वस्तुस्थिती अहवाल तात्काळ सादर करण्याचे आदेश
पुढील सुनावणीपर्यंत वृक्षतोडीवर तात्पुरती बंदी कायम
कांदिवली कारशेडमधील तांत्रिक देखभाल-दुरुस्तीचे काम, तसेच कांदिवली ते मालाड स्थानकांदरम्यान जलद मार्गांवर वेगमर्यादा लागू करण्यात येणार...
या कामासाठी मंगळवारी पश्चिम रेल्वेवरील १०२ लोकल फेऱ्या रद्द असणार.
अमरावती महानगरपालिकेचा नवा फॉर्म्युला अखेर मंजूर;स्वीकृत नगरसेवकांची संख्या 5 वरून 9 करण्यात वाढ.
15 फेब्रुवारीपूर्वी होणाऱ्या पहिल्याच बैठकीत ठरणार महापौर,उपमहापौर.
सदस्यसंख्या वाढल्याने सत्तासमीकरणात बदलाची शक्यता
नव्या फॉर्म्युल्यामुळे इच्छुकांची फिल्डिंग वाढली.
प्रशासनाकडून अधिकृत आदेश जारी राजकीय वर्तुळात हालचालींना वेग.
महापालिकेच्या सत्ताकेंद्रावर सर्वांचे लक्ष
अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यातील येवदा येथील 41 मजुरांनी महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेतून रोजगाराची मागणी केली होती, मात्र त्यांना मागणी करूनही रोजगार न देणाऱ्या दर्यापूर तालुका प्रशासनाला जिल्हाधिकारी कार्यालयाने चांगलाच दणका दिला आहे. बेरोजगार भत्ता मागणी केलेल्या मजुरांची मोजणी करून त्यांना तातडीने बेरोजगार भत्ता देण्याचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने काढले आहेत, तालुका प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या पगारातून ही बेरोजगार भत्त्याची रक्कम वसूल करून मजुरांना दिली जाणार आहे... शासकीय अधिकाऱ्यांच्या पगारातून रक्कम वसूल करून थेट मजुरांना द्यावी लागणार असल्याचे हे राज्यातील पहिलच उदाहरण आहे. येवदा येथील भाजपचे पदाधिकारी नकुल सोनटक्के यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे.
आतापर्यंत पंचायत समितीसाठी 22 तर जिल्हा परिषदेसाठी 27 असे एकूण 49 उमेदवारी अर्ज झाले दाखल
तर दुसरीकडे आतापर्यंत तब्बल 586 उमेदवारी अर्जांची विक्री
धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव, तुळजापूर, भूम, परंडा, उमरगा, वाशी, लोहारा आणि कळंब या पंचायत समित्यांच्या निवडणुका जिल्हा परिषद निवडणुकी सोबतच पार पडणार
धाराशिव जिल्हा परिषदेसाठी एकूण 55 सदस्य आणि पंचायत समितीसाठी 110 सदस्यांसाठी पार पडणार निवडणूक प्रक्रिया
सोलापुराहून दुपारी 2.50 वाजता विमान उड्डाणं भरेल, दुपारी 3.55 मिनिटांनी हे विमान मुंबईत पोहोचेल
मुंबईत साधारण 45 मिनिटांचा थांबा घेऊन दुपारी 4.35 वाजता इंदूरला विमान रवाना होईल, संध्याकाळी 5.50 वाजता इंदूरला पोहोचेल
सोलापूर-मुंबई विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळतं असल्याने स्टार एअर कंपनीने आता इंदूरपर्यंत विस्तार करण्याचा निर्णय घेतलाय
आठवड्यात सोमवार, बुधवार, गुरुवार अशी आठवड्यातून तीन दिवस ही विमानसेवा असणार आहे
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायचा उद्या शेवटचा दिवस आहे. तरीही छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप - शिवसेना शिंदे यांच्या युतीचा आणि शिवसेना ठाकरे- काँग्रेस आघाडीचा अद्याप निर्णय झाला नसल्यामुळे अनेक इच्छुक उमेदवार सध्या ताटकळत बसले आहेत. काल रात्री उशिरापर्यंत भाजप शिंदे सेनेच्या नेत्यांची हॉटेल रामामध्ये बैठक झाली. एकत्र निवडणूक लढवावी यासाठी युतीची रात्री उशिरापर्यंत बैठक झाली. मात्र याबद्दल कुठलाही निर्णय झाला नाही आज दोन्ही पक्षाचे नेते एकत्र येऊन युतीबाबतचा आपला निर्णय सांगणार आहे. तर आघाडी बाबत ठाकरे सेना आणि काँग्रेस हे एकत्र लढणार का आणि त्या कोणत्या जागेवर लढणार ही आज दुपारपर्यंत कळेल असं सांगितलं जाते. महानगरपालिका निवडणुकीमध्ये एक लाख चलो रे मूळ दोन्ही शिवसेनेचे मोठे नुकसान झालेला आहे त्यामुळे ग्रामीण भागात आपलं वर्चस्व कायम राहावं यासाठी सगळेजण आता युती आणि आघाडी करण्याच्या मनस्थिती मध्ये आहेत.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील हजारो पात्र महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातील लाभ मिळाला नाही, केवायसी केल्याचा फटका बसलेल्या शेकडो महिलांनी यवतमाळ येथील महिला व बालकल्याण विभागात धडक दिली यावेळी महिलांना अश्रू अनावर झाले. संतप्त महिलांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याविरोधात नारेबाजी केली तातडीने लाभ वळता करावा अन्यथा कार्यालयासमोर उपोषणाला सुरुवात करू असा इशारा देखील यावेळी लाडक्या बहिणींनी दिलाय.
गेल्या काही दिवसांपासून शहरातील किमान आणि कमाल तापमानात मोठी वाढ झाली. त्यामुळे शहरात उन्हाचा चटका वाढला होता मात्र सोमवारी तापमान लक्षणेरीत्या घट झाली आहे परिणामी गार्ट आवडला असून पुढील दोन दिवस आम्हा स्थिर राहण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे
अमरावती महानगरपालिकेवर महाविकास आघाडीचा महापौर होणार- काँग्रेस नेते माजी मंत्री सुनील देशमुख यांचा दावा..
2017 मध्ये भारतीय जनता पार्टीचे 45 नगरसेवक आले होते आता मात्र जनतेने भाजपाला नाकारलय. यावेळीं भाजपचे फक्त 25 नगरसेवक विजयी झाले
आता भारतीय जनता पार्टीने महापौर पदावर दावा करणे ही निर्लज्ज पणाची हद्द आहे..
काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीची एकजूट करीत आहे,कोणत्याही परिस्थितीत भाजपचा महापौर बसला नाही पाहिजे याचा प्रयत्न करीत आहे -काँग्रेस नेते सुनील देशमुख
आम्ही महाविकास आघाडीच्या महापौर साठी प्रयत्न करीत आहे
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड यांना धक्काबुक्की करत शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी जामगाव येथील एका इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैजापूर आणि गंगापूर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड हे सध्या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत. वैजापूर पंचायत समितीच्या सभागृहात नामनिर्देशन पत्रे स्वीकारण्याचे काम सुरू होते. एम जामगाव (ता. गंगापूर) येथील रहिवासी बाळासाहेब बनसोडे हा व्यक्ती नामनिर्देशन कक्षात शिरला. 'तुम्ही आमच्यासाठी योग्य व्यवस्था केलेली नाही' असा आरोप करत त्याने अचानक गोंधळ घालण्यास सुरुवात केली. उपस्थित अधिकाऱ्यांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अधिकच आक्रमक झाला. तो थेट अधिकाऱ्यांच्या अंगावर धावून गेला. त्याने टेबलवरील निवडणूक संदर्भातील अत्यंत महत्त्वाची आणि गोपनीय कागदपत्रे बळजबरीने हिसकावून घेतली. या प्रकारामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
गुरूवारी वसंत पंचमीच्या मुहूर्तावर विठ्ठल रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा होणार आहे या विवाह सोहळ्याची मंदिरात आता तयारी सुरू झाली आहे विवाह सोहळ्याच्या निमित्ताने रुक्मिणी स्वयंवर या कथेला प्रारंभ झाला आहे.
विवाह सोहळ्याच्या निमित्ताने रुक्मिणी मातेला विविध पारंपारिक व मौल्यवान अलंकार परिधान करण्यात आले आहेत गुरुवारी दुपारी 12 वाजता मंदिरात शाही विवाह सोहळा होणार आहे या विवाह सोहळ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे.
रायगडच्या माणगावमधील राष्ट्रवादी कार्यकर्ते रमेश मोरे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसोबत मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला आहे. ऐन जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या प्रवेशामुळे माणगावच्या मोर्बा जिल्हा परिषद मतदार संघात शिवसेनेची ताकद वाढली आहे. त्यांची पत्नी आरती मोरे या यापूर्वी रायगड जिल्हा परिषदे सदस्या म्हणून निवडून आल्या आहेत.
16 जानेवारीला अकोल्यात निवडणुक निकालानंतर अकोटफैल भागात भाजपच्या दोन गटांत राडा झाला होताय. यात भाजपचे प्रभाग क्रमांक 2 ब मधील नवनिर्वाचित नगरसेवक शरद तुरकरांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला होताय. हा हल्ला करणार्यांना पडकण्यात आलंय. नगरसेवक शरद तुरकर यांच्यावर प्रभाग क्रमांक 2 ड मधील भाजपचे पराभूत उमेदवार नितीन राऊतसह अन्य एकाने जीवघेणा हल्ला केला होता. हल्ल्यात शरद तुरकर गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर तूरकर आणि राऊत यांचे समर्थक आमनेसामने येत मोठी दगडफेक झाली होती. तर अनेक वाहनांची तोडफोड झाली होती. या दरम्यान समर्थकांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला होता. अखेर पोलिसांनी हल्लेखोर नितीन राऊतसह अन्य एकाला अटक केलीये.
अकोल्यातल्या मूर्तिजापूरमध्ये पतंगीच्या नादात 10 वर्षीय मुलाचा विहिरीत पडून दुर्देवी मृत्यू झालाय. पतंग पकडण्याच्या नादात 10 वर्षीय शेख उमेर शेख फकीरा हा चिमुकला कटघरे नसलेल्या उघड्या विहिरीत पडलाय.. घराजवळ मित्रांसोबत खेळत असताना पतंगाच्या मागे धावताना त्याचा तोल गेला आणि तो थेट 60 फूट खोल पाण्याने भरलेल्या विहिरीत कोसळला. स्थानिक नागरिकांनी विहिरीत उड्या घेत वाचविण्याचे प्रयत्न केले. मात्र खोल विहीरीत प्रचंड पाण्यामुळे मदत अपुरी पडली. अखेर शेखं उमेर याचा मृत्यू झालाय.. संत गाडगेबाबा आपत्कालीन पथकाच्या मदतीने शेख उबेर याचा मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आलाये. दरम्यान, याच विहिरीत यापूर्वी जनावरे व एक महिला पडली होती. अगदी रहदारीच्या रस्त्यालगत असलेली ही विहीर अद्याप उघडीचं आहे.
बाळाभाऊ भेगडे ना भारतीय जनता पक्षात कोण विचारतो? आणि गणेश भेगडे ना कोण विचारतं? जर त्यांना खरंच विचारत असतील तर मला जिल्हाध्यक्ष का फोन करतात? मला भाजपचे प्रदेशाध्यक्ष का फोन करतात? मला मुख्यमंत्री महोदयांच्या कार्यालयातून का फोन येतात? देवेंद्र फडणवीस साहेबांकडे तुम्हीही जाता, मीही जातो… बघू कुणाला किती किंमत आहे!” असे म्हणत त्यांनी थेट आव्हानात्मक पवित्रा घेतला. “हे जे काही चाललंय, दाखवायचं-करायचं बंद करा, असे आमदार सुनील शेळके म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.