सांगलीच्या शिराळा तालुक्यातील आटूगडेवाडी येथे स्कूल व्हॅनचा भीषण अपघात होऊन पाच वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला आहे.. तर चार मुले जखमी झाली आहेत. विठ्ठल मंदिराजवळील ओढ्याच्या पुलावर हा अपघात झाला.
काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांनी २०१७ मध्ये संविधान चौक येथे केलेल्या आंदोलनादरम्यान दाखल झालेल्या खटल्यात न्यायालयाने आज माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना जामीन मंजूर केला.
* दुरांतो एक्स्प्रेसवर कसारा इगतपुरी दरम्यान दगडफेक
* ट्रेन क्रमांक12290 अप दुरांतो एक्स्प्रेसच्या ए-1 कोचवर दगडफेक
* किलोमीटर 135/217 शेंगाळवाडीजवळ अज्ञात व्यक्तीकडून दगडफेक
* दगड लागून ए-1 कोचमधील खिडकीची काच फुटली
पुण्याच्या कॅम्प परिसरातील नामांकित हॉटेलमध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून काऊंटरमध्ये ठेवलेली २ लाख ४७ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना समोर आली आहे. कॅम्पमधील ईस्ट स्ट्रीट परिसरात, बॉम्बे गॅरेजसमोर असलेल्या मसाला टाइम्स हॉटेलमध्ये घडली. चोरट्यांनी रात्रीच्या वेळी हॉटेलचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि काऊंटरमधील रोकड चोरून पोबारा केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.
नाशिकच्या वणी-सापुतारा राष्ट्रीय महामार्गावर दिंडोरी तालुक्यातील पांडाणे येथील देवनदी पुलावर दुपारी सुमारास दुचाकी आणि क्रेटा कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात दुचाकीवरील मंगेश पांडू खराटे (वय ३५, रा. खोबळा, ता. सुरगाणा) यांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असून त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.
दुपारी च्या सुमारास खोबळा येथून वणीकडे येणारी दुचाकी आणि वणीकडून सापुताऱ्याकडे जाणार क्रेटा कार यांची पांडाणे येथील देवनदी पुलावर सामोरा समोर धडक झाली,अपघाताची तीव्रता एवढी होती की, धडकेनंतर दुचाकीने पेट घेतला आणि ती पूर्णपणे जळून खाक झाली. तर क्रेटा कारच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला,दरम्यान अपघातात जखमी झालेल्या दोघांना नाशिक तर दोघांवर वाणीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले,
हिंगोलीमध्ये भाजपच्या वरिष्ठ पदाधिकारी प्रीती जयस्वाल यांच्या नाश्त्यातील खिचडीमध्ये आळ्या निघाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस झाला आहे. हिंगोली शहरातील महाराज भजे सेंटरमध्ये नाश्ता करत असताना शिजवण्यात आलेल्या खिचडीमध्ये या अळ्या होत्या. दरम्यान या प्रकारानंतर प्रीती जयस्वाल चांगल्या संतप्त झाल्या तर दुकान चालकाने मात्र खिचडीमध्ये आळ्या नसून करपलेले तांदूळ असल्याचा दावा केला आहे, दरम्यान आता प्रीती जयस्वाल यांनी एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासह हिंगोलीच्या जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांना तातडीने या दुकानावरती कारवाई करावी अशी मागणी केली आहे
आंबेगाव तालुक्यात दूध भेसळ प्रकरणात मंचर पोलिसांनी आणखी १० जणांना अटक केली असून अटकेचा आकडा २४ वर पोहोचला आहे. मात्र काही भेसळखोरांमुळे शेतीला जोडव्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांचा व्यवसाय बदनाम होत आहे.
नाशिकच्या येवल्याचे आमदार व मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून येवला तालुक्याच्या उत्तरपूर्व भागातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी साकारण्यात आलेल्या मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी सलग तिसऱ्या वर्षी डोंगरगाव साठवण तलावात दाखल झाले. या जलप्रवाहाचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले.दिंडोरी तालुक्यातील मांजरपाडा प्रकल्प भरून ते पाणी पुनेगाव-दरसवाडी डोंगरगाव थेट पोहच काळव्यावतून येवला तालुक्यातील शेवटच्या टोकाला पोहचत असल्याने दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत आहे
जालन्यात धारदार शस्त्रांचा मोठा साठा पोलिसांनी जप्त केलाय.जालना शहरातील सुंदरनगर परिसरात चंदनझिरा पोलिसांनी कारवाई केलीय.या कारवाईत पोलिसांनी 22 तलवारी,15 खंजीर आणि 4 चॉपर असा 1 लाख 34 हजारांचे घातक शस्त्र जप्त केले आहेत. दरम्यान हे धारदार शस्त्र जालना ,भोकरदन आणि परतूर शहरात आरोपी विक्री करणार होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तर या आरोपींनी ही धारदार शस्त्र राजस्थानच्या अजमेर येथून मागितली असल्याची माहिती जालन्याच्या डीवायएसपी अनंत कुलकर्णी यांनी दिली आहे...
पुण्यात अचानक रस्ता खचला! नागरिकांच्या सतर्कतेमुळे दुर्घटना टळली
पुण्यातील शनिवार पेठेत रस्ता खचल्याची घटना
निकृष्ट दर्जाच्या कामाचे जिवंत उदाहरण
डांबर टाकून डागडुजी करत पालिकेने दाखवली तत्परता
वेळेत नागरिकांनी प्रशासनाला दिलेल्या माहितीमुळे दुर्घटना टळली
नंदुरबारमधील कथित व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणात भाजपचे माजी प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. भाजपच्या माजी खासदार डॉ. हिना गावित यांचे भाऊ रोहन गावित यांनी विजय चौधरी यांच्याविरोधात ॲट्रॉसिटी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
पहिली यादीमध्ये 17 लाख पात्र शेतकरी आहेत. 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांना वितरण करण्यात आलेय आज पाहिलं तर 13 लाख शेतकऱ्यांचे kyc पूर्ण झालेली आहे. income टॅक्स भरणाऱ्या 94 हजार शेतकऱ्यांना वागळ्यात आलेय 46 हजार अन्य कारणासाठी अपात्र ठरले आहेत.
थकीत वेतनासह वाढीव GST अनुदान मिळावे, या मागणीसाठी परभणी शहर महानगरपालिकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आजपासुन बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे.महापालिकेच्या मुख्य कार्यालयात सकाळपासूनच विविध विभागांतील अधिकारी आणि कर्मचारी एकत्र आले. परभणी शहर महानगरपालिका अधिकारी-कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष के. के. आंधळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
आज मुंबईत झालेल्या तिरंगा रॅलीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत.
मानधनात वाढ करून किमान ३० हजार रुपये मानधन द्यावे, तसेच पेन्शन योजना लागू करावी, या प्रमुख मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर्स आज आक्रमक झाल्या. जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारो सेविका व आशा वर्कर्सनी मोर्चा काढत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
पाच ते सहा जणांनी केली एका तरुणाला बेदम मारहाण
किरकोळ कारणावरून वाद झाल्यानंतर पाच ते सहा जणांनी एकाला बेदम मारलं
घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे
संबंधित तरुणाने पोलिसांकडे तक्रार देखील दिली असल्याची माहिती
मराठा समाजात एकनाथ शिंदे यांची निर्माण झालेली क्रेज कमी करण्यासाठी मंत्री बावनकुळे यांनी नोंदी रद्दचा प्लॅन केल्याचा गंभीर आरोप,मनोज जरांगे-पाटील यांनी केला आहे.एकनाथ शिंदेंच्या काळात 58 लाख नोंदी सापडल्या,पण बावनकुळेंनी देवेंद्र फडणवीस यांच्या काळात त्या नोंदी रद्द केल्या, कारण एकनाथ शिंदेंची मराठा समाजात निर्माण झालेली क्रेझ कमी करण्यासाठी केलेला,हा प्लॅन असल्याची दाट शक्यता असल्याचं स्पष्ट करत 10 टक्के ही आरक्षण रद्द करतील,अशी भीती देखील जरांगे-पाटील यांना व्यक्त केली,सांगलीच्या कवठेमहांकाळ येथे बोलत होते.
प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी धाराशिवमध्ये मोर्चाचे काढण्यात आला.सध्या केवळ २,५०० रुपये मासिक मानधन मिळत असल्याचा संघटनेचा दावा आहे. केरळच्या धर्तीवर १८ हजार रुपये मासिक मानधन देण्याची प्रमुख मागणी करण्यात आली आहे.आजारपणासाठी मेडिकल सुविधा,विमा संरक्षण आणि सामाजिक सुरक्षा देण्यात यावी तसेच १० ऐवजी १२ महिने मानधन देण्यात यावे तसेच एकत्रीकरणामुळे कामावरून कमी झालेल्या धाराशिव जिल्ह्यातील ५६ शाळांमधील कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घ्यावे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
‘स्मार्ट मीटर’ विरोधात मालवण येथील वायरी-भूतनाथ गावातील ग्रामस्थ व लोकप्रतिनिधींनी आक्रमक भुमिका घेत महावितरण कार्यालयावर धडक दिली. आम्ही कोणत्याही परिस्थितीत गावात स्मार्ट मीटर बसवू देणार नाही!असा ठाम निर्धार वायरी-भूतनाथ येथील ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. यासंदर्भात महावितरणला ग्रामपंचायतीच्या वतीने निवेदनही देण्यात आले आहे. ज्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत तेथे दुप्पट-तिप्पट बिल येत असल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी, मजूर व सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित कोलमडणार आहे. सध्याचे डिजिटल मीटर्स सुरळीत सुरू असताना नवीन मीटर सक्तीने बसविल्यास व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास महावितरण जबाबदार राहील असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज नंदुरबार जिल्ह्यातील शहाद्यात जेलभरो आंदोलन पुकारण्यात आले आहे. अखिल भारतीय किसान सभा, भाकप ,मार्क्सवादी आणि लाल बावटा युनियनच्या संयुक्त विद्यमाने हे आंदोलन होत आहे. शेतमालाला दीडपट हमीभाव, वनजमिनीचे 7/12उतारे, स्मार्ट मीटर रद्द करणे, 24 तास वीज, मजुरांना किमान वेतन आणि निराधार योजनेची पेन्शन 3 हजार रुपये करण्याची प्रमुख मागणी आहे. तसेच खराब रस्त्यांची चौकशी आणि महागाईवर नियंत्रणाची मागणी करण्यात आली आहे. हे आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण आणि संविधानिक मार्गाने होणार असल्याचे संघटनांच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे.
मुलुंड स्थानकात स्पार्किंग झाल्यामुळे रेल्वे वाहतूक सेवा विस्कळीत झालीय.
यवतमाळ जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात विद्यार्थ्यांचा शिक्षकाच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी अनोखा आंदोलन केलं. वणी पंचायत समिती अंतर्गत परमडोह येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची कमतरता असून शिक्षक नियुक्तीच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी थेट शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयातच शाळा भरवली.शिक्षकांची तात्काळ नियुक्ती करावी यासाठी विद्यार्थ्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधत मागणी केली.
नाशिक शहरातील मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या विविध राजकीय आणि स्थानिक घडामोडींवर बैठकीत चर्चा
खड्ड्यांच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक, सत्ताधाऱ्यांवर सातत्याने होत आहे टीका
नाशिक महापालिकेत भाजपसोबत शिवसेनाही सत्तेत
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील नाशिक दौऱ्यात खड्ड्यांच्या मुद्द्यावर केली होती टीका
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये खड्ड्यांच्या प्रश्नावर मोर्चा काढण्याचा इशारा दिल्यानंतर बैठकीला विशेष महत्त्व
- त्र्यंबकेश्वर–घोटी मार्गावरील बोरीची वाडी परिसरात वाहनाला अडवून मारहाण
- मोटारसायकलला कट मारल्याच्या कारणावरून वाद झाल्याची पोलिसांत नोंद
- १० जणांविरुद्ध घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
- आरोपींनी मोटारसायकलवरून पर्यटकांच्या गाडीचा पाठलाग केल्याचा आरोप
- वावी हर्ष येथे गाडी अडवून चालक आणि प्रवाशांना काठी तसच चापटीने मारहाण केल्याचा आरोप
बीडचा परळी तालुक्यात वर्गीकरणाच्या विरोधामध्ये महामोर्चाचा आयोजन करण्यात आला आहे.
या मोर्चामध्ये हजारो बांधव मोर्चामध्ये सहभागी झाले असून या मोर्चामध्ये आनंदराज आंबेडकर हे देखील सहभागी झालेत.
हा मोर्चा परळी शहरातून निघाला आनंदराज आंबेडकर यांच्या भाषणाने या मोर्चाचा समारोप होणार आहे.
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीच्या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून विविध स्तरांवर आंदोलने केली जात आहेत.
याच मागणीला पुन्हा एकदा जोर देण्यासाठी लोकसेवा काँग्रेसच्या वतीने अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आलंय.
कल्याण डोंबिवली शहरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. काल काही तासांत तब्बल १३० नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नाशिकच्या जिल्हा रुग्णालयासमोर कुंभार समाजाचं रास्ता रोको आंदोलन
नाशिक जिल्ह्यातील सिन्नरच्या दोडीतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचारानंतर आजीचे अपहरण करून खून केल्याचा आरोप
पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पीडित कुटुंबीयांवर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव आणल्याचा दावा
तक्रार मागे घेण्यासाठी तीन लाख रुपयांची ऑफर दिल्याचा आरोप
जीएसटीच्या वाढीव अनुदानाच्या मागणीसाठी लातूर महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
महापालिका कर्मचाऱ्यांनी महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर ठिय्या आंदोलन करत प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली
प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी घरांच्या मुद्यावरून भाजप शिवसेना आमने सामने
एकमेकांविरोधात घोषणाबाजी
क्लस्टर योजनेत बदल करण्या वरून भाजप आणि शिवसेना परत एकदा आमने सामने
भिवंडी पारोळ या राज्य मार्गाचे नुकताच काँक्रिटीकरण करण्यात आले आहे.परंतु या रस्त्यावरील असंख्य ओढे नाले यावरील पूल हे जुनेच असून या पुलांवरील संरक्षक कठडे नसल्याने हा रस्ता सध्या धोकादायक ठरला आहे.
मध्ये रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. मुलुंड स्थानकात स्पार्किंग झाल्याचं समोर आलंय. यामुळे मध्य रेल्वेच्या लोकल वाहतूकीवर परिणाम झाला आहे.
४४३ शेतकऱ्यांच्या भात रोपांचे, तर १,४३६ शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे नुकसान
या नुकसानीपोटी एकूण १ कोटी ३३ लाख ६३ हजार रुपयांच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव कृषी विभागाने पंचनामे करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला.
जुलै महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, ४४३ शेतकऱ्यांच्या १२३.३८ हेक्टर क्षेत्रातील भात रोपे, तर १ हजार ४३६ शेतकऱ्यांच्या २७८.२७ हेक्टर शेतजमिनी बाधित झाल्या आहेत
- नागपूरातील बडकस चौकापासून काही अंतरावर असलेल्या एका व्यक्तीवर चाकुने हल्ला
- महाल येथील बडकस चौकापासून काही अंतरावर असलेल्या आयचित मंदिर परिसरात घटना
- पिसरातील गल्लीमध्ये एका व्यक्तीवर चाकूने हल्ला
- कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील घटना
- पोलीसांकडून तपास सुरु, जखमी व्यक्तीवर उपचार सुरु
पुण्यात पे अँड पार्कचा स्थायी समोर प्रस्ताव
लक्ष्मी रस्ता,विमानतळ रस्त्यासाठीचा प्रस्ताव सादर,व्यावसायिक आणि नागरिकांचा विरोध
रत्नागिरीतील ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था दयनीय
वरवडे - कळझोंडी रस्त्याची झाली चाळण
मोठ्या प्रमाणात पडलेल्या रस्त्यामुळे विद्यार्थी त्याचबरोबर ग्रामस्थ देखील त्रस्त
चिखल अंगावर उडेल याची भिती देखील मनात
संतश्रेष्ठ श्री नामदेव महाराज यांच्या संजीवन समाधी दिनानिमित्त आज मनमाड शहरातून समस्त शिंपी समाजाकडून भव्य रथयात्रेचे आयोजन करण्यात आले. या रथयात्रेत महिला आणि पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संपूर्ण रथयात्रेदरम्यान "ज्ञानोबा-तुकोबा", "जय हरी विठ्ठल" चा जयघोष करण्यात आला.तर विविध वेशभूषा करून लहान मुले सहभागी झाले होते,तर रथ यात्रा मिरवणुकीत समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते
रेखा अंबुरे यांची 2025 च्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मागास प्रवर्ग–महिला म्हणून निवड झाल्याचा उल्लेख.
त्यांच्या कुणबी नोंदीबाबत आक्षेप नोंदविण्यात आल्याचे पत्रात नमूद.
संबंधित कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याबाबत कोणतीही अधिकृत कार्यवाही झालेली नाही, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
प्रमाणपत्र रद्द झाल्याच्या बातम्यांबाबत प्रशासनाकडे अधिकृत आदेश किंवा नोंद उपलब्ध नसल्याचे पत्रातून स्पष्ट होते.
पिंपरी-चिंचवडमधील म्हेत्रे वस्ती परिसरात रविवारी दुपारी घडलेल्या एका अत्यंत धक्कादायक आणि विचलित करणाऱ्या घटनेत अवघ्या चार वर्षांच्या चिमुरडीवर सात भटक्या कुत्र्यांच्या टोळीने अचानक जीवघेणा हल्ला केला.
महाड विन्हेरे रस्त्यावर दोन ST बसला अपघात
कुर्ला घाटातील वळणावर दोन्ही ST बस चालकांचे नियंत्रण सुटल्याने झाला अपघात
एक ST बस झाडावर आदळली तर दूसरी ST बस रस्त्याशेजरी घसरली
अपघातात ST ड्रायव्हर सह सात ते आठ प्रवासी जखमी
जखमींवर महाडच्या ट्रॉमा केअर युनिट हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु
पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत
वांद्रे ते माटुंगा दरम्यान तांत्रिक बिघाड
* मखमलाबाद परिसरातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे, नागरिकांचा संताप
* खड्ड्यांमुळे कारसह दुचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
* वाहनचालकांना जीव मुठीत धरून करावा लागतोय प्रवास
* रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात नागरिकांनी अनोख्या पद्धतीने व्यक्त केला संताप
पुण्यात पोलीस ठाण्यातच 'हाय-व्होल्टेज' राडा....
आरोपींच्या समर्थनार्थ आलेल्या महिलांचा उरुळी कांचन पोलिसांसमोरच गोंधळ
व्हिडिओ व्हायरल
शेततळ्यात बुडून आजोबा आणि नातवाचा मृत्यू...
संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ येथील दुर्दैवी घटना...
शेततळ्यात बुडत असलेल्या नातवाला वाचवण्यासाठी गेलेल्या आजोबांनाही मृत्यूने गाठले...
दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू...
सर्वेश संतोष गुळवे असे 13 वर्षीय नातवाचे, तर पांडुरंग रखमा गुळवे असे 65 वर्षीय आजोबांचे नाव...
घटनेमुळे परिसरात शोककळा
जळगावमधील धांडे नगर, श्रद्धा कॉलनी परिसरातील. येथील 'गौरी शंकर महादेव मंदिरात' चोरांनी डल्ला मारला. चोरांनी देवाच्या गाभाऱ्यात घुसून चोरी केली आहे. भरदिवसा आणि गजबजलेल्या भागात ही चोरी झाल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे. दिवसाढवळ्या जर मंदिरेच सुरक्षित नसतील, तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचं काय? असा संतप्त प्रश्न आता नागरिक विचारत आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशाची धक्कादायक घटना घडली आहे. सर्पदंशामुळे तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारं बदलापूर जवळील बारवी धरण पूर्ण क्षमतेनं भरलं असून आज पहाटे 4 वाजता धरणाच्या 11 दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. गेल्या काही दिवसांपासून पावसाने थोडी उसंत घेतली असली, तरी धरण क्षेत्रात आतापर्यंत २
2002 मिलीमीटर इतक्या दमदार पावसाची नोंद झालीय. त्यामुळे धरण 100% भरून ओव्हरफ्लो झालय. आज पहाटेपासून धरणाच्या सर्व 11 दरवाजांमधून 2500 क्यूसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. बारवी धरणातून ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, मिरा-भाईंदर, आणि औद्योगिक क्षेत्राला मोठा पाणीपुरवठा केला जातो. धरण पूर्ण भरल्यामुळे आता ठाणे जिल्ह्याची आगामी वर्षाची पाण्याची चिंता पूर्णपणे मिटली आहे.धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने प्रशासनाकडून नदीकाठच्या सर्व गावांना सतर्क राहण्याचा इशारा दिलाय.
सिंधुदुर्गच्या तिलारी खोऱ्यातील जंगलात पट्टेरी वाघाचे दर्शन झाले आहे. निसर्ग अभ्यासक विकास माने हे दोडामार्ग पट्ट्यात भ्रमंती करत असताना त्यांनी या पट्टेरी वाघाचा मुक्त संचार कॅमेर्यात कैद केला आहे.
सिंधुदुर्गच्या सह्याद्रीच्या पट्ट्यात तब्बल 12 पट्टेरी वाघांचा अधिवास असल्याची नोंद यापूर्वीच वनविभागाकडून करण्यात आली आहे. हा परिसर सह्याद्री- कोकण वन्यजीव भ्रमणमार्गावरील महत्त्वाचा परिसर आहे त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जंगल हे जैवविविधतेने विपुल असल्याच पुन्हा अधोरेखित झाल आहे.
पावसाळ्याचा निम्मा कालावधी उलटून गेला, मात्र लातूर जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामातील पिकांवर संकटाचे सावट निर्माण झाले आहे, जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे डोळे आता आभाळाकडे लागले आहे.
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर काल एका दिवसात सर्वाधिक 219 विमानांच्या उड्डाणाची नोंद झाली आहे
गोवा जळगाव आणि मुंबई या मार्गावर अतिरिक्त विमानसेवा सुरू झाल्यामुळे विमानांच्या संख्या वाढली आहे गेल्या रविवारी नोंदवलेल्या 216 विमानांच्या हालचालीचा विक्रम अवघ्या आठवड्यातच मोडला गेला.
पीकविमा भरण्यासाठी आज शेवटची तारीख आहे.पीक विम्याच्या सर्व्हरचा शेतकऱ्यांना फटका बसत आहे.दिवसभर सर्व्हर स्लो असल्याने अनेक शेतकरी तासंतास सेंटरवर थांबत आहेत. काल दिवसभर पोर्टल संथ गतीने सुरु होते. त्यामुळे ऑनलाइन विमा भरण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धावपळ होत आहे. सर्व्हरच्या समस्येमुळे अनेक शेतकरी विम्यापासून वंचित राहण्याची भीती आहे.धाराशिव जिल्ह्यात आतापर्यंत 1 लाख 93 हजाराहून अधिक शेतकऱ्यांनी भरला पीक विमाआहे.आज मुदत संपत असल्याने सर्व्हर सुरळीत करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे
मुंबई मेट्रो-५ च्या दुसऱ्या टप्प्यात उल्हासनगरपर्यंत मेट्रो येणार असून, याचे श्रेय घेण्यासाठी दोन्ही पक्षांकडून दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत.भाजपा आमदार कुमार आयलानी यांनी आपण केलेल्या पत्रव्यवहार आणि सरकारकडे केलेल्या पाठपुराव्यामुळेच उल्हासनगरमध्ये मेट्रो येत असल्याचा दावा केला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पाळल्याचेही त्यांनी सांगितले.
पुणे महापालिकेच्या यापूर्वी पाच शाळा आकांक्षा फाउंडेशन ला दिल्यानंतर आणखी आठ शाळेचा प्रस्ताव
प्रति विद्यार्थी 29 हजार रुपये महापालिका आयटीएच मुव्हमेंट आठ शाळा दिल्या जाणार
खाजगी संस्थेकडे दिल्या जाणाऱ्या आठ शाळा
क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे शाळा येरवडा संत गाडगे महाराज इंग्रजी माध्यम शाळा कोंढवा पुण्यश्लोक आहिल्यादेवी शाळा औंध स्वर्गीय विठ्ठलराव तुपे शाळा हडपसर पंडित दीनदयाळ उपाध्याय शाळा कोथरूड आणि आचार्य विनोबा भावे शाळा गंज पेठ सम्राट अशोक विद्या मंदिर कर्वेनगर
धरण क्षेत्रात गेले काही दिवस सुरू असलेल्या पावसामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू होता.
धरणाच्या पाणी पातळीमधील झपाट्याने होत असलेले घट यामुळे कालपासून मुळा मुठा नदीपात्रातील विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.
यंदा खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांमध्ये चांगला पाऊस झाल्याने धरणे काठोकाठ भरली आहेत.
त्यामुळे खडकवासला धरणातून आतापर्यंत १३.७९ टीएमसी पाण्याचा विसर्ग मुठा नदीत झाला आहे.खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चार धरणातून शहराला आणि ग्रामीण भागाला पाण्याचा पुरवठा होतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.