पोर्शे प्रकरणात सर्वात मोठी अपडेट
ससून रुग्णालयाचे डॉ अजय तावरे आणि डॉ श्रीहरी हाळनोर यांचा वैद्यकीय परवाना रद्द
आरोपींचे रक्ताचे नमुने बदल्याप्रकरणी डॉ तावरे आणि डॉ हाळनोर यांना निलंबित करण्यात आले आहे
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल यांनी या दोन्ही डॉक्टर यांचे परवाने रद्द केले आहे
स्वारगेट लैगिंक अत्याचार खटल्यासाठी नाशिकचे ॲड अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पुण्यातील स्वारगेट एस टी स्टँड मधील तरुणीवर झालेल्या लैंगिक अत्याचार खटल्यासाठी सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील म्हणून ॲड अजय मिसर यांची नियुक्ती
माजलगाव शहरात खुणाचे दोन प्रकरण ताजे असताना आता गेवराई तालुक्यातील वाहेगाव येथे आठ जणांवर कोयता आणि रॉडने हल्ला झाला आहे. याप्रकरणी मात्र अद्याप पोलिसात तक्रार दाखल झालेली नाही.
सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटील यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चांना भाजपचे ज्येष्ठ नेते व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी पूर्णविराम दिला आहे.संजयकाका पाटील हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत,तिथेच त्यांचे पुनर्वसन केलं पाहिजे,
हे राज्यातील सर्वाधिक तापमान आहे. काल 44.6 अंशाची नोंद झाली होती, तर आज त्यात पुन्हा एका अंशाची भर पडली. पारा चढू लागल्याने लोकांना घराबाहेर पडणे कठीण झाले असून, प्रशासनाने 27 तारखेपर्यंत काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. हे तापमान आणखी पाच सहा दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.
नांदेड जिल्ह्यात पाण्याची समस्या गंभीर बनत आहे. अशातच नांदेडच्या धर्माबाद तालुक्यातील राजापूर येथील विलास शिंदे राजपुरकर या युवकाने चक्क गटाराच्या पाण्यात अंघोळ करून अनोखा आंदोलन केलं.
अंबरनाथमध्ये बांधकाम व्यावसायिक विश्वनाथ पनवेलकर यांच्या घरावर गोळीबार करणारा आरोपी निष्पन्न झाल्याची माहिती पोलीस सूत्रांन कडून समोर येत असून टो अंबरनाथ मधील असल्याचे बोलले जात आहे.मात्र अधिकृतरीत्या मात्र अद्याप पोलिसांनी आरोपीबाबत माहिती दिलेली नाही. दरम्यान, गोळीबाराच्या घटनेनंतर डीसीपी सचिन गोरे घटनास्थळी दाखल झाले असून आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी चार पथकं रवाना केली आहेत, तर क्राईम ब्रॅंचकडूनही आरोपीचा समांतर शोध सुरू असल्याची माहिती डीसीपी सचिन गोरे यांनी दिली आहे.
२६ एप्रिलपासून CNG विक्री बंदचा निर्णय मागे घेण्यात आलाय. MNGL कडून विस्कळीत CNG पुरवठ्यामुळे पेट्रोल डीलर असोसिएशनने २६ एप्रिलपासून CNG विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.
नागपूर हिंसाचारातील महत्त्वपूर्ण आरोपी हमीद इंजिनियरला नागपूर सत्र न्यायालयाने जामीनावर सोडण्याचे आदेश दिलेत. ५० हजार रुपयाच्या जात मुचलक्यावर मुक्ततेचे आदेश देण्यात आलेत. सत्र न्यायाधीश एन बी ओझा यांच्या न्यायालयाने आदेश दिलेत. उद्या कारागृहात सुटका होण्याची शक्यता आहे. मास्टरमाईंड फहिम खानच्या जामिनावर बुधवारी सुनावणी होणार आहे.
बीड पोलीस दलातील बडतर्फ पोलीस अधिकारी रणजीत कासलेच्या पोलीस कोठडीत वाढ झालीय. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या ॲट्रॉसिटी प्रकरणात 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावलीय.
पुरंदर एयरपोर्टसंदर्भात अजित पवार यांनी मोठं विधान केलंय. याला सात गावांचा विरोध आहे, पण शेतकऱ्यांना अधिक मोबदला दिला जाणार आहे. त्या पैशातून ते दुसरीकडे जमीन घेऊ शकतात.
बारामती एमआयडीसीमध्ये असलेल्या भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागलीय. आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
- सर्वोच्च न्यायालयाचा महापालिकेला मोठा दिलासा
- नाशिकच्या अनाधिकृत बांधकाम प्रकरणी याचिकाकर्त्यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली
- याचिका दाखल करण्यापूर्वीच महापालिकेने कारवाई केल्याचं निदर्शनास
- याचिकाकर्त्यांना नव्याने हायकोर्टात दाद मागण्याचा न्यायालयाचा सल्ला
- नाशिक महापालिकेच्या बाजूने सिध्दार्थ धर्माधिकारी यांनी मांडली बाजू
दोन मुलींचे आजन्म पालकत्व स्वीकारुन दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने औदार्य दाखवावे, आमदार अमित गोरखे यांची मागणी
बाळांची काळजी घेण्या साठी आम्ही समर्थ आहोत असल्याची गोरखे यांची प्रतिक्रिया
मात्र दीनानाथ हॉस्पिटल प्रशासनाने मृत मातेविषयी आत्मीयता दाखवावी, भाजप आमदार गोरखे यांची मागणी
एक एक समिती चे अहवाल येत आहेत, दूध का दूध पानी का पानी होत आहे. यातून कुणीही सुटणार नाही, आमदार गोरखे यांचे मत
विधान परिषदेचे भाजपचे आमदार अमित घोडके यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे यांचा काही दिवसांपूर्वी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला होता
तनिषा भिसे यांनी २ बाळांना दिला होता जन्म आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला
खा. सुनिल तटकरे यांनी महाडच्या चांदे क्रिडांगण येथे किकेट सामन्यांदरम्यान आपल्या महाविद्यालयीन आठवणींना उजाळा देत राजकिय शेरेबाजी केली. 50 वर्षांपूर्वी या मैदानात खेळताना ट्रॉफी मिळाल्याचे तटकरे यांनी सांगताना त्यानंतर अनेक ट्रॉफी मिळाल्या पण ही ट्रॉफी जपून ठेवल्याचे तटकरे म्हणाले. या ट्रॉफीने संघ भावना, आक्रमकपणा, संयम, क्षेत्ररक्षण शिकवल, जिंकण्याची उर्मी दिली आणि पराजय पचवण्याची ताकद, शक्ती दिल्याचे तटकरे म्हणाले. मैदान हे आपल्याला सर्वकाही देत असल्याचे सांगताना मैदानात एकदा माणूस तयार झाला कि त्याला अयुष्यात मागे वळून बघाव लागत नाही तटकरे म्हणले. मैदान हे आपली जुनी आठवण देत असतात. 50 वर्ष विकेटवर टिकून राहीलो आणि सलग 50 वर्ष विकेटवर टिकून रहाण सोप नाही. अस सांगताना त्याला संयम पराकोटीचा लागतो असे तटकरे म्हणाले.
अकोल्यातल्या मूर्तिजापूर मतदारसंघाचे भाजपचे आमदार हरीश पिंपळे यांना एका पोलीस अधिकाऱ्याने फोनवर शिव्या दिल्याचा प्रकार समोर आला होता. गुरांच्या तस्करीवरून भाजप आमदार पिपंळे यांनी थेट बार्शीटाकळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रकाश तूनकलवार यांना फोन केला. मात्र, याच वेळी दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला अन थेट पोलिस अधिकारी आमदाराला फोनवर शिव्या देऊन बसला. असा आरोप करीत भाजप आमदाराने थेट शिव्या देणाऱ्या ठाणेदारावर तात्काळ निलंबनाची करा, अन्यथा राजकीय आमदाराची इज्जत राहणार नाही, गृहमंत्र्यांना ऑडिओ क्लिपद्वारे मागणी केली होती. त्यानंतर आता वरिष्ठ पोलीस अधिकारी तूनकलवार यांच्यावर अकोला पोलीस अधीक्षकांनी मोठी कारवाई केली आहे.
अंबरनाथच्या हुतात्मा चौकाजवळ उद्योजक विश्वनाथ पनवेलकर यांचं सीताई सदन हे घर आहे. आज दुपारी अडीच वाजताच्या सुमारास पनवेलकर यांच्या घराबाहेर दुचाकीवरून दोन अज्ञात हल्लेखोर आले आणि त्यांनी पनवेलकर यांच्या घराच्या गेटच्या दिशेने दोन गोळ्या झाडत तिथून पळ काढला. ही संपूर्ण घटना पनवेलकर यांच्या घराबाहेर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. याप्रकरणी आता शिवाजीनगर पोलीस, तसंच क्राईम ब्रँचची टीम घटनास्थळी दाखल झाली असून पोलिसांकडून तपासाला सुरुवात करण्यात आली आहे.
माढा येथील शिवसेना शेतकरी मेळाव्यात कर्ज माफी करावी अशी मागणी करत दाखवले काळे झेंडे...
पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांचे भाषण सुरू असताना शेतकरी सत्यवान कदम यांनी कर्ज माफी करावी अशी घोषणा...
घोषणा बाजी करणारा शेतकरी सत्यवान कदम पोलिसांच्या ताब्यात
३१ व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रविण गायकवाड यांची निवड
९ व १० मे रोजी कराडमध्ये रंगणार अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन
९०० पेक्षा जास्त साहित्यिकांचा सहभाग
९ व १० मे रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कराड या ठिकाणी हे संमेलन संपन्न होणार असून या संमेलनाचे उद्घाटन शरद पवार करणार
ग्रंथदिंडी, उद्घाटन समारंभ, परिसंवाद, चर्चासत्र, कथाकथन, कविसंमेलन असे विविध कार्यक्रमांचे आयोजन
शिंदेच्या शिवसेना मेळाव्याला माढा आणि करमाळ्याचे शरद पवार गटाच्या दोन आमदारांची उपस्थिती...
शरद पवार गटाच्या आमदरांच्या उपस्थितीमुळे राजकीय चर्चांना उधाण...
शिवसेना पक्षाच्या व्यासपीठावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे करमाळ्याचे आमदार नारायण पाटील , माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांची विशेष हजेरी..
माजी आमदार राजन पाटील , संजयमामा शिंदेही सेनेच्या व्यासपीठावर....
मंत्री उदय सामंत आणि शंभूराजे देसाई यांच्या उपस्थितीत होणार आहे शिवसेना मेळावा..
अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर पती व मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील मंगी फाट्यासमोर घडली.संतोषी किसन तोडसाम वय ५० वर्ष राहणार पळसकुंड असे अपघातातील मृत महिलेचे नाव आहे.तर पती किसन तोडसाम वय ५५ वर्ष व मुलगा जय तोडसाम वय २८ वर्ष रा,पळसकुंड असे अपघातातील जखमीचे नाव आहे.हा अपघात इतका भीषण होता की महिलेचा डोक्याचा पूर्ण भाग चक्क धडापासून वेगळा झाला असून याप्रकरणी वडकी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून कामगारांना साहित्याचे वाटप करण्यात येतं... मात्र साहित्य वाटपामध्ये अनियमितता असल्याचा आरोप काही कामगारांनी केला आहे...ज्यांची नोंद चार दिवसांपूर्वी झाली आहे अशा कामगारांना साहित्य वाटप केले जातं, मात्र ज्यांनी गेल्या तीन ते चार महिन्यांपूर्वी नोंदणी केली आहे त्यांना मात्र साहित्य घेण्यासाठी पुढचे दोन ते तीन महिन्यांनी या असं सांगितलं जातं.. कोल्हापूर जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून बांधकाम कामगार हे साहित्य घेऊन जाण्यासाठी कोल्हापूरच्या मार्केट यार्ड परिवारात येत असतात...दरम्यान हे साहित्य वाटप करत असताना एजंट निर्माण झाल्याचा आरोप देखील कामगारांच्या वतीने करण्यात आलेला आहे... यासंबंधी अधिकाऱ्यांशी संपर्कसाधला असता कोणत्याही एजंटांच्या भूलथापांना कामगारांनी बळी पडू नये असा आवाहन बांधकाम कामगार उपायुक्त कोल्हापूर यांनी केलं आहे
काल मी जे भाषण केलं त्याचा वेगळा अर्थ घेतला गेला.जे मी बोललो नाही ते तोंडामध्ये घातला आहे.अनेक वृत्तपत्रा आणि मीडियाने पण असं काही करण्यात अर्थ नव्हता.पण मी 26 11 हल्ला माहिती होता की नाही त्यावेळच्या सरकारला..एका प्रेस नोट द्वारे सरकारने हल्ला होणार असल्याची शक्यता आहे अशी माहिती दिली होती.त्यातील 85% जागेसहित माहिती होती.पाच महिने अगोदर सरकारला जर माहिती होतं हल्ला होणार आहे तर मग ती सरकारची जबाबदारी होती हल्ला रोखण्याची. माहिती असून सुद्धा राज्य सरकारने तो हल्ला का रोखला नाही.२६/११ हल्ल्यात अनेक अधिकारी आणि कर्मचारी शहीद झाले. मग आता रानाला भारतात आल्यावर त्यावर चर्चा सुरू झाली त्यावेळेसच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी राज्यकर्त्यांनी यावर बोललं पाहिजे.मी कोणाचा हात आहे असं काही बोललो नाही. हेडली का पाळून गेला किंवा इतर सगळ्या प्रश्नांची उत्तर त्यावेळेस असणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकारने दिली पाहिजे.रानाला भारतात आणल्यावर त्याची चौकशी सुरू झाली. ज्यावेळेस 26/11 घडलं त्यावेळेसच्या मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांची ती जबाबदारी होती.त्यांनी ती उत्तर द्यायला हवी अजित पवार गृहमंत्री नव्हते.मी बोलल्याचा अर्थ कोणी काय काढायचा ते ज्याने त्यांनी ठरवावे. पण वस्तुस्थिती बद्दल वाद का?माधव भंडारी
रुग्णाच्या नातेवाईकाने हातात सलाईन धरून रुग्णाला नेले रुग्णालयात...
नातेवाईकांना न्यावं लागलं स्ट्रेचर आणून रुग्णाला आत..
रुग्णवाहिकेतून स्वतः रुग्णांच्या नातेवाईकांनी रुग्णांला आत मध्ये केलं दाखल
चक्क हातात सलाईन घेऊन रुग्णांच्या नातेवाईकांनी केलं रुग्णाला आत मध्ये दाखल
बाहेर रुग्णांना स्ट्रेचर आणण्यासाठी या ठिकाणी कर्मचारी नाहीत का? हा संतप्त सवाल
माणसाला चीड आणणारी घटना अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात..
राज्यात उद्धव आणि राज ठाकरेंच्या मनोमिलनाचे वारे वाहत असताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पाटील यांनी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यास आनंद होईल प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तसेच सर्व संघटना एकत्र येऊन काम केल्यास महाराष्ट्रात एक मजबुती निश्चित पणाने येईल,असा विश्वास देखील आमदार रोहित पाटील यांनी व्यक्त केला आहे,ते सांगलीमध्ये बोलत होते.
नॅशनल हेरॉल्डच्या घोटाळा प्रकरणी काँग्रेस पक्षाच्या विरुद्ध आज भाजपकडून अमरावतीमध्ये आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला.
राज ठाकरे व उद्धव ठाकरेंनी एकत्र यावं, ही मराठी माणसांची इच्छा आहे. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना अट घातलेली नाही. मात्र शंका बोलून दाखवली ती रास्त आहे त्याचा खुलासा आत्ताच झाला पाहीजे. नाहीतर आत्ता मिठी मारायची आणि नंतर फाटे फोडत जायचे हे योग्य नाही. त्यामुळे राज ठाकरे त्यावर योग्य तो विचार करतील. महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्र द्वेष्ठांच्या विरोधात लढण्यासाठी आज दोघांनी एकत्र येण्याची गरज आहे.विनायक राऊत
कर्जतच्या नगराध्यक्ष उषा राऊत यांच्याविरोधात नव्या कायद्यानुसार दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावर जिल्हाधिकार्यांनी आज अकरा वाजता विशेष सभा आयोजित केली होती मात्र त्याआधीच साडेदहा वाजता नगराध्यक्ष उषा राऊत यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाधिकारी यांच्याकडे दिला असून या प्रकरणाची गांभीर्यच संपवून टाकले आहे.
अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी कुरूंदकर याला कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
काही विषय राजकारणाच्या पलीकडे असतात. परिवार म्हणून एकत्र येतात, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. शरद पवार हे संस्थेचे अध्यक्ष आहेत, मी ट्रस्टी आहे. त्यामुळे आम्ही एकत्र आलो होतो.अजित पवार
माढा तालुक्यात शिवसेना मेळाव्यासाठी येणार होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे...
कार्यक्रमापूर्वी काही तास दौरा रद्द झाल्याची मिळाली शिवसेना पदाधिकाऱ्यांना माहिती...
तानाजी सावंत यांचे बंधू शिवाजी सावंत यांनी आयोजित केला होता शिवसेना मेळावा
एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्याच्या जाहिरातीमधून तानाजी सावंत यांचा फोटो वगळला होता, यानंतर एकनाथ शिंदे यांचा दौरा रद्द झाला...
नाशिक मनसेच्यावतीने शहरातील विविध समस्यांच्या संदर्भात महापालिकेच्या मुख्य गेटवर घंटा नाद आंदोलन करण्यात येत आहे. नाशिक शहरात विविध समस्या असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील निवडणुकीत नाशिकला दत्तक घेण्याची घोषणा केली होती मात्र या दत्तक नाशिकच्या समस्या कोण सोडवणार असा प्रश्न उपस्थित करत मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील जिल्हाप्रमुख अंकुश पवार शहराध्यक्ष सुदाम कोंबडे या प्रमुख पदकरांच्या समवेत नाशिकच्या महापालिका गेटवर घंटा नाद आंदोलन करण्यात येत आहे. महापालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत घंटा वाजवत मनसेचे आंदोलन सुरू आहे.
साखर संकुलातील बैठक संपल्यानंतर दोघांमध्ये वेगळी बैठक सुरु
AI ची बैठक संपताच अजित पवार, शरद पवारांच्या दालनात
शरद पवारांच्या दालनात अजित पवार आणि इतर सहकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू
मागील 15 मिनिटांपासून अजित पवार शरद पवारांच्या दालनात
एआयची बैठक संपताच दोन्ही नेते एकाच दालनात करत आहेत
कोल्हापूर जिल्ह्यातील आळते इथल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणी आज मुख्य आरोपी आणि बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर सह त्याच्या साथीदार कुंदन भंडारी महेश फाळणीकर यांना पनवेल सत्र न्यायाधीशाने दोषी ठरविले आहे. दोषी अधिकाऱ्यांसह साथीदारांना आज 11 वाजता शिक्षा सुनावण्यात येणार आहे. त्यांना फाशी की आजन्म कारावास यावर शिक्कामूर्त होणार आहे.
- 'उद्धवसाहेब स्वतः राजसाहेबांना मातोश्रीचं आमंत्रण द्या आणि महाराष्ट्राला आनंदाची बातमी द्या'
- आमच्यावर कितीही दबाव आला, तरी आम्ही एकनिष्ठ राहिलो
- बाळा दराडे आणि किरण गामणे यांनी केली बॅनर लावून विनंती
- ठाकरे बंधू युतीबाबत चर्चा सुरू असतांना बॅनर चर्चेत
- ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यालयासमोर लावलेय बॅनर
- बॅनरवर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंसह उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचा फोटो
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोलापुरातील शिव मेळाव्याच्या जाहिरातीतून माजी आरोग्यमंत्री, आमदार तानाजी सावंत यांचा फोटो गायब
- आमदार तानाजी सावंत यांचे बंधू शिवसेना संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांनी शिव मेळाव्याचे आयोजन केले आहे
- मात्र आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांचा फोटो जाहिरातीतून पूर्णपणे वगळला
- महायुतीतील नेत्यांचे फोटो जाहिरातीत आहेत मात्र माजी मंत्री तानाजी सावंत यांचा फोटो वागळल्याचे पाहायला मिळतेय
- विधानसभेवेळी सावंत बंधुंमध्ये फूट पडल्याच्या चर्चा जोर धरल्या होत्या त्यानंतर आता जाहिरातीतून त्यांचा फोटो वगळल्याने चर्चेला उधाण
उदगीर शहरातील जळकोट रोड परिसरात असलेल्या एका घरामध्ये करणी, भानामती आणि काळ्या जादूचे संकट असल्याच सांगत घरातील सोने ,चांदी यासह 33 लाखाचा गंडा घातला असल्याचं समोर आल आहे.. दरम्यान या प्रकरणी आता उदगीर शहर पोलीस ठाण्यात अघोरी प्रथा, जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे..तर या प्रकरणी दोन महिलांना ताब्यात घेतल आहे.
कोकणची ओळख आणि महाराष्ट्राचा लाडका हापूस आंबा आता दिल्लीत पोहचणार असून येत्या 30 एप्रिल ला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते महाराष्ट्र हापूस आंबा महोत्सवाचे भव्य उदघाटन होणार आहे.
लातूरच्या चाकुर तालुक्यातील दळवेवाडी या ठिकाणच्या केशव सीताराम होळे या 40 वर्षीय शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे... पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , केशव होळे हे दळवेवाडी येथील एक अल्पभूधारक शेतकरी आहेत.., त्यांच्या नावावर पावणेदोन एकर कोरडवाहू शेती आहे.. दरम्यान यंदाच्या हंगामात शेतात कापूस पिकाचा पेरा केला होता,मात्र सततची नापिकी आणि बँकेचं 48 हजाराचं कर्ज . त्यात घरातील मुलीचे लग्न तोंडावर आलेलं. आणि अशातच बँकेकडून कर्ज वसुलीसाठी सततचा होणारा तगादा,याच आर्थिक विवेंचनेत त्यांनी, स्वतःच्याच शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे.. दरम्यान याबाबत किनगाव पोलीस ठाण्यात आत्महत्याची नोंद करण्यात आली आहे.
डॉ सुश्रुत घैसास यांची चौकशी होणार
पुणे पोलिस नोंदवणार डॉ घैसास यांचा जबाब
डॉ घैसास यांच्यावर उपचारादरम्यान हलगर्जीपणा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
तनिषा भिसे यांच्यावर उपचारादरम्यान हलगर्जीपणा केल्याप्रकरणी घैसास यांच्यावर पुण्यातील अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा
बी एन एस १०६(१) या कायद्याअंतर्गत घैसास यांच्या विरोधात गुन्हा दाखल
डॉ घैसास यांच्यावर काय कारवाई होणार हे पहावं लागेल..
करवीर तालुक्यातील बेंडाई धनगरवाड्या मधील रस्त्या अभावी उपचार वेळेत न मिळाल्यामुळे एका महिलेचा काल मृत्यू झाला. शेतात काम करणाऱ्या दगडूबाई देवणे या महिलेला भर उन्हात चक्कर आली. रस्त्या अभावी त्यांना रुग्णालयात नेण्यात खूप उशीर झाला. परिणामी वेळेवर उपचार होऊ शकले नाहीत. त्यामुळे दगडूबाई देवणे यांनी अखेरचा श्वास सोडला. बेंडई धनगरवाडा परिसरात रस्ते नसल्या उपचारासाठी दगडूबाई देवणे याना स्थानिक नागरिकांनी खाटल्यावर बांधून रुग्णालयात नेले. मातृ उपचार पूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता.
- विदर्भात उन्हामुळे जीव लाही लाही होण्याची वेळ आली असून विदर्भातील नागरिक होरपळून निघत आहेत.
- रविवारी संपूर्ण राज्यात चंद्रपूर येथे सर्वाधिक म्हणजे कमाल 44.6 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली.
- तर नागपुरमध्ये 44.0 अंश सेल्सियस तापमान नोंदवण्यात आले
- अमरावती आणि ब्रह्मपुरीत उच्चांकी 44.4 अंश नोंद करण्यात आली
- विदर्भातील सहा शहरात तापमान 44 अंशावर पोहोचले आहे.
- अकोला 44.3,अमरावती 44.4, चंद्रपूर 44.6, नागपूर 44.0,वर्धा 44.0 अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद.
- पुढील 3 ते 4 दिवस विदर्भातील अनेक शहरांमध्ये उष्णतेच्या लाटेचा हवामान विभागाचा इशारा
बीडच्या सायबर विभागामधील बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रंजीत कासले चे नवनवीन व्हिडिओ समोर आले या व्हिडिओ नंतर रंजीत कासलेने एक वादग्रस्त व्हिडिओ पोस्ट केला होता आणि याप्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये ॲट्रॉसिटी अंतर्गत रणजीत कसले विरोधात गुन्हा दाखल झाला होता आणि आज पुण्यामध्ये त्याला तीन दिवसांची भेट न्यायालयाकडून पोलीस कष्ट मिळाली होती त्याचे पोलीस कष्ट या संपत असून त्याला दुसऱ्या गुन्ह्यांमध्ये ताब्यात घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे परळी शहर पोलीस स्टेशन आणि अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशन मध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे दोन गुन्हे दाखल आहेत नक्कीच रंजीत घासलेला न्यायालय कोठडी मिळते की पोलीस कोठडी मिळते हे पहाण महत्त्वाचा असणार आहे.
मुळशी तालुका भाजपचे सरचिटणीस दत्तात्रय जाधव यांनी यासंदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र
प्रत्येक निवडणूक दरम्यान, ज्यांच्या विरोधात आजपर्यंत प्रचार केला,
टोकाचा संघर्ष केला तेच नेते भाजपात आल्यावर त्यांच्याशी जुळवून घेणे अवघड होणार आहे.
तसेच त्यांच्याकडून स्वतःच्याच कार्यकर्त्यांना बळ देऊन, भाजपाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांना डावललं जाण्याची शक्यता
दत्तात्रेय जाधव यांनी पत्रातून नाराजी व्यक्त केली आहे
- अनाधिकृत बांधकामावरील महापालिकेच्या कारवाईला सर्वोच्च न्यायालयाने दिली होती स्थगिती
- महापालिकेने बजावलेल्या अतिक्रमण नोटीसला ट्रस्टने दिलं होतं सर्वोच्च न्यायालयात आव्हान
- महापालिकेच्या नोटीस विरोधात उच्च न्यायालयाने याचिका दाखल करून घेतली नसल्याचा ट्रस्टकडून सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद
- महापालिकेने अतिक्रमण जमीनदोस्त केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात पार पडली होती सुनावणी
- या पुढील कारवाईला स्थगिती देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
- उच्च न्यायालयाने तातडीने सुनावणी का केली नाही? याबाबत सर्वोच्च न्यायालयाने विचारला होता खुलासा
- आज होणाऱ्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालय काय निकाल देणार? याकडे लक्ष
अकोल्यातल्या मूर्तिजापूरात पेट्रोल पंपावरील कामगारावर दोघांनी हल्ला केलाय.. हिरपूर मार्गावरील मातोश्री पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या तरुणावर पेट्रोल भरण्याच्या वादातून दोघांनी मिळून हा हल्ला केला आहे.. कामगार तरुणाला लोखंडी पाइपने हल्ला करून गंभीर जखमी केले आहे.. या घटनेचे cctv फुटेज देखील समोर आले आहे.. स्वप्नील बावनकर असे जखमी तरुणाचे नाव आहे.. तो मातोश्री पेट्रोल पंपावर सेल्समन म्हणून काम करतो. दोन अज्ञात व्यक्तींनी पेट्रोल भरण्यावरून किरकोळ कारणावरून स्वप्नील'शी वाद घातलाये.. या वादातूनच त्यांनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व नंतर लोखंडी पाइपने मारहाण केली आहे.. या घटनेनंतर मूर्तिजापूर शहर पोलिस ठाण्यात दोघा अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झालाय.
मावळ तालुक्यात दोन ठिकाणी अपघात झाले. पहिला अपघात आंदर मावळ टाकवे फळणे रस्त्यावरती स्मशानभूमी शेजारी अपघात झाला. तर दुसरा अपघात शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत दारूंब्रे येथे अपघात झाला.आंदर मावळ येथील टाकवे-फळणे रस्त्यावर स्मशानभूमी शेजारी अपघात झाला. अपघातात एकजण जखमी झाला आहे. त्यास कामशेत येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमी व्यक्तीचे नाव गणेश अंधारे आहे..तर शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत दारूंब्रे येथे दुसरा अपघात झाला. त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून दोघेजण जखमी झाले आहेत. सौरभ इंगोले असे मृत्यू झालेल्याचे व्यक्तीचे नाव आहे. तर पृथ्वीराज इंगोले आणि शुभम ही दोघे जखमी झाले आहेत. जखमींना सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे...
शासकीय योजनांच्या अंमलबजावणीसाठी राज्यभरात फार्मर आयडी सक्तीचे करण्यात आले आहेत.याची अंमलबजावणी सर्वत्र सुरू झाली असून याच वेळी यवतमाळ जिल्ह्यातील अडीच लाख शेतकऱ्यांना या प्रक्रियेपासून दूर आहेत. शेतकऱ्यांना डिजिटल सेवेचा वापर करून शासनाच्या विविध योजना जलद गतीने आणि परिणामकारक पद्धतीने अंमलबजावणी करण्यासाठी फार्मर आयडी सक्तीचे करण्यात आले आहे.यातून फार्मर आयडी मधून शेतकऱ्यांच्या शेतातील माहिती कृषी विभागाला आणि महसूल यंत्रणाला मिळणार आहे. जिल्ह्यात साडेपाच लाख खातेधारक शेतकरी आहेत त्यातील तीन लाख शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढली आहे अजूनही अडीच लाख शेतकरी फार्मर आयडी न काढल्याने या प्रक्रियेपासून दूर आहे.
धाराशिव मधील कंञाटदाराची तब्बल 2 कोटी 20 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना 5 ते 19 मार्च दरम्यान घडली असुन बांधकाम साहीत्य पुरविण्याचे आश्वासन देत पुणे व मुंबईच्या तीन व्यापाऱ्यांवर फसवणूक केली आहे या प्रकरणी धाराशिव मधील आनंदनगर पोलीसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पुणे येथील जन्नु ओस्वाल,मुंबई येथील वेलकम ट्रेकर्सचे मालक विक जाजोट,आळंदी येथील आशा पुरा स्टील ट्रेडर्सचे मांगीलाल पुरोहीत यांनी धाराशिव मधील दिलीप सोळुंके यांना बांधकामासाठी लागणारे साहित्य पुरविण्याचे सांगितले यासाठी त्यांनी २ कोटी २० लाख आरटीजीएस द्वारे घेतले माञ साहीत्य पुरवले नाही व पैसे ही परत न देत फसवणूक केली या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचे काम तीन वर्षांपासून रखडल्याने वाहनधारकांना व नागरिकांना याचा त्रास होत आहे.या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते.रखडलेल्या पुलाच्या कामामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे.या रखडलेल्या पुलामुळे पावसाळ्यात नदीचे पाणी आजुबाजूच्या शेतात पाणी जमा होत असल्याने या पुलाचे काम तात्काळ होणे गरजेचे आहे.
धाराशिव च्या भुम तालुक्यातील ईट येथे शेत तळ्यावर पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.ओमकार सुनिल स्वामी अस मृत्यू झालेल्या २१ वर्षीय युवकाच नाव असुन रविवारी तो मिञांसोबत शिवारातील एका शेततळ्यावर पोहण्यासाठी गेला होता त्याने पोहण्यासाठी पाण्यात उडी मारल्यानंतर परत वर आलाच नाही त्यानंतर मिञांनी ही माहिती नातेवाईकांना दिली यावरुन ५ तास शोध घेतल्यानंतर मृतदेह आढळून आला.
अकोल्यात कर्जमाफीसाठी उद्धव ठाकरेंची शिवसेना आक्रमक होणारेये.. शेतकरी हातात रुमणे आणि ट्रॅक्टर घेऊन अकोल्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहेये... शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर न झाल्याने येत्या 2 मे'ला शेतकऱ्यांना घेऊन हा ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार आहे, जिल्ह्यातील 800 गावात संवाद साधत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत शिवसेनेचा मोठा मोर्चा असणार आहे.. अशी माहिती ठाकरे गटाचे आमदार तथा उपनेते नितीन देशमुख यांनी दिलीये..
जिल्ह्यातून शेतकरी ट्रॅक्टर ट्रॅलीसह घेऊन प्रथम अकोला क्रिकेट क्लब मैदानावर दाखल होतील, प्रत्येक ट्रॅक्टरमध्ये 20 शेतकरी राहणार आहेत. एकत्रित 500 ट्रॅक्टरद्वारे हा मोर्चा टॉवर चौकातून मदनलाल धिंग्रा चौक मार्गे, गांधी रोड, पंचायत समितीसमोरून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.
गोरगरिबांच्या मुलाना चांगल्या शाळेत शिक्षण मिळावे यासाठी शिक्षण हक्क कायदा आणण्यात आला. मात्र या कायद्याचा गैरवापर होत असल्याचं समोर आलं आहे. रायगड जिल्हयातील RTE (शिक्षण हक्क कायदा) प्रवेशाची यादी पुन्हा एकदा वादाच्या भोवरयात सापडली आहे. RTE प्रवेशासाठी पालकांकडून वास्तव्याचे बोगस पुरावे जोडल्याची बाब रायगड जिल्ह्यातील खारघर येथे उघडकीस आली आहे. त्यामुळे या पालकांच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करावेत अशी शिफारस गट शिक्षणाधिकारी यांनी केली आहे. आरटीई कायद्याचा गैरवापर करून नामांकीत शाळांमध्ये प्रवेशासाठी प्रयत्न केले जात असल्याची बाब रायगड जिल्ह्यात समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी अलिबाग येथील खानविलकर एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष अमर वार्डे यांनीही असाच प्रकार उघडकीस आणून कारवाईची मागणी केली होती.
यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय अभिलेख कक्षात चोरी केल्याप्रकरणी आरोपीला शहर पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून पाच किलो ग्रॅम तांब्याची तार आणि दोन मोबाईल जप्त करण्यात आले उमेश लक्ष्मण घुटके असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. विशेष म्हणजे आत्तापर्यंत वैद्यकीय अभिलेख कक्षात वायर चोरीच्या सलग तीन घटना घडल्या असून पहिल्या चोरीच्या वेळी चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता.दुसऱ्या वेळी चोरट्याने चक्का सीसीटीव्ही लांबविणचा प्रयत्न केला आता तिसऱ्या वेळी वेळी चोरट्याला पोलिसांच्या जाळ्यात अडकला.
मेळघाट मधील राणी गावात देखील पाण्यासाठी नागरिकांची धावपळ..
पाणी भरण्यासाठी सार्वजनिक नळावर मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थांची गर्दी..
तर अनेक भागात डोंगरदर्यातून आणाव लाग पिण्याचे पाणी.
शासनाच्या अनेक पाण्याच्या योजना कुचकामी ठरल्याचा आरोप.
महिला व बाल विकास विभागाच्या वतीने पुणे जिल्ह्यासाठी ४ हजार महिलांना "पिंक ई- रिक्षा " वाटप करण्याचे उदिदष्ट दिलेले असुन पुणे जिल्हयात २० ते ५०वर्षे वयोगटातील ३ हजार २३० इच्छुक महिलांचे अर्ज प्राप्त झालेले आहेत.
त्यापैकी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील गठीत समितीने 1 हजार ७२६ लाभार्थ्यांना मंजुरी मिळाली आहे. यापैकी पहिल्या टप्प्यातील ६० लाभार्थी महिलांना आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ६० कायनेटिक ग्रिन कंपनीचे "पिंक ई- रिक्षा" वितरीत करण्यात येणार आहे..
आर टी ई खाजगी शाळांमध्ये राखीव जागा व प्रवेशासाठी राबवण्यात येणाऱ्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतून आतापर्यंत एकूण 69 हजार 621 मुलांनी प्रवेश घेतले आहेत.
प्रतीक्षा यादीच्या दुसऱ्या फेरीतून प्रवेश येण्याचे आज शेवटची संधी आहे त्यामुळे मुलांनी आपले प्रवेश निश्चित करावे असे आवाहन प्राथमिक शिक्षण संचालकांनी केले
यंदा प्रवेश प्रक्रियेत राज्यातील 8हजार 863 शाळांमध्ये 1 लाख 9 हजार 102 जागा उपलब्ध होत्या
त्यासाठी तीन लाख पाच हजार 151 मुलांचे अर्ज आले होते, त्यापैकी एक लाख 967 मुलांना प्रवेश जाहीर झाले आहेत.
यादीच्या दुसऱ्या फेरीतून प्रवेश घेण्याची 15 एप्रिल तारीख होती मात्र पालकांच्या मागणीमुळे 21 एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.
शरद पवार आणि अजित पवार आज पुन्हा एकत्र येत आहेत. पुण्यात साखर संकुल येथे कृषी क्षेत्रात AI च्या वापराबाबत बैठक होणार आहे. बैठकीला दोन्ही पवार राहणार उपस्थित राहणार आहेत. तसेच कृषिमंत्री माणिकराव कोकाटे ही उपस्थित असणार आहेत. सकाळी ९ वाजता बैठक सुरू होणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.