Maharashtra Live News Update:  Saam TV Marathi
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update: नाशिकमध्ये भीषण अपघात, २ जणांचा मृत्यू

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : विधान परिषद निवडणुका, राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ अन् विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा, राजकीय घडामोडी, देशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

भुसावळमध्ये छतावर झोपलेल्या जोडप्यावर जीवघेणा हल्ला; सहा जणांविरुद्ध गुन्हा

भुसावळच्या व्हीआयपी सिटी कॉलनीत छतावर झोपलेल्या जोडप्यावर सहा जणांनी लोखंडी रॉड, चॉपर, हॉकी स्टिक व काठ्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.या हल्ल्यात मंगेश काळे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जळगाव शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बचावासाठी छतावरून उडी मारूनही आरोपींनी पाठलाग करून पुन्हा मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

भंडाराची कन्या नमीरा सिद्दिकी NEET MDS परीक्षेत देशातून अव्वल

शिक्षणाच्या क्षेत्रात भंडारा जिल्ह्याने पुन्हा एकदा आपली मान उंचावली आहे. भंडारा शहराची रहिवासी असलेल्या नमीरा सिद्दिकी हिने देशातील अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाणारी NEET MDS परीक्षा उत्तीर्ण करत 'ऑल इंडिया रँक १' पटकावला आहे. नमीराने आपल्या जिद्दीच्या आणि मेहनतीच्या जोरावर हे उत्तुंग यश संपादन केले असून, तिने संपूर्ण देशात भंडारा जिल्ह्याचा गौरव वाढवला आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून तिचे अभिनंदन केले जात असून, तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. नमीराच्या या यशाने अनेक विद्यार्थ्यांसाठी एक नवी प्रेरणा निर्माण केली आहे.

क्रेनचे ब्रेक फेल होऊन चार वाहनांना धडक, 2 जण ठार

नाशिकच्या चांदवड येथे मुंबई-आग्रा महामार्गावर दुपारी एसटी बस ला आग लागल्याची घटना ताजी असताना संध्याकाळच्या सुमारास पुन्हा एक मोठा अपघात घडला असून राहुड घाट उतरत असताना क्रेनचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटून भरधाव जाणाऱ्या क्रेनने समोरील चार वाहनांना धडक दिली. या भीषण दुर्घटनेत एका कार मधील ऐका लहान मुलासह दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे,क्रेन ने आयशर गाडी,कार, आपे रिक्षा यांना धडक दिली,तर आपे रिक्षा क्रेन च्या पुढील भागात अडकून तिचा चक्काचूर झाला,अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी रिक्षा मध्ये अडकलेल्या दोघांना बाहेर काढले.अपघातानंतर जखमींना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले.चांदवड पोलीस घटनेचा अधिक तपास करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! २ लाखांपर्यंतचे कर्जमाफ; पण कुणाला मिळणार लाभ? राज्य सरकारच्या योजनेत नेमकं काय?

Weather Update : मोठी बातमी! अखेर 'तो' क्षण आला; पुढील काही तासांत मान्सून धडकणार, 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Mumbai Rain : वरुणराजाचं थाटात आगमन! मुंबई-उपनगरात काळे ढग दाटले, मुसळधार पाऊस सुरू

French Toast Recipe: सकाळी झटपट करा टेस्टी फ्रेंच टोस्ट; लहानमुलं पोटभर करतील नाश्ता

रशिया बनवतंय अमरत्वाचं औषध? रशियाचा 26 बिलियन डॉलरचा 'महाप्रोजेक्ट'

SCROLL FOR NEXT