Aurangabad Municipal Corporation
Aurangabad Municipal Corporation Saam Tv
महाराष्ट्र

Aurangabad: पाणीप्रश्न सोडविण्यासाठी महापालिकेची अनोखी शक्कल

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद - शहराचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी आता महापालिकेने (Aurangabad Municipal Corporation) अनोखी शक्कल लढवली आहे. शहरातील ड्रेनेज वाहिन्यांतून जाणाऱ्या पाण्यावर कांचनवाडी येथील सिव्हरेज ट्रीटमेंट प्लान्टमधील (एसटीपी) प्रक्रियायुक्त ८० एमएलडी पाण्यापैकी ३० एमएलडी पाण्यावर आरओ सिस्टीमद्वारे प्रक्रिया करण्याचे ठरविण्यात आले आहे. हे प्रक्रियायुक्त पाणी स्वतंत्र वाहिनीद्वारे कांचनवाडी (kanchanwadi) येथून फारोळा जलशुद्धीकरण केंद्रावर नेले जाणार आहे.

तेथून हे पाणी शहरवासीयांना पिण्यासाठी पुरविले जाणार आहे. तर उर्वरित ५० एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करून ते बांधकामांसह उद्योग, शेती, उद्यानांसाठी वापरात आणण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. मनपाचे तत्कालीन प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी यासंबंधीच्या प्रस्तावास जाता-जाता मंजुरी दिली आहे.

हे देखील पाहा -

केंद्र सरकारच्या अमृत-२ मिशनअंतर्गतयासाठी निधी मिळविण्यासाठी मनपा प्रशासनाने पीएमसीकडून प्राथमिक अंदाजानुसार १७४ कोटी १२ लाख ६२ हजार रुपयांचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे पाठविला जाणार आहे. कांचनवाडी येथील एसटीपीवर शहरातील ड्रेनेज वाहिन्यांतून ६० एमएलडी पाणी जाते तर सातारा देवळाई भागातून २३.१२ एमएलडी ड्रेनेजचे पाणी येते. अशा प्रकारे सरासरी ८० एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करून हे पाणी वापरात तसेच ५० एमएलडी पाणी शेती उद्योगांनाही देणार नागरिकांना पिण्यासाठी देण्याचा मनपाचा प्रयत्न असल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे.

त्यानुसार, शुद्ध पाणी प्रकल्प उभारणे, यासाठी सर्वेक्षण करणे, विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी पीएमसी नियुक्त करणे तसेच अमृतअंतर्गत मनपाचा हिस्सा म्हणून टाकाव्या लागणाऱ्या १० ते ३० टक्के रकमेची तरतूद मनपाच्या बजेटमध्ये करणे व या प्रकल्पासंबंधीचे आवश्यक निर्णय घेण्याचे अधिकार आयुक्तांना प्रदान करण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashi Bhavishya: आजचे राशिभविष्य, एप्रिल महिन्याच्या शेवटचा दिवस तुमच्यासाठी काय घेऊन आलाय?

Amrita Pandey: प्रसिद्ध अभिनेत्री फ्लॅटमध्ये मृतावस्थेत आढळली; मृत्यूच्या काही तास आधीचं व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस व्हायरल

Johnny Lever: कोण आहे आमिर खान? मुलाखतीदरम्यान जॉनी लीव्हर काय म्हणाला? VIDEO

KKR vs DC: इडन गार्डनवर दिल्लीचा दारूण पराभव; कोलकताचा ६वा विजय

Maharashtra Election:'..त्यांचा सत्यानाश होणार'; अकलूजमधून फडणवीसांचा मोहिते-पाटलांना इशारा

SCROLL FOR NEXT