A young man was killed due to love affair in Gondia city Saam TV
महाराष्ट्र

Gondia Crime News: बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याचा राग; भररस्त्यात प्रियकराला संपवलं, भावाचं भयानक कृत्य

Gondia Crime News: बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या रागातून एकाची चाकूने वार करीत निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना गोंदिया शहरात घडली आहे.

Satish Daud

Gondia Crime News

बहिणीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या रागातून एकाची चाकूने वार करीत निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना गोंदिया शहरात घडली आहे. प्रज्वल मेश्राम (वय २० वर्ष) असे मृत तरुणाचे नाव आहे. शहरातील कुडवा येथील गोंडीटोला रोड चौकात रविवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, मृत प्रज्वल याचे आरोपी तरुणाच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध होते. त्यांच्या प्रेमसंबधाची कुणकुण कुटुंबियांना लागली होती. माझ्या बहिणीला फोन करू नकोस, असं आरोपीने मृत तरुणाला सांगितले होते.

मात्र, जीवपाड प्रेम असल्याने मृत प्रज्वल आरोपीच्या बहिणीला वारंवार फोन करीत होता. याच गोष्टीचा राग मनात धरून आरोपीने प्रज्वलचा काटा काढण्याचा (Crime News) कट रचला. त्याने रविवारी रात्री प्रज्वलला फोन करून बोलावून घेतले.

त्यानंतर मित्रांच्या मदतीने चाकूने सपासप वार करीत प्रज्वलची हत्या केली. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच रामनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

या प्रकरणी पोलिसांनी आरोपी तरुणाला ताब्यात घेतलं आहे. त्याचा एक मित्र झटापटीत जखमी झाल्याने त्याला नागपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. घटनेचा पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: मलकापूरमध्ये राजेश एकडे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT