Maharashtra Live News Update Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update: ज्येष्ठ नागरिकाला २२ कोटी रुपयांचा चुना! पुण्यातील सर्वात मोठ्या सायबर फसवणुकी प्रकरणी ८ जणांना अटक

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज बुधवार, दिनांक ११ फेब्रुवारी २०२६, राज्यातील राजकीय घडामोडी, हवामान अपडेट्स, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

ज्येष्ठ नागरिकाला २२ कोटी रुपयांचा चुना! पुण्यातील सर्वात मोठ्या सायबर फसवणुकी प्रकरणी ८ जणांना अटक

पुण्यातील ज्येष्ठ नागरिकाला शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करून चांगल्या परताव्याचे आमिष दाखवत तब्बल २२ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी ८ जणांना छत्रपती संभाजीनगर मधून अटक केली आहे. पुण्यातील हडपसर मगरपट्टा भागातील ज्येष्ठ नागरिकाला शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यासाठी सायबर चोरट्यांनी फोन केला, विश्वास संपादन झाल्यानंतर त्यांना देशातील ७ विविध बँकेत पैसे ट्रान्स्फर करण्यासाठी तयार केलं आणि चांगला परतावा मिळेल असं आमिष दाखवलं. या अमिषाला बळी पडत त्यांनी २२ कोटी रुपये गमावले

आरक्षण मागणीसाठी लवकरच पश्चिम महाराष्ट्रात बैठकासत्र; मनोज जरांगे पुन्हा अॅक्शन मोडमध्ये

सातारा संस्थान,मिरज आणि कोल्हापूर संस्थानचे गॅझेटर लागू करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात बैठका घेणार आहे. पुढच्या महिन्यात सोलापुरात पहिली बैठक घेतली जाणार आहे. सरकारने त्यापूर्वी पश्चिम महाराष्ट्रात सातारा गॅझेटिअर लागू करावे अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आंदोलन करणार असे सांगितले आहे. मी बैठकीला सुरुवात करणार आहे.

कोल्हापूरमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजित पवार यांचं नाव दिलं जाणार

आज झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय

कोल्हापुरातील विकासवाडी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम साठी कालच मंत्रिमंडळ बैठकीत 12 हेक्टर जमीन हस्तांतरित करण्याची आदेश आले आदेश.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम साठी प्रस्तावित जागेपेक्षा अधिकची जागा अजितदादांच्या सूचनेनुसारच दिली गेल्यानं या स्टेडियमला अजितदादांच नाव दिले जाणार

Eknath shinde : एकनाथ खडसे यांच्यावर गुन्हा दाखल

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

पोलिसांना अर्वाच्या शब्दात अरेरावी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

सावदा पोलीस स्टेशनमध्ये एका गौण खनिज चोरीच्य प्रकरणात पोलिसांना जाब विचारताना एकनाथ खडसेंनी अर्वाच्य शब्दात अरेरावी केल्याचा आरोप

सावदा पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आला गुन्हा दाखल

Thane : ठाण्यात शर्मिला पिंपळोलकर महापौरपदाच्या खुर्चीवर विराजमान

ठाणे महानगरपालिकेच्या शिवसेनेच्या महापौर शर्मिला पिंपळोलकर आज महापौर पदाच्या खुर्चीवर विराजमान झाल्यात. तीन तारखेला ठाणे महानगरपालिका महापौर पदाच्या निवडणुका झाल्या होत्या. यामध्ये शर्मिला या बिनविरोध निवडून आल्या होत्या. महापौरपदाचा चार्ज स्वीकारला, मात्र त्या खुर्चीवर विराजमान झाल्या नव्हत्या. शिंदेंना वेळ नसल्याने ते अनुपस्थित राहिले होते. एकनाथ शिंदे आज स्वतः महापालिकेत उपस्थित राहणार असून महापौर शर्मिला पिंपळोलकर या खुर्चीवर विराजमान झाल्या आहेत.

kolhapur : कोल्हापुरातील स्टेडियमला अजित पवार यांचे नाव दिलं जाणार

कोल्हापूर च्या विकासवाडी मध्ये साकारणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला स्वर्गीय अजित पवार यांचे नाव दिलं जाणार

आज झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय

कोल्हापुरातील विकासवाडी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम साठी कालच मंत्रिमंडळ बैठकीत 12 हेक्टर जमीन हस्तांतरित करण्याची देण्यात आले आहेत आदेश

pune : बुधवार पेठेतील बांगलादेशी महिलांची सुटका

बांगलादेशी महिलांची सुटका करण्यात आली. पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांचे कॉम्बिंग ऑपरेशनमधून धक्कादायक माहिती समोर आली. पुण्यातील बुधवार पेठेत पुणे पोलिसांनी मोठं कॉम्बिंग ऑपरेशन राबवलं. या ऑपरेशन मध्ये ६०० पेक्षा अधिक पोलिस अधिकारी कर्मचारी सहभागी होते.

Nanded: नांदेडच्या मुखेड तालुक्यातील 7 ते 8 गावांना भूकंपाचे सौम्य धक्के

नांदेड -

नांदेडच्या मुखेड तालुक्यातील 7 ते 8 गावांना भूकंपाचे सौम्य धक्के

जमिनीतून आला गुड आवाज व जमीन हादरल्याचे गावकऱ्यांनी अनुभवले

मुखेड तालुक्यातील, हिबट, कोळगाव, धामणगाव, मोटरगा, जामखेड, धनज गावात भूकंप

Nashik: नाशिकमध्ये किन्नर समाजाचे गद्दीपती आणि किन्नर प्रतिष्ठानचे किन्नर पोलिस आयुक्तालयात

नाशिक -

- नाशिकमध्ये किन्नर समाजाचे गद्दीपती आणि किन्नर प्रतिष्ठानचे किन्नर पोलिस आयुक्तालयात

- नाशिक पोलिस उपायुक्तांची घेतली भेट

- किन्नर जिहादचे आरोप करणाऱ्यांवर कारवाई करण्यासंदर्भात देण्यात आले निवेदन

- धर्मांतराचे आरोप करून समाजात तेढ आणि खोट्या आरोप लावणाऱ्यांवर कारवाईची करण्यात आली मागणी

Parbhani: परभणी महापौर निवडीपूर्वी ठाकरेसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक मातोश्रीवर

परभणी -

परभणी महापौर-उपमहापौर निवडीपूर्वी ठाकरेंच्या सेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक मातोश्रीवर

फोडाफोडीच्या राजकारनाच्या भीतीने सर्व नगरसेवक शहराबाहेर

Pune: उद्या अजित पवार यांच्या निधनानंतर पहिलीच जिल्हा नियोजन समितीची बैठक

पुणे -

उद्या अजित पवार यांच्या निधनानंतर पहिलीच जिल्हा नियोजन समितीची बैठक

सुनेत्रा पवार पालकमंत्री म्हणून घेणार पहिली च बैठक

सगळ्या आमदार आणि खासदार आणि जिल्हा नियोजन समिती सदस्यांना बैठकीच निमंत्रण

सुनेत्रा पवार वीडियो कॉन्फरन्स द्वारे लावणार हजेरी

पालकमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांची पहिलेच बैठक

जिल्ह्यातील विकास कामांचा घेणार आढावा

शिर्डीतून धनगर आरक्षणाच्या पुढील लढाईचा एल्गार -

धनगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापणार...

शिर्डीत धनगर नेते आणि समाज बांधवांची बैठक संपन्न...

धनगरांना आदिवासीचे आरक्षण लागू करण्याची मागणी...

लवकरच मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन.. बैठकीत निर्णय...

राज्यभरातील हजारो धनगर बांधव मुंबईत एकवटणार...

देवेंद्र फडणवीसांनी दिलेला शब्द पाळावा.

मालेगाव महापालिकेत आज महापौर नसरीन बानो शेख व उपमहापौर शान निहाल अहमद यांनी पदाचा कारभार हाथी घेतला

नाशिकच्या मालेगाव महापालिकेत आज महापौर नसरीन बानो शेख व उपमहापौर शान निहाल अहमद यांनी अधिकृतरित्या पदाचा कारभार हाथी घेतला,त्यामुळे 4 वर्षा पासून मालेगाव महापालिकेत असलेली प्रशासकीय राजवट संपुष्टात आली असून खऱ्या अर्थाने महापालिकेच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे,येत्या 18 तारखेला महापालिकेची पहिली महासभा होणार असून त्यात जन्म दाखले प्रकरणारवर चर्चा होणार आहे.

धुळे मनपाची वडजाई रोडवर मोठी कारवाई; पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण जमीनदोस्त

धुळे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने शहराच्या वडजाई रोड भागातील सर्वे शासकीय जागेवर धडक कारवाई केली, गेल्या दीड वर्षांपासून कायदेशीर प्रक्रियेत असलेल्या या जागेवर मनपाची मालकी असल्याचे उताऱ्यावरून स्पष्ट झाले होते, तत्कालीन आणि नूतन आयुक्तांच्या आदेशानुसार 28 मे 2024 पासूनच या भागातील अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावून जागा खाली करण्याचे आवाहन करण्यात आले होते, मात्र सण-उत्सव, पावसाळा आणि शालेय परीक्षांचा काळ लक्षात घेता, प्रशासनाने ही कारवाई काही काळ स्थगित ठेवून नागरिकांना सहकार्याची संधी दिली होती,

"फटाका सायलेंसर" लावून फिरणाऱ्या बुलेट राजांवर कारवाई

मॉडिफाय करून सायलेंसर बसवून देणाऱ्या गॅरेज वर सुद्धा पोलिसांची कारवाई

फटाका सायलेंसर लावणाऱ्या दुचाकीस्वार यांच्याकडून वाहने जप्त

पुण्यातील वारजे माळवाडी पोलिसांची कारवाई

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारजे भागात बुलेट दुचाकी गाड्यांना मॉडिफाय केलेले व फटाके वाजवणारे सायलंसर बसवून ध्वनीप्रदुषण निर्माण करणारे दुचाकीचालक यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशा तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या

: नंदुरबारमध्ये कापसाच्या दरात पुन्हा घसरण, शेतकरी चिंतेत....

नंदुरबार जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी चिंतेची बाब समोर आली आहे. कापसाच्या दरात पुन्हा घसरण झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडताना दिसत आहेत. सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्रावर सध्या कापसाला सात हजार नऊशे ते आठ हजार रुपयांपर्यंत दर मिळत आहे. यावर्षी कापसाच्या पेरणी क्षेत्रात तब्बल पंधरा टक्क्यांनी घट झाली होती.

बीडमध्ये पोलीस भरती दरम्यान उमेदवाराचा मृत्यू

  • 1600 मीटर धावताना आली होती भोवळ.

  • बीडमध्ये 174 पदांसाठी पोलीस भरतीची प्रक्रिया आजपासून झाली होती सुरू.

  • उमेदवाराला भोवळ आल्याने बीडच्या जिल्हा रुग्णालयात करण्यात आले होते दाखल.

  • रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी केले मृत घोषित.

  • डीहायड्रेशन मुळे हार्ट अटॅक आला असण्याची शक्यता डॉक्टरांचा प्राथमिक अंदाज.

  • परळी येथील दिपक वाव्हळ नामक उमेदवाराचा मृत्यू

बीडमध्ये अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवलं; दोन महिन्यांपासून पीडित कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत

मागील दोन महिन्यांपासून फुस लावून पळविण्यात आलेली मुलगी पोलिसांनी सापडून द्यावी. या मागणीसाठी एक कुटुंब बीड पोलिसांचे उंबरठे झिजवत आहे. मात्र पोलिसांनी पीडित कुटुंबालाच मारहाण केल्याचा प्रकार समोर आला. बीडच्या नेकनूर पोलीस ठाण्यात डिसेंबर 2025 रोजी एका तरुणाने अल्पवयीन मुलगी फुस लावून पळविल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. याचाच पाठपुरावा पीडित कुटुंबाकडून केला जातो आहे.

परंतु पोलिसांनी फिर्यादी पीडित कुटुंबाला मारहाण करून गुन्हा नोंदविल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी पीडित कुटुंबाने न्याय देण्याची मागणी थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली. घडलेल्या सर्व प्रकाराची रीतसर तक्रार पीडित कुटुंबाने पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्याकडे केली. यापूर्वी देखील न्याय मिळत नसल्याने पीडित कुटुंबाने पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दिली होती. मात्र स्थानिक पोलिसांकडून कोणतीच कारवाई होत नसल्याचा आरोप कुटुंबाचा आहे.

खासदार सुप्रिया सुळे दिल्लीला रवाना

  • दिल्लीतील काही महत्त्वाच्या बैठकीसाठी गेल्याची माहिती

  • सुनेत्रा पवार,पार्थ पवार,जय पवार, रोहित पवार हे सगळं पवार कुटुंब दिल्लीत गेलेलं असताना सुप्रिया सुळे देखील दिल्लीला रवाना

  • शरद पवार पुण्यात एडमिट आहेत त्याची तब्येतीत सुधारणा होते आहे.या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे दिल्लीत रवाना

  • रोहित पवार.. अजित पवार यांच्या अपघाताबाबत शंका उपस्थित केली होती

  • सुनेत्रा पवार यांनी अमित शाह यांची भेट घेतली

  • संपूर्ण पवार कुटुंबीय वेगवेगळ्या कारणाने दिल्लीत

  • आता सुप्रिया सुळेही दिल्लीत रवाना...

वंचित नंतर कॅांग्रेसचं ही सुशील रहेजा विरोधात आंदोलन

रहेजा ला “संविधान” पुस्तक भेट देण्याचयसाठी व त्याच्या कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यासाठी जात असलेल्या कॅांग्रेस कार्यकर्त्यांना पोलीसांनी घेतलं ताब्यात..

बौद्ध समाजाच्या कामगारास मारहाण करून जातीवाचक शिव्या दिल्या प्रकरणी संबधीत पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद असून अजता गायत त्यांना अटक करण्यात आलेली नाही सुशील रहेजा यांना अटक करावी या मागणीकरता निषेध निदर्शन व धरणे देण्यासाठी रहेजाच्या कार्यलयाबाहेर जाताना अटकाव..

वर्ध्यात राज्य बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी

शासनाच्या संस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून वर्ध्यात पहिल्यांदाच राज्य बालनाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी पार पडली. तब्बल पंचेचाळीस चमू यात सहभागी झाल्या. प्राथमिक फेरीत निवड झालेल्या नाट्यकलावंताना २२ वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. वर्ध्याच्या रंजन सभागृहात पार पडलेल्या स्पर्धेत वर्ध्यातील विविध शाळांनी सहभाग नोंदविलाय. स्पर्धेचे संयोजन सुनील तितरे यांनी यावेळी वर्ध्यात नाट्यगृह व्हावे अशी मागणी कलावंताची आहे.

वाशिम - टँकर आणि दुचाकीच्या अपघातात मंडळ अधिकारी ठार,एक

वाशीमच्या रिसोड ते मेहकर मार्गावर सरपखेडा फाटाजवळ पाण्याचा टँकर व दुचाकीच्या अपघातात कृषी मंडळ अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एक जन गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे, अपघात होताच घटनास्थळावरून टँकर फरार झाला होता.

विलास बारबले (वय 55) असे मृतक मंडळ अधिकारीचे नाव आहे. तर प्रवीण पुन्नमवार वय 36 असे गंभीर जखमीचे नाव असून,जखमीला रिसोड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे,त्यांचे दोघे दुचाकीने एकलासपूर वरून रिसोड कडे येत असताना सरपखेड फाट्याजवळ अपघाताची घटना घडली आहे.

शक्तीपीठ महामार्गाला लातूरमध्ये शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध

लातूर जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांकडून सातत्याने विरोध होताना पाहायला मिळतो आहे, लातूरच्या रामेश्वर येथे शक्तीपीठ महामार्गाच्या मोजणी करीत आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केलाय, शेतकऱ्यांना भूमीही होण्यापासून रोखावे, शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी शासनाने हिसकावून घेऊ नये. या मागणी सह शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळालं. दरम्यान या ठिकाणाहून थेट आढावा घेतला आहे

हडपसरमध्ये इमारतील भीषण आग

हडपसर मधेबबी.टी.कवडे रोडतील कोहिनूर सोसायटी मधील 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला आग लागली आहे.

अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल

आग विझवण्याचे काम सुरू आहे

जळगाव जिल्ह्यात पोलीस भरती प्रक्रिया सुरू

जळगाव जिल्ह्यात उद्यापासून पोलीस भरती प्रक्रियेसाठी सुरुवात होत आहे 171 जागेसाठी बाराशे हुन अधिक उमेदवारांचे अर्ज आले असून यामध्ये 118 पुरुष वर्ग तर 53 महिला वर्गांसाठी ही पोलीस भरती प्रक्रिया पार होणार आहे मानवी चुका टाळण्यासाठी संपूर्ण पोलीस भरती प्रक्रिया ही डिजिटल टेक्नॉलॉजीने होणार असून संपूर्ण पोलीस भरती प्रक्रियेतील मैदान हे सीसीटीव्ही कॅमेऱ्याने कव्हर केला आहे आज सकाळी पाच वाजेपासून पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.

Shambhuraj Desai: “अति तिथे माती!”- शंभूराज देसाईंचा भाजपच्या नेत्यांवर हल्लाबोल

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप स्वबळावर, आणि शिंदे गटाची शिवसेना, अजित पवार गट आणि शरद पवार गट एकत्र लढले होते.. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निकालानंतर पाटणमध्ये विजय सभेत मंत्री शंभूराज देसाई यांनी सूचक वक्तव्य केलं.“निवडणुकीत पाटणमध्ये मोठे नेते आले, भाषणं झाली… पण जिल्हा परिषदेचा निकाल बघा.एकीकडे राष्ट्रवादीचे दोन्ही गट आणि शिवसेना तर दुसरीकडे भाजप बेरीज काय झाली अति तिथे माती होते… अति जाऊन कुठे केलं तर माणसं योग्य वेळेची योग्य संधीची वाट बघत असतात,”असं म्हणत देसाईंनी भाजपवर निशाणा साधला.

Wardha: वर्धा जिल्ह्यात जाणारी अवैध देशी विदेश दारू जप्त

दारू बंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात जाणारी अवैध देशी विदेश दारू जप्त

एक कंटेनर, चारचाकी किया वाहन व मालवाहू चारचाकी वाहन असा 1 कोटींवर मुद्धेमाल जप्त

यवतमाळ जिल्ह्यातून दररोज वर्धा जिल्ह्यात देशी विदेशी दारू जात असल्याची माहिती

अनेक विदेशी मध्यांचे डुप्लिकेट स्टिकर जप्त

यवतमाळ-वर्धा जिल्ह्याच्या सीमेवरील राळेगाव तालुक्यातील रामतीर्थ गावाजवळ कारवाई

यवतमाळच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाची अनेक वर्षानंतर मोठी कारवाई

गोपनीय माहितीच्या आधारे वर्धा-यवतमाळ उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

Hadapsar: हडपसरमध्ये महापालिकेची जलवाहिनी फुटली

हडपसरमध्ये महापालिकेची जलवाहिनी फुटली

फुरसुंगी गोंधळेनगर मधील घटना

जलवाहिनीचा व्हालो फुटून लाखो लिटर पाणी वाया गेल्याची घटना हडपसर सासवड रस्त्यावरील फुरसुंगी गोंधळेनगरमध्ये काल सकाळी साडे दहाच्या सुमारास घडली..

व्हाल्वोमधून पाण्याचा फवारा कारंजासारखा उडत असल्याचे व्हिडिओ काढले आहेत.

या घटनेमुळे गोंधळी नगर सर्वे क्रमांक 16 परिसरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला

स्थानिक नागरिकांनी पाणीपुरवठा विभागाला कळविल्यानंतर जलवाहिनी बंद करण्यात आली त्यानंतर तीन तास दुरुस्ती केल्यानंतर हा पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात आला.

ZP Election: निवडणुकीच्या निकालानंतरही मोहोळ तालुक्यातील भाजप राष्ट्रवादीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरूच

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निकालानंतर देखील भाजप राष्ट्रवादीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरूच

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांचा दारुण पराभव केलेले भाजपचे सचिन जाधव यांच्यात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरूच

भाजपचे सचिन जाधव हे जकराया साखर कारखान्याचे चेअरमन असल्याने शेतकऱ्यांचा काटा मारणाऱ्यांना जनतेने न निवडून देण्याचे आवाहन उमेश पाटलांनी केले होते

आम्ही काटा मारत नसतो तर निकालाच्या माध्यमातून काटा काढत असतो म्हणत भाजपचे विजयी उमेदवार सचिन जाधव यांची उमेश पाटलांवर सडकून टीका

सदरच्या निवडणुकीत पैशाचा प्रचंड वापर झाल्याचा आरोप करत उमेश पाटलांचे प्रतिउत्तर

Palghar: पालघर जिल्ह्यात 158 पोलीस शिपाई तर सात वाहन चालकांसाठी भरती

पालघर जिल्ह्यात 158 पोलीस शिपाई तर सात पोलीस वाहन चालक या भरतीसाठी आजपासून मैदानी स्पर्धा सुरू होणार असून पालघरच्या कोळगाव पोलीस परेड ग्राउंड वर 11 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी दरम्यान ही स्पर्धा परीक्षा होणार आहे . यासाठी 7763 पुरुष तर 1446 महिला स्पर्धकांनी अर्ज दाखल केले आहेत . ही संपूर्ण पोलीस भरती प्रक्रिया ही पारदर्शकतेने होणार असून कोणत्याही खाजगी इसमाने स्पर्धकांना जर नोकर भरतीच आमिष देऊन पैशाची मागणी केली तर त्वरितच पालघर पोलिसांशी संपर्क साधावा तसंच कोणत्याही आमिषाला बळी पडू नये अस आवाहन पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्याकडून करण्यात आल आहे.

Nanded: नांदेडच्या किनवट तालुक्यातील चार शेतकऱ्यांवर अस्वलाचा हल्ला

नांदेडच्या किनवट तालुक्यातील चार शेतकऱ्यांवर अस्वलाचा हल्ला.

हल्यात गंभीर जखमी झालेल्या एका शेतकऱ्यावर नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू

अस्वलाच्या हल्यानंतर दोन शेतकरी बेपत्ता असल्याची माहिती, वनविभागाच्या वतीने शोध सुरू

नांदेडच्या किनवट तालुक्यातील दयाल धानोरा शिवारातील घटना.

शेतात पिकाला पाणी देण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांवर अस्वलाने केला हल्ला.

Hingoli: हिंगोलीत पोलिस भरतीला सुरुवात

हिंगोलीत आज पासून पोलीस भरती प्रक्रिया पार पडणार आहे, संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे दरम्यान पोलीस शिपाई पदाच्या 37 तर पोलीस चालक पदाच्या 27 अशा एकूण 64 जागांसाठी तेरा हजार पेक्षा अधिक उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाल्याची माहिती हिंगोली जिल्हा पोलीस दलाच्या वतीने देण्यात आली आहे तर या भरती प्रक्रिया दरम्यान कोणत्याही उमेदवारांनी भुलथापा व आमिषाला बळी पडू नये असे आवाहन हिंगोलीचे पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन यांनी केले आहे या संपूर्ण भरती प्रक्रिया दरम्यान सीसीटीव्ही कॅमेरे ड्रोन व्हिडिओ आणि खोट्या अफवा पसरवणाऱ्या विरोधात पोलीस लक्ष ठेवून असणार आहेत.

Beed:  बीड जिल्हा पोलिस दलातील भरती प्रक्रिया सुरू

बीड जिल्हा पोलिस दलात रिक्त 174 पदांसाठी आजपासून भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.. 18 तारखेपर्यंत ही प्रक्रिया पार पडणार आहे..आठ हजारांहून अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत. मैदानी चाचणी आणि लेखी परीक्षा पारदर्शी याकरिता जिल्हा पोलीस दल वरिष्ठ अधिकारी प्रयत्नशील आहेत.

Supriya Sule: खासदार सुप्रिया सुळे यांनी रूबी हॉल क्लिनिकच्या मेडिकल स्टाफचे मानले आभार

खासदार सुप्रिया सुळे यांनी रूबी हॉल क्लिनिकच्या मेडिकल स्टाफचे मानले आभार

पुण्यातील रूबी हॉल क्लिनिकमध्ये मागील ३ दिवसांपासून शरद पवार यांना एडमिट करण्यात आल आहे

त्यांच्यावर रूबी हॉल क्लिनिकचे डॉक्टर्स आणि मेडिकल स्टाफ उपचार करत आहेत. त्यांची काळजी घेत आहेत

त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी व्हॉट्सअप स्टेटस टाकून त्यांचे आभार मानले आहेत.

Sugar: राज्यात आतापर्यंत 82 लाख 55 हजार टन साखर उत्पादन

राज्यात आतापर्यंत 82 लाख 55 हजार टन साखर उत्पादन

कोल्हापूर विभाग अव्वल

राज्यातील यंदाचा 2025 26 चा ऊस गाळ हंगाम आत्ता अखेरच्या टप्प्यात आला असून आत्तापर्यंत 82 लाख 55 हजार टन साखर उत्पादन तयार झाले आहे

पुणे विभागात 199.52 लाख टन इतकी सर्वाधिक ऊसगाळप पूर्ण झाले आहे.

सर्वाधिक साखर उत्पादन आणि निव्वळ साखर उताऱ्यात कोल्हापूर विभागाची आघाडी ..

या विभागात 206.21 लाख क्विंटल साखर उत्पादन तयार तर 10.85% साखर उतारा आला आहे..

महाराष्ट्रातील साखर उत्पादनाने यंदाच्या हंगामात मागील हंगामातील 81 लाख टनाचा टप्पा ओलांडला..

राज्यात जवळपास 199 हून अधिक सहकारी आणि खाजगी कारखाने कार्यरत आहेत.राज्यात 1 नोव्हेंबर रोजी ऊस काळात हंगाम सुरुवात झाली.

200 कारखान्यांनी मिळून आत्तापर्यंत 888 लाख टन ऊस गाळप पूर्ण केले आहे.

15 मार्चपर्यंत ऊस गाळात हंगाम सुरू राहणे अपेक्षित असून त्यानंतर मोजकेच कारखाने सुरू राहू शकतात

राज्याचा निव्वळ साखर उतार 9.29% आहे.कोल्हापूर विभागात 37 कारखान्यांनी 190 लाख टन ऊस गाळ पूर्ण केले.पुणे विभागात 191.52 लाख क्विंटल साखर उत्पादन तयार.

Latur Mayor: लातूर महापौर–उपमहापौर निवड, महापालिकेवर काँग्रेसची एकहाती सत्ता

लातूर महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी निवड प्रक्रिया पार पाडण्यात आली आहे, महापौर पदी जयश्री सोनकांबळे, तर उपमहापौरपदी ॲड स्नेहल उटगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली , लातूर महापालिकेवर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने बाजी मारत मनपावर एकहाती सत्ता प्रस्थापित केली. दरम्यान महापौर आणि उपमहापौरपदी निवड झाल्याने शहराच्या राजकारणात काँग्रेसचे वर्चस्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. “लातूर महानगरपालिकेत पारदर्शक, लोकाभिमुख आणि भ्रष्टाचारमुक्त कारभार राबवण्याचा निर्धार असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसने आमदार अमित देशमुख यांनी दिली,

Nashik: नाशिकमधील शिवसेनेच्या अंर्तगत गटबाजीची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दखल

नाशिकमधील शिवसेनेच्या अंर्तगत गटबाजीची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दखल

रात्री उशिरापर्यंत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुरू होती बैठक

एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक नगरसेवक, पदाधिकाऱ्यांशी केली स्वतंत्र चर्चा

पक्षाच्या ध्येय धोरणाविरोधात कोणी काम करतंय का?

उपमहापौर आणि गटनेते निवडी दरम्यान काय झाले? यासंदर्भात एकनाथ शिंदे यांनी प्रत्येकाकडून घेतलं जाणून

पदाधिकाऱ्यांना खडे बोल सुनावत एकत्र काम करण्याच्या दिल्या सूचना

Nagpur: नागपुरात आज वीजपुरवठा खंडित

नागपूरात काही भागात तांत्रिक देखभाल करिता आज वीजपुरवठा खंडित असणार.

अधिक दर्जेदार आणि अखंडित वीजसेवेसाठी महावितरणच मोहीम.

सिव्हिल लाईन्स आणि बुटीबोरी विभागात तांत्रिक कामे हाती बारावी परीक्षा लक्षात घेऊन परीक्षा केंद्रांच्या वाहिन्या वगळल्या.

सकाळी ९ ते १ शंभू नगर, तिरंगा चौक, शिवगिरी चौक, ओम साई नगर आदी परिसर असणार प्रभावित.

सकाळी १० ते ३ या दरम्यान अनंत नगर, एसबीआय कॉलनी, गुलिस्तान कॉलनी, मदिना मस्जिद परिसरात वीज खंडित.

सकाळी ९ ते १२.३० या दरम्यान काँग्रेसनगरमधील आरपीटीएस रोड परिसरात पुरवठा बंद कामांमुळे वीजपुरवठा तात्पुरता खंडित असणार आहे नागरिकांनी सहकार्य करावे, असे महावितरणचे आवाहन केले आहे.

Amravati: अमरावतीत ग्रामीण पोलिस दलात 214 जागासाठी भरती प्रक्रिया सुरु

अमरावतीत ग्रामीण पोलिस दलात 214 जागासाठी भरती प्रक्रिया आजपासून सुरू..

214 जागेसाठी 22 हजार 208 उमेदवार देणार भरती..

अमरावती च्या जोग स्टेडियम वर भरती प्रक्रिया राबविली जाते आहे.

पहिल्या दिवशी 800 विद्यार्थीची प्रात्यक्षिक चाचणी होणार असून आज सकाळपासूनच मैदानावर विद्यार्थी हजर.

भरती प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी पोलिस विभाग सज्ज..

Nashik: नाशिकहून फेब्रुवारीत दिल्लीसाठीची ८ तर बंगळुरूची ५ विमानं रद्द

नाशिकहून फेब्रुवारीत दिल्लीसाठीची ८ तर बंगळुरूची ५ विमानं रद्द

ऑपरेशनल कारणांमुळे फेब्रुवारी महिन्यात दिल्लीसाठी ७ तर बंगळुरूची ५ विमानं रद्द

नाशिक विमानतळावरून दिल्ली आणि बंगळुरूसाठी सेवा पुरवण्याचं काम करणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सकडून दोन्ही शहरांसाठी अंशतः सेवा बंद राहणार असल्याचं स्पष्टीकरण

आजपासूनच दिल्ली आणि बंगळुरूसाठी विमानसेवेत अंशतः बदल

Pune: पुणे महापालिकेच्या विरोधी पक्ष नेतेपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निलेश निकम यांची निवड

पुणे महापालिकेच्या विरोधी पक्ष नेतेपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निलेश निकम यांची निवड

महापौर मंजुषा नागपुरे यांची निलेश निकमांना दिलं निवडीचं पत्र

भाजपनंतर राष्ट्रवादी पक्ष दुसऱ्या क्रमांकाच्या जागांवर निवडून आल्याने निलेश निकम विरोधी पक्षनेतेपदासाठी निवड

निलेश निकम पाच वेळा नगरसेवक राहिलेले आहेत

यावेळी काँग्रेसचे चंदू कदम राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सोपान उर्फ काका चव्हाण आणि शिवसेनेचे नितीन गावडे यांनाही गटनेते पदाचे पत्र देण्यात आली..

Sunetra Pawar: सुनेत्रा पवार यांची उद्या पुण्यात बैठक

उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनिता पवार यांच्या अध्यक्षतेखाली उद्या पहिल्यांदा जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडणार आहे यात 2026- 27 या आर्थिक वर्षाच्या जिल्हा प्रारूप आराखड्यास मान्यता दिली जाणार आहे.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर नियोजन समितीची ही पहिलीच बैठक होणार आहे जानेवारीत अजित पवार यांनी जिल्हा वार्षिक योजनेचे प्रारूप आराखडे तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांना दिल्या होत्या.त्यानुसार जिल्हा नियोजन अधिकारी जिल्हा परिषद आणि इतर शासकीय विभागाकडून विकास आराखडे तयार करण्याचे काम सुरू होते

Pune: पुणे शहरात काही भागाचा पाणीपुरवठा उद्या बंद

पुण्यातील अनेक भागात पाणीपुरवठा बंद

रॉ वॉटर पाईपलाईनवर डमी प्लॉट (बंद प्लॉट) बसवण्यासाठी वडगाव जलशुद्धीकरण केंद्र येथे तीन नवीन मीटरिंग युनिट (क्रॉसक) बसविण्यात येणार आहेत.

त्यानंतर शुक्रवारी सकाळी अशिरा कमी दाबाने पाणपुरवठा होणार आहे.

शहरातील पाणीपुरवठा बंद असणारा भाग

वडगाव जलकेंद्र परिसर

हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धारावी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक आंबेगाव खुर्द, आंबेगाव बुद्रुक, येवलेवाडी, सहकारनगर भाग २ दरम्यान भाग, आंबेकरनगर, टिळकनगर परिसर, दाते बस स्टॉप परिसर

Sharad Pawar: शरद पवार यांच्या प्रकृतीत सुधारणा

शरद पवार यांच्या प्रकृतीत सुधारणा

पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये शरद पवार यांच्यावर उपचार सुरु आहेत.

शरद पवार यांना डॉक्टरांनी 5 दिवस रुग्णालयात उपचार घेण्याचा सल्ला दिलाय..

त्यामुळे शरद पवार पूर्णपणे डॉक्टरांनी दिलेल्या सल्यानुसार उपचार घेतील.

शरद पवार यांच्यावर गेल्या तीन दिवसांपासून उपचार सुरुवात.

छातीत कप असल्याने श्वास घेण्यास आणि बोलण्यास त्रास होत होता.

Nashik:नाशिकच्या सिडको भागात पुढचे आठ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा

- सिडको परिसरातील जलकुंभाच्या दुरुस्तीच्या कामासाठी होणार कमी दाबाने पाणीपुरवठा

- कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याने पाणी जपून वापरण्याचं पालिका प्रशासनाचं आवाहन

- सिडको परिसरातील जलकुंभाच्या दुरूस्तीचं काम जवळपास सात ते आठ दिवस चालणार

- सिडको परिसरातील प्रभाग क्रमांक २४, २५ आणि २९ मध्ये होणार कमी दाबाने पाणीपुरवठा

Bhandara: लग्नसमारंभावरून परतणाऱ्या महिलेचा पाठलाग, दुचाकीस्वारांकडून ३ तोळ्यांचे मंगळसूत्र लंपास

तुमसर शहरातील हनुमान नगर भागात रात्रीच्या सुमारास चेन स्नॅचिंगची थरारक घटना घडली आहे. लग्न समारंभातून घरी परतणाऱ्या एका महिलेचा पाठलाग करून दुचाकीवरून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पोबारा केला. विशेष म्हणजे, या चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.पल्लवी बडवाईक असे या पीडित महिलेचे नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पल्लवी बडवाईक या रात्री १०.३० च्या सुमारास एका लग्न समारंभाला उपस्थित राहून आपल्या घरी परतत होत्या. त्या घराच्या समोर पोहोचताच, दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना गाठले. काही समजण्याच्या आतच चोरट्यांनी महिलेच्या गळ्यात असलेले सुमारे ३ तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावले आणि भरधाव वेगात पसार झाले.या धाडसी चोरीमुळे हनुमान नगर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. महिलेने या घटनेची तक्रार तुमसर पोलिसात दाखल केली आहे.

Pune: नवनिर्वाचित महापौर मंजुषा नागपुरे आणि उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी घेतली मुख्यमंत्र्यांच्या भेट

नवनिर्वाचित महापौर मंजुषा नागपुरे आणि उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

मुंबईमध्ये जाऊन घेतली भेट

चंद्रकातदादा पाटील, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत झाली भेट

सोबत महापालिका गटनेते गणेश बिडकर उपस्थितीत

महापौर उपमहापौर झाल्यानंतर मुख्यमंत्री यांची पहिलीच भेट

पुण्यात भाजपची महापालिका निवडणुकीत एकहाती सत्ता

भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांच्या खुनाचा कट; पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा आरोप

माळशिरसचे भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांच्या खुनाचा कट रचण्यात आला आहे, असा खळबळजनक आरोप पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केला आहे.

माळशिरस तालुक्यामध्ये दहशतीचे वातावरण आहे. निवडणूक निकालाच्या दिवशीच भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांना मारहाण करण्यात आली, दमबाजी करण्यात आली एवढेच नाही तर राम सातपुते यांच्या हत्येचा कट देखील रचण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. पोलीस त्याचा तपास करत आहेत.पोलिस तपासातून नक्कीच कोण काय करत आहे समोर येईल असेही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केले.

Dharashiv: जिल्हा परिषदेवर शिवसेनेचे अध्यक्ष झाला तर मला आनंदच होईल-राजन साळवी

धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीनंतर अध्यक्षपदावरून सत्तासंघर्ष रंगण्याची चिन्हं दिसू लागली आहेत.पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या करेक्ट नियोजनामुळे भाजपच्या तोडीस तोड जागा शिवसेनेला मिळाल्या असून,जिल्हा परिषद अध्यक्षपदावर शिवसेनेचा दावा असल्याचं स्पष्ट संकेत शिवसेना संपर्कप्रमुख राजन साळवी यांनी दिले आहेत.“जिल्हा परिषदेवर शिवसेनेचा अध्यक्ष झाला, तर मला आनंदच होईल,”असं ठाम मत राजन साळवी यांनी व्यक्त केलं आहे. या भूमिकेमुळे शिवसेना आणि भाजप यांच्यातील तणाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.दरम्यान, भाजप आमदार राणा पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील या अध्यक्षपदासाठी इच्छुक असल्याचं समोर आलं आहे. अर्चना पाटील यांच्या अध्यक्षपदावरील निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील, असं भाजपकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्षपदावर नेमकं कोण बाजी मारणार, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे.

राज्यात ५,५०० प्राध्यापकांची होणार भरती; उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा

राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधील रिक्त असलेल्या प्राध्यापकांच्या जागा भरण्याबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली की, महाविद्यालयांमधील सुमारे ११ हजार रिक्त जागांपैकी ५,५०० जागा भरण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MasterChef India 9 Winner : महाराष्ट्रात आली 'मास्टर शेफ'ची ट्रॉफी; 2 भावांना किती मिळले बक्षीस? पारंपरिक चवीने जिंकली लाखो लोकांची मने

PM Kisan Yojana: खुशखबर! १३ मार्चला शेतकऱ्यांच्या खात्यात येऊ शकतात ₹२००० ; पीएम किसान योजनेबाबत अपडेट

Hair Care : केसांना गरम तेल लावल्याने काय होते? जाणून घ्या योग्य पध्दत

Face Care: चेहरा नॅचरल ग्लोईंग आणि सॉफ्ट पाहिजे? फक्त आठवड्यातून २ वेळा 'ही' घरच्या घरी तयार होणारी पेस्ट नक्की

Maharashtra Live News Update : मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात विदर्भातील पारा चाळीशीपार

SCROLL FOR NEXT