Bhandara Jail अभिजीत घोरमारे
महाराष्ट्र

Bhandara: अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या तरुणाला १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा

Bhandara Crime News: खैरीपट येथील अल्पवयीन मुलगी 5 ऑगस्ट 2016 ला वडसा येथे कॉलेजला जाते म्हणून घरातून निघून गेली होती.

अभिजीत घोरमारे

भंडारा: अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेणाऱ्या तरुणाला जिल्हा सत्र न्यायालयाने दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. भंडारा (Bhandara) जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील खैरीपट येथे सहा वर्षांपूर्वी अल्पवयीन मुलीला (Minor Girl) पळवून नेण्याची घटना घडली होती. मुकेश रमेश गायकवाड (21) रा. खैरीपट, ता. लाखांदूर असे शिक्षा झालेल्या तरुणाचे नाव आहे. (Bhandara Crime News)

हे देखील पाहा -

मिळालेल्या माहितीनुसार, खैरीपट येथील अल्पवयीन मुलगी 5 ऑगस्ट 2016 ला वडसा येथे कॉलेजला जाते म्हणून घरुन निघून गेली होती. अनेक दिवस ती परत आलीच नाही, तिचा शोध घेतला असता तिचा थांगपत्ता लागला नाही. मात्र, काही दिवसांत तिला मुकेश गायकवाड हिने फूस लावून पळवून नेल्याचे पुढे आले. यावरुन लाखांदूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती, दरम्यान मुकेश विरुद्ध पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला. उपनिरीक्षक टी. जी. निंबेकर यांनी तपास करून मुकेश गायकवाड याला अटक केली.

अखेर प्रकरणाचा तपास करुन साक्षीदार आणि पुरावे गोळा करत हे प्रकरण भंडारा येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. साक्षी आणि पुराव्याअंती आरोप सिद्ध झाल्याने अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. एस. खुणे यांनी आरोपी मुकेश गायकवाड याला दहा वर्षे सश्रम शिक्षा ठोठावली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बारामतीत बड्या उद्योजकावर भीषण हल्ला! शहरात खळबळ

Maharashtra News Live Update: मुंबईत गॅंगवॉर खपवूनन घेतला जाणार नाही- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

त्याने आमचं ऐकलं नाही; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर 'अनिल' नावाची पोस्ट व्हायरल

Tiger Shroff Firing Video: दोन सेकंदात ५ राउंड; अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा व्हिडिओ आला समोर

टायगर श्रॉफवर ५ राऊंड फायर, गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; बॉलीवूड हादरलं | VIDEO

SCROLL FOR NEXT