Maharashtra Live News Update Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update : मेट्रो प्रशासनाचा निष्काळजीपणा, दुसाचीस्वार पडला महा मेट्रोच्या खोदलेल्या खड्ड्यात

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: आज गुरूवार, दिनांक २६ नोव्हेंबर २०२५, राज्यातील थंडीला पुन्हा सुरूवात, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका अपडेट्स, आजच्या ताज्या बातम्या, महाराष्ट्र हवामान अपडेट्स, राज्यात थंडीची लाट, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

Chiplun: चिपळूणमध्ये काॅग्रेसमधील तीन पदाधिकाऱ्यांचे सहा वर्षासाठी निलंबन

काॅग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष गणेश पाटील यांच्याकडून कारवाई

चिपळूण नगरपरिषदेत बंडखोरी करणाऱ्या काॅग्रेस तालुकाध्यक्ष लियाकत शहांवर कारवाई

लियाकत शहा यांच्यासह तुळशीदार पवार आणि राजेंद्र भुरण यांच्यावर देखिल कारवाई

पक्ष विरोधी कारवाईचा ठपका, बंडखोर उमेदवाराला साथ दिल्या प्रकरणी इतर दोघांवर कारवाई

शिंदे सेनेतून काँग्रेसमध्ये आलेले सुधिर शिंदे काँग्रेसचे अधिकृत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार

Politics: भाजपसाठी स्वत: मुखमंत्र्यानी घेतली हिवरखेड्यात सभा.

अकोला जिल्ह्यातील पहिल्यांदाच होत असलेल्या हिवरखेड नगरपालिकेच्या निवडणुकीकडे संपुर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय. 26 ऑगस्ट 2024 ला हिवरखेड ग्रामपंचायतीचे थेट नगरपालिकेत रूपांतर करण्यात आलेय. त्यामूळे नगरपालिकेत पहिले सत्ताधारी होण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसलीय. सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेल्या हिवरखेड गावचं राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलंय. येथे प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस येऊन गेलेयेत. तर एकनाथ शिंदेही आपल्या पक्षाच्या प्रचारासाठी हिवरखेडात येतायेत. राज्याच्या राजकारणात एकत्र असलेल्या सत्ताधारी आणि विरोधी आघाडीतील सर्वच पक्ष येथे एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेयेत.

Indigo: इंडिगो पुन्हा लेट; तिकीट विमानाचे, मात्र चारचाकीने मुंबई गाठण्याची वेळ

संभाजीनगरच्या विमानतळावर इंडिगोचे विमान पुन्हा एकदा 5 तास उशिरा उशिरा आले, रात्री सव्वानऊ वाजता येणारे विमान मध्यरात्री दीड वाजता संभाजीनगर ला आले. त्यामुळे विमानाचे तिकीट घेऊन प्रवाशांना चार चाकी ने प्रवास करावा लागला. इंडिगो एअरलाइन्सच्या उड्डाणातील सातत्याने होणाऱ्या उशिरामुळे प्रवाशांचा संताप दिवसेंदिवस वाढत आहे. रात्रीच्या मुंबई विमानास बुधवारी सुमारे 5 तासांहून अधिक विलंब झाला. हे विमान मध्यरात्री 1:30 वाजता येणार असल्याचे प्रवाशांना सांगण्यात आले. तेव्हा तीव्र नाराजी व्यक्त करीत काही प्रवाशांनी विमानप्रवासच रद्द केला. तर काही प्रवासी चारचाकीने रस्तेमार्गाने मुंबईला रवाना झाले. मुंबईहून येणाऱ्या प्रवाशांनाही प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागले.

Ambernath: अंबरनाथ मध्ये प्रचाराच्या कारणावरुन भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला

अंबरनाथ मध्ये प्रचाराच्या कारणावरुन भाजप कार्यकर्ते सत्यम तेलंगे याच्यावर कोयत्याने हल्ला केल्याची घटना अंबरनाथच्या सर्वोदय नगर परिसरात घडली आहे .भाजप उमेदवाराचा प्रचार करू नको असे सांगत शिवेसना शिंदे गटाचा कार्यकर्ता साहिल वडनेरे याने हा हल्ला केल्याचा आरोप सत्यम तेलंगे याने केलाय , या हल्ल्यात भाजप कार्यकर्ता सत्यम तेलंगे यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे तर अंबरनाथ , पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे ,मात्र साहिल हा शिंदे शिवसेनेचा कार्यकर्ता नसल्याच आरोप शैलेश भोईर यांनी स्पष्ट केल असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत

Dahisar: दहिसरमध्ये भाजप-ठाकरे गट आमने-सामने; शाखाप्रमुखकडून सरचिटणीसावर हल्ला

दहिसर परिसरात भाजप आणि ठाकरे गटातील वाद चव्हाट्यावर आला आहे. भाजपचे सरचिटणीस गणेश खणकर आणि ठाकरे गटाचे शाखा क्र. 11 चे शाखाप्रमुख सुबोध माने यांच्यात काल उघडपणे हाणामारी झाली.

सुबोध माने यांचा पाण्याच्या टँकरचा व्यवसाय असून टँकर चुकीच्या ठिकाणी पार्क केल्याबाबत गणेश खणकर यांनी अनेकदा तक्रार केली होती. या पार्श्वभूमीवर खणकर यांनी काल फेसबुकवर एक पोस्ट केली. ही पोस्ट पाहून संतापलेल्या सुबोध माने यांनी गणेश खणकर यांच्यावर धाव घेऊन मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे.

Politics: राष्ट्रवादी गटाचे नेते सुरज चव्हाण आणि सना मलिक यांच्याकडून तळोदा येथे जाहीर सभा...

तळोदा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार भाग्यश्री चौधरी यांच्यासाठी राष्ट्रवादीचे नेते मैदानात उतरलेत....

खा कोणाच पण बटण मात्र बटन दाबा राष्ट्रवादीच सुरज चव्हाण यांचं मतदारांना साकडं...

महायुतीत गेल्यानंतर देखील अजितदादांनी निधी कधीही कमी पडू दिला नाही तर मुस्लिम आरक्षणा मिळावा यासाठी सर्वात आधी अजितदादा आग्रही होते सुरत चव्हाण....

तळोदा चे नगराध्यक्ष किंवा नगरसेवक पद घेऊन थांबू नका तर विधानसभेत देखील येण्याच्या प्रयत्न करा आमदार सना मलिक यांची प्रतिक्रिया

Pune Metro: मेट्रो प्रशासनाचा निष्काळजीपणा, दुसाचीस्वार पडला महा मेट्रोच्या खोदलेल्या खड्ड्यात

महा मेट्रोचा निष्काळजीपणा पुन्हा एकदा उघडकीस झाला आहे. पिंपरी चिंचवड शहरातील भक्ती शक्ती चौकाजवळ महा मेट्रो ने खोदलेल्या एका मोठ्या खड्ड्यात एक दुचाकीस्वार थेट त्याच्या दुचाकी वाहनासह जाऊन पडला आहे. महा मेट्रो ने खोदलेल्या खड्ड्याजवळ बॅरिकेटिंग नसल्याने तसेच दुचाकी स्वाराला खड्ड्याचा अंदाज न आल्याने दुचाकी स्वार त्याच्या दुचाकी वाहनासह थेट महा मेट्रो ने खोदलेल्या खड्ड्यात जाऊन पडला आहे. यात दुचाकीस्वार तरुणाचे प्राण थोडक्यात बचावले आहेत मात्र त्याला मुका मार लागून तो जखमी झाला आहे

Nandurbar: नंदुरबारमधील नगरपालिकेचे निवडणुकीसाठी राज्याच्या नेत्यांच्या प्रचार सभेच्या धडाका सुरू...

नंदुरबार जिल्ह्यात होणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराला राज्यातील प्रमुख नेते सभा घेत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री दादा भुसे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सभा घेतली आहे तर आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माणिकराव कोकाटे सुरज चव्हाण सलाम मलिक हे जाहीर सभा घेणार आहेत नगरपालिकेच्या निवडणुकीत सत्तेत असलेल्या पक्ष एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढत असल्याने सत्ताधारी पक्षांच्या सगळ्यांच्या धडाका लावण्यात आलेला आहे मात्र या नेत्यांच्या भाषणातून प्रामुख्याने लाडकी बहीण योजनेच्या उल्लेख केला जात असून ही योजना आम्ही आणला असल्याचा दावा करण्यात येत आहे परंतु राज्यातील नेत्यांच्या होत असलेल्या या सभांमुळे नेमकं सत्तेतील कुठला पक्षाला फायदा होणार आणि कुणाल नुकसान होणार हा देखील महत्त्वाच्या मुद्दा आहे तर आज राज्याचे उपमुख्यमंत्री येत असल्याने लाडकी बहीण योजना आणि आदिवासी बद्दल काय बोलणार या काळात सर्व लक्ष लागलं आहे.

Pune: पुण्यात शालार्थ आयडी साठी लाचप्रकरणी तीन दिवसात अहवाल द्या

शिक्षण विभागातच राज्याचे प्रकरण घडल्याने शिक्षण आयुक्त कार्यालयाकडून गंभीर दखल

रावसाहेब मिरगणे लाजप्रकरणी सखोल चौकशी करून तीन दिवसात अहवाल सादर करा

शिक्षण आयुक्ताने सहसंचालक डॉक्टर श्रीराम पानझडे यांना दिले चौकशी करण्याचे आदेश

Pune: मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी मूळ वतनदारांचे जबाब नोंदवले

पुणे पोलिसांकडून नोंदवण्यात आले मूळ वतनदारांचे जबाब

आतापर्यंत पुणे पोलिसांनी एकूण २५ ते ३० जागा मालकांचे नोंदवले जबाब

गरज भासली तर सर्व २७५ जागा मालकांचे पुणे पोलीस नोंदवणार जबाब

पुणे पोलिसांनी शीतल तेजवानी, तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्यासह मूळ जमीन मालकांचे जबाब देखील घेतले नोंदून

मुंढव्यातील या जमिनीच्या मूळ मालकांकडून पुणे पोलिसांनी मागून घेतले संपूर्ण कागदपत्र

या जागेच्या संदर्भात मूळ वतनदारांकडे असणारे सर्व कागदपत्र पुणे पोलिसांनी तपासले

शितल तेजवानी आणि या मूळ मालकांमध्ये झालेला मुख्य व्यवहार पुणे पोलीस तपासणार

तर आम्हाला शीतल तेजवानी यांनी काही पैसे दिले असल्याची देखील जागामालकांची जबाबात कबुली

Pune: पुण्यात ३ डिसेंबरपर्यंत हरकती नोंदवण्याची संधी

पुणे

3 डिसेंबर पर्यंत हरकती नोंदवण्याची संधी

निवडणूक आयोगाची मतदार यादी बाबत सूचना

महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी तयार केलेल्या प्रारूप मतदार याद्यांमधील अनेक त्रुटी समोर आले आहेत

त्यावर हरकती सूचनांचा पाऊस पडत आहे त्यातच प्रशासनाकडून मतदार यादी उपलब्ध करून देण्यासही सुरुवातीला विलंब झाला होता

या पार्श्वभूमीवर हरकती नोंदवण्यासाठी 3 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे

दरम्यान बुधवारी सायंकाळपर्यंत पुण्यात 3343 हरकती नोंदविण्यात आले आहेत.

Sangola: रविवारी सांगोल्यात देवेंद्र फडणवीस यांची सभा

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना विरुद्ध भाजप अशी थेट लढत होत आहे. शिवसेनेचे माजी आमदार शहाजी पाटील यांनी भाजप समोर मोठं आव्हान उभे केले आहे. त्यामुळे येथे भाजपची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दरम्यान रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सांगोल्यात सभा होणार आहे.‌

चिन्हांचे वाटप होताच भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांच्यासह कार्यकर्ते घरोघरी जाऊन प्रचाराला लागले आहेत.

सांगोल्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांच्या पत्नी सुजाता केदार नगरसेवक पदासाठी निवडणूक लढवत आहेत. दरम्यान केदार यांनी कमळ चिन्ह न घेता आघाडीचे चिन्ह घेतले आहे. येत्या 30 नोव्हेंबर रोजी सांगोल्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा ही होणार आहे अशी माहिती जिल्हा अध्यक्ष चेतन केदार यांनी दिली.

Devandra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची 30 नोव्हेंबर रोजी अक्कलकोट येथे होणार सभा

- अक्कलकोट तालुक्यातील भाजप लढवत असलेल्या तीन नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस घेणार सभा.

- अक्कलकोट तालुक्यात भाजप विरुद्ध शिवसेना असा तिन्ही नगर परिषदेत होणार आहे सामना, दोन्ही पक्षांना काँग्रेसचा आव्हान असणार आहेत..

- माजी मंत्री शिवसेना नेते सिद्धाराम म्हात्रे यांच्यावर केली जोरदार टीका.

- अक्कलकोट तालुक्यातील अक्कलकोट, दुधनी आणि मैंदर्गी नगरपरिषद तिरंगी लढत होणार आहे.

- तीन वर्षात अक्कलकोट तालुक्यातील विकास कामांचा लेखाजोखा मांडून विकासाच्या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवणार.

- अक्कलकोट भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली माहिती.

Kolhapur: कोल्हापूरमध्ये हरकतींसाठी मुदत वाढवली

प्रारूप मतदार यादीमध्ये झालेल्या असंख्य चुकांमुळे कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिका क्षेत्रात मोठा गोंधळ उडाला आहे. या पार्श्वभूमीवर विविध पक्षांकडून केलेल्या मुदतवाढीच्या मागणीनुसार राज्य निवडणूक आयोगाने हरकती दाखल करण्याची मुदत तीन डिसेंबरपर्यंत वाढवली. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याची ही मुदत १० डिसेंबरपर्यंत वाढवली. त्यामुळे मतदार यादीचा सर्वच कार्यक्रम २२ डिसेंबरपर्यंत लांबला आहे.

Nalasopara: नालासोपाऱ्याच्या निलेमोरे गावातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात औषध गोळ्यांचा साठा

नालासोपाराच्या निलेमोरे गावातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यात मुदतकाळ संपलेल्या हजारो औषध गोळ्यांसह बॉटल टाकण्यात आल्या आहेत,

यामध्ये विविध कंपन्यांचे खोकल्याचे औषध, लिव्हरचे औषध असल्याचे बोलले जात आहे. यामुळे परिसरातील, गाई, कुत्रे अन्य जनावरांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

अजित पवार,चंद्रकांत पाटील,एकनाथ शिंदेंविरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाची निवडणूक आयोगाकडे तक्रार

निवडणूक प्रचारादरम्यान अजित पवार, चंद्रकांत पाटील ,एकनाथ शिंदे यांनी केलेल्या वक्तव्याविरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी केलेल्या वक्तव्याने निवडणूक आयोगाचा भंग केला असल्याचं राष्ट्रवादी शरद पवार गटाने टीका केली. लक्ष्मीदर्शनाशिवाय निवडणूक जिंकता येत नाही असा यांचा समज असल्याचा टोला गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यावर शशिकांत शिंदे लगावला. निवडणूक आयोग आमच्या तक्रारीची वाट का पाहतो त्यांना हे दिसत नाही का असा सवाल करत आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह हे उपस्थित केल. धाराशिव मध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार यांच्या प्रचारासाठी आल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

Parbhani: परभणीच्या पूर्णा तालुक्यातील मुंबर येथील 12 एकर ऊस जळून खाक

परभणीच्या पूर्णा तालुक्यातील मुंबर येथील ४ ते ५ शेतकऱ्याचा 12 एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.मध्यरात्री 1 ते 1.30 कोणी तरी अज्ञात व्यक्तीने या शिवारात आग लावली आहे असा आरोप शेतकरी करत आहेत तर शेतकऱ्यांनी तत्परता दाखवत आग विजवल्याने शेजारील जवळपास 10 एकर ऊस मोठ्या शर्थीच्या प्रकरणातून वाचवण्यात यश आले आहे.सखाराम व्यंकटराव शिंदे व बालासाहेब ज्ञानोबा शिंदे याचा 3 एकर व गोविंद माधव शिंदे यांचा 6 एकर व उध्दव हरीभाऊ शिंदे व भास्कर हरिभाऊ शिंदे यांचा 3 एकर असा एकूण १२ ऊस जळून खाक झाला त्यामधील पाईप ही जळाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.आग लावणाऱ्यांचा शोध घेवून कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे

मुंबई महानगर विकास प्राधिकरणाला 9 प्रकल्पांसाठी सरकारने 500 कोटींचे बिनव्याजी कर्ज वितरित

मुंबई महानगर विकास प्राधिकरणाला मुंबईपासून ठाण्याच्या नऊ प्रकल्पांसाठी सरकारने 500 कोटींचे बिनव्याजी कर्ज केले वितरित

नगर विकास विभागाकडून एमएमआरडीएला दहिसर, मीरा रोड, ठाणे , कल्याणच्या विविध मार्गावरील नऊ मेट्रो प्रकल्पासाठी हे कर्ज वितरित करण्यात आले आहे

मुंबई मेट्रो मार्ग 5 ठाणे कल्याण भिवंडी या मेट्रोसाठी 1 हजार 352 कोटी रुपयाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीपैकी 52 कोटी 38 लाख 60 हजार रुपये दुय्यम कर्जाच्या स्वरूपात वितरित करण्यास मान्यता

Yavatmal: माजी मुख्याधिकारी निवडणूकीच्या रिंगणाबाहेर,काॅग्रेसच्या प्रियंका मोघेंना दिलासा

यवतमाळ नगरपरिषदेच्या निवडणूकीतून माजी मुख्याधिकारी रिंगणाच्या बाहेर पडल्याने अखेर काॅग्रेसच्या उमेदवार प्रियंका मोघेंना दिलासा मिळाला असून माजी मुख्याधिकारी माधुरी मडावी यांचे अपिल न्यायालयाने फेटाळले त्यामुळे पालिकेतील लढत स्पष्ट झालीये. माजीमंत्री शिवाजीराव मोघे यांच्या सून प्रियंका मोघे ही काॅग्रेस कडून निवडणुकीच्या रिंगणात आहे.

Dharashiv: धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या न्यायालयीन लढ्याला यश,पीक विम्याचे 220 कोटी मिळणार

धाराशिव जिल्ह्यातील 2020 च्या प्रलंबित पीक विम्याचा मार्ग सुकर झाला असुन उच्च न्यायालयाने विमा कंपनीच्या विरोधात निकाल देत न्यायालयात जमा असलेले 75 कोटी रुपये व्याजासह तातडीने शेतकऱ्यांना वितरीत करण्याचे आदेश दिले आहेत.तसेच विमा कंपनीची राज्य सरकारने रोखलेली देय रक्कम ही शेतकऱ्यांना देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे आणखीन 220 कोटी रुपये मिळणार असुन शेतकऱ्यांनी दिलेल्या न्यायालयीन लढ्याला यश आल्याची माहिती भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

Nashik: नाशिकच्या ओझर गावात एका भाविकाचा दुर्दैवी मृत्यू

- बारागाड्या ओढत असताना बारागाड्यांच्या खाली येऊन मृत्यू

- चंपाषष्टीच्या दिवशी ओझर गावात बारागाड्या ओढण्याची आहे परंपरा

- बारागाड्या ओढण्याचा उत्सव पाहण्यासाठी आसपासच्या गावातील नागरिक करत असतात मोठ्या प्रमाणात गर्दी

- किरण कर्डक या युवकाचा बारागाड्यांच्या खाली येऊन दुर्दैवी मृत्यू

Pune: पुण्यात गेल्या सात महिन्यात 22 कोटींचा गुटखा जप्त

राज्यात गुटखा, पानमसाला संबंधित तंबाखू व सुपारी खरा मावा यासारख्या संबंधित अन्नपदार्थांचे उत्पादन व विक्री करणाऱ्यावर अन्न व औषध प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या कारवाई अंतर्गत मागील सात महिन्यात राज्यात सुमारे 22 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा गुटखा आणि अन्यमाल जप्त करण्यात आलाय गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची चोरट्या पद्धतीने विक्री करणाऱ्यांवर मुकोका कायद्यान्वये कारवाई करण्याबाबत एफडीए गांभीर्याने विचार करीत असल्याची माहिती.

Pune: पुण्यात दिवसा ऊबदार वातावरण, पहाटे कडाक्याची थंडी

बंगालच्या उपसागरासह अरबी समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात बाष्पयुक्त वारे वाहत आहेत.

तापमानात मोठी घट नसली तरी दिवसा ऊबदार हवामान तर उत्तररात्र आणि पहाटे कडाक्याची थंडी जाणवत आहे.

हे वातावरण २९ नोव्हेंबरपर्यंत कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

अरबी समुद्रातील हालचालींमुळे राज्यातील किमान तापमानात किंचित वाढ नोंदली झाली आहे

Nagpur: नागपूर शहरातील ४५ हजार दुबार मतदारांना मतदानापूर्वी हमीपत्र द्यावे लागणार

- प्रशासनाने सुरु केली दुबार मतदारांकडून हमीपत्र घेण्याची तयारी

- दुबार मतदारांना महानगरपालिका निवडणूकीत एकाच ठिकाणी मतदान करता येणार

- दुबार मतदारांनी हमीपत्र द्यावे, असं आवाहन मनपाच्या निवडणूक विभागाने केलंय

- प्रारुप मतदार यादीत ४५ हजार दुबार मतदारांपुढे डबलस्टार

- नागपूर महानगरपालिका हद्दीत सध्या २४ लाख ८२ हजार ४७५ मतदार

सुषमा अंधारे यांनी मनमाडच्या सभेत, निवडणूक आयोग यांच्यावर केली टीका

मनमाड नगर परिषदेच्या निवडणुकी निमित्ताने शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते,सभेत बोलताना अंधारे यांनी भाजप,शिवसेना गटाचे नेते गुलाबराव पाटील यांच्यासह निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली,आताची भाजप घोटाळे बाज झाली असल्याची टीका त्यांनी भाषणात केली.

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप

सांगलीच्या उरूण-ईश्वरपूर नगरपरिषदेच्या निवडणुकी दरम्यान हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवारांना राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे,तर विरोधकांना पराभव दिसत असल्याने खोटा आरोप केल्याचं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.तर याप्रकरणी दोन्ही गटाच्या तक्रारी दाखल करण्यात येत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

जालन्यातील नांजा गावात अवैध गर्भलिंग निदानाचा गोरखधंदा उघड ,दोन आरोपी अटक

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातल्या नांजा गावात अवैध गर्भलिंग निदान करणारे रॅकेट उघडकीस आलय, आरोग्य विभाग आणि जालना पोलिसांनी एकत्रित केलेल्या कारवाईत हा अवैध आणि बेकायदेशीर धंदा उघडकीस आला, जालन्यातील लांजा गावातील पत्र्याच्या शेडमध्ये गुप्तपणे गर्भलिंग तपास केला जात असल्याचे समोर आले. त्यावरून या पथकाने अचानक छापा टाकत केशव गावंडे आणि सतीश सोनवणे या दोन आरोपींना अटक केलं यातील एक आरोपी पॅथॉलॉजिस्ट असल्याचे तपासात समोर आले असून यातील दुसऱ्या आरोपीवर यापूर्वी देखील अशाच प्रकरणात गुन्हा दाखल झालेला आहे.दरम्यान संयुक्त पथकाने केलेल्या कारवाईमध्ये पेनाच्या आकाराचे गर्भलिंग निदान करणारे सूक्ष्म उपकरण जप्त करण्यात आले. असून हे मशीन मोबाईल ॲपशी जोडून गर्भलिंग तपास केल जात असल्याचं समोर आलाय,स्थानिक पातळीवर हा गोरखधंदा सुरू असताना त्या ठिकाणी तीन पुरुष आणि तीन महिलाही आढळून आल्या. याप्रकरणी दोन मुख्य आरोपीसह इतर सहा महिला आणि पुरुष यावर देखील भोकरदन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'शौक बड़ी चीज है'; चक्क १.१७ कोटींची नंबर प्लेट, VIP आकडा पाहून व्हाल थक्क

Mumbai: एकटक पाहत अश्लील हावभाव अन् चाळे, तरुणीने तरुणाला जन्माची अद्दल घडवली; रेल्वे स्थानकावरच धूधू धुतला; पाहा VIDEO

मोठी किंमत मोजावी लागेल, 'व्हाईट हाऊस'जवळच्या गोळीबारावर ट्रम्प संतापले, म्हणाले दहशतवादी....

Shocking : नवऱ्याचे अनैतिक संबंध, गर्लफ्रेंडसोबतचे अश्लील फोटो दाखवायचा, लग्नानंतर ६ महिन्यात बायकोने केली आत्महत्या, शेवटच्या चिठ्ठीत...

Government Job: १०वी पास आहात? सुरक्षा मंत्रालयाच्या कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी; अर्ज कसा करायचा?

SCROLL FOR NEXT