Maharashtra News Live Update Saam TV Marathi
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update: अवैध गोवंश वाहतूक करणारा पिकअप पलटी; चार गोवंशांचा मृत्यू

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा धुमाकूळ, विधान परिषद अन् राजकीय घडामोडी, पेट्रोल-डिझेलची बचत करा, विदर्भाला उन्हाचा तडाखा, देशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

devgad : देवगड मिठमुंबरी समुद्रात पर्यटक युवक बुडाला, तिघांना वाचवण्यात यश

सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मुंबईहून देवगड येथे आलेल्या पर्यटकांचा एक ग्रृप मिठमुंबरी समुद्रात पोहण्यासाठी गेला होता. यातील चार युवक पाण्यात बुडत असताना यातील तिघांना वाचवण्यात यश आले आहे तर एक जण समुद्रात बुडाला आहे.

आटपाडी तालुक्यात गारांचा पाऊस...

सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यांमध्ये सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस पडला. अनेक ठिकाणी झाडे पडली आहेत. तर झाड पडून एका म्हशीचा मृत्यू देखील झालेला आहे. सखल भागात पाणीच पाणी साचले आहे. या पावसामुळे डाळिंब पिकाचे हे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने डाळिंब उत्पादक शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.

अवैध गोवंश वाहतूक करणारा पिकअप पलटी; चार गोवंशांचा मृत्यू

नाशिकच्या देवळा-नाशिक रस्त्यावर गोदावरी हॉटेलजवळ अवैधरित्या गोवंश वाहतूक करणारा पिकअप वाहन पलटी झाल्याची घटना घडली. गोरक्षकांनी पाठलाग करताच चालकाने भरधाव वेगाने वाहन पळवण्याचा प्रयत्न केला, मात्र नियंत्रण सुटून वाहन कांदा चाळीवर आदळले. वाहनात डाळिंब व पाण्याच्या खोक्यांआड गोवंश लपवून कत्तलीसाठी नेले जात असल्याचे उघड झाले. या अपघातात चार गोवंशांचा मृत्यू झाला. देवळा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत पुढील तपास सुरू केला आहे.

nashik : चांदवड-मनमाड रस्त्यावर भीषण अपघात; वाहन उलटून २१ मजूर  जखमी 

नाशिकच्या चांदवड-मनमाड रस्त्यावरील निकम वस्तीजवळ अपघात घडला असून,कांद्याच्या खळ्यात मजुरांना घेऊन जाणाऱ्या एका 'छोटा हत्ती' टेम्पोचा अपघात झाला आहे, या अपघातात तब्बल २१ मजूर जखमी झाले आहेत. क्षमता नसतानाही या छोट्या टेम्पोमध्ये तब्बल २९ प्रवासी मजूर भरण्यात आले होते,हे मजुर दुगाव,पिंपळगाव ढाबळी येथील आहेत. अपघातानंतर तातडीने सर्वाना चांदवडच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघात प्रकरणी चांदवड पोलीस अधिक तपास करीत आहे.

kalyan : कल्याणमध्ये युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलन

कल्याणात युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलन करण्यात आलं.

पेट्रोल पंपावर ग्राहकांना वाटले मेलोडी चॉकलेट

इंधन दरवाढी विरोधात मेलोडी चॉकलेट

वाटप करत केले निषेध आंदोलन

Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाची हजेरी 

अहिल्यानगर जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पावसाची हजेरी..

कोपरगाव, राहाता तालुक्यासह सर्वदूर पावसाची हजेरी...

उकाड्यापासून हैराण नागरिकांना दिलासा.

pandharpur : पंढरपुरात विठ्ठलाची दर्शन रांग चार किलोमीटर लांब

मे महिन्यातील शेवटचा वीकेंड आणि अधिक मासानिमित्त पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी झालेली पाहायला मिळत आहे. सध्या विठ्ठलाची दर्शन रांग चार किलोमीटर लांब गोपाळपूर रोड पर्यंत जाऊन पोहोचली आहे.

pune : पुण्यातून ६ बांगलादेशी महिला पोलिसांच्या ताब्यात 

पुण्यातील बुधवार पेठेत बेकायदेशीर वास्तव केल्याप्रकरणी ६ बांगलादेशी महिला ताब्यात

पुणे पोलिसांच्या कॉम्बिंग ऑपरेशन मध्ये फरासखाना आणि खडक पोलिसांची कारवाई

पुण्यातील बुधवार पेठेत असणाऱ्या सागर बिल्डिंग वर पोलिसांची छापेमारी

नीटपेपर फुटी प्रकरणातील महाराष्ट्रातील पहिली अटक केलेल्या तरुणाला न्यायालयीन कोठडी

शुभम खैरनारला ६ जून पर्यंत न्यायालयीन कोठडी

खैरनार ने मनिषा वाघमारे कडून नीट चे पेपर मिळवून पुढे राजस्थानातील यश यादव या तरुणाला दिले होते

नाशिक मधून ताब्यात घेतलेल्या खैरनार ला आज दिल्ली न्यायालयात हजर करण्यात आले होते

न्यायालयाने त्याला ६ जून पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे

धाराशिवच्या उमरगा शहरात पावसाची जोरदार हजेरी

धाराशिवच्या उमरगा शहरात पावसाची जोरदार हजेरी,अचानक आलेल्या पावसामुळे आठवडी बाजाराचा उडाला फज्जा

अंतर्गत गटारी तुडुंब भरून वाहू लागल्याने गटारीतील घाण पाणी शिरले थेट शेतकऱ्यांच्या भाजीपाल्यात

ज्या भाजीपाल्यावर नागरिकांचा उदरनिर्वाह आणि आरोग्य अवलंबून आहे,त्याच भाज्यांमध्ये सांडपाणी मिसळत असल्याने नगरपरिषदेच्या विरोधात नागरीकांचा संताप

बाजारात अनेक ठिकाणी गटारीचे पाणी साचल्याने चिखल,दुर्गंधी आणि अस्वच्छता

विक्रेत्यांना अक्षरशः घाण पाण्यात उभे राहून भाजी विक्री करण्याची वेळ

पुण्यात किरकोळ कारणावरून तरुणावर कोयत्याने वार, २ जणांना अटक

पुण्यातील कोंढवा भागातील घटना सी सी टिव्ही मध्ये कैद

पोलिसांनी ठोकल्या २ तरुणांना बेड्या

दिलशाद शेख ने या पोलिसात तक्रार दिली होती

कोंढवा पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता

बीडमध्ये केज तालुक्यातील जिवाचीवाडी शिवारात रात्री झालेल्या गारपिटीसह वादळी वाऱ्याने शेती पिकांचे नुकसान

- जीवाचीवाडी शिवारातील पपई बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान.

- तर याच परिसरातील मका पिकाचे देखील भुईसपाट होऊन मोठे नुकसान झाले आहे.

- वादळी वाऱ्याने विजेचा पोल देखील खाली पडले आहेत.

पंढरपूरमध्ये चालत्या एसटी बसची डिझेल टाकी तुटली; एसटी बसच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर

एस टी महामंडळाच्या बसच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. करमाळा डेपोच्या एका चालत्या बसची डिझेल टाकी तुटून खाली पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चालकाने प्रसंगावधान राखून वेळीच गाडी थांबवल्याने मोठी दुर्घटना टाळली.‌ करमाळा - वाशिंबे या मार्गावर धावणाऱ्या बसची डिझेल टाकी तुटली‌. या बसमधून जवळपास 30 हून अधिक प्रवाशी प्रवास करत होते.

सांगोल्यात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

सांगोला तालुक्याच्या पश्चिम भागाला आज मान्सून पूर्व पावसाने झुडपून काढले. सकाळपासूनच ढगाळ वातावरण तयार झाले आहे आज दुपारी सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. तालुक्यातील नाझरे,चोपडी,हातीद,उदनवाडी या परिसरात जोरदार पाऊस झाला.

6 वर्षीय चिमुकल्यासह आठ जणांना चावा, घटना सीसीटीव्ही मध्ये कैद

फिसाळलेल्या कुत्र्याने एका सहा वर्षांच्या मुलासह आठ जणांचा चावा घेतल्याची घटना रायगडच्या कर्जतमधून समोर आली आहे. या घटनेमुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. कर्जत शहरातील महावीर पेठ हि घटना असून शिव परेश शिर्के असे जखमी झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. सर्व जखमींवर कर्जत उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कुत्र्याने केलेल्या हल्लाचा VDO CCTV मध्ये केला झाला आहे.

धुळे जिल्ह्यामध्ये असलेल्या एकूण 182 पेट्रोल पंपापैकी जवळपास 9 पेट्रोल पंपांवर डिझेलचा तुटवडा

धुळे जिल्ह्यामध्ये असलेल्या एकूण 182 पेट्रोल पंपापैकी जवळपास 9 पेट्रोल पंपांवर डिझेलचा तुटवडा मोठ्या प्रमाणात असून, या नऊ पेट्रोल पंपांवर पेट्रोल मुबलक प्रमाणात उपलब्ध नसल्याने डिझेलचा तुटवडा निर्माण झाला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाच्या तयारी वरती याचा परिणाम दिसून येत आहे

सातारा पालिकेतील वादावर राजेंची नगरसेवकांना फटकार

सातारा नगरपालिकेतील नगरसेवकांची आज खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत एक महत्त्वाची आणि हायव्होल्टेज बैठक पार पडली. गेल्या काही दिवसांपासून पालिकेतील दोन्ही राजेंच्या गटातील नगरसेवकांमध्ये अंतर्गत वाद धुमसत होता. याच वादाची गंभीर दखल घेत आज दोन्ही राजेंनी नगरसेवकांची चांगलीच कानउघाडणी केली आहे.

रांजणगाव गणपतीजवळ मिक्सर रोडखाली उतरला; वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त

अहिल्यानगर–पुणे महामार्गावर रांजणगाव गणपती परिसरात टर्न घेताना मिक्सर चालकाचा ताबा सुटल्याने मिक्सर थेट रोडखाली उतरल्याची घटना घडलीय. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी टळली, मात्र काही काळ वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागला.

डिझेल संपले मात्र टँकरची वाट पाहत शेकडो जणांच्या रांगा, ड्रोन कॅमेराने घेतलेली दृश्य

हिंगोलीत पेट्रोल पंपावरील डिझेल साठा संपला असताना देखील शेतकरी डिझेल टॅंकर दाखल होण्याची वाट पाहत,ट्रॅक्टर सह कॅन घेऊन रांगेत उभे टाकले आहेत, हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील बोल्डा फाटा परिसरात असलेल्या पेट्रोल पंपावर मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे, ड्रोन कॅमेरा द्वारे या गर्दीची टिपलेली ही दृश्य बळीराजाची दाहकता दाखवत आहेत दरम्यान रांगेत उभे टाकलेल्या या शेतकऱ्यांना डिझेल नेमकं कधी मिळणार हे मात्र कुणी सांगू शकत नसल्याने शेतकरी पेट्रोल पंपावर जेवण आणि झोपा काढत आहेत.

नाणेघाटावर धुक्याची पांढरी चादर; इंद्रवज्र पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

पावसाळा सुरू होण्यासाठी अजून काही दिवसांचा अवधी बाकी असतानाच सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर निसर्गाने मनमोहक रूप धारण केलंय. जुन्नर तालुक्यातील ऐतिहासिक नाणेघाट परिसर दाट धुक्याने वेढला गेला असून, इंद्रवज्राचा नजारा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढू लागलीय.

लोखंडी रॉड लाठ्याकाठ्याने तरुणाला बेदम मारहाण

लोखंडी रॉड लाठ्याकाठ्याने तरुणाला बेदम मारहाण करणाऱ्या त्या आरोपी विरोधात अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला

आरोपी भरत क्षीरसागर विजेंद्र क्षीरसागर, साई गिरी व अन्य एक जण अशा चार आरोपीच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल

कोंडीबा क्षीरसागर या तरुणाला केली होती बेदम मारहाण

वसमत शहर पोलीस स्टेशनमध्ये आरोपी विरोधात गुन्हा दाखल होताच आरोपीच्या अटकेसाठी पथके रवाना

गोवंश तस्करांच्या दगड-लाकडी दांडक्यांनी जीवघेणा हल्ला 

गोवंश तस्करांच्या दगड-लाकडी दांडक्यांनी जीवघेणा हल्ला

हल्ल्यात गजानन सुरोशे यांचा मृत्यू, सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर प्रचंड वायरल

महागाव परिसरात बंदची हाक, सुकळी गावात मोठा पोलीस बंदोबस्त

लक्ष्मण हाके सुपारी बहाद्दर; मराठा क्रांती मोर्चा चे धनंजय साखरकर यांचा जोरदार निशाणा 

स्वतःला ओबीसी नेता म्हणून घेणारा लक्ष्मण हाके हा भामटा सुपारी बहाद्दर आहे. सर्वच नेत्यांवर गरळ ओकायच एवढेच काम त्याने केले आहे. त्याच्या अशा प्रक्षोभक वक्तव्याने एकही ओबीसी कार्यकर्ता त्याच्या मागे राहणार नाही. अशी टीका मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक धनंजय साखळकर यांनी केली आहे.

महागाईच्या विरोधात शिवसेना शिंदे गटाचे नंदुरबारमध्ये आंदोलन 

वाढत्या महागाईच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने आज नंदुरबार शहरात अनोखे आंदोलन करण्यात आले. पेट्रोल, डिझेल, गॅस तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या दरांविरोधात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध रॅली काढली. या आंदोलनाचे विशेष आकर्षण म्हणजे बैलगाड्यावर मोटरसायकल ठेवून करण्यात आलेला निषेध होता.

अधिक मास आणि रविवार यामुळे तुळजाभवानी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी 

अधिक मास आणि रविवार यामुळे तुळजाभवानी मंदिरात भाविकांची मोठी गर्दी

देशभरातून भाविक तुळजाभवानी देवीच्या दर्शनाला

अधिकमासात देवदर्शनाकडे भाविकांचा ओढा

उन्हाळी सुट्ट्या यामुळे कुटुंबासह दर्शनाला गर्दी

बीड उस्मानाबाद विधान परिषद मतदार संघाचे आचारसंहिता सुरू असल्याने सर्व रेफरल पास बंद

मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

० मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

० माणगाव नजीक महामार्गावर वाहनाच्या रांगा

० माणगाव बाजारपेठ ते खरवली फाट्यापर्यंत वाहनांच्या रांगा

० कोकणात येणारे चाकरमानी आणि पर्यटक अडकले वाहतूक कोंडीत

० वाहतूक कोंडी फोडताना पोलिसांची दमछाक

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच नांदेडच्या दुर्गमभाग असलेल्या माहूर तालुक्यातील सावरखेड गावात पोहचली बस

नांदेड जिल्ह्यातील अतिशय दुर्गमभाग असलेल्या माहूर तालुक्यातील सावरखेड या गावात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच एसटी बस पोहचली. विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर सावरखेड या गावाला अखेर बस सेवा सुरू करण्यात आली आहे.गावात स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच बस पोहोचल्यानंतर गावकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला.अतिशय दुर्गम भाग असलेल्या या गावातील विद्यार्थी, जेष्ठ नागरिक,महिला आणि सर्वसामान्य नागरिकांना या बस सेवेचा फायदा होणार आहे.

वेंगुर्ला शिरोडा समुद्रात मच्छीमारी बोट उलटली, तीन मच्छीमार बूडाले

वेंगुर्ल्यातील शिरोडा समुद्रात आज पहाटे मासेमारीसाठी गेलेली बोट सोसाट्याच्या वाऱ्यामुळे समुद्रात बुडाली. या बोटीत एकाच कुटुंबातील तीघे मच्छीमार होते यातील दोघांना वाचविण्यात यश आले आहे तर एकजण समुद्रात बुडून बेपत्ता झाला आहे.

मंत्री दादा भुसेंनी केला वंदे भारत एक्स्प्रेसने प्रवास

शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे कधी मंत्री पदाचा बडेजाव करत,ना कधी गाड्यांचा ताफा नाही. अनेकदा त्यांचा रेल्वेने प्रवास करत असतात,मात्र पंतप्रधान नरेंद मोदी यांनी इंधन बचावासाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत कुठलाही मंत्री पदाचा बडेजाव न मिरवता आजही ते जमिनीवर असल्यासारखे वागतात पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानंतर भुसे. यांच्या या साधेपणाचे आठवण आल्याशिवाय राहत नाही.आजही देखील मंत्री भुसे यांनी मनमाड रेल्वे स्थानकातून वंदे भारत एक्स्प्रेसने अगदी सामान्य प्रवाश्यांप्रमाणे मुंबईकडे प्रवास केला.कालच मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी शिर्डी येथे जाताना वंदे भारत एक्सप्रेसने प्रवास केला होता.

तळेगाव दाभाडे येथील तुळजाभवानी मंदिरात चोरी

मावळातील तळेगाव दाभाडे येथील तुळजाभवानी मंदिर परिसरात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. देवीचा चांदीचा मुकुट अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार मंदिराच्या गाभाऱ्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. एक अज्ञात व्यक्ती दर्शनाच्या बहाण्याने मंदिरात दाखल झाला. सुरुवातीला त्या व्यक्तीने अत्यंत शांतपणे देवीचे दर्शन घेतले. हातात नारळ घेऊन देवीला कुंकूही वाहिलं. त्यामुळे मंदिरातील पुजाऱ्यालाही त्याच्यावर कोणताही संशय आला नाही. मात्र काही क्षणातच आरोपीने संधी साधली.

मनिषा हवालदार यांनी शाळेतूनच काढल्या भौतिकशास्त्राच्या प्रश्नांच्या "प्रिंट आउट"

पुण्यातील बुधवार पेठेत असलेल्या शाळेत हवालदार होत्या मुख्याध्यापिका

मनिषा मांढरे ने विनंती केल्यानंतर शाळेतील प्रिंटरचा वापर करून काढल्या प्रिंट

मुख्याध्यापिका राहिल्यामुळे शाळेत होते केबिन आणि कॉम्प्युटर

याच कॉम्प्युटर वरून काढले भौतिकशास्त्राच्या विषयाचया प्रश्नांची प्रिंट आउट

मुंबई- गोवा महामार्गावर मासळी वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात

मुंबई गोवा महामार्गावर कुडाळ पावशी येथे पहाटेच्या सुमारास मासळी वाहतूक करणाऱ्या ट्रकचा अपघात झाला. या अपघातात सर्विस रोडवर उभारण्यात आलेले संरक्षक गार्ड या ट्रकने उध्वस्त केले. नव्यानेच उभारण्यात आलेल्या या गार्डला कोणतेच रिफलेक्टर बसविण्यात आले नसल्यामुळे वाहन चाककांना हे गार्ड दिसून येत नव्हते त्यामुळेच हा अपघात घडल्याच बोललं जात आहे. दरम्यान या अपघात सर्वच गार्ड तुटून पडले असून ट्रकचेही मोठे नुकसान झाले आहे.

दक्षिण रायगडमध्ये अवकाळी पावसाची हजेरी

पहाटेपासून आकाशात ढगाळ वातावरण

० महाड, माणगाव तालुक्यात सकाळी जोरदार पावसाची हजेरी

० आज आणि उद्या असे दोन दिवस रायगड जिल्ह्याला हलक्या ते मध्यम स्वरुपातील पावसाचा हवामान विभागाचा इशारा

वादळी पावसाने मेंढपाळांचे कंबरडे मोडले,  लाखणगावात पशुधनासह संसार उघड्यावर

आंबेगाव तालुक्यातील लाखणगाव येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने मेंढपाळांचे मोठे नुकसान झालंय शेळ्या-मेंढ्यांचा मृत्यू, वाड्यांचे नुकसान आणि उघड्यावर आलेला संसार यामुळे मेंढपाळ हवालदिल झालेत

मुंबईच्या काही भागात मान्सून पूर्व पाऊस

मुंबईच्या दादर परिसरात मान्सून पूर्व पाऊस दाखल झाला आहे.

पुणे: जनगणना कामात निष्काळजीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशारा

जनगणनेच्या कामात टाळाटाळ करू नये, ठरवून दिलेल्या वेळेत घरभेटी पूर्ण करा, पुणे महापालिकेचा कर्मचाऱ्यांना इशारा

पुणे शहराची समाधानकारक प्रगती दिसून न आल्याने तांबी

जनगणनेच्या कामात निष्काळजीपणा करणाऱ्या प्रगणक आणि पर्यवेक्षकांवर होणार कारवाई

झालेल्या बैठकीत सुमारे १६०० पर्यवेक्षकांकडून शहरातील कामाचा घेण्यात आला आढावा

अकोल्यात आयशर ट्रॅक्टर शोरूमच्या ऑइल गोदामाला भीषण आग

अकोल्यात आयशर ट्रॅक्टर शोरूमच्या ऑइल गोदामाला भीषण आग. परिसरात धुराचे लोट उठले... अकोला शहरातल्या शिवणी परिसरात असलेल्या या आयशर ट्रॅक्टर शोरूमच्या ऑइल गोदामाला मोठी आग लागलीये. आज सकाळी ही आग लागली आहे. सकाळी गोदामातून धूर निघत असल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले, तात्काळ अकोला अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली.. अग्निशमन विभाग घटनास्थळी दाखल झालं.. आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.. आग लागली त्यावेळी शोरूम बंद होतंये.. दरम्यान, संबंधित आयशर ट्रॅक्टर शोरूमला लागूनच पेट्रोल पंप असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं... मात्र या आगीत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं अनुमान लावल जात आहे.

Maharashtra News Live Update: पुण्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी

पुण्यात सकाळपासून मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

देवगड हापूसच्या नावाखाली विकला जाणारा कर्नाटकी आंबा रस्त्यावर फेकला

देवगड हापूसच्या नावाखाली कर्नाटकातून आलेला आंबा मुंबई गोवा महामार्गावर विकला जात असल्यामुळे संतापलेल्या आंबा बागायतदारांनी कणकवली ओसरगाव येथे कर्नाटकी आंबा रस्त्यावर फेकून दिला. वारंवार प्रशासनाचं लक्ष वेधूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी कर्नाटकी आंब्याचे स्टॉल उधळून लावत तीव्र निषेध व्यक्त केला. देवगड हापूसची ओळख आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या मेहनतीवर घाला घालणाऱ्यांवर कारवाईची मागणी करत शेतकऱ्यांच्या संयमाचा अंत पाहू नये असा इशारा शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी प्रशासनाला दिला आहे.

Eknath Shinde At Delhi Tour : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल  

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल झालेत..विधानपरिषदेच्या जागांचा तिढा सोडवण्यासाठी ते दिल्लीला गेल्याची चर्चा आहे...शिंदसेनेने विधानपरिषदेसाठी 6 जागांची मागणी केली असून भाजपनं मात्र 4 जागा शिंदेसेनेला देण्याची तयारी दर्शवलीय...त्यामुळे मुंबईत जागावाटपाचा तोडगा न निघाल्यानं शिंदे आता दिल्लीला गेल्याची माहिती सूत्रांनी दिलीय..दिल्लीत ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेण्याची शक्यता आहे...या भेटीत ऑपरेशन टायगरबाबतही महत्त्वाची चर्चा होऊ शकते...

नागपूरवर सूर्य देवता आग ओखत आहे... उष्माघाताने जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी संशयित चौघांचा बळी ?

- शवविच्छेदन अहवाल आल्या नंतर स्पष्ट होईल मृत्यूचे कारण, मात्र उन्हाचा तडाखा वाढला असल्यानं संशयितांची संख्या वाढतीवर

- शनिवारी नागपूरात तापमानाचा पारा तब्बल 45 अंश सेल्सिअसवर पोहोचला होता

- उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे नागपूर शहरात दोघांचा आणि सावनेर मध्ये आणखी दोघांचा उष्माघाताने दोन जणांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे...

- उष्माघाताचे चार बळी गेल्याने जिल्ह्यात भीतीचा वातावरण आहे

Maharashtra News Live Update: ठाण्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी

सकाळपासूनच ठाणे जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर, भिवंडी, कशेळी, मुरबाड, कळवा खारेगाव. घोडबंदर रोड आणि मुंब्रा सारख्या शहरांमध्ये पहाटे पासूनच मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे.... गेले अनेक दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात कडाक्याच्या उन्हा पासून नागरिक त्रस्त झाले होते आता मान्सूनपूर्क पावसामुळे त्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

नंदुरबारमध्ये पेट्रोल पंपावर कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये तुफान हाणामारी

नंदुरबार - शहादा शहरात असलेल्या पेट्रोल पंपावर कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये तुफान हाणामारी....

पेट्रोल पंपावर असलेल्या कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांना लाठ्या काठ्यांनी मारहाण करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल..

ऑनलाइन पेमेंट बंद असून कॅश ने पेमेंट करण्याच्या मागणीवर वाद झाल्याची प्राथमिक माहिती....

कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये होत असलेल्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : धीरज सेठ नवे लष्करप्रमुख; संरक्षण मंत्रालयाकडून आदेश जारी

ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचा मोठा राडा; पदावरून उचलबांगडी केल्याने ऑफिस फोडलं, AC, पंखे, खुर्च्यां घरी नेल्या

गाडी अडवली, कॉलर पकडली, खेचत नेलं...; टेस्ट क्रिकेटरला पोलिसांकडून बेदम मारहाण

Kidney Damage: किडनी 95% खराब होईपर्यंत दिसत नाहीत लक्षणं; तज्ज्ञांनी सांगितले सुरक्षित ठेवण्याचे 8 महत्त्वाचे उपाय

Skin Care: चेहऱ्यावर पिंपल्स आणि डाग खूप झालेत? मग हा मास्क तुमचे सगळे प्रॉब्लेम्स करतील दूर

SCROLL FOR NEXT