Saam Tv Breaking News Live Updates In Marathi Maharashtra SAAM TV
महाराष्ट्र

Marathi News Live Updates: राज ठाकरेंकडून अभिनेते भरत जाधव आणि दिग्गदर्शक केदार शिंदे यांचा सत्कार

Maharashtra Breaking News Live Updates : आज गुरुवा दिनांक १५ ऑगस्ट २०२४ आजच्या ठळक बातम्या, राजकीय घडामोडी, देशासहित राज्यातील ताज्या अपडेट्स, देश-विदेशातील महत्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Vishal Gangurde

राज ठाकरेंकडून अभिनेते भरत जाधव आणि दिग्गदर्शक केदार शिंदे यांचा सत्कार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अभिनेते भरत जाधव आणि अभिनेते महेश जाधव, दिग्दर्शक केदार शिंदे यांचा सत्कार केला. यावेळी मंचावर अभिनते सिद्धार्थ जाधव, अभिनेते अंकुश चॊधरी उपस्थित होते.

Raju Shetty:  आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांची सोलापुरात गुप्त भेट

आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांची सोलापुरात गुप्त भेट

सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात दोन्ही नेत्यांची तब्बल एक तासापासून चर्चा

दोन्ही नेत्यांच्या भेटीमागे राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी आहे का असा सवाल उपस्थित होतोय.

भेटीचे कारण अद्याप अस्पष्ट मात्र या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चा.

जॉर्जिया मेलोनीने दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करत एका पोस्टमध्ये इटली आणि भारत यांच्यात मजबूत संबंध आहेत आणि मला खात्री आहे की एकत्रितपणे आम्ही चांगले परिणाम साध्य करू. आमचे धोरणात्मक सहकार्य हा भविष्यातील महत्त्वाचा आधारस्तंभ असल्याचं त्या म्हणाल्या.

Hingoli Crime : राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्य विक्रेत्यांचा डाव उधळला

हिंगोलीत केमिकल व मोह वापरून निर्मिती केलेल्या अवैध गावठी दारू साठ्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने धाड टाकून कार्यवाही केली आहे, हिंगोली शहराच्या परिसरात केलेल्या या कार्यवाहीमध्ये चौदाशे लिटर दारूचा साठा पोलिसांनी नष्ट केला आहे

Raj Thackeray : 'सही रे सही'च्या प्रयोगाला राज ठाकरेही असणार उपस्थित

बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात सही रे सही या नाटकाचा ४ हजार ४४४ वा प्रयोग रंगणार आहे. हे नाटक पाहण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील उपस्थित राहणार आहेत. राज ठाकरे यांचा आज बोरिवली येथे दौरा असून याच दौऱ्यानिमित्त पोलिसांचा बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे.

मुंबई गोवा महामार्गावर टँकर पलटी, चालक गंभीर जखमी

मुंबई गोवा महामार्गावर हळवल फाटा येथे मुंबईहून गोव्याच्या दिशेने सिमेंट वाहतूक करणारा टँकर रस्त्याच्या डाव्या बाजूला पलटी झाला. चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने हा अपघात घडला अपघातात टँकरच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने यामध्ये कोणतीह जीवितहानी झाली नाही. चालकाला किरकोळ दुखापत झाल्यामुळे कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

नाशिकमध्ये कला क्रीडा संगणक शिक्षकांचे चार दिवसापासून अन्न त्याग आंदोलन, दोघांची प्रकृती खालावली

नाशिकमध्ये आदिवासी विकास विभाग संगणकासाठी कला क्रीडा संगणक शिक्षकांचे चार दिवसापासून अन्न त्याग आंदोलन सुरू असून दोन आंदोलकांची प्रकृतिक खालावली आहे. भाजप आमदार सीमा हिरे आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत, मात्र आंदोलन आणि डॉक्टरांमध्ये बाचाबाची झाली.

Bachchu Kadu : जेव्हा प्रश्न मार्गी लागेल तेव्हा विश्वास टिकेल : चंद्रकांत पाटील यांच्या भेटीनंतर बच्चू कडू यांची प्रतिक्रिया

प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांच्या कुरळपूर्णा येथील निवासस्थानी भाजपनेते व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं की मला शंका नाही बच्चू कडू हे महा युतीतच राहतील यावर बच्चू कडू यांनी स्पष्टीकरण दिलं,आजची भेट घरगुती भेट होती तर माझा विश्वास जेव्हा टिकून राहील तेव्हा आमचे प्रश्न मार्गी लागतील. विश्वास असणे वेगळा भाग आहे, समस्या असणं वेगळा भाग तर त्याची जुळवाजवळ झाली तरच विश्वास वाढनार, नाही तर कमी होईल अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली

Pune News : पुण्यातील अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेजमध्ये झेंडा वंदन झाल नाही

पुण्यातील अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज मध्ये झेंडा वंदन झालेलं नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. झेंडावंदन कॉलेजमध्ये न करता ते हॉस्पिटलमध्ये करण्यात आल्याची डीन यांनी कबुली दिली आहे.

jayant Patil : बीड जिल्ह्यात पाणी आणण्याचं काम राष्ट्रवादी करेल : जयंत पाटील

रायगड जिल्‍ह्यात स्‍वातंत्र्यदिन उत्‍साहात साजरा

आज 78 वा भारतीय स्‍वातंत्र्यदिन रायगड जिल्‍ह्यात मोठ्या उत्‍साहात साजरा होत आहे. मुख्‍य ध्‍वजारोहण सोहळा अलिबाग येथील पोलीस परेड मैदानावर पार पडला. महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्‍ते ध्‍वजारोहण करण्‍यात आले.

Ajit Pawar News : पुण्यात अजित पवारांच्या उस्थितीत सैनिक संवाद सन्मान सोहळा

पुण्यात अजित पवारांच्या उस्थितीत सैनिक संवाद सन्मान सोहळा पार पडला.

पुण्यातली वडगाव शेरी मतदार संघात सैनिक मेळाव्याचं आयोजन

स्वतंत्रदिनानिमित्त अजित पवार साधना सैनिकांशी संवाद

अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेनिमित्त पुण्यातील वडगाव शेरी मतदारसंघात सैनिक मेळाव्याचे आयोजन

Dada gaikwad Strike Called Off : ससूनबाहेरील दादा गायकवाड यांचं उपोषण मागे

गेल्या दहा दिवसापासून सुरू असलेलं ससून बाहेरील दादा गायकवाड यांच्याकडून उपोषण अखेर मागे घेण्यात आले. दादा गायकवाड यांचे 80 बेवारस पेशंटचा हिशोब ससून देणार आहे. बेवारस पेशंट आणि संबंधित अधीक्षक, विभाग प्रमुख, यांची पुणे पोलिसांकडून चौकशी होणार आहे. तपासामध्ये दोषी आढळल्यास अधीक्षक यलप्पा जाधव आणि विभाग प्रमुख यांच्यावर कारवाई होणार आहे. ससूनचे डीन एकनाथ पवार यांची चौकशी होणार आहे.

Ajit Pawar : माझी विनाकारण बदनामी केली जातेय, माझे मतभेद नाहीत; अजित पवारांचे स्पष्टीकरण

मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात धुसफूस झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.'माझी विनाकारण बदनामी केली जात आहे. माझे त्यांच्याशी मतभेद नाही, असं अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत तृतीयपंथीयांच्या हस्ते ध्वजारोहण

आज 78 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात येत आहे. याच दिनाच औचित्य साधून पिंपरी- चिंचवड शहरात समाजपासून दुरावलेल्या तृतीयपंथींना ध्वजारोहण करण्याची संधी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी उपलब्ध करून दिली.

लेह लडाखमध्ये ITBP जवानांनी साजरा केला स्वातंत्र्यदिन

ITBP जवानांनी स्वातंत्र्यदिन साजरा केला.

लेह लडाखमध्ये तब्बल 14 हजार फुटांवर स्वातंत्र्य दिन साजरा केला.

ज्या ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता, त्या ठिकाणी हातात तिरंगा घेऊन घोषणा देत ITBP जवानांनी 78वा स्वातंत्र्य दिन साजरा केला

 Ahmednagar News :  'वंदे भारत'ला आंदोलनाचा फटका, कोपरगाव रेल्वे स्थानकावर थांबवली ट्रेन 

'वंदे भारत'ला आंदोलनाचा फटका बसला आहे. कोपरगाव रेल्वे स्थानकावर वंदे भारत ट्रेन थांबवली आहे. कोरोनानंतर गाड्या बंद झाल्या आहेत, त्या पूर्ववत कराव्यात, अशी आंदोलकांची मागणी आहे.

Kolhapur News  : स्वातंत्र्यदिनी कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये आत्मदहनाचा प्रयत्न

स्वातंत्र्यदिनी कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये आत्मदहनाचा प्रयत्न एकाने केला आहे.

हातकणंगले तालुक्यातील भादोले गावात पाणीपुरवठा संस्थेसाठी उभारण्यात आलेल्या सोलार पॅनलची चौकशी करण्याची मागणी

सरपंच आणि ग्रामसेवक यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप

कृष्णात भीमराव पाटील या तरुणाने केला आत्मदहनाचा प्रयत्न

अंगावर रॉकेल ओतून घेतात पोलिसांनी घातली झडप

Nanded News : स्वातंत्र्यदिनी नांदेड शहरासह परिसरात दमदार पाऊस

नांदेड जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून पावसाने उघडीप दिली होती. आज स्वातंत्र्यदिनी पावसाने नांदेड शहरासह परिसरात दमदार हजेरी लावली. चार दिवस पावसाने उघडीप दिल्याने शेती पिकाच्या अंतर्गत मशागतीचे कामे करण्यास शेतकऱ्यांना वेळ मिळाला. दरम्यान आजचा हा पाऊस शेती पिकांना चांगला पोषक ठरला आहे. उकड्यापासून देखील नागरिकांना दिलासा मिळाला.

puntamba News : रेल्वे प्रशासनाच्या विरोधात पुणतांबा ग्रामस्थ आक्रमक

रेल्वे प्रशासनाच्या विरोधात पुणतांबा ग्रामस्थ आक्रमक

अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा गावात आज रेलरोको आंदोलन करण्यात आलं.

आंदोलनाला पाठिंबा देत पुणतांबा ग्रामस्थ आणि व्यावसायिकांनी ठेवले गावबंद

पुणतांबा रेल्वे जंक्शन येथे अनेक गाड्यांचा थांबा बंद झाल्याने ग्रामस्थ आक्रमक

Mhada News : म्हाडाची बनावट वेबसाईट अखेर लॉक 

म्हाडाची बनावट वेबसाईट अखेर लॉक करण्यात आली आहे.

मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने ही कारवाई केली.

म्हाडाच्या मुंबई मंडळाने २०३० घरांची लॉटरी जाहीर केली असताना बनावट संकेतस्थळाच्या माध्यमातून फसवणुकीचा घाट

independence day :  पालकमंत्री मुनगंटीवार यांनी फडकावला तिरंगा

चंद्रपुरात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते तिरंगा फडकावण्यात आला. स्वातंत्र्यदिनाचा मुख्य शासकीय सोहळा जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात पार पडला. यावेळी खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार आणि प्रशासनातील सर्व अधिकारी उपस्थित होते.

Jayant Patil News : जयंत पाटील यांना मराठा आंदोलकांचा घेराव

राष्ट्रवादी शरचंद्र पवार गटाचे जयंत पाटील हे काल आणि आज शिवस्वराज्य यात्रेसाठी लातूर दौऱ्यावर आहेत. आज लातूरच्या जय क्रांती महाविद्यालयाचे झेंडावंदन करण्यासाठी जात असताना मराठा समाजाने आडवत निवेदन दिलं. मात्र मराठा आरक्षणावर भूमिका स्पष्ट करण्याच जयंत पाटलांनी टाळल्याने आंदोलन आक्रमक झाले. जयंत पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली.

Chandrakant Patil News  : चंद्रकांत पाटील आज बच्चू कडू यांची भेट घेणार 

भाजप नेते, मंत्री चंद्रकांत पाटील आज आमदार बच्चू कडू यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देणार

बच्चू कडू यांनी चंद्रकांत दादा पाटील यांना दिल आहे स्नेहभोजनाचे निमंत्रण.

अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यातील बच्चू कडू यांच्या कुरळपूर्णा येथील निवासस्थानी भेट देणार

काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनीही दिली होती बच्चू कडू यांच्या निवासस्थानी भेट

चंद्रकांत पाटील आणि बच्चू कडू यांच्यात राजकीय चर्चा होणार का, याकडे सर्वांचे लक्ष

मनसेकडून बांधकाम विभागात ठिय्या आंदोलन

रत्नागिरीच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील टेंडर प्रक्रियेतील भ्रष्टाचार तसेच एकाधिकार शाहीच्या विरोधात रत्नागिरी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. रत्नागिरीत चाललेल्या अनागोंदी कारभाराविषयी अधिकाऱ्यांना जाब देखील विचारण्यात आला. येत्या चार दिवसात समाधानकारक उत्तर देऊन भ्रष्ट अधिकार्‍यांवर कठोर कारवाई केली नाही, तर मनसे स्टाईलने यापुढे आंदोलन केले जाईल, असा इशारा मनसेकडून देण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Assembly Election: नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात राडा,पोलीस ठाण्याबाहेर आमनेसामने

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा गौरव – "रुखवत" लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार

VIDEO : शाब्बास! असं धाडस करायला वाघाचं काळीज लागतं, तरुणानं ३ मजले चढून २ मुलांना आगीतून वाचवलं

Maharashtra News Live Updates: नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात राडा, स्लीप वाटण्यावरून वाद

Pune Crime: थंड वडापाव दिला म्हणून ग्राहक तापला, स्नॅक्स सेंटरचालकाला काचेची बरणी फेकून मारली

SCROLL FOR NEXT