Maharashtra News Live Update saam tv
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update : जळगाव विधान परिषदेत निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन 577 मतांनी विजयी

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : मुंबईत मान्सूनचे आगमन, शहरासह उपनगरात मुसळधार पावसाचा अंदाज, विधान परिषद निवडणुकीचा निकाल, आजपासून पावसाळी अधिवेशन, ठाकरेंच्या ६ खासदारांचा आज शिंदेसेनेत होणार प्रवेश, देशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

धाराशिव - बीड- लातुर विधानपरिषद निवडणुकीत भाजपाचे उमेदवार बसवराज पाटलांचा दणदणीत विजय

धाराशिव बीड लातुर विधानपरिषद निवडणुकीत

भाजपाचे उमेदवार बसवराज पाटलांचा दणदणीत विजय

721 मतांनी काँग्रेसचे उमेदवार महेश देशमुख यांना चारली पराभवाची धूळ

राज्यात सर्वाधिक मताधिक्य घेऊन विजयी असण्याची शक्यता

845 मतांसह बसवराज पाटील विजयी

महाविकास आघाडीच्या मतालाही धक्का

जळगाव विधान परिषदेत निवडणुकीत महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन 577 मतांनी विजयी

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन 577 हून अधिक मतांनी विजयी

महाविकास आघाडीचे शरद तायडे यांना 5 मत

सोलापूरमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे राजेंद्र राऊत विजयी

सोलापूरमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे राजेंद्र राऊत 365 मतांनी विजयी

विजयानंतर कार्यकर्त्यांनी केला जल्लोष

Nagpur : नागपूरमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे राजीव पोतदार विजयी

नागपूरमध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपचे राजीव पोतदार विजयी

विजयानंतर कार्यकर्त्यांनी केला जल्लोष

सांगली-सातारा विधानपरिषद प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात

शिवसेना महायुतीचे उमेदवार सईद खान यांचा विजय

पहिल्या पसंतीचे २४२ मते मिळाल्याने विजय

दुसऱ्या नंबर महाविकास आघाडीचे उमेदवार विवेक नवंदर

Nanded : नांदेडमध्ये विधानपरिषद निवडणुकीत भाजपाचे अमरनाथ राजूरकर यांचा विजय

नांदेडमध्ये विधानपरिषद निवडणुकीत भाजपाचे अमरनाथ राजूरकर यांचा विजय.

अमरनाथ राजूरकर यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी ढोल ताशाच्या गजरात केला जल्लोष.

अशोक चव्हाण राजकारणातील धुरंदर अशा आशयाचे बॅनर घेऊन कार्यकर्त्यांनी केला जल्लोष.

परभणीत शिवसेना महायुतीचे उमेदवार सईद खान यांचा विजय

परभणीत शिवसेना महायुतीचे उमेदवार सईद खान यांचा विजय

पहिल्या पसंतीचे २४२ मते मिळाल्याने विजय

दुसऱ्या नंबरवर महाविकास आघाडीचे उमेदवार विवेक नवंदर

आरक्षणाच्या उपवर्गीकरणाविरोधात आंबेडकरी समाजाचा निर्धार; बीड ते मुंबई ‘लाँग मार्च’ लोणावळ्यात दाखल.

अनुसूचित जाती-जमाती आरक्षणाचे उपवर्गीकरण होऊ नये, या प्रमुख मागणीसाठी बीड येथून निघालेला आंबेडकरी समाजाचा भव्य पायी ‘लाँग मार्च’ आता लोणावळा येथे पोहोचला आहे.

10 जून रोजी बीडमधून मुंबईच्या दिशेने कूच केलेल्या या मार्चमध्ये राज्यभरातील हजारो आंबेडकरी अनुयायी सहभागी झाले असून, मार्गक्रमणादरम्यान विविध ठिकाणी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात येत आहे.

Dharashiv : धाराशिवमध्ये भाजपच्या विजय रथाची सजावट

धाराशिव मध्ये भाजपच्या विजय रथाची सजावट

मतमोजणीला सुरुवात, दुसरीकडे निकाला अगोदरच भाजपकडून जल्लोषाची तयारी

धाराशिव बीड लातूर विधान परिषदेत भाजप विरुद्ध काँग्रेस लढत

विजयाची खात्री आहे त्यामुळेच आम्ही तयारी करत आहोत भाजप कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया

कोंढापुरी तलाव कोरडा; शिरूर तालुक्यात पाणीटंचाईचे गंभीर संकट

शिरूर तालुक्यातील कोंढापुरी तलाव कोरडा पडल्याने रांजणगाव गणपती, शिक्रापूर आणि परिसरातील गावांमध्ये तीव्र पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. तलावातील पाणीसाठा संपुष्टात आल्याने हजारो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

चाकण एसटी बसस्थानकाची दुर्दशा; कचरा आणि भाजीमंडईमुळे प्रवाशांचे हाल

औद्योगिक नगरी म्हणून ओळख असलेल्या चाकणमधील एसटी बसस्थानकाची दयनीय अवस्था समोर आली आहे.

बसस्थानक परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरले असून दुसरीकडे भाजीमंडईचा बाजार भरत असल्याने एसटी बसना स्थानकात प्रवेश करण्यासही अडथळे निर्माण होत आहेत.

परिणामी प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे नगरसेवक मजनू नाटेकर यांचे नगरसेवक पद रद्द होणार?

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घडामोड समोर आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभाग क्रमांक १०-अ मधील विद्यमान नगरसेवक मजनू नाटेकर यांचे अनुसूचित जाती (महार) प्रवर्गातील जातवैधता प्रमाणपत्र पुणे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरवून रद्द केले आहे.

महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन आणि महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे यांच्या मधे थेट लढत

जळगाव विधान परिषदेचा निकाल आज लागत आहे या मधे महायुतीचा उमेदवार विजयी होणार की महाविकास आघाडी चा उमेदवार विजयी होणार या कडे सगळ्यांच लक्ष लागले आहे.

जळगाव विधान परिषदेची निवडणूक महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन आणि महा विकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे यांच्या मधे चुरशीची होईल असे चिन्हे असताना, अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवला होता तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाच्या रेशमा काळे यांनी बंडखोरी केल्याने ही निवडणूक राज्यभर चर्चेचा विषय बनली होती.

Maharashtra News Live Update: - विधान परिषद निवडणुकीची आज मतमोजणी, निकालाकडे सर्वांचे लक्ष

छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेच्या निवडणुकीची आज मतमोजणी होणार आहे. सकाळी ८ वाजल्यापासून रेल्वे स्टेशन रोडवरील शासकीय औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयात ही मतमोजणी होत आहे. चार टेबलवर ही मतमोजणी होणार असून त्यासाठी ६५ अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एकूण ६३७ मतदारांपैकी ६३० जणांनी मतदान केले. निवडणूक रिंगणात महायुतीचे सुहा शिरसाठ, महाविकास आघाडीचे गणे लोखंडे तर अपक्ष इसाक खान तीन उमेदवार असले तरी खरी लढत शिरसाठ आणि लोखंडे यांच्यातच होत असल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : नवी मुंबईत हिट अँड रनचा थरार! अवजड वाहनाच्या धडकेत बाईकरचा जागीच मृत्यू; चालक फरार

ट्रेडमिलवर धावूनही वजन कमी होत नाहीये? मग आजच बदला पद्धत; फॉलो करा 'या' ५ सोप्या स्टेप्स

Raigad : कातळकड्यांमधून निघणारी वाट, 'हा' ऐतिहासिक किल्ला चढताना प्रत्येक पावलावर वाढतो थरार

Crime : सोलापूर हादरले! शेतकरी नेत्यावर तलवारीने सपासप वार, स्कॉर्पिओमधून आले अन्...

Veen Doghantali Hi Tutena Video : "तु माझी मी तुझा गं सात जन्मभर..."; वटपौर्णिमेला समर-स्वानंदीच्या नात्यांची वीण आणखी घट्ट होणार, प्रेमाला बहर येणार

SCROLL FOR NEXT