Maharashtra News Live Update Saam Tv News
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Marathi Breaking Live Headlines Updates : राज्यात ऑक्टोबर हिट, दुष्काळग्रस्त भागांचा पंचनामा, महाराष्ट्रासह देशातील राजकीय घडामोडी, महाराष्ट्रातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

धाराशिवमध्ये दुष्काळाचे चित्र बनले अधिकच गडद,पाणी टंचाईच्या झळा

:धाराशिव जिल्ह्यात दुष्काळाचे चित्र अधिकच अधिकच गडद होत आहे.पावसाच्या आशेवर आणि उपलब्ध पाण्याच्या जिवावर शेतकऱ्यांना फळबागा व भाजीपाला केला मात्र पावसाने दडी मारली आणि उपलब्ध पाणी साठा देखील कमी झाला त्यामुळे अर्धा एकरावरील कोबी प्लॉट ऐन बहरात असतानाच पाणी मिळत नसल्याने मातीमोल होण्याच्या मार्गावर आहे.कोबीची वाढ खुंटली व किड रोगांचा प्रादुर्भाव वाढला त्यामुळे केलेला लाखो रुपये खर्च वाया जाणार आहे.कळंब तालुक्यातील आंदोरा परीसरातील शेतकरी शहाजी तांबारे यांनी संताप व्यक्त केलाय,दुष्काळ जाहीर झाला तो केवळ कागदावर झाला आहे,सरकार फक्त जाहीर करतय देत काहीच नाही अशी संतप्त प्रतिक्रिया या शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

अकोल्यात पिक कापणी प्रयोगातून सोयाबीनची उत्पादकता हेक्टरी शून्य किलोपासून अवघ्या 40 किलोपर्यंत

यंदा अकोला जिल्ह्यात सोयाबीनची उत्पादकता हेक्टरी शून्य किलोपासून अवघ्या 40 किलोपर्यंत आलीय. ही परिस्थिती वेगवेगळ्या ठिकाणच्या पिक कापणी प्रयोगांतून दिसून येत आहे. काही ठिकाणी तर शेतकऱ्यांनी पेरलेल्या बियाण्या इतकेही उत्पादन हाती येण्याची शक्यता नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे पीक काढणी आणि लागवन खर्चही निघणार नाहीये. अनेक शेतकऱ्यांसमोर पीक काढायचे की तसेच सोडून द्यायचे, असा प्रश्न निर्माण झाला

मिरज रुग्णालय कमान प्रकरणी ठेकेदार,रुग्णालय अधिष्ठाता व विभागीय अभियंत्यावर गुन्हा दाखल करा - डॉ. महेशकुमार कांबळे

सांगलीच्या मिरजेतील शासकीय रुग्णालयाची कमाल कोसळल्या प्रकरणी ठेकेदार व संबंधित दोषींना वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप स्वाभिमानी आंबेडकरी संघटनेचे नेते डॉक्टर महेशकुमार कांबळे यांनी केला आहे. या सर्व प्रकरणात निष्काळजी आणि संगनमताने भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोप कांबळे यांनी करत संबंधित ठेकेदार ,कोल्हापूर विभागीय सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता आणि शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठता यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील महेशकुमार कांबळे यांनी केले असून प्रशासनाने यांच्यावर कोणी दाखल न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महेशकुमार कांबळे यांनी दिला आहे.

रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

सोलापुरात रंगभवन चौकात रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास भीषण अपघात झाला. बसखाली आल्याने सायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.रेवप्पा सोमनाथ कांबळे असे मृत सायकलस्वाराचे नाव आहे. ते एका अपार्टमेंटमध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून कार्यरत होते.ड्युटी संपल्यानंतर रेवप्पा कांबळे हे सायकलवरून घरी जात असताना रंगभवन चौक परिसरात त्यांच्या सायकलला अपघात झाला. यावेळी बसखाली आल्याने गंभीर जखमी झाले. या दुर्घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दुर्घटनेनंतर रंगभवन चौकात काही काळ मोठी गर्दी झाली होती. सोलापूर शहरात गेल्या तीन दिवसात दोन जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे..

महायुतीत खलबतं? Eknath Shinde दिल्ली दौऱ्यावर?

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौराआज दुपारी एकनाथ शिंदे दिल्लीला येणार केंद्रातील काही महत्वाच्या नेत्यांच्या घेणार भेटीगाठी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे यांचा होणार दौरा महत्वाचासूत्रांची माहिती

नागपूर महानगर पालिकेने थकबाकीदारांकडून ४१ दिवसात वसूल केले ५० कोटी रुपये

- महापालिकेच्या विविध विभागात कार्यरत असलेल्या मालमत्ता कर विभागांशी संबंधित कर्मचाऱ्यांना पाचारण करून करवसुलीसाठी ४१ दिवसाची विशेष मोहीम राबविण्यात आली.

- या मोहिमेबाबत मनपा आयुक्त डॉ विपिन इटनकर यांनी घेतल्या अनेक बैठका.थकबाकीदारांवर कोणतीही दयामया न दाखविण्याच्या दिल्या होत्या सूचना..

उत्तर सोलापूर तालुक्यातील दुष्काळी भागांची पाहणी अंतिम टप्प्यात ; दोन दिवसात अहवाल राज्य सरकारला पाठवणार

उत्तर सोलापूर तालुक्यातील तहसीलदार,तलाठी,कृषी अधिकारी शेतीचे पंचनामे करण्यासाठी बांधावर दाखल..

उत्तर सोलापूर तालुक्यातील बहुतांश खरीप पीक झाली आहेत मातीमोल,

पाण्याविना तूर पिकाची वाढ खुटली

शेतीच्या दाहक परिस्थितीचा पंचनामा करून अधिकारी घेतायत आढावा

उत्तर सोलापूर तालुक्यातील प्रताप नगर भागातील शेतीचा पंचनामा सुरु असताना लवकरातलवकर शासनाकडून मदत मिळण्याची शेतकऱ्यांची अपेक्षा

खरीप पीक पुरत वाया गेल्यामुळे हातचा 'विळा ही गेला आणि भोपळा ही गेला' आशा व्यक्त केल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी भावना

यवतमाळात ऑक्टोबर हीटचा तडाखा,तापमान 35.2 अंशावर

पावसाने पाठ फिरवताच यवतमाळ जिल्ह्यात ऋतूचक्राने अचानक कलाटणी घेतली असून गेले काही दिवस आल्हाददायक वाटणाऱ्या वातावरणात आता तीव्र उन्हाच्या झळा जाणू लागल्यात यामुळे नागरिकांना ऑक्टोंबर हीट चा सामना करावा लागत आहे.रविवारी पारा 35.2 अंशावर गेला होता,पुढील दोन दिवसात तापमान 37 अंशावर पोहोचण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.तीन वर्षातील हे सर्वाधिक तापमान आहे.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

रायगड जिल्ह्यात महायुतीमध्ये अजूनही खटके उडत असून आलबेल नसल्याचं चित्र आहे. विकास कामांच्या श्रेयावरून अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी खासदार सुनील तटकरे यांना लक्ष्य केलं होत. आपण निधी दिलेला असताना त्याचं उद्घाटन तटकरेंनी केलं, त्या कार्यक्रमाला सुद्धा बोलावलं नाही नसल्याचा आरोप आ. दळवी यांनी सुनिल तटकरे यांच्यावर केला होता. त्याला आमदार अनिकेत तटकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. निवडणुका आल्याकी तटकरे यांच्या पायाशी येतात निवडणूक संपली की कोण तटकरे असं विचारू लागतात. आमची जर मतदार संघात ताकद नसेल तर आमच्यावर टीका करण्यात वेळ घालवण्यापेक्षा लोकांच्या विकासकामांकडे लक्ष द्या, असा सल्ला अनिकेत तटकरेंनी दळवींना दिला. आमचं काम हाथी चाले बाजार ..... या पद्धतीने सुरू असतं असंही ते म्हणाले. यापुढे टीका झाली तर जशास तसं उत्तर दिलं जाईल, असा इशाराही अनिकेत तटकरे यांनी दिला आहे.

पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचे डाॅ.बी.पी रोंगे यांच बंडखोरी

पुणे शिक्षक मतदार संघात भाजपने कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर पंढरपूर येथील डाॅ.बी.पी रोंगे यांनी बंडाचे निशाण फडकावले. रोंगींच्या बंडखोरीमुळे पुणे शिक्षक मतदार संघात भाजपला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान बी.पी. रोंगे आज सकाळी विठ्ठलाचे दर्शन घेऊन उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पुण्याला रवाना झाले.

छत्रपती संभाजीनगर : पाण्यासाठी सातारा-देवळाई परिसरातील नागरिकांचे आंदोलन

छत्रपती संभाजी नगर शहरातील सातारा, देवळाई परिसरात निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईविरोधात नागरिकांचा संताप उफाळून आला. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसह परिसरातील नागरिकांनी सकाळी साडेदहाला देवळाई परिसरातील हरिओमनगर येथील पाण्याच्या टाकीच्या खाली परिसरातील नागरिक एकत्र येत धरणे आंदोलन केले. सातारा देवळाईवासीयांना हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने सातारा देवळाई परिसरातील भूजलपातळीत मोठी घट झाली आहे. परिणामी, बहुतांश बोअरवेल आटल्याने नागरिकांसमोर पाण्याचे गंभीर संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे नागरिकांना विकतचे पाणी घेण्याची वेळ आली आहे. तसेच परिसरातील पाण्याच्या टाकीत उपलब्ध असलेले पाणी खासगी टँकरद्वारे कमी दरात नागरिकांना उपलब्ध करून द्यावे, तसेच भूमिगत टाकण्यात आलेल्या पाइपलाइनला नळजोडण्या द्याव्यात, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. दरम्यान, आंदोलनातील काही नागरिक पाण्याच्या टाकीवर जाऊन घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. मागण्या तातडीने मान्य न केल्यास आगामी काही दिवसांत देवळाई चौकासह धुळे-सोलापूर महामार्ग बंद करण्याचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सातारा पोलिस ठाण्याचे कर्मचारी खबरदारीचा उपाय म्हणून घटनास्थळी उपस्थित होते.

शहरात मद्यधुंद तरुणाचा दुकानात राडा, घटना CCTV कॅमेरात कैद

-लातूर शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत जाताना दिसत आहे, शहरातल्या विवेकानंद पोलीस ठाणे हद्दीत, एका दुकानांमध्ये मध्य धुंद तरुणाचा राडा पाहायला मिळाला. दुकानात दुचाकी घालत, दुकान चालकाला आणि ग्राहकांना शिवीगाळ करत धनकवल्याची माहिती समोर आहे. दरम्यान लातूर शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी प्रवर्तिच्या घटना वाढत जात असल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर सामान्य नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातो आहे

Maharashtra News Live Update: ई पीक पाहणीत 'हापूस'ला स्वतंत्र ओळख द्या रत्नागिरीतील शेतकऱ्यांची मागणी

कोकणातील आंबा बागायतदारांच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वाचा असलेल्या ई-पीक पाहणीतील वाणांच्या नोंदीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शासनाच्या DCS अॅपमध्ये आंबा पिकाची नोंद करताना मूळ 'हापूस'ऐवजी 'कोकण रुची' असा पर्याय दिसत असल्याने शेतकरी वर्गात तीव्र संभ्रम व असंतोष पसरला आहे. ई पीक पाहणीत 'हापूस'ला स्वतंत्र ओळख द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.. प्रत्यक्ष शेतात हापूसची लागवड असताना सरकारी डिजिटल नोंदीत त्याची स्वतंत्र ओळख न दिसणे ही केवळ तांत्रिक चूक नसून भविष्यातील कृषी नियोजन, पीक विमा, शासकीय भरपाई व योजनांवर परिणाम करणारी गंभीर बाब असल्याचे मत व्यक्त होत आहे. या प्रश्नावर कोकणातील युवा शेतकरी नेतृत्व तथा अधिवक्ता अॅड. ज्ञानेश पोतकर यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. डिजिटल पीक पाहणीत हापूसची स्वतंत्र नोंद असणे हा बागायतदारांचा अधिकार आहे. हापूससोबतच केशर, पायरी, रत्ना, सिंधु या आंब्याच्या जाती तसेच काजू, कोकम व इतर फळपिकांचीही स्वतंत्र नोंद प्रणालीत उपलब्ध झाली पाहिजे," असा ठाम आग्रह अॅड. पोतकर यांनी धरला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

Ladki Bahin Yojana : ऑक्टोबर सुरू झाला, लाडकीच्या खात्यात सप्टेंबरचे ₹१५०० कधी जमा होणार? महत्त्वाची अपडेट आली समोर

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

SCROLL FOR NEXT