शांतिनिकेतन लोकविद्यापीठात शौर्यगाथा सांगणारा रणगाडा विजय पाटील
महाराष्ट्र

शांतिनिकेतन लोकविद्यापीठात शौर्यगाथा सांगणारा रणगाडा

अनेक युध्दात पराक्रम गावजलेला रणगाडा आता शांतिनिकेतनमध्ये आल्याने हे विद्यापीठ शौर्यगाथा सांगणारे प्रेरणास्थान बनले आहे.

विजय पाटील, साम टीव्ही, सांगली

सांगली: अनेक क्षेत्र गाजवणारे विद्यार्थी सांगलीच्या शांतिनिकेतन लोकविद्यापीठाने घडवले आहेत, तर क्रीडा क्षेत्रात शांतिनिकेतनचा नावलौकिक आहे. अनेक युध्दात पराक्रम गावजलेला रणगाडा आता शांतिनिकेतनमध्ये आल्याने हे विद्यापीठ शौर्यगाथा सांगणारे प्रेरणास्थान बनले आहे. (A tank that tells the story of heroism at Shantiniketan Lok Vidyapith sangli)

हे देखील पहा -

1971 च्या पाकीस्तान युध्दात अनेक कामगिरीमध्ये सहभागी झालेला टी-55 बॅटल टैंक (रणगाडा)

1966 मध्ये भारतीय सेना दलात आलेला आणि त्यानंतर 1971 च्या पाकीस्तान युध्दात अनेक कामगिरीमध्ये सहभागी झालेला टी-55 बॅटल टैंक (रणगाडा) शांतिनिकेतन लोकविद्यापीठामध्ये स्थापित करण्यात आला. आज जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण करण्यात आले. नवभारत शिक्षण मंडळाचे अध्यक्ष विशाल पाटील, कार्याध्यक्ष गणपतदादा पाटील, ब्रिगेडियर सुरेश पाटील यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

1971 च्या पाकिस्तान युध्दामध्ये पश्चिम बॉर्डरवर 36 इन्फन्टरी डिव्हीजनच्या शिंदे हॉर्स युनिटने 8 डिसेंबर 1971 रोजी शक्करगढच्या बाजुने चढाई केली होती. 10 डिसेंबर 1971 रोजी भारतीय सैन्याने शत्रूचे आठ टँक नष्ट केले होते. या युध्दात शिंदे हॉर्सला एक महावीर चक्र, दोन वीर चक्र, एक सेना मेडल आणि चार मेनशन इन डिसपॅचेसने सन्मानित करण्यात आले होते. असा वैशिष्टपूर्ण टी-55 बॅटल टैंक युवावर्गाला राष्ट्रप्रेमाबाबत प्रेरीत करण्याच्या उद्देशाने ट्राफीच्या स्वरुपात नवभारत शिक्षण मंडळाला सुपूर्द करण्यात आला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Priyanka Gandhi : जातनिहाय जनगणनेसाठी काँग्रेस आक्रमक; प्रियंका गांधींचे PM मोदींना ओपन चॅलेंज

Walnut: दूध की पाणी? अक्रोड कशात भिजवून खाणे जास्त फायदेशीर

Rohit Sharma Son: रोहित शर्माने मुलाचं नाव काय ठेवलं?

Uddhav Thackeray Exclusive: मुख्यमंत्रिपद ते भाजपसोबत युती आणि शिंदेसेना ते राज ठाकरे; उद्धव ठाकरेंची Exclusive मुलाखत

Tourism Place: मनमोहक दृश्ये अन् सुंदर नजारा; कोकणातील या गावात वाहने नाही तर दारासमोर होड्या केल्या जातात पार्क

SCROLL FOR NEXT