Maharashtra Live News Update : Saam Marathi
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update: वनरक्षकावर हल्ला केल्यानंतर तासाभरात वाघिणीचा मृत्यू

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: विदर्भासह महाराष्ट्रात उष्णतेची लाट, मुंबईसह कोकणात पावसाचा इशारा, विधान परिषदेच्या निवडणुका अपडेट, भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण, नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरण, राज्यातील राजकीय घडामोडी यासह राज्यातील आणि देशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Priya More

वनरक्षकावर हल्ला केल्यानंतर तासाभरात वाघिणीचा मृत्यू

एका वाघिणीने प्रथम बैलाची शिकार केली, त्यानंतर कर्तव्यावर असलेल्या वनरक्षकावर हल्ला करून त्यांना जखमी केले आणि अवघ्या एका तासाच्या अंतराने ती वाघीण मृतावस्थेत आढळल्याने वनविभागात खळबळ उडाली आहे. ही घटना चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर शेतशिवारातील आहे. एक पट्टेदार वाघीण आणि तिचे तीन बछडे शेतात फिरताना दिसून आले. याची माहिती परिसरात पसरताच गावकऱ्यांनी शेताकडे धाव घेतली. तेव्हा वनरक्षकावर वाघिणीने हल्ला केल्याने वनरक्षक सज्जन पारेकर गंभीर जखमी झाले.

माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत विधान परिषदेसाठी इच्छुक

मुंबई पदवीधर मतदारसंघातून डॉ. सावंत यांनी उमेदवारी अर्ज केला होता दाखल

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मध्यस्थीनंतर सावंत यांनी अर्ज घेतला होता मागे

बुलढाण्यातील खामगाव आणि शेगाव परिसरात जोरदार पाऊस

जिल्ह्यातील खामगाव आणि शेगाव परिसरात जोरदार पावसाला सुरुवात.

वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात जोरदार पाऊस.

आज खामगाव परिसरात 45.8 अंश सेल्सिअस इतका तापमान नोंदवल्या गेलं.

दिवसभर उन्हाच्या झळा आणि सायंकाळी पाऊस धारा यामुळे काहीसा परिसरात नागरिकांना दिलासा मिळाल्याचे चित्र आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपार आदर'; वादग्रस्त वक्तव्यावरून वाद वाढताच धीरेंद्र शास्त्रींची माफी

धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील वक्तव्यावरून सुरू झालेल्या वादानंतर दिलगिरी व्यक्त केली. नागपूरमध्ये त्यांनी सांगितले की, त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला. “शिवाजी महाराजांविषयी आमच्या मनात अपार आदर आहे. जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर आम्ही मनापासून माफी मागतो,” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच समाजात मतभेद टाळून एकता राखण्याचे आवाहनही त्यांनी केले.

अमरावतीच्या परतवाडा मध्ये तरुणींचे लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ वायरल केल्याचा प्रकरण

मुख्य आरोपी अयान अहमद चे पाय आणखी खोलात....

लैंगिक शोषण प्रकरणातील आणखी एक सोळा वर्षीय पीडिता SIT समोर...

आरोपी अयान याने तरुणीला तिच्या मर्जी शिवाय स्पर्श केल्याचा तरुणीचा जवाब

त्यामुळे मूळ गुन्ह्यात कलम 74 BNS समाविष्ट करण्यात आले आहे..

गोदा ते नर्मदा जलयात्रेचा आज शिर्डी साईनगरीत मुक्काम...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या हस्ते काल जलयात्रेला झाली सुरुवात...

शिर्डीत जलयात्रेच जल्लोषात स्वागत ; सदाभाऊ खोत यांनी बडावला ढोल तर जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी फुगडी खेळत घेतला आनंद...

अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी निमित्त जलसंवर्धनाचा संदेश देण्यासाठी जलयात्रा...

पुण्यात वाघोली केसनंदमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी,मुख्य चौकातून १ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा

पुण्याच्या केसनंद परिसरात संध्याकाळच्या सुमारास तीव्र वाहतूक कोंडी निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

मुख्य चौकापासून तब्बल एक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.या कोंडीमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागला.

अरुंद रस्ते,वाढती वाहनसंख्या आणि काही वाहनचालकांची बेफिकीर व वेडीवाकडी वाहन चालवण्याची पद्धत यामुळे कोंडी अधिक तीव्र होत आहे.

दरम्यान प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात,अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे

आज रविवार सुट्टी असल्याने शहरात येणारी आणि बाहेर पडणारी दोन्ही बाजूंनी वाहतूक कोंडी आहे

धुळ्यात दुचाकी आणि चार चाकी वाहनाचा भीषण अपघात; दोन जणांचा जागीच मृत्यू तर चार जण गंभीर जखमी

शिंदखेडा तालुक्यातील दरखेडा येथे चार चाकी वाहन आणि दुचाकी वाहन समोरासमोर धडकल्याने भीषण अपघात झाला आहे या अपघातामध्ये दोघा जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर या अपघातामध्ये चार जण गंभीररित्या जखमी झाले असून, स्थानिकांच्या मदतीने जखमींना शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. चिमठाणे गावाजवळ असलेल्या दरखेडा या ठिकाणी हा भीषण अपघात झाला असून या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेल्या दोघेजण हे दुचाकी वरील असल्याचे उघडकीस आले असून, यात अपघातामध्ये दुचाकी पूर्णतः चक्काचूर झाली असल्याचे दिसून येत आहे.

Pune : पुरंदरमध्ये बायोगॅसची टाकी स्वच्छ करण्यासाठी गेलेल्या तिघांचा मृत्यू

पुरंदर तालुक्यातील बेलसर येथे बायोगॅसची टाकी स्वच्छ करण्यासाठी गेलेल्या तिघांचा मृत्यू झालाय .. मृत्यू झालेले कामगार हे उत्तर प्रदेश मधील असल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. बेलसर येथील एका मशरूम कंपनीमध्ये ते काम करत होते घटनेनंतर जेजुरी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. टाकी स्वच्छ करण्यासाठी हे कामगार टाकीत उतरले असतात ते बेशुद्ध पडले आणि त्याच ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला.. याबाबत जेजुरी पोलीस अधिकचा तपास करत आहेत

Mumbai : राघव चढ्ढा यांच्या घराबाहेर आंदोलन, आप कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात 

भाजपाने राबवलेल्या ऑपरेशन लोटस मुळे आम आदमी पक्षाच्या सात राज्यसभा खासदारांनी भाजपात प्रवेश केला. त्यांचा हा निर्णय आम आदमी पक्षातील कार्यकर्त्यांना आवडला नाही. पंजाब मध्ये हरभजन सिंग यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांनी आंदोलन केल्यानंतर आता मुंबईतही आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खार पश्चिमेकडील डीबी ब्रिज या राघव चड्डा आणि परिणीती चोपडा यांच्या घराबाहेर आंदोलन केले. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून सध्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम सुरू आहे. पोलिसांकडून सध्या राघव चड्डा यांच्या इमारतीच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कायदा व सुव्यवस्था व्यवस्थित राहावी यासाठी खार पोलिसांकडून सध्या प्रयत्न सुरू आहेत

baramati : वैशाख शुक्ल दशमी निमित्त श्री खंडोबा मंदिर मुख्य गाभारामध्ये विविध फळांची आकर्षक सजावट

अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या श्री खंडेरायाच्या मुख्य गाभाऱ्यामध्ये वैशाख शुक्ल दशमी निमित्त फळांची सजावट करण्यात आलीय....गुरव कोळी वीर घडशी समाज संघटना, जेजुरी व श्री मार्तंड देवसंस्थान, जेजुरी यांच्या वतीने श्री खंडोबा मंदिर मुख्य गाभारा मध्ये विविध फळांची आकर्षक सजावट करण्यात आलीय.

Sangli : बोरगावमध्ये विजेचा धक्का लागून बिहारच्या तरुण मजुराचा दुर्दैवी मृत्यू

सांगलीच्या वाळवा तालुक्यातील बोरगाव येथे एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे.नवीन डीपी लाईनवर सुरक्षिततेसाठीचे गार्डिंग काम करत असताना विजेचा तीव्र धक्का लागल्याने एका १९ वर्षीय तरुण मजुराचा जागीच मृत्यू झाला आहे.जुम्मन मोहमद नसीम असे या मृत तरुणाचे नाव असून तो मूळचा बिहारचा रहिवासी होता.

yavatmal : गुप्तधन शोधणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात; वडगांव जंगल पोलिसांची कारवाई

यवतमाळ तालुक्यातील वडगाव जंगल पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारेगाव शिवारात गुप्तधन शोधण्यासाठी अघोरी पूजा करत असलेल्या सहा जणांना वडगाव जंगल पोलिसांनी मध्यरात्री अटक केली. शिवारात मोटार पंप चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाल्याने ठाणेदार विकास दांडे पथकासह आडवळणाच्या रस्त्याने गस्त घालत असताना वरूड-कारेगाव रस्त्यावर हा प्रकार उघडकीस आला.

Hingoli : हिंगोलीत उष्मघाताने 48 वर्षीय महिलेचा मृत्यू

उष्मघाताने 48 वर्षीय महिलेचा मृत्यू झालाय

शेतात काम करून विवाह सोहळ्यात उपस्थित राहण्यासाठी घरी आलेल्या महिलेला उष्मघाताचा त्रास जाणवल्याने रुग्णालयात दाखल केलं मात्र उपचारा आधीच मृत्यू झाल्याची डॉक्टरांची माहिती

महिलेला उष्णतेमुळे त्रास जाणवत असल्याची नातेवाईकांची माहिती

अरुणा संजय सांगळे असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव असून हिंगोलीच्या औंढा तालुक्यातील गोजेगाव येथील ही महिला रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे

Farmer News : सोनोशी–पिंपरखेड शिवारात अस्वलाचा धुमाकूळ; शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण

सिंदखेडराजा तालुक्यातील सोनोशी व पिंपरखेड गावांच्या शिवारात अस्वलाचा मुक्त संचार सुरू असल्याने शेतकरी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दररोज शेतातील मशागतीच्या कामासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून वावरावे लागत आहे.

गिरणा धरणातून पाण्याचा विर्सग सोडण्यात आला

नाशिक जिल्ह्यातील सर्वात मोठ्या गिरणा धरणातून बिगर संचनासाठी जळगाव जिल्ह्यासाठी दुपारी पाणी सोडण्यात आलेय. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, धुळे अंतर्गत असलेल्या एम आय डी सी चाळीसगांव, नगरपरिषद भडगाव व पाचोरा यांच्या मागणीनुसार बिगर सिंचन पाणीवापराचे चौथे आवर्तन 2000 क्युसेक्स सोडण्यात आले आहे.हे पाणी फक्त बिगर सिंचन वापराकरिता असल्याने सर्व शेतकऱ्यांनी शेतीचे पंप बंद ठेवावे. तसेच नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे.पाटबंधारे विभागाच्या प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

TCS कंपनी महाराष्ट्रात नव्हे अख्या भारतासह जगभरात - छगन भुजबळ

पोलीस आपलं काम करत आहे काही लोकांना यात अटक झाली आहे...

टीसीएस कंपनीची चौकशी मला वाटतं सुरू आहे.....

पोलीस शेवटपर्यंत चौकशी करणार.....

यामध्ये काय कंपनीचा दोष नाहीये...

टीसीएस कंपनी महाराष्ट्रात नव्हे अख्या भारतासह जगभरात आहे...

कोण कुठे काय काम करत असेल त्यामुळे संपूर्ण कंपनी बदनाम करणं योग्य नाही....

पोलिसांनी त्यांचं काम करावं जे कोणी चुकीचे वागले असतील त्यांना शिक्षा करावी मात्र उगाच टीसीएस कंपनीला बदनाम करू नये

या कंपन्या नाशिक मधून गेल्या तर दुसरी कंपनी निश्चित येणार नाही....

मात्र या प्रकरणामुळे संपूर्ण कंपनीत बंद करा असं म्हणणं चुकीचं आहे त्यातील काही लोक चुकीचे वागले असतील त्यांना कठोर शिक्षा करा आमचं काही म्हणण नाही..

पुण्यातलं तापमान गेल्या आठवड्याभरापासून 40°c वर

पुण्यात सह राज्यभर उन्हाचा तडाका वाढलाय पुण्यातलं तापमान गेल्या आठवड्याभरापासून 40°c च्या वर आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी पुणेकर थंड पेय घेत आहे. सध्या ऊन खूप मोठ्या प्रमाणात आहे इतर पे यापेक्षा उसाचा रस जास्त आयुर्वेदिक असतो. ऊन असल्यामुळे एकीकडे उन्ह आणि दुसरीकडे उसाच्या रसाचा आनंदही पुणेकर घेताना दिसत आहेत.

पिक विमा प्रश्न पेटला; दखल न घेतल्यास टप्प्याटप्प्याने तीव्र आंदोलनाचा इशारा

शेतकरी योद्धा कृती समिती, बुलढाणा यांच्या वतीने सिंदखेडराजा येथे झालेल्या बैठकीत पिक विमा प्रश्नावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. खरीप 2025 हंगामात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान होऊनही विमा कंपन्या व कृषी विभागाकडून नुकसान नाकारले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. या पार्श्वभूमीवर 29 एप्रिल रोजी आमरण उपोषण करण्याचा तसेच 1 मे महाराष्ट्र दिनी सरकार विरोधात काळी गुढी उभारून निषेध मारण्याचा इशारा शेतकरी योद्धा कृती समितीने दिला आहे ... शासनाने तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करत टप्प्याटप्प्याने पुढे नेण्याचा इशारा समितीने दिला आहे....

हिंगोलीच्या औंढा तालुक्यातील गोजेगाव मध्ये विवाह सोहळ्यात अनोखे जुगाड

लग्न मंडपात उष्माघाताचा त्रास होऊ नये म्हणून नवरीच्या बापाने शेतात स्प्रिकलर लावून पाहुण्यांना केली थंड हवेची व्यवस्था

हिंगोलीच्या औंढा तालुक्यातील गोजेगाव मध्ये विवाह सोहळ्यात अनोखे जुगाड

घुगे व सांगळे परिवाराच्या विवाह सोहळ्यात पाहुण्यांची सोय

दोन दुचाकीची समोरासमोर धडक...चार जण जखमी..

वाशिम ते अनसिंग मार्गावरील वेअर हाऊस जवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन अपघात झालाय.. या अपघातात दुचाकी वरील चार जण जखमी झाले असून यातील दोन गंभीर जखमी आहेत... या जखमींमध्ये एक महिला आणि तीन पुरुष होते..

बीडच्या नेकनूर गावात दगडफेक तणावाचे वातावरण, पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज

ACबीडच्या नेकनूर गावात रिक्षाचा धक्का गाडीला लागल्याच्या किरकोळ कारणावरून रिक्षा चालक आणि रिक्षा मधील महिलांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या प्रकारानंतर पोलीस स्टेशनच्या समोर दगडफेकीची घटनाही समोर आली आहे. यात जमावला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठी चार्ज केला.

रायगड मधील लोणेरे येथील लॉजवर तरुणीचे हत्याकांड प्रकरण

रायगडच्या लोणेरे येथील तरुणाच्या हत्याकांड प्रकरणातील आरोपी अनिस मोहमद खान मालदार याला अलीबागच्या जिल्हा सत्र न्यायालयाने 30 एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. गुन्हा घडल्यानंतर तब्बल सहा दिवसांनी आरोपी मालदार पोलिसांच्या हाती लागला आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलिस ठाण्याची आठ ते दहा पथके आरोपीच्या मागावर होती. काल रात्री ठाणे परिसरातून आरोपीला जेरबंद करण्यात आले. आज त्याला अलिबाग येथील न्यायालयासमोर हजार करण्यात आले. आरोपीने मृत तरुणी पल्लवी मोरे हिला लोणेरे येथील लॉजवर नेले. तिथं आधी तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर तिचा धारदार शस्त्राने खून केला. या घटनेनंतर गोरेगाव परिसरात वातावरण संतप्त झाले होते. आरोपी विरोधात यापूर्वी देखील गुन्हे दाखल आहेत .आरोपीने हा गुन्हा का केला याचा शोध आता पोलिस घेत आहेत.

भंडाऱ्याजवळ वाळू घाटावर भरधाव धावणारा ट्रॅक्टर उलटून चालकाचा दबून मृत्यू

वाळूच्या ट्रीप सर्वाधिक व्हाव्यात, आणि वाळूसाठा जास्त व्हावा, यासाठी डेपो संचालकांच्या आदेशानुसार ट्रॅक्टर चालकांमध्ये जीवघेणी स्पर्धा रंगलेली असताना ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटलं आणि चालकाचा त्याखाली दबून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील ईटान येथील वाळू घाटावर आज सकाळी घडली. सचिन सौंदरकर (२६) असं मृत ट्रॅक्टर चालकाचं नावं आहे. घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी वाळू घाट बंद पाडला.

डोंबिवलीत पुस्तकांचा महासागर,नेहरू रोड फडके रोड बनला बुक स्ट्रीट,वाचकांचा महापूर

डोंबिवली ही सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखली जाते, आणि आज या नगरीने वाचन संस्कृतीचा एक अनोखा आदर्श देशासमोर ठेवला आहे. पै फ्रेंड्स लायब्ररी आणि डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बुक स्ट्रीट’ या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.पहाटेपासूनच रस्त्यावर पुस्तकांचा अक्षरशः महासागर पाहायला मिळत आहे.

हिंगोलीत उन्हापासून शेळ्यांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्याने राहत्या घरात शेळ्या बांधून पंखे लावले

उन्हापासून शेळ्यांचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्याने राहत्या घरात शेळ्या बांधून पंखे लावले. हिंगोलीत वाढत्या तापमाना मुळे पशुपालक शेतकरी संकटात आहे. शेळ्या आणि म्हशीचे गर्भ नष्ट होण्याचे प्रमाण वाढले आहे.

स्कार्पिओचा टायर फुटून समृद्धी महामार्गावर अपघात; पाच जण जखमी 

वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर आज कारंजा तालुक्यातील चॅनल क्रमांक 167 वर भीषण अपघात टळल्याची घटना समोर आली आहे. स्कार्पिओ गाडीचा समोरील टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून वाहन डिव्हायडरला धडकून पलटी झाले.

कोंढापुरीत भीषण आग; गॅस सिलेंडर स्फोटाने घर भस्मसात

शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथे भीषण आग लागून एक घर पूर्णतः जळून खाक झाले.

स्वयंपाकघरातील गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे आगीने उग्र रूप घेतले.

सुदैवाने जीवितहानी टळली.

अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.

रिक्षा चालकांवर मराठीची सक्ती करण्याआधी शिकविण्याची गरज - रईस शेख

महाराष्ट्रात प्रत्येकाने मराठी मध्ये बोलणे अपेक्षित आहे.

आमच्या पक्षाकडून ही याचे समर्थन केले जात आहे.

परंतु रिक्षा चालकांवर मराठीची सक्ती करण्याआधी ती शिकविण्याची गरज आहे.

अशी प्रतिक्रिया भिवंडी पूर्वेचे समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी दिली आहे.

नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा कहर,  पारा 44 अंश सेल्सिअसवर

नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा कहर

सलग दुसऱ्या दिवशी तापमानाचा पारा 44 अंश सेल्सिअस वर

या वर्षाच्या सर्वाधिक तापमानाची नोंद झाली असून तापमान ४४ अंशांवर

एप्रिलमध्येच धोक्याची पातळी गाठली, उष्माघाताचा धोका वाढला

कमी आर्द्रतेमुळे उकाड्याची तीव्रता वाढली

धिरेंद्र शास्त्री बागेश्वर बाबाला महाराष्ट्रात बंदी घाला; अमरावतीत काँग्रेसचे आंदोलन

धिरेंद्र शास्त्री बागेश्वर बाबाला महाराष्ट्रात बंदी घाला; अमरावती शहर काँग्रेसचे आंदोलन.....

बागेश्वर बाबाच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारून काँग्रेसने केल अमरावतीत आंदोलन...

या सरकारकडून या बाबांना प्रोत्साहन दिल जात असल्याचाही काँग्रेसचा आरोप....

बागेश्वर बाबा ने शिवाजी महाराजांचा अपमान केला त्यावर कारवाई करा काँग्रेसची मागणी..

बुलढाण्यात धावत्या बसचे मागील चाके निखळले; जीवित हानी नाही

बुलढाणा जिल्ह्याच्या मलकापूर तालुक्यातील हरणखेड ते मलकापूर रस्त्यावर धावणाऱ्या एस टी बसची मागील चाके निखळली असल्याची घटना घडली .

मात्र चालकाव्या सतर्कतेने बसमधील प्रवाशांचा जीव वाचला

तत्काळ दुसरी बस बोलावून प्रवाशांना त्यांच्या गावी सोडण्यात आले

लग्नाच्या वरातीत नाचण्यावरून तरुणाचा खून, चौघांना अटक

लग्नाच्या वरातीत नाचण्यावरून तरुणाचा खून

भारती पोलीस स्टेशन कडून चौघांना अटक

तेजस दत्तात्रय पिलाने असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे.

वरातीतील भांडणाच्या सूड घेण्यासाठी तेजसची हत्या करण्यात आली

याप्रकरणी विशाल खोपडे अभिषेक खोपडे सचिन धुळे आदिनाथ कसबे या आरोपींना अटक करण्यात आली आहे

ठाण्यात तापमान 38 अंशावर; नागरिक उकाड्याने हैराण

ठाण्यात आज सकाळी पासून उन्हाची काहिली वाढलेली आहे.

आता 38 अंश सेल्सियस तापमान आहे. दिवसभर उन्हाची काहिली वाढली आहे.

त्यामुळे नागरिकांची पावले शीत पेय दुकानाकडे वळले आहेत.

दुपार नंतर उन्हाची काहिली वाढणार आहे.

Solapur: सोलापूर महापालिका रुग्णालयात आणखी 4 बालमाता आढळल्या

सोलापूर -

महापालिका रुग्णालयात आणखी आढळल्या चार बालमाता, अल्पवयीन माता असल्याचे समजतात डॉक्टरांनी दिली पोलिसांना माहिती

- सोलापुरात बालमाता प्रकरणी चौकशीचा ससेमिरा मागे लागताच सरकारी आणि खाजगी डॉक्टर अलर्ट मोडवर

- गुरुवारी व शुक्रवारी मनपाच्या रुग्णालयात आढळल्या तब्बल चार बालमाता

- बाल माता असल्याचे लक्षात येताच संबंधित डॉक्टरांनी तात्काळ पोलिसांना दिली माहिती

- बालमाता प्रकरणी माहिती लपवल्याप्रकरणी खाजगी आणि सरकारी डॉक्टरांवर होतायत गुन्हे दाखल

- महापालिकेकडून 130 प्रसूतीगृहातील प्रत्येक प्रसूती महिलेची फेरतपासणी सुरू

Hingoli: ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसीम देशमुख यांच्या कारवर अज्ञातांकडून हल्ला

हिंगोली -

ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसीम देशमुख यांच्या कारवर अज्ञातांकडून हल्ला

रात्रीच्या वेळी गाडीवर दगडफेक करून गाडीची तोडफोड

फॉर्च्युनर गाडीची तोडफोड झाल्याने शिवसेनेचे नेते वसीम देशमुख थेट पोलीस स्टेशनमध्ये दाखल

राजकीय वैमान्यासातून हल्ला झाल्याचा आरोप

पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्याची मागणी

हिंगोली शहर पोलीस स्टेशनमध्ये शिवसैनिक जमण्यास सुरुवात

Jalgaon: भुसावळ येथे खडका चौफुलीजवळ महामार्गावर अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक

जळगाव -

भुसावळ येथे खडका चौफुली जवळ महामार्गावर अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक

अपघातात दुचाकी वरील दोन जखमी

जखमींमध्ये एका महिलेचा समावेश आहे.

अपघातानंतर स्थानिकांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले

Pandharpur: भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात 4 शेळ्यांचा मृत्यू

पंढरपूर -

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात चार शेळ्यांचा मृत्यू

सांगोला तालुक्यातील चोपडी येथील सुभाष पाटील यांच्या शेतातील शेळ्यांवर चार भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला.

यामध्ये चार बोकड, एक पाठ आणि एक शेळी ठार झाली आहे.

यामध्ये शेतकऱ्याचे सुमारे एक लाख रुपयाचे नुकसान झाले आहे.

Solapur: अवकाळी पावसाचा बसला फटका; सोलापुरात कांद्याची आवक घटली

सोलापूर -

अवकाळी पावसाचा बसला फटका; सोलापुरात कांद्याची आवक घटली

दरात चढ-उतार सुरूच; अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत

अवकाळी पावसामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक मंदावल्याचे पाहायला मिळाली.

Dharashiv: धाराशिवमध्ये मध्यरात्री सशस्त्र दरोडा, माजी सैनिक गंभीर जखमी 

धाराशिव -

परंडा तालुक्यातील कुंभेजा शिवारात मध्यरात्री सशस्त्र दरोडा

सहा दरोडेखोरा बरोबर 70 वर्षीय माजी सैनिकांचा निकाराचा लढा

हल्ल्यात माजी सैनिक गंभीर जखमी पुण्यात उपचार सुरू

Yavatmal:  यवतमाळ जिल्ह्यात 25 दिवसात 18 शेतकऱ्यांनी संपविले जीवन

यवतमाळ - जिल्ह्यात 25 दिवसात 18 शेतकऱ्यांनी संपविले जीवन

यवतमाळ जिल्ह्याला लागलेला शेतकरी आत्महत्येचा डाग शासन आणि प्रशासन पुसण्यात अपयशी ठरत असल्याचे आकडेवारीवरून समोर येत आहेत.

1 ते 25 एप्रिल या कालावधीत यवतमाळ जिल्ह्यात तब्बल 18 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटावळे असून नापिकी आणि शासनाचे उदासीन धोरण या आत्महत्यांना कारणीभूत असल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून केला जात आहे.

Raigad: रायगडच्या लोणेरे येथील तरुणीच्या हत्याकांड प्रकरणातील आरोपी अनिस मोहम्मद खान मालदारला अटक

रायगड -

- रायगडच्या लोणेरे येथील तरुणी हत्याकांड प्रकरणातील सर्वात मोठी बातमी

- आरोपी अनिस मोहम्मदखान मालदार याला अटक

- रायगड पोलिसांची मोठी कामगिरी

- पोलीस अधिक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मोठ यश

- लोणेरे येथील लॉजवर तरुणीवर बलात्कार आणि खुन करून सहा दिवसांपासून आरोपी नराधम होता फरार

- पिडीत मृत तरुणी पल्लवी मोरे हिच्यावर लैंगिक अत्याचार करून केली होती निर्घृण हत्या

- नवी मुंबई परिसरात पोलिसांनी आरोपीला अटक केल्याची माहिती

Nashik: अशोक खरातच्या फार्महाऊसमधील संशयास्पद व्हिडिओ SIT च्या हाती

नाशिक -

- अशोक खरातच्या फार्महाऊसमधील संशयास्पद व्हिडिओ SIT च्या हाती

- कुकच्या माध्यमातून खरातच्या हालचालींवर ठेवण्यात आले होते लक्ष

- महिलांसोबतच्या कृत्यांचे CCTV फुटेज समोर आल्याची माहिती

- ऑफिसबॉयनंतर कुकनेही केला खरातच्या कारनाम्यांचा भंडाफोड

Nashik: TCS प्रकरणात फरार निदा खानचा आरोपींशी संपर्क कायम

नाशिक -

- TCS प्रकरणात फरार निदा खानचा आरोपींशी संपर्क कायम

- मोबाइल तपासात कॉलिंग डिटेल्समधून कनेक्शन उघड

- नोकरी सोडल्यानंतरही आरोपींशी सतत संपर्कात असल्याची माहिती

- दानिश शेखच्या मोबाईलमधून फोटो आणि संशयास्पद व्हिडिओ सापडले

- SIT कडून डिजिटल पुराव्यांचे सखोल विश्लेषण सुरू

- आरोपी आणि निदा खानच्या जामिनावर २७ एप्रिलला सुनावणी

Pune: ड्रायव्हरनेच मारला मालकाच्या घरी डल्ला, 15 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

पुणे -

ड्रायव्हरनेच मारला मालकाच्या घरी डल्ला

मालकाच्या आईचे 15 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

राजेश कांबळे असं चोर असलेल्या ड्रायव्हरचं नाव

विमानतळ पोलिसांकडून ड्रायव्हरला अटक

Pune: पुण्यामध्ये उकाडा वाढला, तापमान 40 अंशांपार

पुणे -

पुण्याचे तापमान 40 अंशांच्या पुढे

रात्रीच्या तापमानातही वाढ पुढील दोन दिवस दुपारनंतर पावसाचा अंदाज

शहरात कालपासून पुन्हा एकदा तापमानात वाढ होऊन ते 40.9 अंशावर पोहोचले लोहगाव परिसरात 42° सेल्सिअस तापमानाची नोंद झाली रात्रीच्या तापमानातील सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली

गेल्या आठवड्यात शहरात घरांचा पाऊस पडला होता मात्र हवामानातील प्रतिकूल घडामोडींमुळे चार दिवसांपासून पारा 39 ते 41 अंशामध्ये बेंगाळत आहे

पुणे शहराबरोबरच जिल्हासह मध्य महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसात तापमानात लक्षणे वाढ झाली आहे.

Jalgaon: जळगावात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मुलाचे भावी आमदार आशयाचे लागले बॅनर

जळगाव -

जळगावात शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटलांचे चिरंजीव प्रतापराव पाटील यांचे भावी आमदार आशयाचे लागले बॅनर

जळगाव शहरातील स्वातंत्र्य चौक, आकाशवाणी चौक सह वेगवेगळ्या चौकांमध्ये प्रतापराव पाटील भावी आमदार अशा आशयाचे लागले बॅनर

प्रतापराव पाटील यांचा 28 एप्रिल रोजी वाढदिवस असून वाढदिवसानिमित्ताने भावी आमदार कार्यकर्त्यांनी लावले बॅनर

Thane: मुंब्रा चुहा खाडी प्रकरण नताशा आव्हाड यांची पाहणी; अधिकाऱ्यांवर टीका

मुंब्रा -

मुंब्रा चुहा खाडी प्रकरण नताशा आव्हाड यांची पाहणी; अधिकाऱ्यांवर टीका

मुंब्राचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची मुलगी नताशा आव्हाड यांनी चुहा खाडी पुलाला भेट देत परिस्थितीची पाहणी केली.

खाडीत बेकायदेशीर भराव टाकून खारफुटी व झुडपे नष्ट केली जात असल्याचा आरोप

चुहा पुलावर मोठ्या प्रमाणावर भराव टाकला जात असून पालिका कर्मचारी व अधिकाऱ्यांवर त्यांनी जोरदार टीका केली..

चुहा पुल ते दिवा रस्ता बंद करण्याचे आदेश कोणी दिले?खाडीभोवती भिंत बांधण्याचा निर्णय कोणी घेतला?

"खाडी भरणे थांबले नाही तर पावसाळ्यात मुंब्रा पाण्याखाली जाऊ शकतो;त्याची जबाबदारी संबंधितांवर असेल"

वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे तक्रार करणार

डंपरद्वारे माती टाकून खाडी भरली जात असल्याचा आरोप केला आहे

Amravati: अमरावती जिल्ह्यातील वरुड–मुलताई मार्गावर ताज फ्रूट कंपनीला भीषण आग

अमरावती -

अमरावती जिल्ह्यातील वरुड–मुलताई मार्गावर ताज फ्रुट कंपनीला भीषण आग, आगीत कोट्यवधींचे फ्रुट कॅरेट जळून खाक, कोट्यावधी चे नुकसान

या आगीने काही वेळातच विक्राळ रूप धारण केले. आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट दूरवरून दिसत असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच नरखेड, काटोल आणि बैतुल येथील अग्निशमन विभागाचे बंब घटनास्थळी दाखल आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू

घटनेची गंभीरता लक्षात घेता पोलिसांनी घटनास्थळी लावला तगडा बंदोबस्त..

लागलेली आग पाहण्यासाठी नागरिकांनी घटनास्थळी केली गर्दी क

आग आग कशाने लागली याचा शोध लागला नसून आगीचे कारण अस्पष्ट आहे...

Navi Mumbai: नवी मुंबई महानगरपालिकेच्या ८० मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय भाजपाने घेतला

नवी मुंबई महानगरपालिकेच्या मराठी शाळा बंद करण्याचा सत्ताधारी भाजपाचा निर्णय

मराठी शाळा सुरू ठेवण्यासाठी शिवसेनेकडून कोर्टात याचिका.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या ८० मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय सत्ताधारी भाजपाने घेतला आहे.

महानगरपालिका शाळेत एकूण ६० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

शिक्षण धोरणात सुधारणा करून या शैक्षणिक वर्षापासून मराठी मिडीयम बंद करण्याचा घाट भाजपाने घेतला आहे. तसा प्रस्ताव महासभेत मंजूर करण्यात आलाय.

या विरोधात शिवसेना आक्रमक झाली असून न्यायालयात याचिका दाखल केली आहे. महाराष्ट्रात मराठीवर अन्याय न करता , मराठी आणि

इंग्रजी मिडीयम असे दोन्ही पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी शिवसेनेने केली आहे.

असे न झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा विरोधीपक्षनेते विजय चौगुले यांनी दिलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हार्ट अटॅकचा मोठा संकेत! पायांवर दिसणाऱ्या 'या' बदलांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका

Maharashtra News Live Update : देवगड येथे आंबा बागायतदारांनी मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळला

NEET पेपर फुटीनंतर महत्त्वपूर्ण बदल; मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय

Rajdhani Express Fire : धावत्या एक्स्प्रेसला अचानक आग; प्रवाशांची डब्यात एकच धावाधाव, थरार कॅमेऱ्यात कैद, VIDEO

Weather Update : राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट; तुमच्या जिल्ह्यात कसं असेल हवामान?

SCROLL FOR NEXT