हिंगोली : घर बांधण्यासाठी गृहकर्ज (HomeLoan) मंजूर करून देतो म्हणून मध्यप्रदेशातील (MP) आरोपीने हिंगोलीतल्या एका शिक्षकाला पंचवीस लाखांचा चुना लावला आहे. या प्रकरणी फसवणूक झालेले शिक्षक विजय कदम यांच्या तक्रारीवरून मध्यप्रदेशातील आरोपी कृष्णकांत सूरी यांच्या विरोधात आखाडा बाळापूर पोलिसात विरोधात (Akhada Balapur Police) फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे देखील पहा -
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार आरोपीने फिर्यादी शिक्षकास पन्नास लाखांचे ग्रहकर्ज मंजूर करून देतो म्हणत आमिष दाखवले, या साठी आरोपीच्या खात्यावर अगोदर ऑनलाईन पैसे ट्रान्सफर (Online money transfer) करावे लागतील असेही सांगितले. फिर्यादीने पैसे पाठवल्यानंतर आरोपीने, अनेक बनावट कागदपत्रे दाखवून तब्बल 25 लाख 76 हजार रुपये कदम यांच्याकडून उकळले, मात्र त्या नंतर आपली फसवणूक झाल्याचे कदम यांच्या लक्षात आले व त्यांनी तक्रार दाखल केली, दरम्यान या आरोपीच्या शोधासाठी बाळापूर पोलीस लवकरच मध्यप्रदेशात जाणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान याप्रकरणामुळे लोकांनी सतर्क रहात ऑनलाईन फसवेगिरी (Online fraud) करणाऱ्यापासून सावध राहण्याचे आवाहन देखील पोलिसांनी केले आहे.
Edited By - Jagdish Patil
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.