गंगापूर तालुक्यात पावसासह वादळी वाऱ्याचा तडाखा; सोलर पॅनल, झाडांचे नुकसान
जिल्ह्यातील काही भागांमध्ये गारांचा पाऊस
तालुक्यातील अनेक गावात झाडे व घरावरील पत्रे व शाळेवरील पत्रे उडून गेल्याने मोठ नुकसान
दसमेगाव,झिन्नर,गोजवाडा,घोडकी,पिंपळगाव परीसरात वादळी वाऱ्याने झाडे पडली उन्मळून
वाशी तालुक्यातील दसमेगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवरील सर्व खोल्या वरील पत्रे गेले उडुन
शाळेच्या वर्गखोल्यांचे मोठ नुकसान तर शाळेत जोपासलेली झाड ही जमीनदोस्त
प्रशासनाने याकडे लक्ष घालून नवीन शाळा बांधण्याची नागरीकांची, मुख्याध्यापकांची मागणी
अहिल्यानगर मध्ये पाडळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात...
अचानक आलेला पावसामुळे नागरिकांची धावपळ..
प्रचंड वारे आणि पाऊस सुरू झाल्याने नागरिकांमध्ये घाबरट...
जोरात सोसाट्याचा वाऱ्यामुळे अनेक मोठमोठे होर्डिंग फाटले....
हवामान खात्याने दिला होता आज आणि उद्या पाडळी पावसाचा इशारा...
सोलापूर विधान परिषदेच्या जागेसाठी भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच
अद्याप उमेदवारी जाहीर न झाल्याने इच्छुकांची धाकधूक वाढली.
माजी आमदार प्रशांत परिचारक आणि बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्यामध्ये उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच
उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस...
तरीही उमेदवार बाबतचा सस्पेन्स कायम
परिचारक आणि राऊत समर्थकांकडून सोशल मीडियातून दावे-प्रतिदावे सुरू
भंडाऱ्यात सलग दुसऱ्या दिवशीही सायंकाळी वादळीवारा आणि विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली. मागील काही दिवसांपासून भंडाऱ्याचा तापमान ४५ अंश डिग्री सेल्सिअस वर पोहोचल्याने प्रचंड उघडा निर्माण झाला होता. या उकळ्यामुळे नागरिकांसह पाळीव जनावर आणि पशुपक्षीही हैराण झाले होते. आज सायंकाळच्या सुमारास आलेल्या या मान्सूनपूर्व पावसानं वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना उकड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बहुतांश भागात वादळी वारे आणि पावसाला सुरुवात
गंगापूर तालुक्यात पावसासह वादळी वाऱ्याचा तडाखा
सोलर पॅनल, झाडांचे नुकसान
जिल्ह्यातील काही भागांमध्ये गारांचा पाऊस
परभणी हिंगोली विधान परिषद निवडणुकीतून अर्जुन खोतकर यांचे सुपुत्र अभिमन्यू खोतकर यांची माघार
परभणी हिंगोली विधान परिषद निवडणुकी वर दावा करत तिकीट मिळावे यासाठी केले होते मोठी प्रयत्न
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचा उत्साह हिंगोलीच्या औंढा शहरांमध्ये पाहायला मिळाला आहे,आठवे ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ मंदिराच्या परिसरात असलेल्या अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळा परिसरात मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली आहे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी या जयंती सोहळ्याचे आयोजन केलं होतं दरम्यान यावेळी अहिल्याबाई होळकरांच्या जय घोषाचे नारे देण्यात आले होते
नीट आणि सीबीएसई पेपरफुटी घोटाळ्याच्या निषेधार्थ पुण्यात काँग्रेस पक्षाकडून मशाल मोर्चाचे आयोजन करण्यात आलंय
शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कार्यकर्ते मशाली घेऊन रस्त्यावर उतरणार आहेत.
हा मोर्चा काँग्रेस भवन येथून सुरू होऊन पुणे महापालिकामार्गे झाशी राणी पुतळ्यापर्यंत काढण्यात येणार आहे.
मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
धाराशिवमध्ये मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी
येरमाळा परिसरात गेल्या वीस मिनिटांपासून पावसाची जोरदार बॅटिंग
उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना काही अंशी दिलासा
उन्हाच्या तीव्रतेमुळे वाळत चाललेल्या ऊसाला नवसंजीवनी
आठवडाभराच्या विश्रांतीनंतर मनमाड परिसरात रविवारी सायंकाळी विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. सकाळी वातावरण काहीसे ढगाळ होते, मात्र दुपारनंतर उष्णतेचा कडाका वाढला होता. सायंकाळी अचानक झालेल्या पावसामुळे रविवारच्या आठवडे बाजारावर परिणाम झाला. दरम्यान, पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे.
वर्ध्यातील मगनवाडी येथील गोरस भंडारावर अन्न व औषध प्रशासनाच्या वर्धा आणि नागपूर येथील संयुक्त पथकाने छापा टाकत २५ लाख ८६ हजार १६८ रुपयांचा दुग्धजन्य पदार्थांचा साठा जप्त केला. तपासणीत अस्वच्छ वातावरणात उत्पादन, साठवणूक व विक्री सुरू असल्याचे तसेच आवश्यक लेबलिंग नसल्याचे आढळून आले. गाईचे दूध, ताक, तूप आणि खव्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून पुढील आदेशापर्यंत उत्पादन व विक्री बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पिंपरी-चिंचवडमधील टेल्को रोडवर भरधाव वेगातील बसने दोन चारचाकी वाहनांना जोरदार धडक दिल्याची घटना घडली. बर्ड व्हॅली उद्यानाकडून केएसबी चौकाच्या दिशेने जाणाऱ्या बसचा चालक बेदरकारपणे वाहन चालवत असल्याचे सांगितले जात आहे. या अपघातात दोन्ही चारचाकी वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी वाहनांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने प्रस्तावित केलेल्या जलशुल्क दरवाढीवर आणि जलमापक मीटर अनिवार्य करण्याच्या निर्णयावर काँग्रेसचे विधानपरिषद गटनेते सतेज पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शेतकरी, ग्रामपंचायती आणि उद्योग क्षेत्राशी कोणतीही व्यापक चर्चा न करता हा निर्णय पुढे नेला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
राज्य परिवहन महामंडळची बस आणि एर्टिगा कारचा भीषण अपघात..
अपघातात दोन जण ठार तर 15 जण जखमी..
अपघातात कारचा चक्काचूर तर एसटी बसचे नुकसान..
कारमधील दोघे जागीच ठार तर दोन्ही वाहनांमधील 15 जण जखमी...
शिर्डी जवळील सावळीविहीर हद्दीतील घटना...
पनवेल वरून शिर्डीकडे येणारी बस आणि नाशिककडे निघालेल्या कारचा भीषण अपघात...
जखमींना उपचारासाठी साई संस्थानच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हलविले...
अपघात स्थळी पोहचताच शिर्डी पोलिसांनी दाखवली तत्परता...
जखमींना उपचारासाठी तातडीने पोलिस गाडीतून रुग्णालयात पोहचवले...
येणारा प्रोजेक्ट माझ्या हातून चांगला व्हावा असं बाप्पाकडे मागणं मागितलं
महाराष्ट्र एप्सटीन फाईल चित्रपटावरून वाद सुरू आहेत
या चित्रपटात दीपाली सय्यद अभिनेत्रीची भूमिका करत आहे
सध्या दीपाली सय्यद यांच्याबाबत सर्वात मोठा वाद सुरू आहे. मला धमकीचे फोन आले. मात्र मी हा अभिनय करण्यावर ठाम आहे
.
चित्रपट येण्या अगोदरच्या चर्चा एवढ्या सुरू आहेत त्यामुळे आता मी हा चित्रपट करणारच आहे
चित्रपटातील एक पात्र काही राजकीय व्यक्तींशी साधर्म्य दाखवत असल्याने धमकीचे फोन आणि राजकीय दबाव येत आहेत.काही महिला नेत्यांनी "ही भूमिका करू नकोस , माझ्यासोबत च्या व्यक्तींना माझं लोकेशन विचारले जाते
हीरोइन मी आहे मात्र हिरो कोण असावा हे अजून ठरलं नाही ज्या प्रकारे ती व्यक्ती आहे तसा हिरो शोधण्याचं काम सुरू आहे
मात्र अशा धमक्यांना घाबरणार नाही आणि या चित्रपटात भूमिका करणारच अशी भूमिका दीपाली सय्यद यांनी घेतली.
अशा प्रकारच्या भोंदू बाबावर लोक विश्वास ठेवतात हे दुर्दैव आहे.
याचा अभ्यास करावा लागणार आहे यात अनेक जण अडकलेले आहेत यात राजकीय नेतेही आहेत.
महाराष्ट्र समोर नाशिक मध्ये घडलेले संपूर्ण प्रकरण दाखवण्याचा प्रयत्न आहे.
उद्यापासून सर्व बस स्थानकांवर प्रसाधन गृह मोफत असणार आहेत. अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. एस टी महामंडळंच्या 78 व्या वर्धापन दिनाच्या पूर्व संध्येला कोकणातील बस स्थानकांची प्रताप सरनाईक यांनी पाहणी केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी बस स्थानकाची सरनाईक यांनी पाहणी केली यावेळी त्यांनी ही घोषणा केली. त्यासोबत 78 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून कोकणातील बस स्थानकाच्या आवरात 78 हजार झाड लावण्याचा संकल्प करण्यात आलाय. सी.एन.जी पुरवठया बाबत आपण असमाधानी असून येत्या काळात एसटीबस इलेक्ट्रिक बस मध्ये रूपांतर केले जाईल असेही सरनाईक यांनी सांगितले
नांदेड जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाच्या सरी.
मान्सूनपूर्व पाऊस बर असल्याने उघड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा.
अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी येथे आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव साजरा करण्यात आला यावेळी झालेल्या कार्यक्रमात राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा ताई पवार या अजित दादांचे नाव घेताना भाऊक झाल्या होत्या.. त्यामुळे संपूर्ण कार्यक्रमात काही क्षण शांतता पसरली होती भाषण सुरू असताना अजित दादांच्या पश्चात अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनपट माझ्यासाठी आदर्श दीप स्तंभा सारखा कार्य करत आहे या वाक्य नंतर उपमुख्यमंत्री सुनीताताई पवार यांचा कंठ दाटून आला होता.. काही क्षण सर्व परिसर चांगलाच भावुक झालेला पाहायला मिळाला
धुळे तालुक्यातील वडेल शिवारामध्ये रानडुकरांचा मोठ्या प्रमाणात हैदोस सुरू असून, परिसरातील गोरख मोरे या शेतकऱ्याचे केळीचे उभे पिक या रानडुकरांनी अक्षरशः जमीनदोस्त केले आहे, जवळपास दोन एकर क्षेत्रात जवळपास पाचशे केळीचे रोप या रानडुकरांनी जमीनदोस्त केल्यामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे
पुण्यात विषारी दारुने १५ जणांचा बळी घेतला. या प्रकरणात आता मोठी कारवाई करण्यात आली. ३ पोलिस अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. त्यात आणखी एका पोलिसाला अटक केली आहे.
केडीएमसी नगरसेवक मधुर म्हात्रे यांच्या अपात्रतेच्या याचिकेवर उद्या सुनावणी
ठाकरे सेनेतून निवडून येऊन केला शिंदे सेनेत प्रवेश
नगरसेवक मदुर म्हात्रे यांच्यावर अपात्रतेची टांगती तळावर, उद्या सुनावनी
होळकरांच कार्य, त्यांचे काम त्यांचे आदर्श घेऊन आपण काम करत असतो...
इंग्रजी लेखक लोरेन्स रशियाची, इंग्लंडची राणी शी केली होती... मात्र त्यांचं नावं जगात एक नंबर वर आहे....
अजित दादाचा नावं घेतलं पाहिजे त्यांनी हे आराखडा तयार करतांना दादानि मेहनत घेतली होती...
शासनाच्या वतीने युवक मेंढपाळ यांच्यासाठी भविष्य काळात विविध योजना आणण्याचा प्रयत्न करत आहे...
यावर्षी अहिल्यादेवीच्या नावाने कर्ज माफी केली आहे...
येणाऱ्या 10 दिवसात कर्ज माफी केली जाईल, अहिल्यादेवीच्या नावाने केलेली कर्ज माफी येत्या 10 दिवसात केली जाईल
मुंबादेवीत बेवारस बॅग सापडल्याने नागरिकांमध्ये खळबळ
बॉम्ब शोध आणि नाशक घटनास्थळी दाखल
परभणी हिंगोली विधान परिषद निवडणूक
महाविकास आघाडीतील उबाठा शिवसेनेकडून डॉ विवेक नावंदर यांची उमेदवारी घोषित
आमदार अंबादास दानवे यांनी ट्विट करून नावंदर यांची उमेदवारी केली घोषित
डॉ नावंदर परभणी उबाठा शिवसेना शहर प्रमुख
दारूच्या नशेत नऱ्हे पोलिस चौकीत महिलेचा धिंगाणा
दारूच्या नशेत नऱ्हे पोलिस चौकीत येऊन पोलिसांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण करत धिंगाणा घातल्याप्रकरणी एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी वय ४१ वर्षीय महिलेवर नऱ्हे पोलिस चौकीच्या पोलिस उपनिरीक्षक यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय.
चंद्रपूर जिल्ह्यात रानटी हत्तींच्या कळपाने प्रवेश केल्याने सावली तालुक्यातील करोली, आकापूर, खानबाद आणि सायखेडा परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हत्तींच्या हालचाली लक्षात घेता वन विभागाने विशेष सूचना जारी केल्या
हत्तींचे फोटो किंवा व्हिडिओ काढण्यासाठी त्यांच्या जवळ जाऊ नये, तसेच सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता वन विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
नाशिकच्या मालेगावात तापमानाचा पारा ४३ अंशा पर्यंत पोहचल्याने विहिरींनी तळ गाठलाय.त्यामुळे पाणी टंचाई वाढत असून आता पर्यंत १६ गावे ४४ वाड्या वस्त्यांना ३१ टँकरने पंचायत सिंती तर्फे पाणी पुरवठा केला जात असून,अनेक गावातील १६ विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत.तर रोज २१ फे-यांच्या माध्यमातून सात लाख ४४ हजार लिटरचा पाणी पुरवठा केला जात आहे.पावसाचे आगमन उशिरा झाल्यास टँकरच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर आलेल्या राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सह्याद्रि शिक्षण संस्थेला सदिच्छा भेट दिली. यावेळी आमदार शेखर निकम यांनी त्यांचं स्वागत केलं. भेटीची सुरुवात स्वर्गीय गोविंदराव निकम स्मृतीस्थळाला भेट देऊन झाली. यावेळी सरनाईक यांनी गोविंदराव निकम यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेत श्रद्धांजली अर्पण केली. तसेच परिसरातील शंकर मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. यानंतर त्यांनी सह्याद्री शिक्षण संस्थेला भेट देत संस्थेच्या शैक्षणिक, प्रशासकीय आणि विकासात्मक कामकाजाची सविस्तर माहिती घेतली. सरनाईक यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेत विविध शैक्षणिक उपक्रमांबाबत चर्चा केली. सह्याद्री शिक्षण संस्थेने शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याचं कौतुक करत संस्थेच्या प्रगतीबद्दल प्रताप सरनाईक यांनी समाधान व्यक्त केलं.
कोकणातील विधानपरिषदेच्या जागेवर शिवसेना आणि राष्ट्रवादीत रणकंदन
कोणाला ही जागा मिळणार अशी चर्चा सुरू
मंत्री भरत गोगावले यांनी याबाबत सूचक विधान केलं असून या बाबत आमचे नेते एकनाथ शिंदे निर्णय घेतील आणि त्याप्रमाणे आम्ही काम करू असे वक्तव्य त्यांनी यावेळी केलं आहे.
या जागेबाबत आज निर्णय होईल अ
मात्र या बदल्यात रायगडचे पालकमंत्री मिळण्यावरून आज यांवर देखील मार्ग निघणार असल्याचे त्यांनी सूचक विधान केलं आहे.
आज सकाळी उलवे हलक्या सरी कोसळल्या. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला आहे. पुढील काही दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
अमरावतीच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख,कोषाध्यक्ष दिलीप इंगोले यांचा आज अमृत महोत्सवी सोहळा होत आहे.या सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यमंत्री पंकज भोयर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणारेत..सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या या सोहळ्याची शिव परिवाराकडून जोरदार राहणार बाजी करण्यात आली आहे.पुढील वर्षी श्री शिवाजी शिक्षण संस्थेत निवडणुका होणार आहेत. त्याची मोर्चेबांधणी आतापासून सुरू झाल्याचे पाहायला मिळतेय.
जळगाव जामोद तालुक्यातील सुनगावला वादळाचा तडाखा; केळीची बाग जमीनदोस्त..
हातातोंडाशी आलेले पीक निसर्गाने हिरावले; शेतकरी आर्थिक संकटात..
अहिल्यानगर जिल्ह्यावर पाणी टंचाईचे सावट
मान्सून लांबणीवर पडल्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यावर पाण्याचं संकट गडद होताना दिसतंय..
जिल्ह्यातील प्रमुख तीन धरणांमधील जलसाठा झपाट्याने कमी होत असून मुळा, भंडारदरा आणि निळवंडे धरणांमध्ये सरासरी केवळ 30 टक्के पाणी शिल्लक आहे..
कासारसाई धरण परिसरात फुलशेतीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल पाहायला मिळत असून कमी खर्चात अधिक उत्पादन देणाऱ्या ॲस्टर फुल लागवडीला विशेष पसंती मिळत आहे.. मध्यम आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन, भरपूर सूर्यप्रकाश आणि योग्य व्यवस्थापन असल्यास ॲस्टर शेतीतून चांगला आर्थिक फायदा मिळू शकतो.. महाराष्ट्रात खरीप, रब्बी आणि उन्हाळी अशा तिन्ही हंगामात या पिकाची लागवड केली जाते.. योग्य खत व्यवस्थापन, नियमित पाणी आणि वेळेवर आंतरमशागत केल्यास फुलांचे उत्पादन अधिक वाढते.. लागवडीनंतर अवघ्या तीन ते पाच महिन्यांत फुले काढणीस तयार होत असल्याने ॲस्टर शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहेत.
नांदुरा तालुक्यात आज सकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे चांदूर बिस्वा ते जिगाव मार्गावरील दोन मोठी झाडे उन्मळून रस्त्यावर कोसळली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. झाडे रस्त्यावर आडवी पडल्याने नांदुरावरून जिगावकडे जाणारी एसटी बसही मार्गात अडकून पडली. बसमधील प्रवाशांना तसेच इतर नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. अखेर काही प्रवाशांनी शेतातून पर्यायी मार्ग काढत आपले गाव गाठले. घटनेमुळे परिसरातील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून झाडे हटविण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळाली आहे....
कोकणातील विधान परिषदेच्या जागेवर महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये सध्या जोरदार जुंपली असताना सुनील तटकरे आणि सुपुत्र अनिकेत तटकरे यांनी थेट एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. या भेटीत एकनाथ शिंदे यांनी अनिकेत तटकरे यांच्या खांद्यावर हात ठेवल्याचा फोटो अनेकेत तटकरे यांनी सोशल मिडीयावर व्हायरल केला आहे. त्यामुळे त्यांच्या या भेटीने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगू लागली आहे. कोकणातील जागा अनिकेत तटकरे यांनाच मिळावी यासाठी तटकरे अनेक राजकीय डाव टाकत आहेत.
अमरावती जिल्ह्यात मे महिन्यात झालेंक्या अवकाळी पावसाचा 12 गावांना फटका बसला आहे.वादळ व गारपिटीसह आलेल्या पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे...यामध्ये 96 घरांचे नुकसान झाले असून 92 घरांची पडझड झाली आहे..तर जिल्ह्यातील 16 गावामध्ये 25 हेक्टर वरील पपई,लिंबू ,संत्रा,केळी,आंबा टरबूज,मुंग तीळ पिकांचे नुकसान झाले आहे...अमरावती जिल्ह्यात मे महिन्यात सरासरी 8.6 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे..
शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी आणि तात्पुरती चांगली शरीरयष्टी बनवण्यासाठी जिममध्ये जाणाऱ्या तरुणांना आकर्षित करणाऱ्या टर्मिन इंजेक्शन्सची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या दोन इसमांना करमाळा पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईत 'मेफेनटरमाइन सल्फेट या घातक इंजेक्शन्सच्या एकूण १५० बाटल्या आणि गुन्ह्यात वापरलेली बुलेट मोटारसायकल असा एकूण २ लाख ९ हजार १३३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हे इंजेक्शन्स डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विकण्यास कायद्याने बंदी असता ही आरोपी कोणत्याही खरेदी बिलाशिवाय आणि परवान्याशिवाय त्याची विक्री करत होते. याप्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
पनवेल तालुका पोलिसांनी ऑनलाईन सट्टेबाजी व जुगार रॅकेटवर मोठी कारवाई करत १३ आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे २ लाख ७१ हजार ६३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई वाकडी येथील परिसरात करण्यात आली. कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून १७ मोबाईल फोन, ६ लॅपटॉप, ४ लॅपटॉप चार्जर, ४ एक्स्टेन्शन बोर्ड, १० मोबाईल चार्जर, एक वाय-फाय राऊटर, पासबुक, चेकबुक, क्रेडिट व डेबिट कार्ड, सिमकार्ड, पासपोर्ट तसेच लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या डायऱ्या जप्त केल्या. जप्त मुद्देमालाची किंमत ₹२,७१,६३० इतकी आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.