छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात पैठण संभाजीनगर महामार्गावर ढोरकिन येथे बेकायदेशीर रित्या गोवांशाच्या मासाची विक्री करण्यासाठी निघालेल्या दोन जणांना एमआयडीसी पैठण पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पोलिसांनी त्यांच्याकडून 30 किलो गोवंशाचे मास जप्त केले असून त्यांच्याविरुद्ध एमआयडीसी पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. दरम्यान सदरील गोमांस कोठून खरेदी केले, जनावरांची कत्तल कुठे झाली आणि ही गोमांस कोणाला विक्रीसाठी जात होते अशा विविध बाबींचा सखोल तपास आता पोलीस करत आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने सरकार आणि पालिका प्रशासनाला बेकायदेशीर फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून फैलावर घेतलं. मंत्रालय आणि राजभवनाबाहेर फेरीवाल्यांना स्टॉल लावू द्याल का? असा मुंबई उच्च न्यायालयाने पालिका आणि राज्य सरकारला संतप्त सवाल केलाय.
काँग्रेसची उद्या दुपारी ३ वाजत दिल्लीत महत्वाची बैठक होणार आहे. महाराष्ट्रातून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड यांसह महत्वाचे नेते बैठकीला उपस्थित राहणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बैठकीला महत्व प्राप्त झाले आहेत. संघटन सरचिटणीस के सी वेणुगोपाल यांच्यासोबत बैठक होणार आहे.
मुंबईच्या विक्रोळीत कन्नमवारनगरमधील इमारत क्रं २३३ या इमारतीचे पुनर्विकासाचे काम चालू आहे. हे काम चालू असताना पायलिंग क्रेन कोसळण्याची घटना घडली आहे. सुदैवाने रस्त्यावर असलेले एक झाड आणि टेम्पोवर क्रेनचा भाग अडकला. यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे. घटनास्थळी अग्निशमन दल,पोलीस दाखल झाले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिवाजी विद्यापीठाला मुसळधार पावसाचा फटका बसला आहे.
या पावसामुळे 23 आणि 24 जुलै रोजी होणाऱ्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत.
सह्याद्री अतिथीगृहातील बैठक संपताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक होणार आहे. मराठा आरक्षण प्रश्नी शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा झाल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चर्चा होणार आहे. सांयकाळी ६ .३० पर्यंत मुख्यमंत्री शिंदे फडणवीस यांच्यात बैठक होणार असल्याची माहिती मिळत आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते निलेश निकम यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.
निलेश निकम यांच्या पत्रात उर्दू मजकुरात त्यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.
यासंदर्भात शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये निलेश निकम पत्र घेऊन पोहोचले.
यापूर्वीही त्यांना जीवे मारण्याची धमकी पत्राद्वारे देण्यात आली होती.
मनोरमा खेडकर यांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला आहे. मनोरमा खेडकर यांची रवानगी येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. न्यायालयाने आज मनोरमा खेडकर यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मनोरमा खेडकर यांच्या वकिलांनी यांची सुटका व्हावी, यासाठी तात्काळ जामीन अर्ज दाखल केला होता. शेतकऱ्यांना पिस्तूल घेऊन धमकवल्याप्रकरणी मनोरमा खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल आहे. मनोरमा खेडेकर या वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या मातोश्री आहेत.
NEET प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुरू असलेली आजची सुनावणी संपली. NEET परिक्षेत एका प्रश्नाला दोन्ही पर्याय योग्य असल्याने 44 विद्यार्थ्यांना बोनस गुण मिळाले होते. त्यामुळं 4.2 लाख उमेदवारांचे नुकसान झाल्याने कोर्टाने यावर IIT दिल्लीच्या तज्ज्ञांचे मत घेतले पाहिजे असं म्हटलं. कोर्टाने IIT दिल्लीच्या संचालकांना 3 तज्ञांची टीम तयार करून या विषयावर अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. उद्याही या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.
राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यांचे राज्य सरकारने आदेश दिले आहेत. 33 टक्के पेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतीचे वस्तुनिष्ठ पंचनामे विभागीय आयुक्त मार्फत सादर करण्याचा पत्रात उल्लेख आहे.
मुंबईमधील लोकल रेल्वेचा प्रश्न खासदार अनिल देसाई यांनी मांडला. लोकलमधून प्रवास करणं म्हणजे युद्धभूमीवर जाण्यासारखं झालं आहे. त्यामुळे रेल्वे मंत्रालयाने गाड्यांची संख्या वाढवावी. यामुळे अनेक प्रवाशांचा बळी जातो, याबाबत सरकारने लक्ष घालावे, असा मुद्दा अनिल देसाई यांनी अधोरेखित केला आहे.
चर्चगेट स्थानकावरील फलाट क्रमांक 2 च्या ओव्हरहेड वायरवर जॅकेट अडकले आहे. जॅकेट असल्याने पश्चिम रेल्वेची विरारच्या दिशेने जाणारी वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे. जवळपास १० ते १५ मिनिटं पश्चिम रेल्वेची वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे. ओव्हरहेड वायरवर पडलेलं जॅकेट काढण्याचे RPF जवानांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
IAS पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मनोरमा खेडकर या वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई आहेत. शेतकऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवल्याप्रकरणी त्यांच्यावर पुण्यातील पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस कोठडी संपल्यानंतर आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.
मुलुंडमध्ये भरधाव ऑडी कारने दोन रिक्षांना धडक दिली होती. यामध्ये दोन्ही रिक्षाच्या चालकांसोबत दोन प्रवासी जखमी झाले होते. अपघातानंतर फरार झालेल्या कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतेले आहे. चालकाची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून रक्ताच्या नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत.
पुण्याच्या पौड पोलिसांनी मनोरमा खेडकरला कोर्टात हजर केलं. पूजा खेडेकरची आई मनोरमा खेडकरची पोलिस कोठडी आज संपणार आहे. पुणे पोलिसांकडून तीन दिवसांच्या पोलिस कोठडीची मागणी करण्यात येण्याची शक्यता आहे. पौड पोलीस स्टेशनमध्ये मनोरमा खेडकर यांच्यासह इतर सहा जणांवर गुन्हा दाखल आहे. या सहाही जणांचा पुणे ग्रामीण पोलिसांकडून शोध घेतला जात आहे.
परदेशातून होणारी आयात ठप्प झाल्याने काजूचे दर वाढले. १ किलो काजुचा दर १००० रुपयांवर पोहचला. घाउक आणि किरकोळ बाजारात काजूच्या भावात वाढ झाली आहे. खराब हवामान आणि अवेळी झालेल्या पावसाचा सुद्धा काजू उत्पादकांना फटका बसला आहे. काजूच्या दरामध्ये प्रतिकिलो मागे १५० ते २०० रुपयांनी वाढ झाली आहे. ६०० रुपयांना मिळत असलेला साधा काजू ८०० ते ९०० रुपयांना तर चांगल्या काजूचा भाव १००० रुपयांवर पोहचला आहे.
खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या निवडीला राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवार अर्चना पाटील यांनी आव्हान दिलंय. ओमराजे निंबाळकर यांच्यासह ३१ उमेदवारांना प्रतिवादी केलंय. लोकसभा निवडणुकीत गैरप्रकार घडले आहेत. निवडणूक प्रक्रिया योग्य प्रकारे पार पडली नसल्याचा आरोप याचिकेत केलाय.
विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपा आमदार गणेश नाईक अॅक्टिव्ह झालेले पहायला मिळत आहेत. गणेश नाईक यांचा आजपासून विभागनिहाय जनसंवाद दौरा सुरु करण्यात आलाय. मतदार संघातील ऐरोली विभागातून त्यांच्या जनसंवाद दौऱ्याला सुरुवात झालीय. प्रत्येक विभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
वर्ध्यात प्रेम प्रकरणातून युवकाचा खून तर युवती गंभीर जखमी झाल्याचं समोर आलंय. मध्यरात्री लोखंडी रॉडने डोक्यावर वार करून आरोपीने युवकाची हत्या केलीय. या घटनेत तरूणी गंभीर जखमी झालीय.
पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये ५० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पुण्यातील मागील गेल्या २ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे धरणातील पाणी पातळीत वाढ झालीय. चार धरणात एकूण १४.६३ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे.
बीडमध्ये वेगवेगळ्या पतसंस्थांमध्ये झालेल्या आर्थिक गैरव्यवहारानंतर ठेविदारांचे कोट्यावधी रुपये अडकले आहेत. हे पैसे मिळावेत, या मागणीसाठी ठेवेदारानी बीडच्या अण्णाभाऊ साठे चौकामध्ये रस्ता रोको आंदोलन केले. जवळपास एक तास हे आंदोलन सुरू होते. यामुळे शहरातील वाहतूक विस्कळीत झाली होती. यानंतर प्रशासनाने निवेदन स्वीकारत ठोस आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेतले.
उद्या संघ आणि भाजपची मुंबईत महत्त्वपूर्ण बैठक आहे. प्रदेश भाजपच्या संघटन मंत्र्यांसह संघाचे मोजके प्रमुख पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीला मोठं महत्त्व आहे.
उत्तराखंड मधील केदारनाथ जाताना गौरीकुंड जवळ चीरबासामध्ये दरड कोसळून नागपूर जिल्ह्यातील खापा मधील एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. मृत तरुणाचे युवक नाव किशोर अरुण पराते (30.रा.डोंगेघाट खापा ) आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविकांत तुपकर अॅक्टिव्ह झालेत. पुण्यात रविकांत तुपकरांनी महत्वाची बैठक बोलावली. 24 जुलै रोजी तुपकर यांनी राज्यभरातील कार्यकर्त्यांची बोलावली महत्वाची बैठक आयोजित केलीय. बैठकीला राज्यभरातील चळवळीतील प्रमुख नेत्यांना आमंत्रण दिलं गेलंय.
गडचिरोली जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. दरम्यान या पावसामुळे जिल्ह्यातील एकमेव सिंचन तलाव असलेला दीना धरण ओव्हर फ्लो झाला आहे. धरणाच्या सांडव्यावरून पाणी ओसंडून वाहत असल्याने येथे पर्यटकांची गर्दी वाढत आहे. पर्यटकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले.
पालघर जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग
जिल्ह्यात 24 तासांत 628 mm पावसाची नोंद
मुसळधार पावसामुळं नदी-नाले दुथडी वाहताहेत
सखल भागांत पाणी साचले
मुंबई-अहमदबाद महामार्गावरील वाहतूक संथगतीने
सरकारला नीटबाबत चर्चा करायची नाही.
तरुणांसाठी नीट हा महत्त्वाचा मुद्दा आहे.
या मुद्द्यावर आम्ही आवाज उठवणार
नीटबाबत चर्चा होणं गरजेचं आहे
नीटविषयी संसदेत मंत्र्यांनी योग्य उत्तर दिलं नाही.
राहुल गांधी यांचा धर्मेंद्र प्रधान यांच्यावर आरोप
दिल्लीत उद्या 4 वाजता काँग्रेस नेत्यांची बैठक
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक
काँग्रेस सरचिटणीस के सी वेणुगोपाल, प्रभारी रमेश चैन्नीथला असणार उपस्थित
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार यांच्यासह काँग्रेस नेते राहणार उपस्थित
पाट्यांवर नाव लिहिणं चुकीचं, याचिकाकर्त्यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तिवाद
अनेक वर्षांपासून ही यात्रा सुरू आहे - याचिकाकर्ते
प्रत्येक धर्मातील लोक कावड यात्रेचे स्वागत करतात - याचिकाकर्ते
सरकारचा हा आदेश आहे की प्रेस नोट आहे, कोर्टाचा सवाल
दिघा ईश्वरनगर येथे मनसे खड्ड्यांविरोधात झंडू बाम आंदोलन करत आहे. खड्ड्यात बसून मनपा विभाग कार्यालयावर मोर्चा काढला. दिघा विभागातील अंतर्गत रस्त्यांची चाळण झाल्याने मनसे आक्रमक झाल्याचं दिसतंय.
मुंबईत NDRF ची तीन पथके तैनात करण्यात आली आहेत. मुंबईत काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर NDRF ची तीन पथके तैनात मुंबईत तैनात करण्यात आलीत. याशिवाय वसई (पालघर), ठाणे, घाटकोपर, पवई (कुर्ला), महाड (रायगड), खेड आणि चिपळूण (रत्नागिरी), कुडाळ (सिंधुदुर्ग), कोल्हापूर, सांगली, सातारा या ठिकाणी देखील एनडीआरएफ पथके तैनात करण्यात आली आहेत.
हिंगोलीत एका तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केलीय. मराठा आरक्षणासंदर्भात नोट सापडल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथील घटना आहे.
कल्याण रेल्वे अपडेट समोर आलंय. कल्याण रेल्वे स्थानकाजवळील सिग्नल यंत्रणेतील बिघाड दुरुस्त झालाय. मात्र, लोकल सेवा 8 ते 10 मिनटं उशिराने आहे. रेल्वे सेवा पूर्ववत करण्यासाठी रेल्वेचे प्रयत्न सुरू आहेत.
नुकताच धर्मवीर २ या चित्रपटाचा ट्रेलर रिलिझ झाला. या ट्रेलरची चर्चा होत असतानाच चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी शिवतीर्थावर दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत मंगेश देसाई आणि प्रसाद ओक देखील आहेत.
अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर नाशिक शहरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सोमवारी सकाळपासून शहरात रिमझिम पावसाच्या सरी, तर काही भागात संततधार पाऊस पडत आहे. पावसामुळे आठवड्याच्या सुरुवातीलाचं शहरातील जनजीवन काहीसं विस्कळीत झालं आहे.
शहरासह जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वरसह अन्य काही तालुक्यात जोरदार पाऊस हो आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यात होत असलेल्या पावसानं निसर्ग बहरला आहे. पावसामुळे परिसरातील धबधबे प्रवाही झाले असून डोंगररांगा हिरवाईनं नटल्या आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 84 बंधारे पाण्याखाली केले असून संभाव्य पूराचा परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
पिंपरी गावात काल दुपारी पुन्हा एकदा हिट अँड रन एक्सीडेंटची घटना घडली आहे. पिंपरी गावातील नानेकर चाळ जवळ काल दुपारी दीड वाजता दरम्यान एका चारचाकी वाहन चालकाने रस्त्याच्या वरून जाणाऱ्या महिलेला जोरदार धडक देऊन पळ काढला आहे.
Vo : या धडकेत महिलेला जोरदार मुका मार लागला असून. तिला उपचारानंतर डॉक्टरांनी घरी जाण्यासाठी मुभा दिली आहे.
मुलुंड मध्ये हिट अँड रन: ऑडी गाडीने दोन ऑटो रिक्षांना धडक दिली. यामध्ये दोन ऑटो चालक आणि दोन प्रवासी जखमी झाले आहेत. एका ऑटो चालकाची प्रकृती गंभीर असून ऑटो रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऑडी चालक फरार झाला असून तपास सुरू आहे.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मनसेने प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घ्यायला सुरुवात केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे स्वतः प्रत्येक मतदार संघाचा आढावा आज पासून घेत आहेत. राज्यभरातील विधानसभा मतदारसंघ अनुषंगाने पक्षातील नेत्यांची नियुक्ती निरीक्षक पदी करण्यात आली होती. या निरीक्षकांनी महिन्याभरात प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेऊन, राज ठाकरे यांना आज अहवालात सादर करत आहेत यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे कोणत्या जिल्ह्यात दौरा करायचा आणि कशाप्रकारे पुढे रणनीती असेल त्या संदर्भात निर्णय घेतील.
मराठा आरक्षणाबाबत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची भेट होणार आहे. दुपारी २ वाजता दोन्ही नेत्यांची वर्षा निवासस्थानी बैठक होणार असून मराठा आरक्षणाबाबत बैठकीत चर्चा होणार आहे. विरोधकांचे नेतृत्व म्हणून शरद पवार मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांनी पाठ फिरवली होती. आज शरद पवार मुख्यमंत्र्यांना काय सांगणार? याकडे लक्ष लागले आहे.
देशाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात होत आहे. आजच्या आर्थिक पाहणी अहवालाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांना संबोधित केले. यावेळी त्यांनी देशाला भक्कर बजेट देणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरची पोलीस कोठडी आज संपणार आहे. पुणे ग्रामीण पोलीस आज दुपारी मनोरा खेडकरला कोर्टात हजर करणार आहेत. पुणे पोलिसांकडून तीन दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात येण्याची शक्यता आहे.
वाशिममध्ये पिसाळलेल्या कुत्र्याने आठ जणांचे लचके तोडल्याचं समोर आलंय. वाशिमच्या रिसोड शहरातील धक्कादायक प्रकार आहे. यामध्ये तीन लहान मुलांचा समावेश आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील बाजार भोगाव गावातील बाजार पेठेत नदीचे पाणी घुसलेय. बाजार भोगाव परिसरातील वाहतूक ठप्प झालीय.
महाबळेश्वर- तापोळा रस्त्यावर दरड कोसळली. वाघेरा गावाजवळ दरड कोसळल्यामुळे काही वेळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती. प्रशासनाने एकेरी वाहतूक सुरू केलीय. घटनास्थळी जेसीबीच्या साह्याने उरलेली दरड हटवण्याचे काम सुरू आहे.
अकोल्यात कूलरचा शॉक लागून ७ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यु झालाय. अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील घोटा गावातील ही घटना आहे. नमन गणेश तरोने असं कुलरचा शॉक लागून मरण पावलेल्या मुलाचं नावे आहे. नमन घरात खेळत असताना कूलरला स्पर्श झाल्यानं जोरदार विजेचा शॉक लागला.
लोणावळ्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मागील 24 तासांत लोणावळ्यात तब्बल 151 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. विकेंडला लोणावळ्यात आलेल्या पर्यटकांना पावसात भिजण्याची पर्वणी मिळाली असून, आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे लोणावळ्यात आल्हाददायक वातावरण तयार झाले.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. जिल्ह्यातील विधानसभेच्या इच्छुकांची भेटीगाठी घेणार आहेत. त्यासोबत कार्यकर्त्यांच्या मेळावा घेणार आहेत. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणूक असल्याने राष्ट्रवादीकडून मतदारसंघाची चाचपणी केली जात आहे.
गेल्या दोन दिवसांपासून बीड शहरासह जिल्ह्यातील अनेक भागात पावसाची कमी अधिक प्रमाणात संततधार सुरू आहे. तर याच संततधार पावसामुळे चिखलमय अन खड्डेमय रस्त्यामुळे बीडकरांचे हाल होत आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील खड्डे अन भाजी मंडईमध्ये झालेली चिखलमय रस्त्याची चिकचिक, यामुळं नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावं लागत आहे. दरम्यान यामुळं जनजीवन मात्र विस्कळीत होत आहे..
नाशिकच्या बागलाणमधिल आदिवासी भागातील साल्हेर पायरपाडा येथील शेतकऱ्याच्या शेतात बिबट्याचा बछडा रात्रीच्या वेळी शिकारीच्या नादात विहिरीत पडला. सकाळी शेतकरी गोविंदा देशमुख यांच्या लक्षात हा प्रकार येताच त्यांनी वनविभागाला याची माहिती दिली. वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहचले असून बिबट्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत आहे.
ठाण्यात सकाळपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. शहरातील नौपाडा पूल तसेच घोडबंदर रोड येथे पाणी साचन्यास सुरुवात झाली आहे. आता पावसाचा जोर कमी झाल्यामुळे पाण्याचा निचरा होत आहे.
नाशिककरांसाठी दिलासादायक बातमी आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारं गंगापूर धरण ४५ टक्के भरलंय. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील त्र्यंबक परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे धरणात नव्यानं पाण्याची आवक सुरू आहे.
राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू पुण्यासह राज्याच्या ३ दिवशीय दौऱ्यावर आहेत. २८ ते ३० जुलैदरम्यान राज्यातील विविध ठिकाणांना राष्ट्रपती भेटी देणार आहेत. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रपती पुणे शहरात येणार आहेत.
माथाडी कामगार सेनेत शेकडो शिरूर तालुक्यातील कार्यकर्त्यांचा प्रवेश झालाय. शहर प्रमुख नाना भानगिरे व जिल्हाध्यक्ष निलेश माजिरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेची ताकद वाढली आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर शिंदे गटाकडे इन्कमिंग सुरू आहे. जिल्हास्तरीय मेळाव्यांमधून शिवसेनेला मोठी ताकद मिळत आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील दुपारच्या सत्रातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलीय. अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने शाळांना सुट्टी देण्यात आलीय. सकाळच्या शाळांना जिथे पाणी भरते तिथे अकरा वाजता विद्यार्थ्यांना सोडण्याचे आदेश दिले आहेत.
महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नी सुनावणी लांबणीवरच आहे. जानेवारी महिन्यापासून सुप्रीम कोर्टात सुनावणी नाही. राज्य सरकारच्या वकिलांकडून कोर्टात प्रकरण मेन्शन करण्यास टाळाटाळ होत असल्याचा सीमा भागातील नागरिकांचा आरोप आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे संभाव्य पुरस्थितीच्या पार्श्वभूमीवर, एनडीआरएफचे पथक देखील सतर्क झालेय. एनडीआरएफचे पथकाने काल सायंकाळी प्रयाग -चिखली, आंबेवाडी या गावाना एन डी आर एफ च्या पथकाने भेट देऊन पाहणी केली. कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती ओढवल्यास नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी एनडीआरएफ आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आता सज्ज झाली आहे.
नवी मुंबईत पावसाचा जोर वाढला आहे. सकाळपासून रिमझिम पाऊस पडत होता, मात्र आता पावसाचा जोर वाढला. नवी मुंबईत सर्वत्र पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. नवी मुंबईत आजही मुसळधार पावसाची शक्यता असून पावसाचा जोर कायम राहिल्यास सखल भागात पाणी सचण्याची शक्यता आहे.
खेड तालुक्यातील दीड टीएमसी पाणीसाठा असलेले तिसरे धरण कळमोडी सकाळी साडेपाच वाजता 100 टक्के भरले आहे. धरणातून सुमारे 200 पेक्षा जास्त क्युसेकने पाणी आरळा नदीत सांडव्यावरून खाली पडत असल्याने चास कमान धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे.
आजपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. उद्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यापूर्वी मोदी सरकारचा आर्थिक पाहणी अहवाल निर्मला सीतारामन आज लोकसभेत दुपारी 1 वाजता तर राज्यसभेत दुपारी 2 वाजता सादर करणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.